द मिसिंग ....ख्रिस मुनी
अनुवाद ...नारायण पै
मेहता पब्लिशिंग हाऊस
साधारण चोवीस वर्षांपूर्वी मेलनी, स्टेफी आणि डार्बी निर्जन जागी बियर पीत होत्या . त्याचवेळी एका स्त्रीची गळा दाबून हत्या होताना त्यांनी पाहिली. त्यांनी 911 ला फोन केला पण पोलिसांना काही सापडले नाही. उलट खुन्याच्या हातून स्टेफी मारली गेली आणि मेलनी बेपत्ता झाली .हल्लेखोर काही दिवसांनी मारला गेला असे जाहीर करण्यात आले.
आता डार्बी मॅकोर्मीक पोलीस अधिकारी झालीय. एका गुन्हा घडलेल्या जागी तिला एक तरुण मुलगी सापडते.ती अतिशय घाबरलेली आणि बरेच दिवस कैदेत असलेली वाटते. तिच्याविषयी तपास करताना अजून एक मुलगी त्या मुलीसोबत होती असे डार्बीला कळते. पण या तपासात पुढे काय काय सापडेल याची कल्पना डार्बीला नसते आणि जेव्हा कळते तेव्हा ती हादरून जाते.
गेल्या वीस वर्षांत अनेक महिला आणि तरुणींचे अपहरण झालेय. यात जे अपराधी आहेत त्यांचा संबंध डार्बी आणि तिच्या बेपत्ता मैत्रिणींशी आहे . तो खुनी अजूनही डार्बीला शोधतोय .तर आजही डार्बी मेलनीचा शोध घेतेय.
No comments:
Post a Comment