Legends
लिजंडस
1990 च्या सुमारास इंग्लंडमध्ये अंमली पदार्थांचे प्रमाण वाढले होते. यात काही मंत्र्यांच्या आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या मुलांचा बळी गेला होता.पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचा उतरता काळ सुरू झाला होता म्हणून त्यांनी अंमली पदार्थांविरुद्ध कठोर पावले उचलण्याची घोषणा केली. त्यांनी यासाठी कस्टमला जबाबदार धरले. इंग्लंडमध्ये ड्रग कसे येते ? याचा छडा लावायची आज्ञा दिली.
पण कस्टम खाते कमकुवत होते .त्यांना फारसे अधिकार ही नव्हते. पण ब्लेकचा आपल्या लोकांवर विश्वास होता. त्याने ऑफिसर डॉनला एक गुप्त टीम बनवायला सांगितले. या टीमला कोणतेही फायदे मिळणार नव्हते ना मेडल . या गुप्त मोहिमेसाठी फारसे पैसे ही मंजूर केले नव्हते.सर्व काही स्वतःच्या जबाबदारी वर करायचे होते.
कस्टमच्या वीस हजार कर्मचाऱ्यात कोणतरी असे असतील जे देशाचा विचार करून काम करत असतील असे डॉनला वाटते आणि तो हवी तशी माणसे शोधायचा सुरवात करतो .शेवटी त्याला दोन पुरुष आणि दोन स्त्रिया या कामगिरीसाठी योग्य वाटतात. त्यांना कमी दिवसात अतिशय तुटपुंजे ट्रेनिंग देऊन या कामगिरीसाठी तयार केले जाते.
इंग्लंडमध्ये ड्रग पाकितानातून अफगाणिस्तान , इराण ,तुर्की असा प्रवास करत येते. दोन ड्रग माफिया यामध्ये सक्रिय आहेत. डॉन आपल्या टीमचे दोन भाग करून त्या दोन्ही माफियांच्या मागावर राहतो.
एकूण दोन टन माल पाकिस्तानातून समुद्रमार्गे येणार आहे. तो माल पकडण्यात डॉनची टीम यशस्वी होईल ?
या सहा भागाच्या सिरीजमध्ये अजिबात हिंसा नाही .ना गोळीबार ,ना बेफाम पाठलाग .माफिया आणि कस्टम आपापल्या प्लॅनिंगनुसार चालले आहेत. इथे कोणी हाणामारी करणारा हिरो नाही खलनायक नाही. पण संपूर्ण सिरीज तणावपूर्ण आहे.आपण ही सिरीज पूर्ण होत नाही तोपर्यंत उठू शकणार नाही .
No comments:
Post a Comment