American Manhunt : Osama bin laden
अमेरिकन मॅन हंट : ओसामा बीन लादेन
9/11/ 2001 अमेरिकेच्या वर्ड ट्रेंड सेंटरवर आत्मघाती हल्ला होऊन दोन्ही इमारती बेचिराख झाल्या . अल कायदा गटाने हे कृत्य केले आणि त्याचा प्रमुख ओसामा बीन लादेनचे नाव प्रमुख आरोपी म्हणून घेतले गेले.
राष्ट्राध्यक्ष बुश यांनी ओसामा बीन लादेनला जिवंत किंवा मृत पकडण्याचे आदेश दिले.अमेरिकेतील प्रत्येक गुप्तहेरखात्याचे ओसामा बीन लादेन हेच प्रमुख लक्ष होते. त्यासाठी अफगाणिस्तानमध्ये तालिबानशी युद्ध केले .तोरा बोराच्या हल्ल्यात ओसामा बीन लादेन मरण पावला अशीच सगळ्यांशी समजूत झाली पण काही वर्षांनी त्याने लंडन आणि इतर युरोपियन देशात आत्मघाती हल्ले झाले आणि ओसामा बीन लादेन जिवंत आहे हे जगाला कळले.
आता बुश नंतर बाराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि ओसामाला पकडण्याची मोहीम तीव्र झाली. शेवटी ओसामा बीन लादेन पाकिस्तानात आहे असे सूत्रांनी माहिती दिली आणि सुरू झाली एक मोहीम .
अतिशय वेगवान अशी ही सिरीज तीन भागात आहे. यात सीआयए ,एफबीआय आणि या मोहिमेत जे सामील होते त्यांचे अनुभव यात आहेत .
अंगावर काटा आणणारी ही सिरीज नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.
No comments:
Post a Comment