Monday, May 12, 2025

The Irregulars

The Irregulars
 द ईरेग्युलरस
ह्या कथेत शेरलॉक होम्स आणि डॉ. वॉटसन आहेत पण त्यांची भूमिका दुय्यम आहे .त्यातही ही कहाणी डॉ. वॉटसनवर जास्त आधारित आहे..
लंडनमध्ये सतरा वर्षाची  बी आपली पंधरा वर्षाची बहिण जेसी  आणि बिली ,स्पाईक या मित्रांसोबत राहतेय.
जेसीत काही अमानवीय शक्ती आहेत. तिला भुयारात अडकल्याची स्वप्ने पडतात. डॉ. वॉटसनला त्यांच्या या शक्तीविषयी माहीत आहे आणि त्यांच्या माध्यमातून तो काही विचित्र केस सोडवतो.
पण महत्वाचे आहे शेरलॉक होम्सला शोधणे.काही वर्षांपासून एका केसच्या तपासात शेरलॉक गायब झालाय.या केसचा संदर्भ काही अमानवीय शक्तींशी होता यात शेरलॉकची प्रेमिका ही गायब झालीय.
इंग्लडचा राजपुत्रही सामान्य मुलगा असल्याचे भासवून बीच्या गॅंगमध्ये सामील झालाय.
जेसीकाला या शक्ती कुठून मिळाल्या याचा शोधही बीला घ्यायचा आहे.काहीजण आपल्या शक्तीचा वापर करून दुसऱ्या जगाचा दरवाजा शोधण्याचा प्रयत्न करतायत आणि तसे झाले तर संपूर्ण मानव जात नष्ट होईल .
बी आणि तिची गॅंग शेरलॉकला शोधून काढेल का ?
डॉ. वॉटसनची यात कोणती भूमिका आहे ?
सर आर्थर कॉनल डोयल यांच्या वर्क्सवर आधारित ही रहस्यमय थरारक सिरीज नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे .

No comments:

Post a Comment