L 2: Empuraan
L 2 :एमपूरण
ज्यांनी ल्युसिफर पाहिला असेल त्यांना हा चित्रपट नवीन नसेल .
UIF पार्टीच्या जतिन रामदासला केरळच्या मुख्यमंत्रीपदावर बसवून स्टीफन नाहीसा होतो.स्टीफन खरा कोण आहे हे कोणालाच माहीत नाही.त्याला ल्युसिफरही म्हटले जाते तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीजगात त्याला अब्राहम कुरेशी हे नाव आहे.अब्राहम कुरेशीचा साधा फोटोहो जगातील कोणत्याच एजन्सीकडे नाही.
आता पाच वर्षानंतर केरळच्या राजकारणात खूप बदल घडून आलेत.मुख्यमंत्री जतिन रामदास आता भ्रष्टाचारी नेता बनलाय. त्याने बाबा बलदेवशी हातमिळवणी केलीय.बाबा बलदेव हा पूर्वाश्रमीचा बलराज पटेल ज्याने शेकडो मुस्लिम मारले होते.
प्रियदर्शनी रामदास आपल्या भावाला विरोध करते पण तो तिचेही ऐकत नाही . पत्रकार गोवर्धन सगळ्या गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून आहे.स्टीफनला ल्युसिफर हे नाव त्यानेच दिलंय.
गोवर्धन ल्युसिफरशी संपर्क साधून पुन्हा केरळात स्टीफन बनून यायला सांगतो.
इराक येथील एका हल्ल्यात स्टीफनचा मृत्यू झालाय असे जाहीर होते.प्रियदर्शनी रामदासच्या सभेत तिच्यावर हल्ला होतो तेव्हा स्टीफन तिथे येतो आणि मग सुरू होते एक भयानक राजकारण .
स्टीफन बाबा बलदेव आणि जतिन रामदासपासून केरळला वाचवू शकेल. अब्राहम कुरेशी नक्की कोण आहे .त्याचे दुश्मन जगभरात पसरलेले आहेत .चीनचा मोठा ड्रग माफिया आता सक्रिय झालाय आणि त्याने अब्राहम कुरेशीला चॅलेंज केलंय ते आपण तिसऱ्या भागात पाहू.
चित्रपट फक्त आणि फक्त मोहनलालचा आहे.त्याची थंड नजर ,आत्मविश्वास तो कोण आहे हे पुरेपूर उभे करतो.
बाकी पृथ्वीराज ,अभिमन्यू सिंह,टोविनो थॉमस ,मंजू वारीयर आपापल्या भूमिकेत व्यवस्थित आहेत .
तिसऱ्या भागात काय घडेल याची माहिती आपल्याला शेवटी मिळतेच.
चित्रपट हॉटस्टारवर हिंदी भाषेत आहे.
No comments:
Post a Comment