The General's Daughter
द जनरलस डॉटर
पॉल ब्रेनर आर्मी पोलीस ऑफिसर .प्रामाणिक आणि अतिशय हुशार . त्याला गुप्त राहून काम करायला आवडते.
सध्या जोसेफ कॅम्पेबल आर्मीचा जनरल आहे. पण तो आता निवृत्त होऊन राजकारणात प्रवेश करणार अशी बातमी आहे. त्याची मुलगी एलिसाबेथही आर्मीत कॅप्टन पदावर आहे. त्यावेळी अमेरिकेने नुकतीच आर्मीमध्ये महिलांना संधी दिली होती त्यामुळे फारच कमी महिला आर्मीत होत्या.कॅप्टन एलिसाबेथ त्यांच्या डिव्हिजनमध्ये हुशार ऑफिसर होती.
एके रात्री कॅप्टन एलिसाबेथ आर्मी बेस ग्राउंडवर मृतावेस्थेत आढळते .तिला बांधून ठेवलेले असते .गळ्याभोवती दोरी आवळलेली आणि अंगावर एकही कपडा नसतो. प्रथमदर्शनी तिच्यावर बलात्कार होऊन नंतर खून झालाय असेच दिसते.
पॉल ब्रेनरची या केसच्या तपासाची जबाबदारी येते. त्याच्या जोडीला जुनी मैत्रीण आणि बलात्कार स्पेशालिस्ट सारा सनहिल मदतीला येते.
एका जनरलच्या मुलीची हत्या ही बातमी अमेरिकन सैन्यासाठी धोकादायक आहे.अश्या बातमीमुळे कोणीही महिला सैन्यात येणार नाही .जनरल दोन दिवसांची मुदत पॉलला देतो . त्यानंतर मीडिया आणि एफबीआय यांचा प्रवेश होणार हे निश्चित .
पॉल आणि सारा जसजसे या प्रकरणाचा शोध घेतात तेव्हा काही अनपेक्षित गोष्टी नजरेस पडतात . सात वर्षांपूर्वी घडलेल्या एका गोष्टीशी या खुनाचा संबंध आहे .
एक चक्रावून टाकणारा तपास जो आपल्याला अनपेक्षित धक्का देतो .
जॉन ट्राव्हेलटाने आर्मी ऑफिसर पॉल ब्रेनर दिमाखदारपणे उभा केलाय .तर त्याच्या साथीला मेलेडीन स्टोव्ह आहे.
1999चा हा गाजलेला चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.
No comments:
Post a Comment