Saturday, May 10, 2025

T-34

T-- 34
टी- 34
युद्धात रणगाड्याचे किती महत्व असते हे सांगणारा हा चित्रपट.
दुसरे महायुद्ध सुरू असताना  मास्कोच्या बाहेर लाल सैन्य अर्थात रशियन बेस असतो.त्या बेसवर आता एकच रणगाडा T- 34 आहे आणि नेतृत्व करायला कोणी नाही .त्याचे इतर सैनिक आता निरुत्साही आहेत. त्याच वेळी निकोलाई त्या रणगाड्याचे नेतृत्व स्वीकारायला येतो .निकोलाई रणगाड्यात कुशल आहे .तो आपल्या चार जणांच्या तुकडीला घेऊन जर्मनीचे अनेक रणगाडे निकामी करतो.पण त्या सर्वांना अटक होते.आणि T 34 जर्मनीच्या ताब्यात जातो.
चार वर्षानंतर जर्मनीला T 34 शिकवणारे हवेत .कारण त्यांच्या पँथर रणगाड्याला फक्त T -34 च टक्कर देऊ शकतात .त्यामुळे जर्मन कर्नल क्लाउस निकोलाईला T 34 तयार करायला भाग पाडतो. निकोलाई आपल्या तुकडीला घेऊन T 34 तयार करून तुरुंगातून पळून जाण्याची योजना आखतो.
आता ट्रेनिंगच्या दिवशी सुरू होतो खरोखरचा थरार . T 34  जर्मन पँथर रणगाड्यांना कशी टक्कर देऊन पळ काढतात हे पाहणे चित्तथरारक आहे.
एक अप्रतिम युद्धपट असेच या चित्रपटाचे वर्णन करता येईल .
चित्रपट प्राईमवर इंग्रजी भाषेत तर हॉटस्टारवर हिंदी भाषेत आहे.

No comments:

Post a Comment