Kerala Crime Files
केरळ क्राईम फाईल्स 2
क्राईम थ्रिलरच्या बाबतीत केरळ चित्रपटसृष्टी नेहमीच आघाडीवर राहिली आहे .केरळ क्राईम फाईलचे दोन्ही सिझन उत्कृष्ट आहेत. सिझन दोनमध्ये थोडा वेगळेपणा आहे .
इन्स्पेक्टर अंबिली राजूला निवृत्त व्हायला दोन वर्षे बाकी आहे.एक प्रामाणिक आणि सनकी इन्स्पेक्टर म्हणून त्याची ओळख आहे.केरळ पोलिसखात्यात अनेक ऑफिसरच्या बदली झाल्यात.त्यात अंबिली राजूचे नाव आहे. पण तो अचानक गायब झालाय.सिनियर इन्स्पेक्टर वर्गीसची बदली त्याच्या विभागात झालीय.
आजारी आणि निवृत्त पोलीस कुत्र्यांचे शेल्टर होम आहे.शहरात नुकतीच एका ज्वेलर्सकडे चोरी झाली आणि तपासकार्य करणारा कुत्रा अचानक विचित्र वागू लागतो . तो आजारी असल्यामुळे त्या शेल्टरमध्ये आलाय.डॉक्टरने त्याची तपासणी करून एक्सरे काढायला सांगितले होते.
अंबाली राजूचा शोध चालू होतो. हा शोध कुठून सुरू होतो आणि कुठे संपून त्यातून कोणते सत्य बाहेर पडते हे पाहून आपण हादरून जातो.
No comments:
Post a Comment