Thug Life
ठग लाईफ
1994 सालात एके दिवशी सकाळी जुन्या दिल्लीत गँगस्टर सदानंद यादव आणि त्याचा प्रतिस्पर्धी रंगाराया शक्तीवेलू आणि त्याचा भाऊ माणिकम मिटिंगसाठी एकत्र येतात . पण सदानंद यादवने या मिटिंगची माहिती आधीच दिल्ली पोलिसांना दिलेली असते .पोलिसांनी त्या चाळीला वेढा घातलेला असतो.
सहा वर्षाचा अमर आपल्या वडिलांसोबत चाळीत पेपर टाकतोय .त्याच्यासोबत त्याची चार वर्षांची बहीण चंद्राही आहे.अचानक गोळीबार सुरू होतो आणि अमरचा बाप त्यात मारला जातो.शक्ती अमरला वाचवतो पण चंद्रा या गोंधळात हरवते . पुढे अमर मोठा होऊन शक्तीवेलूचा उजवा हात बनतो .
शक्तीवेलू आणि सदानंदची दुश्मनी अजून चालू आहे .आता सदानंद राजकारणात प्रवेश करतोय. आपल्या नंतर सगळा कारभार अमर पाहिल हे शक्तीवेलूने जाहीर केलंय. बारमधून सोडवून आणलेली इंद्राणी शक्तीवेलूची रखेल म्हणून राहतेय .पण अमरही तिच्यावर प्रेम करतोय.
अमरच्या वडिलांना शक्तीवेलूने गोळी घातली हे माणिकम आणि त्याचे साथीदार अमरच्या डोक्यात भरवितात आणि अमर शक्तीवेलूला मारण्याचा प्लॅन करतो.
मानस सरोवर यात्रेला शक्तीवेलू त्याच्या साथीदारांसोबत जातो आणि तिथेच शक्तीवेलू सर्व हल्ला करतात . खोल दरीत शक्तीवेलू फेकला जातो .सर्वाना वाटते तो मेलाय.
पण खरंच शक्तीवेलू मेलाय .यमराजाचे आपल्यावर प्रेम आहे .तो मला सोडून माझ्या जवळच्या माणसांना मारतो असे शक्तीवेलू नेहमीच म्हणतो . ते खरे आहे का ??
कमल हसन ,मणिरत्नम, ए. आर. रहमान यांनी एकत्र येऊन बनविलेला हा चित्रपट टिपिकल गुन्हेगारीविश्वावर आधारित आहे .यात फितुरी आहे ,धोकेबाजी आहे आणि नंतर टिपिकल बदला आहे.संपूर्ण चित्रपट कमल हसनचा आहे .
No comments:
Post a Comment