Kuberaa
कुबेर
बंगालच्या उपसागरात तेलाचा प्रचंड साठा मिळतो. ह्या तेलाचे कॉन्ट्रॅक्ट प्रसिद्ध उद्योगपती नीरज मित्राला हवेय. त्यासाठी मंत्री सिद्धप्पा त्याच्याकडे एक लाख कोटीची मागणी करतो. पन्नास हजार कोटी कॅश तर पन्नास हजार कोटी स्विस अकाउंटला . त्यांच्याकडे कोणाला किती पैसे द्यायचे याची लिस्ट आहे पण इतक्या मोठ्या रकमा देणार कश्या.
दीपक तेज एक प्रामाणिक सीबीआय ऑफीसर .भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन तो तुरुंगात आहे.आता तो सिस्टीमवर चिडून नीरज मित्राला मदत करण्याचे ठरवितो. त्यासाठी तो तिरुपतीच्या चार भिकाऱ्यांची निवड करतो.देवा निरक्षर आहे पण त्याची स्मरणशक्ती दांडगी आहे. खुशबू गरोदर आहे. एक नेपाळी आहे तर एक थोडा अधू. ह्या चार भिकाऱ्यांना घेऊन दीपक मुंबईत येतो.
चारही जणांच्या नावाने तो खोट्या कंपनी उभ्या करून प्रत्येकाच्या अकाउंटवरून प्रत्येकी दहा हजार कोटी स्विस अकाउंटला ट्रान्स्फर करायची योजना असते.ट्रान्सफर पूर्ण झाल्यावर नीरज त्यांना ठार करायचा हुकून देतो. योगायोगाने ती योजना देवाला कळते पण त्याआधीच दोन भिकारी ठार झालेले असतात.
देवाच्या वेळी पैसे ट्रान्स्फर होत नाही आणि देवा स्वतःची सुटका करून घेतो. पैसे ट्रान्सफर करण्यासाठी देवाचे जिवंत राहणे आवश्यक आहे. देवाला ह्याविषयी काहीच माहिती नाही.पण आपल्याला ठार मारणार या भीतीने तो पळतो आणि रेल्वे स्टेशनवर समीरा भेटते.समीरा आपल्या मित्रांसोबत पळून जाणार आहे पण तो येतच नाही. नाईलाजाने का होईना समीरा देवाला मदत करते आणि स्वतःचा जीव धोक्यात घालते.
आता दीपक आणि नीरजची माणसे देवा आणि समीराच्या मागावर आहे. देवा आणि समीरा स्वतःचा जीव वाचवून हे सर्व प्रकरण उघडकीस आणतील का ?
नागार्जुनने दिपक तेज या हताश आणि असहाय्य सीबीआय ऑफिसर आणि काही अंशी खलनायकाची भूमिका रंगवली आहे.चित्रपटात त्याची भूमिका मोठी दिसते. धनुष्यने भिकारी देवा रंगविला आहे. भिकार्याची निरागसता ,बोलणी खाताना रडवेला चेहरा खरोखरच्या भिकार्याची आठवण करून देतो.रश्मीका हतबल झालेली आणि नाईलाजाने मदत करणारी समीरा झाली आहे.
No comments:
Post a Comment