ACE
एस
कन्नन बोल्ट तुरुंगातून सुटल्यावर एक चांगले आयुष्य जगण्यासाठी मलेशियाला येतो. तिथे चुकून त्याची भेट अरीवूशी होते.अरीवू खरे तर भंगार विकून जगणारा माणूस पण आपल्या मैत्रिणीला इम्प्रेस करण्यासाठी तो मोठा उद्योगपती असण्याचा आव आणतो. त्याची मैत्रीण कल्पना एक छोटे हॉटेल चालवते आणि तिच्यावर मोठे कर्ज आहे .बोल्ट कन्नन तिच्या हॉटेलमध्ये नोकरी करतो.
रुक्मिणी उर्फ रिक्कू सावत्र बापासोबत राहतेय. तिचा सावत्र बाप राजदुराई भ्रष्ट पोलीस ऑफिसर आहे .तो घरातून निघून जाण्यासाठी रिक्कूकडे मोठ्या रकमेची मागणी करतो .ती रक्कम द्यायला रिक्कू दिवसरात्र काम करतेय.
बोल्टचे रिक्कूवर प्रेम आहे आणि तिच्यासाठी तो काहीही करू शकतो . तिचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी तो दहा हजार रुपयांचा जुगार खेळतो आणि मोठी रक्कम हरतो.
कॅसिनोचा मालक धर्मा त्याला पैसे परत करण्यासाठी काही दिवसांची मुदत देतो. नाईलाजाने बोल्ट एक पैश्याची व्हॅन लुटण्याची योजना आखतो .
तो याकामात यशस्वी होईल का ? काम पूर्ण झाले तरी अजून बरेच प्रॉब्लेम त्यांच्या मागे आहेत . तो यातूनही बाहेर कसा पडतो हे बघण्यासारखे आहे .
सुरवातीला साधी प्रेमकथा वाटणारा हा चित्रपट पुढेपुढे रोमांचक थ्रिलर होत जातो .
विजय सेथुपती आणि योगीबाबू प्रमुख भूमिकेत आहेत .
No comments:
Post a Comment