क्लिओपात्रा.......... सुनिल जावळे
मनोरमा प्रकाशन
जगातील पहिल्या दहा हुकूमशहापैकी एक म्हणून ओळखली जाणारी इजिप्तची राणी क्लिओपात्रा. इतिहासात एक बदनाम ,बदफैली राणी म्हणून तिला ओळखले जाते.आपल्या सुंदर ,मादक रूपाच्या जाळ्यात रोमच्या हुकूमशहाना गुंडाळून तिने इजिप्तचे साम्राज्य उभारले . लेखकाने अतिशय सोप्या आणि ओळखीच्या भाषेत ही राणी आपल्यापुढे उभी केली आहे . युद्धात, तसेच राजकारणात ती एक हुशार राणी होती. ज्युलियस सीझर या रोमच्या हुकूमशहाला आपल्या प्रेमात पागल करून तिने इजिप्तचे राज्य हासिल केले. सिझरच्या मृत्युनंतर त्याच्या विश्वासू मित्राला जवळ केले आणि इजिप्तची भरभराट केली.लेखकाने युद्धाची वर्णने अतिशय अभ्यासपूर्ण रंगवली आहेत. सिझरच्या खुनाचा प्रसंग तर आपल्या समोर घडतोय असे वाटते. क्लिओपात्राची खरी ओळख होण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे .
Friday, March 23, 2018
क्लिओपात्रा.......... सुनिल जावळे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment