Monday, July 31, 2023

THE COVENANT

THE COVENANT
द कॉवेनंट
अफगाणिस्तानात जेव्हा अमेरिकी सैन्य तालिबानच्या मागावर होते तेव्हा त्यांना दुभाष्याची गरज लागत होती.हे दुभाषीही त्यांना नीट पारखून घ्यावे लागत.
जॉन किंली आणि त्याची त्याची टीम अफगाणिस्तानातील शेवटच्या दौऱ्यात होती.त्यांचा दुभाषी मारला गेला होता .आता त्यांना अहमद नावाचा दुसरा दुभाषी भेटला होता.अहमद मितभाषी शांत होता त्याची निर्णय घेण्याची क्षमता होती.आत्मविश्वास होता. 
तालिबानचे हत्यारांचे कारखाने शोधणे आणि ते नष्ट करणे हे जॉनच्या तुकडीचे प्रमुख काम. साधारणतः सैनिक आणि दुभाषाचे एक ट्युनिंग जुळायला लागते.जॉनचा अहमदवर फारसा विश्वास नव्हता .कदाचित ते पहिल्यांदाच एकत्र काम करत होते म्हणून असावे.पण अहमदची जॉनला खूप मदत झाली .
एके दिवशी बेसपासून साधारण 120 किलोमीटर दूर तालिबानचा शस्त्रांचा कारखाना आहे अशी बातमी जॉनच्या तुकडीला लागते. बेसपासून साधारण तीन तासांचा प्रवास जॉन आणि त्याची तुकडी सुरू करते. 
हातघाईची लढाई होऊन जॉन तो कारखाना नष्ट करतो पण दुर्दैवाने त्याला अपेक्षित नसलेले शेकडो तालिबानी त्यांच्यावर हल्ला करतात .हा हल्ला इतका जोरदार असतो की त्यात जॉनचे सगळे साथीदार मारले जातात .पण अहमद आणि जॉन तेथून निसटतात आणि जंगलाचा आश्रय घेतात .तिथे सगळीकडे तालिबान पसरलेले असतात . ते दोघांच्याही मागावर निघतात . त्यात जॉनच्या मांडीला गोळी लागून तो भयंकर जखमी होतो .
आता अहमदवर संपूर्ण जबाबदारी आहे जॉनला सुमारे शंभर किलोमीटर दूर असलेल्या बेस कॅम्पवर घेऊन जायची .रस्तोरस्ती तालिबान सैनिक त्या दोघांच्या शोधात आहेत. त्यामुळे जॉनला गाडीने घेऊन न जाता डोंगरदऱ्यातून हातगाडीवरून खडतर मार्गाने अहमदला जॉनसोबत प्रवास करायचा आहे. अहमद जॉनला सुरक्षितस्थळी पोचवेल का ??
चित्रपट इथेच संपत नाही .तर त्यापुढचा भाग अजून रोमांचकारी आहे .तो पाहायचा असेल तर अमेझॉन प्राईमवर हा चित्रपट जरूर पहा .
मानवी नात्यांचा आणि सदसदविवेकबुद्धी जोपासणारा सुंदर चित्रपट 

Sunday, July 30, 2023

HIDDEN STRIKE

HIDDEN STRIKE
हिडन स्ट्राईक
बगदादमधील वैराण वाळवंटात ती ऑइल रिफायनरी आहे. ती रिफायनरी चायनाच्या ताब्यात आहे.आता त्यांना ती रिफायनरी बंद करून ग्रीन झोनमध्ये जायचे आहे. सर्व कर्मचाऱ्यांना तेथून घेऊन जाण्यासाठी कॅप्टन लु फेंग त्याच्या तुकडीसह रिफायनरी दाखल झालाय. प्रमुख स्त्रीने रिफायनरीचा सगळा डेटा पेन ड्राईव्हवर कॉपी करून तो लु फेंगच्या मुलीकडे देते.लु फेंग आणि त्याच्या मुलीचे फारसे पटत नाही .हायवेच्या डेड झोनमधून जाताना अचानक गाड्यांवर हल्ला होऊन एका बसचे अपहरण होते.
क्रिस त्या वाळवंटातील छोट्या गावात एक अनाथाश्रम चालवितो.पाण्यासाठी पैश्याची गरज आहे म्हणून तो आपल्या भावाला त्या बसचे अपहरण करण्यात मदत करतो पण भावाच्या काही गोष्टी पटत नाहीत म्हणून तो पुन्हा गावी निघून येतो .बसमधील ओलीस ठेवलेल्या कर्मचाऱ्यांकडून अपहरणकर्त्याना तो पेन ड्राईव्ह हवाय.
लु फेंग आणि त्याची मुलगी क्रिसच्या मदतीने ओलिसांची कशी सुटका करतात हे पाहण्यासाठी हा चित्रपट पाहायलाच हवा.
लु फेंगच्या भूमिकेत जॅकी चेनने नेहमीप्रमाणे धमाल केलीय .यावेळी त्याच्या साथीला जॉन सीना आहे. या चित्रपटातील ऍक्शन बघण्यासाठी आहे. फाईट सीन पाहताना आपण जॅकी चेनच्या जुन्या काळात जातो.
प्रत्येक जॅकी चेन प्रेमींनी कुटुंब सोबत पाहायला हवा असा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत उपलब्ध आहे .

Saturday, July 29, 2023

WOMAN OF THE DEAD

WOMAN OF THE DEAD
वुमन ऑफ द डेड
मार्क एक  प्रामाणिक पोलीस ऑफिसर . त्याची पत्नी ब्लूम प्रेतांना अंत्यसंस्कारासाठी सजविण्याचे काम करते. त्यांना दोन छोटी  मुले आहेत. मार्कचे वडीलही त्यांच्यासोबत राहतात.
एक दिवस घरातून कामावर जाण्यासाठी बाहेर पडत असताना मार्कचा भयानक अपघात होतो आणि तो मरतो. हे सगळे ब्लूमच्या समोरच घडते.
काही महिने उलटतात तरी मार्कचा अपघात करणाऱ्या गाडीचा शोध लागत नाही . मार्कची मोटारसायकल मॅकेनिक तयार करून ब्लूमच्या हवाली करतो .त्यात मार्कचा मोबाईलही असतो.
मार्कच्या फोन कॉलमध्ये एक नंबर सारखा दिसत असतो .ब्लूम त्या नंबरवर फोन करते तेव्हा पलीकडून एक स्त्री बोलत असते.ब्लूम तिचा माग काढते आणि तिला घरी आणते.तिच्या बोलण्यातून ब्लूमला कळते मार्कचा अपघात नसून खून करण्यात आला आहे.
ब्लूम एक एक पुरावा शोधत जाते आणि अनपेक्षित सत्य शोधून काढते.
जर्मनीतील बर्फाच्छदीत छोट्याश्या गावात ही सिरीज चित्रित केली आहे.अतिशय निसर्गरम्य बर्फाच्छदीत डोंगररांगा, निर्मनुष्य रस्ते , कमी लोकवस्ती यामुळे सिरीजला वेगळेपणा आलाय .
सहा भागाची ही सिरीज नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे .
.

Friday, July 28, 2023

THE POP'S EXORCIST

द पोपस एक्झॉसिस्ट
THE POP'S EXORCIST
फादर गॅब्रिएल अमोर्थ हा इतर फादरपेक्षा थोडा वेगळा आणि थोडा घमेंडी होता.कधीकधी नियमांच्या बाहेर जाऊनही काम करायचा. सैतानांपासून लोकांना मुक्त करणे हे त्याचे काम .
आजही त्याच्यासाठी एक काम आलेय.पोपने स्वतः त्याला ते काम दिलंय. स्पेनमध्ये एका छोट्या गावात जुने चर्च आहे. जुलिया नावाच्या विधवेच्या नावावर हे चर्च आहे.तिला ते वारसा हक्काने मिळाले आणि त्याची थोडीफार दुरुस्ती करून तिला ते विकायचे आहे .तिला एमी नावाची मुलगी आणि हेन्री नावाचा छोटा मुलगा आहे. सध्या ते चर्चमध्ये राहायला आलेत .
हेन्रीला सैतानाने झपाटले आहे आणि त्याला बरे करण्याची जबाबदारी गॅब्रियलवर येते. गॅब्रियलच्या मदतीसाठी फादर थॉमसही तिथे हजर असतो. गॅब्रियलला पाहताच हेन्रीतील सैतान खुश होतो . त्याला गॅब्रियलचा संपूर्ण इतिहास माहीत आहे इतकेच नव्हे तर तो फादर थॉमसच्या काही खाजगी गोष्टी सांगतो.या सैतानाने नाव कळल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही असे गॅब्रियल थॉमसला सांगतो आणि तो त्या चर्चमध्येच शोध घेण्यास सुरुवात करतो .
सैतान फक्त गॅब्रियलवर सूड उगविण्यासाठीच हेन्रीच्या शरीरात शिरलाय हे गॅब्रियलला कळते.आता तो हेन्रीबरोबर स्वतःचीही सुटका कशी करेल हे पाहण्यासारखे आहे.
फार वर्षांपूर्वी excorcist नावाचा चित्रपट आला होता.त्यातील काही दृश्यतर भयानक होती. यातील बरीचशी दृश्य संयमित आहेत.
रसेल क्रोसारखा दमदार अभिनेता फादर गॅब्रियलच्या भूमिकेत छाप पाडून जातो .
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे .
ज्यांना हॉरर दृश्य आवडत नसतील त्यांनी हा चित्रपट पाहू नये.

द ग्लोरी

द ग्लोरी
THE GLORY
बदला घ्यायचा ठरला तर त्यासाठी कितीही वर्ष वाट पहायची तयारी ठेवावी लागते. बदला घेणारे संधीची वाट पाहत असतात .काहीजण डायरेक्ट आक्रमण करतात काहीजण हळूहळू बदला घेतात.
मून डाँग गरीब विद्यार्थिनी .तिचे शाळेत रोज रॅगिंग होत असते.रॅगिंग करणाऱ्यांचा पाच विद्यार्थ्यांचा ग्रुप असतो .त्यात तीन मुली आणि दोन मुले असतात .टॉयलेट साफ करायला लावणे , अंगावर ड्रायर आणि इस्त्रीचे चटके देणे शिवाय प्रचंड मारहाण तिला रोज होत असते .
ती याविरुद्ध पोलिसात तक्रार करते पण ही सर्व मोठ्या घरातील मुले असल्यामुळे हिलाच बोलणी ऐकावी लागतात .बऱ्याचदा तिला आत्महत्या करावीशी वाटते .या आधीही एका विद्यार्थिनीने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केलेली असते. 
मून डाँगला तर घरुनही सपोर्ट नसतो .शेवटी ती कंटाळून शाळा सोडायचे ठरविते .ती शाळा सोडायचे खरे कारण देते आणि त्या पाचही विद्यार्थ्यांची नावे लिहिते .पण तिच्यावर त्यांची नावे काढून टाकण्याचे दडपण येते ती नकार देताच शिक्षक तिला मारहाण करतात . मग तिच्या आईला पैसे देऊन प्रकरण मिटविले जाते .
मून डाँग आता दिवसरात्र त्यांच्या मागावर आहे.ती कामे करून आपले शिक्षण पूर्ण करते शिक्षिका बनते.पण आपल्याला त्रास देणारे सर्वच तिच्या रडारवर आहे. आता या गोष्टीला अठरा वर्षे पूर्ण झालीत .तिच्याकडे प्रत्येकाची  सखोल माहिती आहे .
आता तिचा बदला सुरू होणार आहे .ती प्रत्येकाला सजा देणार आहे पण प्रत्यक्षात ती कोणाला मारणार नाही.त्यांचे इगो ,सवयी ,सामाजिक प्रतिष्ठा यावर हल्ला करून त्यांना नेस्तनाबूत करणार आहे.यातून कोणी म्हणजे कोणीच वाचणार नाही .
तुम्हाला हा सूडपट पाहायचा असेल तर कोरियन सिरीज द ग्लोरी नक्कीच पहा. अतिशय कमी हिंसाचार असलेली थोडी संथ पण उत्कंठा वाढवीत जाणारी ही सिरीज आपल्याला नक्की आवडेल .
सिरीज नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे .

Wednesday, July 26, 2023

द ग्लोरी

द ग्लोरी
THE GLORY
बदला घ्यायचा ठरला तर त्यासाठी कितीही वर्ष वाट पहायची तयारी ठेवावी लागते. बदला घेणारे संधीची वाट पाहत असतात .काहीजण डायरेक्ट आक्रमण करतात काहीजण हळूहळू बदला घेतात.
मून डाँग गरीब विद्यार्थिनी .तिचे शाळेत रोज रॅगिंग होत असते.रॅगिंग करणाऱ्यांचा पाच विद्यार्थ्यांचा ग्रुप असतो .त्यात तीन मुली आणि दोन मुले असतात .टॉयलेट साफ करायला लावणे , अंगावर ड्रायर आणि इस्त्रीचे चटके देणे शिवाय प्रचंड मारहाण तिला रोज होत असते .
ती याविरुद्ध पोलिसात तक्रार करते पण ही सर्व मोठ्या घरातील मुले असल्यामुळे हिलाच बोलणी ऐकावी लागतात .बऱ्याचदा तिला आत्महत्या करावीशी वाटते .या आधीही एका विद्यार्थिनीने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केलेली असते. 
मून डाँगला तर घरुनही सपोर्ट नसतो .शेवटी ती कंटाळून शाळा सोडायचे ठरविते .ती शाळा सोडायचे खरे कारण देते आणि त्या पाचही विद्यार्थ्यांची नावे लिहिते .पण तिच्यावर त्यांची नावे काढून टाकण्याचे दडपण येते ती नकार देताच शिक्षक तिला मारहाण करतात . मग तिच्या आईला पैसे देऊन प्रकरण मिटविले जाते .
मून डाँग आता दिवसरात्र त्यांच्या मागावर आहे.ती कामे करून आपले शिक्षण पूर्ण करते शिक्षिका बनते.पण आपल्याला त्रास देणारे सर्वच तिच्या रडारवर आहे. आता या गोष्टीला अठरा वर्षे पूर्ण झालीत .तिच्याकडे प्रत्येकाची  सखोल माहिती आहे .
आता तिचा बदला सुरू होणार आहे .ती प्रत्येकाला सजा देणार आहे पण प्रत्यक्षात ती कोणाला मारणार नाही.त्यांचे इगो ,सवयी ,सामाजिक प्रतिष्ठा यावर हल्ला करून त्यांना नेस्तनाबूत करणार आहे.यातून कोणी म्हणजे कोणीच वाचणार नाही .
तुम्हाला हा सूडपट पाहायचा असेल तर कोरियन सिरीज द ग्लोरी नक्कीच पहा. अतिशय कमी हिंसाचार असलेली थोडी संथ पण उत्कंठा वाढवीत जाणारी ही सिरीज आपल्याला नक्की आवडेल .
सिरीज नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे .

Tuesday, July 25, 2023

UNKNOWN

UNKNOWN
अंनोन
डॉ. मार्टीन हॅरीस आणि त्याची पत्नी लिझ एका बायोटेक्नॉलॉजी कॉन्फरन्ससाठी बर्लिनला आलेत.
बर्लिनला ते पहिल्यांदाच येतायत असे मार्टिन म्हणतोय.ते आपल्या हॉटेलमध्ये शिरतात आणि आपली बॅग टॅक्सीत किंवा गाडीत विसरलोय असे त्याच्या लक्षात येते .
तो ताबडतोब मागे फिरतो आणि मिळेल ती टॅक्सी पकडून आपल्या टॅक्सीच्या मागे लागतो.पण त्याच्याच टॅक्सीला अपघात होऊन ती पाण्यात कोसळते .टॅक्सी ड्रायव्हर जिना त्याला वाचवते पण ती बर्लिनला अनधिकृतपणे राहत असल्यामुळे तिथून पळून जाते.
मार्टिनला जेव्हा जाग येते तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये असतो.तो चार दिवस कोमात होता आणि त्याला प्रथम काही आठवत नसते. हळू हळू त्याला थोडे थोडे आठवते आणि तो हॉटेलमध्ये जातो. पण तिथे डॉ मार्टिन हॅरीस नावाची दुसरीच व्यक्ती हजर असते. इतकेच काय त्याची पत्नीही त्याला ओळखायला नकार देते.तोच डॉ .मार्टिन हॅरीस असल्याचे कोणतेही पुरावे सापडत नाहीत.शेवटी तो नाईलाजाने परत फिरतो.
तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये जातो .तिथे एक नर्स त्याला एका व्यक्तीचा अड्रेस देऊन तुला मदत करेल करेल असे सांगते. जुर्गन एक माजी नाझी ऑफिसर मार्टिनला मदत करण्याचे ठरवितो.
एका कॅफेमध्ये जिना त्याला भेटते .पैश्याची लालूच देऊन मार्टिन तिच्या घरी जातो पण तिथे त्यांच्यावर दोन गुंड हल्ला करतात. त्या हल्ल्यातून ते कसेबसे वाचतात आणि जुर्गनला भेटतात.जुर्गनने काही माहिती जमा केलेली असते .
 डॉ. मार्टिन हॅरीस  नक्की कोण आहे ?.त्याला स्वतःची पत्नीच ओळख का दाखवत नाही ?.त्याच्यावर हल्ला करणारे गुंड कोण आहेत ? या कारस्थानामागे नक्की कोण आहेत ? त्यांची योजना यशस्वी होईल का ?
लियाम नेसनची प्रमुख भूमिका असलेला हा वेगवान रहस्यमय चित्रपट नेटफिक्सवर आहे .

Monday, July 24, 2023

कोहरा

कोहरा
KOHRRA
अनिवासी भारतीय पॉल लग्नासाठी आपल्या गावी पंजाबमध्ये आलाय.त्याच्यासोबत मित्र लियामसुद्धा आहे.
पॉलची पंजाबमध्ये मोठी फॅमिली आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी पॉल आणि लियाम फिरायला बाहेर पडतात .दुसऱ्या दिवशी शेतात पॉलचा मृतदेह पोलिसांना सापडतो.पॉलच्या मानेवर आणि डोक्यात जखमा झालेल्या असतात .त्याचे स्मार्ट वॉच आणि अंगठी गायब झालेली असते .पण लियामचा कुठेही पत्ता लागत नसतो.
सब इंस्पेक्टर बालबीरसिंह आणि त्याचा तरुण साथीदार गरुंदी या प्रकरणाचा शोध घेण्यास सुरुवात करतात.पंजाबमधील प्रतिष्टीत फॅमिली आणि अनिवासी भारतीय त्यात एक परदेशी युवक बेपत्ता यामुळे बलबीरसिह आणि गरुंदीवर खूपच दडपण आलेले असते. तरीही ते अतिशय जोमाने या प्रकरणाचा शोध घेतात आणि सत्य उजेडात आणतात.
ही सिरीज केवळ खुनाचे प्रकरण नाही तर अनेक मानवी स्वभाव  उलगडून दाखवते.इथे प्रत्येक पात्राचे खाजगी आयुष्य आहे .बलबीरसिह आणि गरुंदीच्या खाजगी आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहेत पण त्यातूनही ते खुनाच्या तपासाला प्राधान्य देतात त्यासाठी घरच्यांची नाराजी ओढवून घेतात. 
यातील शेवट अनपेक्षित असला तरी धक्कादायक नाहीय.
उडता पंजाब ,कॅट सारख्या चित्रपट सिरीजमध्ये काम केलेला सुविंदर विकी बलबीरच्या प्रमुख भूमिकेत आहे.असुर सारख्या सिरीजमध्ये गाजलेला बरून सोबत्ती गरुंदीच्या भूमिकेत छाप पडतो.
सिरीज नेटफ्लिक्सवर आहे

Saturday, July 22, 2023

हुकूमशाही

हुकूमशाही
खरे तर ते गाव जणू सरकारने वाळीतच टाकल्यासारखे होते.गावात सर्व काही होते पण कोणाचा कंट्रोल नव्हताच .पोलीस नावालाच .कायदे कानून सगळे धाब्यावर बसविलेले होते. गावात बदली घेऊन आलेला कोणताही सरकारी अधिकारी महिन्याभरात बदली घेऊन जायचा किंवा नोकरी सोडून द्यायचा.
यावेळी तर जिल्ह्याधिकारीच सोडून गेला होता .आता नवीन कोण येणार याचीच चर्चा चालू असताना कार्यालयासमोर एक मर्सिडीज उभी राहिली.सगळेजण आश्चर्याने पाहू लागले.यावेळी गाडीवर लाल दिवा नव्हता .
गाडीतून एक उंच कृश भेदक डोळ्यांची व्यक्ती उतरली .अंगावर कोट आणि डोक्यावर फेल्ट हॅट  शोभून दिसत होती. गाडीतून उतरताच त्याने आपली थंडगार नजर सर्वांवर फिरवून घेतली आणि ऑफीसमध्ये शिरला .
केबिनमध्ये शिरताच त्याने आपल्या खुर्चीच्यावर  भिंतीवर टांगलेल्या महापुरुषांची चित्रे खाली उतरवायची ऑर्डर दिली.
"पण सर, प्रोटोकॉल आणि वरून ऑर्डर आहे हे फोटो लावायची "एक क्लार्क हळूच पुटपुटला .
"तसे बरेच प्रोटोकॉल आणि ऑर्डर असतात .त्या सर्वच पाळतात का तुम्ही ? "त्याच्या आवाजात धार होती."जोपर्यंत मी आहे तो पर्यंत मी म्हणेल तेच होईल इथे." काही न बोलता क्लार्कने मान डोलावली .
त्याचा तो दिवस गावात फेरफटका मारण्यातच गेला .सगळीकडे नुसती धूळ ,कलकलाट दिसत होता .तो  फक्त हे नजरेने टिपत होता.
दुसऱ्या दिवशी गावात शंभर तरुणांची एक तुकडी हजर झाली.
"हे माझे अंगरक्षक आणि खाजगी पोलीस आहेत .याना कोणी विरोध करायचा नाही ".अशी सूचना सगळीकडे गेली.
त्याच दिवशी संध्याकाळी प्रत्येक घरातील टीव्ही बंद झाला .सगळ्यांना कळेना काय झाले अचानक .केबल ऑपरेटरला फोन केला तेव्हा वरून ऑर्डर आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेनऊ पर्यंत टीव्ही बंद राहील.
"अरे ही काय दादागिरी !"असे म्हणत सगळ्या स्त्रियांनी त्याच्याकडे जायचे ठरविले.
दुसऱ्या दिवशी नऊच्या ठोक्यालाच तो ऑफिसमध्ये हजर होता.
"साहेब का म्हनुन आमचा टीव्ही बंद केलासा "एक तरुण स्त्री मान खाली घालुन पुटपुटली.
"काय ही भाषा ?तो कडाडला. "किती वर्षे झाली स्वातंत्र्य मिळून ? अजून हीच भाषा .घरी आपापसात ठीक आहे पण चारचौघात व्यवस्थित बोलता आले पाहिजे.आणि मान खाली घालुन काय पुटपुटता .हक्कासाठी आलात तर जोरात बोला.मी टीव्ही बंद केलाय तुमचा .जा कोणाकडे जायचेय तिथे जाऊन तक्रार करा .काय मिळते हो तुम्हाला टीव्ही बघून ? त्याच सासू सुनेच्या भानगडी ,अबला नायिका वरचढ होणारी नणंद ,दिर , त्यांची कारस्थाने ,चहात साखर ऐवजी मीठ , भाजीत मसाला जास्त टाकणे हेच बघायचे असते ना तुम्हाला. त्यातच खुश होणार का तुम्ही. कुटुंबातील भानगडी किती दिवस बघणार .स्वावलंबी बना ,नविन काहीतरी पहा "तो चिडून बोलत होता .
"पन आम्ही काय करणार "? ती घाबरून म्हणाली.
"व्यायाम करा, लढायला शिका , मुलांशी बोला ,जगात काय घडते ते पहा त्याचा फायदा आपल्याला कसा होईल याची चर्चा करा. आज संध्याकाळी माझी माणसे गावात फिरतील ते मुलांना फिटनेस शिकवतील तुम्ही ही शिका,पण कोणाकडे टीव्ही चालू दिसला तर चोप ही देतील. गावातील रस्ते उद्यापासून साफ होतील.नवीन विहिरी खणल्या जातील ,पाईपलाईन तयार होईल .प्रत्येकाने ठराविक रक्कम जमा करा ".
"पण हे सगळे सरकार देते ना ?आम्ही का  पैसे भरायचे "?एक पुरुष पुढे येऊन म्हणाला . 
"फुकट काही मिळणार नाही तुम्हाला .इथे मीच सरकार आहे .काहीतरी रक्कम भरावीच लागेल. फुकट मिळते म्हणूनच माजला आहात तुम्ही."तो आपली थंड नजर सर्वत्र फिरवीत म्हणाला .
दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच गावातील वातावरण बदलू लागले . रस्ते दुरुस्त करायला सुरुवात झाली, पडकी घरे पैसे भरून दुरुस्त होऊ लागली. शाळेत मुलांसोबत आयाही जाऊ लागल्या. जो विरोध करेल त्याला काठीचा प्रसाद मिळू लागला. गावात सोयी मिळत होत्या पण मनासारखे स्वातंत्र्य मिळत नव्हते.
त्या दिवशी मात्र गावात ठिणगी पेटली. दोन गटाची लोक रस्त्यावर उतरली. काही ठिकाणी दगडफेक चालू झाली .तेव्हा मात्र तो उघड्या जीपमधून बाहेर पडला . त्याच्या अंगरक्षकांना नुसती खूण केली आणि ते दंगलकर्त्यावर तुटून पडले. त्यांच्या तावडीतून कोणीही सुटले नाही ,ना स्त्रिया  ना मुले ना म्हातारेकोतारे प्रत्येकाला काठीचा आणि अश्रूधुराचा प्रसाद मिळाला.
 "ओ साहेब गर्दीत स्त्रिया आहेत , मुले आहेत ," एक गृहस्थ त्याच्या पुढे हात जोडत म्हणाला .
"मुले, स्त्रिया रस्त्यावर का आले ? त्यांनी दंगलीत भाग घ्यायचे कारण काय ? अश्यावेळी कोणीही शहाणा माणूस घरी बसेल की दंगलीत दगड मारायला येईल " तो हातातील काठीने त्याला मारीत म्हणाला . तासाभरात दंगल आटोक्यात आली .
आता महिना उलटून गेला .तो म्हणेल त्याप्रमाणे गाव वागत होते.गावातील लोकांसाठी उत्कृष्ट सुखसुविधा उपलब्ध झाल्या होत्या .स्त्रिया मुले ही हुशार होऊ लागली आणि त्याला बोलावणे आले.
तो आला तसाच आपल्या मर्सिडीजमधून पुन्हा निघून गेला .
देशातील एका प्रमुख शहरातील कॉर्पोरेट ऑफिसच्या रिसेप्शनमध्ये तो ताठ बसला होता. त्याची भेदक नजर समोरच्या भिंतीवर खिळून होती. गेला अर्धा तास तो समोरच्या भिंतीवर काय पाहतोय हाच प्रश्न त्या रिसेप्शनिस्टला पडला होता.
 त्याचवेळी हातातील साखळी बोटाने गरगर फिरवीत श्री .यशवंत महादेव राज याचे आगमन झाले . त्यांच्या मागे नेहमीप्रमाणे सेक्रेटरी श्री.चिंतामणी त्रंबक गुप्त हातातील लॅपटॉप सावरत धावत होते.ऑफिसमध्ये शिरताना त्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि निराशेने मान डोलावली.
आत शिरताच थोड्याच वेळाने त्याला बोलावणे आले. "या साहेब,तुम्ही घातलेला घोळ समजला आम्हाला .इथे येऊन ऐंशी वर्ष होत आली तरी तुमचा स्वभाव काही बदलला नाही.अनेक वर्षे तुम्ही पॅरोलची सुट्टी मागत होतात म्हणून यावेळी दया येऊन तुम्हाला चाळीस दिवसाची रजा मंजूर केली तर त्या गावात जाऊन हुकूमशाहीच चालू केली तुम्ही "श्री यमराज हात जोडून उपहासाने म्हणाले.
"त्या देशाला लोकशाहीची नाही तर हुकूमशहाची गरज आहे. पंच्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य मिळवून पण देशाचा विकास नाही . गरिबी वाढतेय ,मुलांना स्त्रियांना शिक्षण नाही .वाहतुकीला रस्ते नाहीत. देशातील एका भागात पूर येतात पण दुसऱ्या भागात प्यायला पाणी नाही. स्त्रियांना हलकी वागणूक दिली जातेय भर रस्त्यात विटंबना होतेय आणि आरोपी मोकाट सुटलेत. लोकशाही फक्त निवडणूक घेण्यासाठी आहे .या देशाचा विकास करायचा असेल तर माझ्यासारख्या हुकूमशहाच हवा " तो जोशात बोलू लागला .
" पुरे ..! तुझ्यामुळे काय काय भोगावे लागले याची कल्पना तरी आहे का ? दुसऱ्या महायुद्धामुळे जग दहा वर्षे मागे गेले. तू केलेल्या हत्याकांडामुळे आमच्या कित्येक दूताना बोनस इंसेंटिव्ह द्यावा लागला .ह्या चित्रगुप्तांची सगळी कॅलक्युलेशन बिघडली.साठ लाख लोकांच्या हत्येचे आरोप तुझ्यावर आहेत आणि म्हणून तुला आयुष्यभर कारावासाची शिक्षा दिली आहे. तेव्हा श्री.एडॉल्फ हिटलर हा  तुमचा ड्रेस घ्या आणि पुन्हा तुरुंगात चला". श्री यमराज हात जोडून म्हणाले.
तो शांतपणे उठला . समोरचा घडी केलेला लष्करी युनिफॉर्म उचलला आणि ताठ मानेने उभा राहून म्हणाला "मी एडॉल्फ हिटलर जर दहा वर्षात माझ्या देशाचा विकास करू शकतो तर तुम्ही सत्तर वर्षात का नाही करू शकत .आज खरोखरच या देशाला हुकूमशहाची गरज आहे .
थोड्या वेळाने पूर्ण लष्करी युनिफॉर्ममध्ये तो ऑफिस बाहेर पडला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज विलसत होते .
© श्री.किरण कृष्णा बोरकर

हंटर

HUNTER
हंटर
विक्रम एक बदनाम पोलीस ऑफिसर. तो अंमली पदार्थाचे सेवन करतो.पैश्यासाठी तो हरवलेल्या व्यक्तींना शोधून देण्याचे काम ही खाजगीरीत्या करतो.एकूण काय, तर ही कोणालाही नकोशी वाटणारी व्यक्ती आहे.अगदी त्याच्या बायकोलासुद्धा.
एके दिवशी बारमध्ये दारू पीत असताना त्याच्याकडे अंकिता येते.अंकिताने त्याच्यासाठी एक काम आणलेले असते.लीना थॉमस नावाच्या स्त्रीला शोधायचे आहे .विक्रम आपल्या हॅकर मित्राच्या साहाय्याने तिचा पत्ता शोधून काढतो आणि तिला जाऊन भेटतो.लीना थॉमस एक प्रसिद्ध उद्योगपती स्त्री आहे.
तिथे त्याची ओळख दिव्याशी होते .दिव्या एक पत्रकार असून लीना थॉमसवर पुस्तक लिहिण्यासाठी आली आहे असे कळते.
दुसऱ्या दिवशी लीना थॉमसची क्रूरपणे हत्या होते.सीसी टीव्हीत विक्रमच तिला मारताना स्पष्टपणे दिसतोय . त्याच्या बोटांचे पुरावे आणि इतर काही गोष्टी तिथे आहेत.
विक्रमचा प्रतिस्पर्धी पोलीस ऑफिसर हुडा आता त्याच्या मागे लागलाय.संधी मिळेल तेव्हा विक्रमला ठार मारायचे हाच हेतू आहे.
इतका मोठा पुरावा विक्रमच्या विरुद्ध असताना आता तो स्वतःचे निरपराध असणे कसे सिद्ध करेल?
साधे खून प्रकरण पुढे भलतेच वळण घेत जाते . हे प्रकरण सुरू असतानाच दुसरे प्रकरण विक्रमच्या अंगावर आदळते. त्यासाठी दुसऱ्या सिजनची वाट पहावी लागेल.
सुनील शेट्टी, राहुल देव ,इशा देओल ,स्मिता जयकर अशी तगडी स्टारकास्ट असलेली ही ऍक्शन पॅक सिरीज आपल्याला अमेझॉन मिनी टीव्हीवर पाहायला मिळेल .
दुसऱ्या सिजनमधील प्रमुख खलनायक पाहून आपली उत्सुकता नक्कीच वाढेल .

Friday, July 21, 2023

लकडबघा

LAKADBAGGHA
लकडबगघा
जगात कसलीही तस्करी होऊ शकते.अगदी मोकाट रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यांचीही तस्करी होऊ शकते. कोलकात्यात असेच काही भटके कुत्रे गायब होतात.त्यांचा वापर अंमली पदार्थ वाहतुकीसाठीही होतो.तर छोट्या मोठ्या हॉटेलात बिर्याणीत वापरले जातात.
अर्जुन बक्षी एक कुरियर सर्व्हिसवाला .सतत कानाला हेडफोन लावून फिरणारा.छोट्या मुलांना मार्शल आर्ट्सही शिकवतो .तो प्राणी मित्र आहे .भटक्या कुत्र्यावर प्रेम करतो.त्याचे ही काही कुत्रे आहेत.
शहरात काही ठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्यात.तर डॉकवर कुत्र्यांच्या शरीरातून अंमली पदार्थ वाहतूक करणाऱ्या टोळीवरही हल्ला झालाय .हा हल्ला करणारा एकटाच माणूस होता असे  जखमी साक्षीदार सांगतात.
क्राईम ब्रँच ऑफिसर अक्षरा या केसची प्रमुख ऑफिसर आहे.
एके दिवशी अर्जुनच्या ताफ्यातील एक कुत्रा गायब होतो .तो त्याचा शोध घेत असताना त्याची अक्षराशी ओळख होते.
त्या दिवशी तो एक गोल्डफिश एका घरी डिलिव्हरी करतो पण खराब पॅकिंगमुळे गोल्डफिश मेलेला असतो.तो दुकान मालकाला जाब विचारण्यासाठी जातो तेव्हा तिथे काही प्राण्यांना अयोग्य रीतीने ठेवलेले असते .तो त्या प्राण्यांची सुटका करतो तेव्हा तिथे त्याला अजून एक प्राणी सापडतो .एक खास दुर्मिळ जातीतील तरस त्याच्याकडे पाहत उभा असतो . अर्जुन त्याला आपल्यासोबत घेऊन जातो
एके दिवशी हॉटेलात पार्सल डिलिव्हरी घेताना अर्जुनला आपल्या कुत्र्याच्या गळ्यातील बिल्ला सापडतो .तो आपला कुत्रा इथे खाण्यासाठी वापरला गेलाय हे समजून जातो आणि अधिक शोध घेताना त्याला तिथे अजून छोटे कुत्रे दिसतात.तो सगळ्यांची सुटका करतो.
अक्षरा तपास करीत अर्जुनपर्यंत पोचते .तरसची तस्करी होणार असते .ते गुंड अर्जुनच्या मागावर असतात.
कोण आहे या तस्करीच्या मागे ? अर्जुन त्या तरसाला वाचवेल ? यात कितीजणांचा बळी जाईल ? 
प्राण्यांची तस्करी ,आपण काय खातो ? या विषयावर असलेला हा चित्रपट झी5 वर आहे .

Thursday, July 20, 2023

बर्ड बॉक्स बार्सिलोना

BIRD BOX BARCELONA
बर्ड बॉक्स बार्सिलोना 
ज्यांनी सॅन्ड्रा बुलोकचा बर्ड बॉक्स चित्रपट पाहिला असेल तर त्यांना या चित्रपटाची कल्पना येईल. विशिष्ठ पक्ष्यांपासून आणि वाऱ्यातून पसरणारा हा रोग माणसांना आत्महत्या करायला भाग पाडतो. कोणी म्हणतात हा व्हायरस आहे तर कोणी म्हणते सैतानी शक्ती आहे. जे उघड्या डोळ्यांनी पाहतात ते ताबडतोब आत्महत्या करतात.
बार्सिलोना शहरात हा व्हायरस पसरतो तेव्हा सॅबेस्टीन ऑफिसमध्ये असतो. त्याच्या आजूबाजूला आत्महत्येचे प्रमाण वाढू लागते तेव्हा तो मुलीला आणायला शाळेत जातो. तिला घेऊन डोळे बंद करून तो घरी येतो पण घराजवळच त्याची पत्नी अपघातात मरते.
तो चर्चमध्ये जातो तिथे फादर त्याला सांगतो इतरांचे डोळे घडून त्यांना मृत्यू दे .त्यांचे आत्मे मुक्त कर .शहरात काही विशिष्ट लोक असतात ज्यांना  त्या व्हायरसची लागण  लागून काही होत नाही .त्याच्या मनावर कसलाही परिणाम होत नाही उलट ते इतरांचे डोळे जबरदस्तीने उघडून त्यांना आत्महत्या करायला भाग पाडतात.
सॅबेस्टीनही त्यातील एक आहे .तो जीव वाचवत लपलेल्या व्यक्तींना शोधतो आणि संधी मिळताच त्यांचे डोळे उघडून व्हायरसची लागण करतो . त्याची मुलगीही त्याला साथ देते. पण कुठेतरी अजूनही तो पूर्णपणे व्हायरसच्या आहारी गेला नाही .तो स्वतःशी झगडून यातून बाहेर पडायला बघतोय .आणि म्हणूनच तो एका ग्रुपमधील छोट्या जर्मन मुलीला आणि लेडी डॉक्टरला वाचविण्याचा प्रयत्न करतोय.
सॅबेस्टीन त्यांना कसे वाचवेल ? त्यासाठी त्याला स्वतःशी आणि फादरशी लढावे लागेल .
एक वेगवान थ्रिलर ,थोडी हॉरर मुव्ही नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Wednesday, July 19, 2023

रफूचक्कर

रफूचक्कर
RAFUCHAKKAR
आईवडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशीच पोलीस अधिकारी शौर्या चौतलाने प्रिन्स उर्फ पवनकुमारला अटक केली.आपला मुलगा काहीच कामाचा नाही ,अपयशी बावळट अशीच प्रिन्सच्या आईवडिलांची समजूत होती. प्रिन्स तसाच होता शांत अबोल भोळा.
सर्वेश पठाणीया  नावाच्या उद्योगपतींला करोडो रुपयांना फसविल्याचा त्याच्यावर आरोप होता. अजय चौहान बनून सर्वेश पठाणीयाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडील करोडो रुपये घेऊन पसार झाला असा आरोप होता. 
सर्वेशने देशातील उत्कृष्ट वकील रितू अरोराला या केससाठी आणली.प्रिन्सच्या वकिलाने जयदेवने सर्व आरोप फेटाळले. मग रितूने शौर्याच्या मदतीने त्याच्या फसवणुकीच्या अजून काही केसेस कोर्टासमोर आणल्या .
एका प्रकरणात त्याने डायट स्पेशालिस्ट बनून काही स्त्रियांना फसविले होते तर एका प्रकरणात वेडिंग प्लॅनर बनून श्रीमंत पंजाबी फॅमिलीला फसविले होते.
कोर्टात यावर खटला सुरू असताना शौर्या या प्रकरणाचा तपास करीत असते. तिला काही पुरावे ही मिळतात पण आयत्यावेळी ते चुकीचे सिद्ध होतात.आपल्यावरील सर्व आरोप पवनकुमार नाकारीत असतो. ज्यांनी ज्यांनी प्रिन्सवर फसवणुकीचे आरोप केले होते त्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का ?
खरेच प्रिन्स उर्फ पवनकुमार खरोखरच ठग आहे का ??त्याने सर्वेश पठाणीयाच का टार्गेट बनविले आहे. 
एक रोमांचकारी ,वेगवान सिरीज जिओ सिनेमावर फ्री उपलब्ध आहे .
मनीष पाल, प्रिया बापट ,सुशांतसिंह सारखे अभिनेते यात प्रमुख भूमिकेत आहेत.

Tuesday, July 18, 2023

अज्ञात गांधी

अज्ञात गांधी
नारायणभाई देसाई
अनुवाद .. सुरेशचंद्र वारघडे
समकालीन प्रकाशन 
अचंबित करणाऱ्या बापूकथा असे लेखकाने लिहिलंय आणि ते खरेच आहे.नारायणभाई देसाई हे गांधीजींचे निकटवर्तीय. त्याचे वडील महादेवभाई देसाई हे गांधीजींचे स्वीय सचिव होते.त्यामुळे ते लहानपणापासूनच गांधीजींच्या निकट सहवासात होते.त्यांच्याबरोबरच दांडियात्रा ,चलेजाव चळवळीत भाग घेतला होता.
या पुस्तकात त्यांनी गांधीजींच्या अनेक अज्ञात गोष्टी उलगडवून दाखविल्या आहेत. सत्याग्रहाचा जन्म ,उपोषणाची सुरवात तसेच दक्षिण आफ्रिकेत गांधीजींना ट्रेनमधील पहिल्या वर्गाच्या डब्यातून बाहेर काढले गेले आणि त्यानंतर गांधीजींनी कसा लढा दिला हे सविस्तरपणे लिहिले.
चंपारण्यातील आंदोलनाची सुरवात का आणि कशी झाली ? त्यासाठी गांधीजींनी किती प्रयत्न केले याचे रोमांचकारी वर्णन आहे. तर गांधीजींनी आपली वेशभूषा का बदलली ह्याचेही हृदयद्रावक कारण सांगितले आहे.
जालियनवाला बाग हत्याकांडानंतर गांधीजींनी दिलेला लढा तर त्यांनी असहकार चळवळीत केलेले आवाहन वाचून आपण खरोखरच अचंबित होतो.
प्रत्येकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक .

RAANGI

RAANGI
सुष्मीताचा तो घाणेरडा विडिओ पाहून तिचा बाप अस्वस्थ झाला होता.त्याला एका नंबरवरून सतत तो विडिओ येत होता.शेवटी त्याने आपल्या बहिणीला हे सर्व सांगितले. 
थैयल नायगी तरुण पत्रकार होती.तिने आपल्या सोर्समार्फत त्या मुलाला शोधून काढले.त्याने सांगितले सुष्मीता माझी फेसबुक फ्रेंड आहे आणि तिनेच हा व्हिडिओ मला पाठवला.सुष्मीता फक्त सोळा वर्षाची अल्लड मुलगी होती.तिचे तर फेसबुक अकाउंटही नव्हते आणि त्या मुलाला तर ती ओळखत ही नव्हती.
केवळ फेसबुक अकाउंट ब्लॉक करून चालणार नाही तर या प्रकरणाची मुळेच उखडून टाकली पाहिजे असे ठरवून नायगीने शोध सुरू केला .सुष्मीताच्या मैत्रिणींना भेटून तिने फेक अकाउंट कोणी बनविला याचा शोध घेतला .तिच्याकडून पासवर्ड घेऊन चॅटिंग करणाऱ्या सर्व व्यक्तींना एकत्र बोलावून समज दिली .
आता नायगी अकाउंट ब्लॉक करणार इतक्यात त्यावर अजून एक मेसेज आला .चॅटिंग करताना तो मुलगा लिबियात आहे असे समजले.पुरावा देताना त्याने आपल्या ठिकाणी होत असलेल्या मिटिंगचे फोटो पाठविले ज्यात भारतातील एक मंत्री तिथे असल्याचे दिसले.नायगीने तो फोटो आपल्या चॅनेलवर प्रसिद्ध केला आणि त्या मंत्र्यांचे कारस्थान उघडकीस आणले.
आमीन हा सतरा वर्षाचा तरुण .आता तो आपल्या हक्कासाठी अमेरिकेविरुद्ध लढतोय.तोच सुष्मीताशी वेळ मिळेल तसे चॅटिंग करतोय.  त्याचे कॉन्टॅक्ट इतके मजबूत आहेत की तो लिबियातून तामिळनाडूतील पोलीस स्टेशनवर हल्ला करून पोलिसांना मारतो.
नायगी सुष्मीता बनून त्याच्याशी रोज चॅट करतेय .तिला शोधून काढायचे आहे की हा नक्की कोण आहे. चॅटिंग करताना तो सांगतो जर आमच्याकडे तेलाचे साठे नसते तर गडाफी आणि आमचे नेते मारले गेले नसते आम्हाला आतंकवादी म्हटले नसते.
आता एफबीआय त्यांच्या मागे लागलीय.ते नायगी आणि सुष्मीताला हाताशी धरून आमीनला शोधायचा प्रयत्न करतात. त्यात ते यशस्वी होतील का ??
सुष्मीताला एकदा तरी भेटायची आमीनची इच्छा पूर्ण होईल का ??
सुष्मीताला खरे काय आहे ? आमीन कोण आहे ? हे समजेल का ? 
फेसबुकच्या एका फेक अकाउंट वरून काय काय घडू शकते हे पहायचे असेल तर हा तामिळ चित्रपट जरूर पहा .
चित्रपट तामिळ भाषेत असला तरी सब टायटल्स हिंदीत आहे .
चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे .

Monday, July 17, 2023

द आउट लॉ

THE OUT LAWS
द आउट लॉ
ओवन एक साधा भोळा तरुण बँकेत मॅनेजर आहे.त्याचे पार्करशी लग्न ठरलंय. तो पार्करवर खूप प्रेम करतो आणि तिच्यासाठी काहीही करायची त्याची तयारी आहे. लग्नाची तयारी चालू असताना पार्कर आपले आईवडील लग्नाला हजर राहणार असल्याचे सांगते आणि ओवन खुश होतो.ते अमेझॉनच्या जंगलात राहतात असे पार्कर सांगते.
दोन दिवसानंतर बिल आणि लिली ओवनला भेटतात.त्यांना पाहून ते पार्करचे आईवडील असतील यावर ओवनचा विश्वास बसत नाही .दोघेही उमदे आणि हसतमुख असतात. 
दुसऱ्या दिवशी ओवनच्या बँकेत दोन बुरखेधारी शिरतात.त्यांना तिजोरीचे सर्व पासवर्ड माहीत असतात. ओवनला बंदुकीच्या धाकावर तिजोरी खोलायला लावून सर्व रक्कम घेऊन पसार होतात .ते चोर पार्करचे आईवडील बिल आणि  लिली असावेत असा ओवनला संशय येतो.
त्यानंतर पार्करचे अपहरण होते आणि त्याबदल्यात  अपहरणकर्ते ओवन आणि बिलकडे 5 करोडची मागणी करतात.त्यासाठी ओवन बिल आणि लिलीला बँक लुटायचा सल्ला देतो .
ओवन ,बिल आणि लिली बँक लुटण्यात यशस्वी होतील का ?
बिल आणि लिली खरोखरच बँक लुटेरे आहेत का??
एक धमाल विनोदी ऍक्शन चित्रपट जो पाहताना हसून हसून पुरेवाट होईल .
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे .

Sunday, July 16, 2023

मुंबईकर आणि लग्न

मुंबईकर आणि लग्न 
च्यायला, ह्या मुंबईच्या गर्दीत नीट चालता येत नाही आणि त्यात आमच्या म्हातारीला घेऊन जायचे म्हणजे डोक्याला ताप. त्यात आम्ही पडलो लोकलवाले .म्हणजे 8.40 पकडायची घाई.फास्ट चालायची सवय .सवयीप्रमाणे तिलाही लोकलने घेऊन जायचे ठरवले पण पोरगा ओरडला. म्हणतो ओला करून जा .त्यानेच बुक करून दिली .
काय म्हणता ही म्हातारी कोण ? आहो, आमच्या मातोश्री.नाही.. नाही सौ.ला म्हातारी म्हणण्याचा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही . तुमच्या मनात असा विचार येतोच कसा ? त्या दिवशी नुसते तिला म्हटले पोरगा मोठा झालाय आता आपण म्हातारे होऊ .तर दोन दिवस डब्यात कारल्याची आणि शेपूची भाजी दिली हो. राहू दे तो वेगळा विषय झाला .
तर मी कुठे होतो ? आईला घेऊन लग्नाला निघालो होतो.आहो, नाना सावर्डेकरच्या मुलीचे लग्न होते.त्या दिवशी पत्रिका द्यायला घरी आला आणि समोर मातोश्री.ती नुकतीच गावावरून आली होती. मग काय ? नाना पाहिले दहा मिनिटे डोळ्यातून पाणी काढीत होता.
नाना मुंबईत आला तेव्हा आमच्या म्हातारीनेच तीन वर्षे आमच्याकडे ठेवून घेतला होता त्याला .काही पैश्याची बोलणी नाही कसली लिखापढी नाही.नाना जे काही देत होता ते ती घेत होती. त्यानंतर त्याने भाड्याने खोली घेतली ,लग्न केले मग हळूहळू संबंध कमी होत गेले . पण दोघेही एकमेकांचे नाव काढतात हो .
पोरींचे लग्न म्हणून नाना खुश होता.त्याने आईला घेऊनच जायची तयारी दाखवली पण त्याच्या उत्साहाला मी आवर घातला .लग्नघरात तिला कुठे सांभाळणार ,तिचे पथ्यपाणी ,औषधे वेळेवर द्यायला हवे असे सांगून त्याला गप्प केले .सौची नजर पाहून नंतर घडणाऱ्या प्रसंगाची मानसिक तयारी ही केली.
लग्नाच्या दिवशी विचार केला दुपारी हाफडे जावे. पण दुपारी कधी नव्हे ते पोटभर जेवून ऑफिसमध्ये झोपाल त्यापेक्षा सुट्टी घ्या असा सल्ला सौने दिला.अर्थात माझ्यापेक्षा तीच मला चांगली ओळखते म्हणून मुकाटपणे सुट्टी टाकली.
पोराने बुक केलेली ओला दारात आली तरी म्हातारीची तयारी नाही.8.40 चुकली आणि 8.44 लेट झाली की जशी चिडचिड सुरू होते तशी माझी झाली .पण सौने ऑफिस नाही तर लग्नाला जातायत अशी आठवण करून दिली .
शेवटी त्या ओलामध्ये बसून म्हातारीच्या जुन्या आठवणी ऎकत हॉलमध्ये पोचलो.नानाने लग्नासाठी खूप पैसे खर्च केले आहेत हे हॉल पाहूनच लक्षात आले. हा मोठ्ठा दोन मजली हॉल. खाली जेवण तर पहिल्या मजल्यावर स्वागत समारंभ.
आम्हाला पाहताच नाना खुश झाला .नानांची बायको तर धावत येऊन आईच्या मिठीत शिरली.थोडा वेळ डोळ्यातून पाणी काढणे झाले. नानांची पोरगी वधूवेशात सुंदर दिसत होती .आमच्याकडे पाहून हसल्यासारखे केले आणि त्या मेकअप करणाऱ्या बाईला सूचना देऊ लागली. बाजूचा फोटोग्राफर तिचे फोटो घेत होता .नानाने तीनदा सांगितल्यावर त्याने चेहऱ्यावर त्रासिक भाव आणून आमचा फोटो काढला ."अरे चेडवाक घे फोटोत "असे मातोश्री म्हणताच "नको माझी तयारी चालू आहे नंतर काढू" असे उत्तर तिने दिले.
मी हॉलमध्ये कोपऱ्यात एक खुर्ची पाहून आईला बसविले पण नानाने आग्रह करून तिला पहिल्या रांगेत सोफ्यावर बसविले.हॉलमध्ये तीन ठिकाणी सेल्फी पॉईंट होते .सगळीकडे ही गर्दी .सगळे हातातील मोबाईलवरून फक्त फोटो काढीत होते.
हे काय ?? नवरा नवरी मंडपात आले पण त्यांचेही तिथेच फोटोशूट सुरू ? आहो विधी करायचे आहेत ना ?? 11.32 चा मुहूर्त आहे 11 तर इथेच वाजले .अक्षता वेळेवर डोक्यावर पडायला हव्या.
शेवटी मनसोक्त फोटो काढून झाल्यावर पुढचे विधी सुरू झाले.नवरा नवरीने एकमेकांच्या गळ्यात हार घातले तेव्हा बरोबर 11.50 झाले होते. सर्व विधी पार पडले आणि नवरानवरी फोटोशूटमध्ये मग्न झाले. आता नाना दिसेनासा झाला होता .ओळखीचे कोण दिसत नव्हते म्हणून आईला जेवायला घेऊन गेलो.
खाली जेवायला ही गर्दी.
तिथेही सेल्फी पॉईंट. 
सुरवात कुठून होतेय तेच कळत नव्हते. शेवटी तो डिश देणारा सापडला .अरे देवा.. सॅलडचे आठ दहा प्रकार होते.नंतर दहा ते बारा प्रकारचे पदार्थ मुख्य जेवणात.
मोजकेच पदार्थ डिशमध्ये घेऊन आईला दिले तर तिने "अरे तो पिझ्झा आण मला "अशी ऑर्डर दिली.मी चमकून पाहिले तर खरेच एक माणूस पिझ्झा खात होता.मी पिझ्झाच्या शोधात निघालो तर पुढे अजून काही काउंटर होते त्यावर वेगवेगळे पदार्थ होते .पावभाजी, डोसे, पाणी पुरी,इडली ,सँडविच अजून बरेच काही .मी पिझ्झा घेऊन आईला दिला.खरे तर इतके पदार्थ पाहून माझी भूकच मरून गेली. म्हातारी एका जागेवर बसून मला ऑर्डर सोडत होती. च्यायला लोक म्हणतील हा पोरगा आईला जेवायला घालत नसेल . 
शेवटी तिचे जेवून झाले आणि डिश ठेवायला गेलो .तिथे लोकांच्या भरलेल्या डिश कचऱ्यात जाताना पाहून मन उदास झाले.
आहो ते सँडविच बाहेर कमीतकमी पंचवीस रुपयाला मिळते ते तुम्ही पोट भरले म्हणून फेकून देतायत हे पाहून चीड आली. आणि हे काय अजून फोटोसेशनच सुरू .आता ही आत कधी जातील कपडे बदलून कधी येतील .स्वागत समारंभतर तीन वाजता संपणार.लोकांनी बघा जेवून रांग लावल्या आहेर देण्यासाठी आणि हे फोटोच काढतायत .
मी बाजूला गप्प बसून म्हातारीचे लग्नावरचे लेक्चर ऐकत होतो. आमच्या वेळी असा काय नव्हता हो असे दर चार वाक्यानंतर येत होते.मध्येच माझ्या लग्नात त्यांचे कसे अपमान झाले हे ही कळत होते.देवा हिला पंचवीस वर्षांपूर्वीच्या गोष्टीही अजून आठवतायत मग सौ ला काय काय आठवत असेल ?? ही संध्याकाळ बहुतेक अशीच जाणार तर ?
हुश्शह .. आले बाबा शेवटी नवरा नवरी स्टेजवर .दोघेही आधुनिक पोशाखात सुंदर दिसत होते .
अरे पण हे काय ? सर्वाना थांबून पुन्हा स्टेजवर फोटो सेशन सुरू .आता तर रांगेतील लोकांनी खुर्च्या आणून त्यावर बसले.तर बरेचजण सतत घड्याळाकडे पाहून मूकपणे निषेध व्यक्त करू लागले. 
मी ही चुपचाप रांगेत उभा राहिलो. माझ्या पुढ्यातील सुंदर स्त्री आपल्या मैत्रिणीला सांगत होती जेवणात पन्नास पदार्थ ठेवले म्हणून हवे तसे वागायचे नसते आम्हालाही बाहेर कामे आहेत आणि फुकट काही खात नाही आहेर देणार आहोत. हे ऐकून मी बाकीच्या इतर स्त्रियांकडे लक्ष वळविले.
थोड्या वेळाने आहेर सुरू झाले तर दुसऱ्या बाजूने भलतीच माणसे घुसून आहेर देऊ लागली.आहेरची रांग नियंत्रित करणाराही कोणाला जाऊ देत नव्हता . शेवटी हॉल खाली करण्याची पहिली घंटा झाली .
मी रांग सोडून बाहेर आलो आईला म्हटले नानाला भेटून येतो .नानाला भेटून त्याच्या हाती आहेर दिला .ते पाहून नाना कसेनुसे हसला .गर्दीतून बाहेर आला आणि आईला दरवाज्यावर भेटला .
"बरा वाटला हो तुका भेटून "असे डोळ्यात पाणी आणून म्हणाला .
"नाना खूप मोठा हो .ह्या तुझ्या डोळ्यातील पाणीच माका खेचून आणता बघ "असे बोलून आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला.समोर आलेल्या टॅक्सीत बसून आम्ही घरी निघालो.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Saturday, July 15, 2023

अधुरा

अधुरा
ADHURA
काही वेब सिरीज /चित्रपट असे असतात की संपूर्ण पाहिल्याशिवाय आपण जागेवरून उठू शकत नाही.प्रत्येक भागानंतर पुढे काय होईल याची उत्सुकता ताणून धरते.अशीच ही एक सिरीज अधुरा 
निलगिरी वॅली स्कूल ही देशातील सर्वोत्तम शाळा समजली जाते. निसर्गाच्या कुशीत उंच थंड हवेच्या ठिकाणी ही शाळा आहे.या शाळेत शिकलेले विद्यार्थी आज जगाच्या कानोकोपऱ्यात यशस्वी व्यक्ती म्हणून नावाजल्या जातात.
लवकरच 2007 साली उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची रियुनियन या शाळेत होणार आहे. त्याच्या काही दिवस आधीच वेदांत  तिथे ऍडमिशन घेतो.वेदांत थोडा अबोल आहे.स्वतःच्या कोषात राहणारा. त्याला इतर मुले त्रास देतात. शाळेचा डीनही त्याला त्रासलेला आहे पण मानसोपचारतज्ञ  सुप्रिया त्याला सतत सपोर्ट करते.
2007 च्या रियुनियनमध्ये अधिराज अमेरिकेतून आलाय.तर देव त्या शाळेचा ट्रस्टी आहे आणि राजकारणीसुद्धा .त्याची बायको मालविका ही अधिराजची पूर्वीची प्रेमिका .सुयश मोठा टीव्ही स्टार आहे .हे सर्व मित्र पंधरा वर्षांनी एकत्र येतात .
पण अधिराजचा मित्र निनाद यात नाहीय.चौकशी करताना अधिराजला समजते की तो शाळेच्या शेवटच्या दिवशी गायब झालाय तेव्हापासून त्याचा पत्ता कोणालाच नाहीय.
रियुनियनच्या काही दिवस आधीच डीन व्यासचा मृत्यू होतो. तो नैसर्गिक मृत्यू नाही असे एक शिक्षक सतत सांगतोय पण त्याच्याकडे कोण लक्ष देत नाहीय.
रियुनियन सुरू झाल्यापासून विचित्र घटना घडत जातात. सुयश आणि अजून एका मित्राचा मृत्यू होतो.
निनादच्या गायब होण्यामागे एक रहस्य दडले आहे आणि छोट्या वेदांतचा याच्याशी काहीतरी संबंध आहे असा संशय अधिराजला येतो आणि तो छडा लावायचा प्रयत्न करतो.
कुठे आहे निनाद ?
वेदांत कोण आहे ?
प्रत्येक भागात या रहस्याचे कोडे एक एक करत सुटत जाते.
प्राईम विडिओवर ही सिरीज हिंदीमध्ये आहे .
अतिशय वेगवान ,भीतीदायक ,अंगावर काटा आणणारी सिरीज आपल्याला पूर्ण पाहून झाल्याशिवाय जागेवरून उठवणार नाही .

Thursday, July 13, 2023

ब्लाईन्ड

BLIND
ब्लाईन्ड
जिया एक तरुण पोलीस अधिकारी .ती अनाथाश्रमात मोठी झालीय. एके दिवशी तिच्या मानलेल्या भावाला पबमधून जबरदस्तीने बाहेर घेऊन येते.गाडीत दोघांची थोडी झटापट होते आणि गाडीचा अपघात होतो त्यात तिचा भाऊ मरतो आणि ती आंधळी होते.
पुढे ती अंध व्यक्तींसाठी असलेले शिक्षण घेते आणि पुन्हा पोलीस खात्यात जॉब मिळवायचा प्रयत्न करते पण त्यात यश येत नाही .एके दिवशी ती अनाथाश्रमातून रात्री उशिरा बाहेर पडते आणि टॅक्सीची वाट पाहत असते.एक टॅक्सी तिला मिळते .योगायोगाने तो ड्रायव्हर भारतीयच असतो . प्रवासात तिला गाडीच्या डिकीत कोणीतरी असल्याचा भास होतो .ती टॅक्सी थांबवून त्याला जाब विचारते पण तो तिच्यावर हल्ला करून पळून जातो.
ती आपले स्टेटमेंट पोलिसांना देते पण पोलीस तिच्यावर फारसा विश्वास ठेवत नाहीत.पृथ्वी नावाच्या सुस्त अधिकाऱ्याकडे तिची केस देण्यात येते. बातम्यांमध्ये एक मुलगी त्या भागातून गायब झालीय असे सांगितले जाते.जियाला खात्री पटते त्या दिवशी टॅक्सीच्या डिकीत तीच मुलगी होती. पृथ्वी जिया आंधळी आहे म्हणून लक्ष देत नाही पण तिची बुद्धीमत्ता आणि टॅक्सी ड्रायव्हरचे साधारण वर्णन ऐकून आश्चर्यचकित होतो.
निखिल नावाचा तरुण बक्षिसाच्या आशेने पृथ्वी आणि जियाला अर्धवट सत्य माहिती सांगतो .
ही सर्व माहिती त्या खुन्याला कळते .आता तो निखिल आणि जियाच्या मागे लागलाय.
पृथ्वी त्या दोघांना पुरेसे संरक्षण देईल का ??
तो खुनी कोण आहे ??
एक आंधळी तरुण मुलगी आणि तरुण मुलगा त्या खुन्याला कसे तोंड देतील.
सोनम कपूरने जियाची व्यक्तिरेखा छान रंगवली आहे.तर विनय पाठक पृथ्वीच्या भूमिकेत शोभून दिसतो.
संपूर्ण चित्रपट परदेशात का चित्रित केलाय ते कळत नाही.अशी कथा भारतात ही चित्रित करता आली असती.
चित्रपट जिओ सिनेमावर फ्रीमध्ये उपलब्ध आहे .

Wednesday, July 12, 2023

अपग्रेड

UPGRADE
अपग्रेड
ग्रे एक मोटर मॅकनिक आहे. ज्याला नवीन टेक्नॉलॉजीविषयी फारशी आवड नाही .स्वतःच्या हाताने काम करणे आवडते.पण त्याची बायको आशा एका मोठ्या रोबोटिक्स कंपनीत काम करते.जी फक्त ऑर्डर देऊन सर्व कामे करते. तिची कारही तिच्या आवाजावर चालते. 
त्या दिवशी ते ग्रेच्या एका कस्टमरकडे जातात. ग्रेचा तो कस्टमर जमिनीखाली एका मोठ्या बंगल्यात राहतो.त्याला प्रसिद्धी नकोय ,लोकांचा सहवासही नकोय. बोलता बोलता तो त्यांना एक छोटी चिप दाखवतो. त्या चिपने मानवात खूप बदल होईल असे त्याचे म्हणणे.ग्रे त्याचे म्हणणे उडवून लावतो.तर आशा खूप उत्साहित होते.परत घरी येताना आशाच्या स्वयंचलित गाडीत बिघाड होतो आणि ती गाडी शहराच्या जुनाट भागात येते.तो भाग असा आहे की तिथे गुंड मवाली लोकांचे राज्य आहे.
तेथील गुंड ग्रे आणि आशावर हल्ला करतात.त्यात आशा मारली जाते आणि ग्रे मानेखाली अधू होतो.एरॉन जो ग्रेचा कस्टमर होता . तो ती चिप ग्रेच्या मानेत बसवतो. एरॉन त्या चिपला स्टीम नाव देतो. अतिशय गुप्तपणे झालेल्या ऑपरेशननंतर ग्रेच्या शरीरात बदल होतो.तो उठून हिंडाफिरायला लागतो. तो स्टीमला प्रश्न विचारतो आणि स्टीम त्याची उत्तरे देतो इतकेच नव्हे तर कधी कधी स्टीम त्याला सल्ले ही देतो.
स्टीम त्याला आशाचा खुनी शोधून देण्यास मदत करतो.हळूहळू स्टीमच्या मदतीने ग्रे त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या सगळ्यांना शोधून काढतो .पण आशाच्या खुनामागे केवळ लूटमारी नसून वेगळेच कारण आहे असा त्याला शोध लागतो. तो त्या प्रकरणाच्या मुळापर्यंत जातो आणि खऱ्या सुत्रधाराला शोधून काढतो. पण हे करताना त्याचा शेवट मात्र अनपेक्षित असतो.
टेक्नॉलॉजी हळूहळू मानवात किती बदल करतोय हे दाखविणारा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत उपलब्ध आहे .

Monday, July 10, 2023

IB 71

IB 71
आय बी 71
1971 च्या भारत पाकिस्तान युद्धापूर्वी बऱ्याच काही घटना घडल्या त्या अजूनही पडद्याआड आहेत.
त्यातीलच ही एक कथा.हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे .भारताचा ईशान्य पूर्वेकडील भाग तोडून आपल्या घशात घालायचा चीनचा इरादा होता.त्यासाठी त्यांनी पाकिस्तानला हाताशी धरले होते.पाकिस्तानलाही पूर्व पाकिस्तानवर आपली पकड मजबूत करायची होती.
या सर्व योजना पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानी सैन्य लवकरात लवकर पूर्व पाकिस्तानात जाणे गरजेचे होते आणि त्याला हवाईमार्ग हाच एक पर्याय होता. 
आयबी एजंट  देवला याची माहिती मिळते.दहा दिवसांनंतर पाकिस्तान आणि चीन भारतावर  कधीही हल्ला करू शकतात . पण त्यासाठी भारतीय सैन्य तयारीत नाही आणि पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आपल्या भूमीवरून हवाई उड्डाणाची बंदीही ते घालू शकत नाही .अश्या दुहेरी पेचात भारत सापडतो.
अचानक काश्मीरमध्ये भारतविरोधी काहीतरी कारस्थान शिजतेय असे देवला कळते आणि तो याच कारस्थानाचा फायदा भारतासाठी कसा वापरता येईल याची योजना बनवितो. 
तीस भारतीय एजंटला घेऊन तो ही योजना तयार करतो .पण हे ऑपरेशन पूर्ण करताना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते.
देवची योजना यशस्वी होईल का ??
तो आपल्यासाहित तीस एजंटला वाचवू शकेल ?
विद्युत जमवालने देवची मुख्य भूमिका केली आहे.यात त्याला हाणामारीचे फारशी संधी नाही .मराठी अभिनेता सुव्रत जोशीला मोठी आणि महत्वाची भूमिका आहे.
एक वेगवान थ्रिलर हेरकथा असलेला हा चित्रपट हॉटस्टारवर आहे.

ओल्ड

OLD
ओल्ड
गाय आणि प्रिसियाने ते रिसॉर्ट इंटरनेटवरून शोधले होते.आपल्या दोन मुलांसह ते तिथे पोचतात.त्यांची मुलगा साधारण सहा वर्षाचा तर मुलगी आठ वर्षाची असेल.रिसॉर्टवर अजूनही काही फॅमिली आल्यात.
रिसॉर्टचा मॅनेजर त्यांना थोड्या अंतरावर असलेल्या छोट्या बेटावर फिरायला येणार का ? असे विचारतो आणि ते तयार होतात.दुसऱ्या दिवशी गाडीत अजून काही फॅमिली त्यांच्यासोबत असतात.
बेट अतिशय सुंदर आहे.स्वच्छ निळा समुद्र ,सोनेरी वाळू आणि निर्मनुष्य .मुले तिथे खेळतात, स्त्री पुरुष पाण्यात पोहतायत.
अचानक त्यातील एकाला जाणवते की मुले आपल्या वयाच्या मानाने मोठी दिसतायत.थोड्यावेळाने ती लहान मुले मोठी होतात.इतकेच नव्हे तर सर्वानाच आपल्या शरीरात बदल जाणवतो. सर्वांना कळते आपण वयाने वाढतोय .पण आता ते तिथे अडकले आहेत.मोबाईलची रेंज नाही.आजूबाजूला लोकवस्ती नाही .त्यांना बेटावर सोडून गेलेली बस परत गेलीय. अडकलेल्या व्यक्तींचा एक एक करून मृत्यू होतोय.काय आहे त्या बेटाचे रहस्य ? मोजक्याच व्यक्तींना का निवडण्यात आलेय.?  या बेटावरून बाहेर पडण्यात कितीजण यशस्वी होतील आणि कसे ?
एम.नाईट श्यामलन दिग्दर्शित हा चित्रपट आहे यावरूनच त्याची गूढता किती असेल याची कल्पना करू शकतो.
चित्रपट हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे.

ओल्ड

OLD
ओल्ड
गाय आणि प्रिसियाने ते रिसॉर्ट इंटरनेटवरून शोधले होते.आपल्या दोन मुलांसह ते तिथे पोचतात.त्यांची मुलगा साधारण सहा वर्षाचा तर मुलगी आठ वर्षाची असेल.रिसॉर्टवर अजूनही काही फॅमिली आल्यात.
रिसॉर्टचा मॅनेजर त्यांना थोड्या अंतरावर असलेल्या छोट्या बेटावर फिरायला येणार का ? असे विचारतो आणि ते तयार होतात.दुसऱ्या दिवशी गाडीत अजून काही फॅमिली त्यांच्यासोबत असतात.
बेट अतिशय सुंदर आहे.स्वच्छ निळा समुद्र ,सोनेरी वाळू आणि निर्मनुष्य .मुले तिथे खेळतात, स्त्री पुरुष पाण्यात पोहतायत.
अचानक त्यातील एकाला जाणवते की मुले आपल्या वयाच्या मानाने मोठी दिसतायत.थोड्यावेळाने ती लहान मुले मोठी होतात.इतकेच नव्हे तर सर्वानाच आपल्या शरीरात बदल जाणवतो. सर्वांना कळते आपण वयाने वाढतोय .पण आता ते तिथे अडकले आहेत.मोबाईलची रेंज नाही.आजूबाजूला लोकवस्ती नाही .त्यांना बेटावर सोडून गेलेली बस परत गेलीय. अडकलेल्या व्यक्तींचा एक एक करून मृत्यू होतोय.काय आहे त्या बेटाचे रहस्य ? मोजक्याच व्यक्तींना का निवडण्यात आलेय.?  या बेटावरून बाहेर पडण्यात कितीजण यशस्वी होतील आणि कसे ?
एम.नाईट श्यामलन दिग्दर्शित हा चित्रपट आहे यावरूनच त्याची गूढता किती असेल याची कल्पना करू शकतो.
चित्रपट हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे.

Thursday, July 6, 2023

बर्ड बॉक्स

BIRD BOX
बर्ड बॉक्स
त्या शहरात अचानक सामूहाईक आत्महत्येचे प्रकार सुरू झाले.यामागे सैतान आहेत असे म्हटले जात होते तर काहीजण अमानवीय पशू पक्षी आहेत असे म्हणत होते.पण उघड्या डोळ्यांनी पाहिले तरी बघणारे आत्महत्या करायचे.
मॅलोरी गरोदर आहे.ती हॉस्पिटलमध्ये चेकिंग करायला जाते आणि तिथेच सामूहाईक आत्महत्येचे प्रकार चालू होतात यात तिची बहीणही मरते. शेवटी एका घरात तिला आश्रय मिळतो .तिथे आधीच काही व्यक्ती राहत असतात.ऑलिपिया नावाची दुसरी गरोदर स्त्री तिथे आश्रयास येते.दोघींही एकाच वेळी मुलांना जन्म देतात .मॅलोरीला मुलगा तर ऑलिपियाला मुलगी होते.पण घरातील सर्व आत्महत्या करतात. त्यातील एक तरुण टॉम मॅलोरीला वाचवतो.ते दोघेही दोन्ही मुलांना घेऊन दूर जंगलात निघून जातात. पक्षांना या संकटाची आधीच जाणीव होत असते म्हणून मॅलोरी आपल्यासोबत पक्षी ठेवते. या गोष्टीला पाच वर्षे होतात .टॉम आणि मॅलोरी दोन्ही मुलांसोबत त्या जंगलातच राहत असतात. त्यांचा बराचसा वेळ डोळ्यावर पट्टी बांधूनच जात असतो.ते मुलांनाही डोळ्यावर पट्टी बांधून जगायचे शिकवितात.अचानक काही व्यक्ती त्यांच्यावर हल्ला करतात.त्यात टॉम मारला जातो.
आता मॅलोरीला दोन्ही मुलांना घेऊन अश्याजागी जायचे आहे जिथे ती सुरक्षित राहील.तिला काही माणसे कुठे यायचे ते सांगतात.पण तो मार्ग खडतर आहे. आत्महत्येनी पछाडलेली माणसे जागोजागी आहेत .तर त्या वातावरणातही हा रोग पसरला आहे.फक्त पक्षीच त्यांना संकटाची आगाऊ सूचना देऊ शकतात.आपल्या आणि दोन्ही मुलांच्या डोळ्यावर पट्टी बांधून मॅलोरी प्रवासास सुरुवात करते.ती पक्ष्यांना एका बॉक्समध्ये घेते. ती इच्छित सुरक्षितस्थळी सुखरूप पोचेल का ?? 
सॅन्ड्रा बुलॉकने नेहमीप्रमाणे अभिनयात कमाल केली आहे पण त्यातही ती दोन छोटी मुले भाव खाऊन जातात.त्यांचा निरागस चेहरा आईसोबत राहणे, ती जे सांगेल तसेच वागणे .डोळ्यावर पट्टी बांधून प्रवास करणे आपल्याला आतून हलवते.
चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे.

Wednesday, July 5, 2023

स्कायस्क्रॅपर

SKYSCRAPER
स्कायस्क्रॅपर
पर्ल हॉंगकॉंगमधील 225 मजल्याची सर्वात उंच इमारत होती. तिचे काही मजले जनतेसाठी खुले झाले होते आणि आता उरलेले मजले खुले होणार होते.पण त्याआधी विल सॉयर हा सिक्युरिटी कन्सल्टंट त्याची पाहणी करायला आणि परमिशन द्यायला आलाय. विलसोबत त्याची फॅमिली आहे.पत्नी आणि दोन मुले.सध्या ते 96 व्या मजल्यावर राहातायत.
विल सॉयर एक मरीन आहे.दहावर्षांपूर्वी एका ओलीस ठेवलेल्या  मुलाला वाचवताना त्याचा पाय गुढग्यातून कापला गेलाय. सध्या तो कुत्रिम पाय लावून फिरतो.
विल इमारतीच्या मालकांकडून सिक्युरिटी सिस्टीम असलेला टॅब घेतो आणि दोन किलोमीटर दूर असलेल्या त्यांच्या सिस्टीम सेंटरला भेट देण्याचे ठरवितो.तोपर्यन्त त्याचे कुटुंब झूला जायचे ठरविते.
रस्त्यात काही माणसे विलवर हल्ला करून त्याचा टॅब ताब्यात घेतात. त्यानंतर तीच माणसे पर्लची सिस्टीम ताब्यात घेऊन संपूर्ण यंत्रणा हॅक करतात . झू बंद झाल्याने विलचे कुटुंब परत पर्लमध्ये येते. काही माणसे 96 व्या मजल्याला आग लावतात.त्यांचे साथीदार सर्व यंत्रणा बंद करून टाकतात .
आपल्या मजल्यावर आग लागलीय हे विलची बायको विलला कळविते. सर्वत्र पोलीस बंदोबस्त असल्यामुळे विलला इमारतीत शिरण्यासाठी दुसरा खडतर मार्ग अवलंबावा लागतो.तो इमारतीत कसा शिरतो हे बघण्यासारखे आहे.
पुढे सुरू होता विलचा आपल्या कुटुंबापर्यंत पोचण्याचा रोमांचक अंगावर काटे आणणारा प्रवास .
बोथा नावाच्या अतिरेक्यांने आपल्या साथीदारांसह हे सर्व योजनाबद्धरित्या घडवून आणलेले असते.हळू हळू संपूर्ण इमारतीत आग पसरत जाते. एका बाजूला आग आणि दुसऱ्या बाजूला अतिरेकी यातून विल आपल्या परिवारासह सुखरूप बाहेर पडेल का ??? 
वायने जॉन्सन उर्फ द रॉक याची प्रमुख भूमिका आहे आणि तो त्यात शोभून दिसतो.
 श्वास रोखून धरणारा आणि संपेपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे.

Tuesday, July 4, 2023

कथाल

कथाल ए जॅकफ्रुट मिस्ट्री
त्या एमएलएच्या बंगल्यातील झाडावरून दोन फणस नाहीसे होतात आणि तो संतापून पोलिसांना बोलावतो.आता फणसाच्या चोरीचा शोध कोण आणि कसा घेणार ? 
सर्व वरिष्ठ अधिकारी आपापल्या ज्युनियरवर ती जबाबदारी ढकलून मोकळे होतात.इन्स्पेक्टर महिमा सर्वाची ज्युनियर त्यामुळे जबाबदारी तिच्यावरच येते.
त्या आमदाराचा रोष सहन करीत आपल्या सहकार्यांना घेऊन ती तपासास सुरवात करते. कोणतरी बळीचा बकरा बनवून त्याला तुरुंगात टाक असे तिचे वरिष्ठ सल्ला देतात पण तिला ते पटत नाही .शेवटी एक संशयित तिला सापडतो.एक म्हातारा जो बंगल्यात माळी होता आणि चोरीच्या घटनेनंतर गायब होता.
ती त्याला अटक करते पण तो रडत रडत गुन्हा नाकबूल करतो.उलट माझी मुलगी काही दिवसांपासून हरवली आहे आणि तिची तक्रारही पोलीस घेत नाही असा आरोप करतो.गोष्ट खरी असते .ह्या कथाल चोरीमुळे पोलिसांना दुसरीकडे कुठेही लक्ष द्यायला वेळ नाही.
महिमा एक युक्ती करते. फणसाची चोरी त्या मुलीने केलीय असे जाहीर करते. ताबडतोब त्या मुलीला शोधा असा वरून आदेश निघतो.महिमाला तिचा शोध घेताना अनेक अनपेक्षित गोष्टी आढळतात. एक असे कारस्थान जे अनेक वर्षापासून चालू आहे याचा सुगावा तिला लागतो आणि चित्रपटाचा गमतीशीर प्रवास गंभीर होत जातो.आतापर्यंत हसत हसत त्याची मजा घेत असलेला प्रेक्षक गंभीर होतो .
काय आहे ते कारस्थान ? महिमा त्या मुलीला शोधण्यात यशस्वी होईल का ? फणस कोणी चोरले ??एका छोट्या गावात घडणारी गोष्ट आपल्याला अनेक सामाजिक गोष्टी चालीरीती यांची जाणीव करून देते.
विजयराज आणि राजपाल यादव हे दोनच ओळखीचे चेहरे यात आहेत.सानया मल्होत्रा आणि अनंत जोशी मुख्य कलाकार यादीत आपली छाप पाडून जातात.
चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे.एकदा पहाच 

रस्ट क्रीक

रस्ट क्रीक 
RUST CREEK
स्वायर स्कॉट एक कॉलेज तरुणी .उत्कृष्ठ खेळाडू.तिला वॉशिंग्टनमधून एका मोठ्या कंपनीतून इंटरव्ह्यूसाठी बोलावणे आलेय. ती एकटीच कारने वॉशिंग्टनला निघालीय.थँक्सगिविंगचे दिवस असल्याने सगळीकडे ट्रॅफिक जॅम आहे म्हणून ती फोनमधील जीपीएसच्या मदतीने दुसरा मार्ग पकडते आणि दाट जंगलात जाऊन पोचते.
आता ती अश्या जागी पोचते जिथून मनुष्यवस्ती अजिबात दिसत नाही.ती जीपीएसचा नाद सोडून नकाशा काढते. इतक्यात बाजूने एक गाडी जवळ येऊन थांबते.त्यात दोन तरुण असतात.ते दोघेही भाऊ असल्याचे तिला सांगतात आणि मदतीची तयारी दाखवितात.स्कॉटला त्यांची वागणूक न पटल्याने ती नकार देते तेव्हा तिच्यावर हल्ला करतात.
स्कॉटच्या पायाला सुरा लागून ती जखमी होते पण ते भाऊही जखमी होतात. स्कॉट त्यांच्यापासून दूर जंगलात पळते.ते दोघेही तिच्या मागे लागतात.ती त्यांना शिताफीने चकमा देते पण जखमी आणि उपाशी असल्यामुळे बेशुद्ध पडते .
पुढे काय ?? 
ते तरुण तिला पुन्हा पकडतील का ? 
का ते तिच्या मागे लागले ??
पोलीस तिला शोधून काढतील का ??
एक थरारक अनुभव घ्यायचा असेल तर नक्की पहा.
चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे.

Saturday, July 1, 2023

नोबडी

नोबडी
NOBODY
तो एका छोट्या कारखान्यात ऑडिटर आहे.घरी पत्नी ,वयात आलेला तरुण मुलगा आणि छोटी मुलगी असे चौकोनी साधे कुटुंब. त्याचे आयुष्यही रुटीनप्रमाणे चालू आहे.सकाळी जॉगिंग,मग थोडा व्यायाम ,नाश्ता ठराविक बस पकडून कामावर जाणे.रोज कचऱ्याची गाडी चुकणे हे रुटीन चालूच आहे.त्याचे वडील रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत.
सगळे कसे छान चालू असताना एका रात्री दोन व्यक्ती त्याच्या घरात बंदूक घेऊन घुसतात.त्यातील एक स्त्री असते .तो घाबरून एका भांड्यात ठेवलेले पैसे मुकाटपणे त्यांना देतो.त्या स्त्रीच्या मनगटावरचा टॅटू पाहून घेतो.त्याचा मुलगा ,शेजारी ,ऑफिसचा सहकारी चोरांना विरोध केला नाही म्हणून त्याला दोष देतात.
पण अचानक त्याची छोटी मुलगी हातातील ब्रेसलेट चोरांनी नेले म्हणून रडते .तेव्हा हा चिडतो आणि टॅटू असलेल्या स्त्रीचा शोध घेतो.तो दोन्हीही हल्लेखोरांना शोधतो पण त्यांना न मारता सोडून देतो .परत बसमधून येताना काही गुंड बसमधील तरुणीला त्रास देतात तेव्हा हा सगळा संताप त्यांच्यावर काढतो .
पण त्या गुंडामधील एकजण तेथील सर्वात मोठ्या रशियन माफियाचा भाऊ असतो .तो माफिया आता त्याच्या मागे लागतो .
तो यातून मार्ग कसा काढेल ?? आपल्या कुटुंबाला तो रशियन माफियापासून वाचवेल का ?? तो कोण आहे ?? त्याची माहिती मिळताच माफियाची सेक्रेटरी आपला जॉब सोडून पळून का जाते ?? 
एक थ्रिलर चित्रपट जो पूर्ण पाहिल्याशिवाय आपण उठू शकत नाही.
चित्रपट अमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्सवर आहे.