Thursday, August 31, 2023

ब्रो

BRO
ब्रो
मृत्यूनंतर आपल्या परिवाराचे काय होईल ही भीती प्रत्येकालाच असते.
मार्कंडेय उर्फ मार्क आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करतो.लहानपणीच त्याचे वडील गेले आणि आई भाऊ दोन बहिणींची जबाबदारी त्याच्यावर आली.तो आता मोठ्या कंपनीत कामाला आहे. लवकरच जनरल मॅनेजरही बनणार आहे.त्याची एक प्रेयसीसुद्धा आहे..पण आपल्या कुटुंब स्थिर झाल्याशिवाय लग्न करायचे नाही असे तो म्हणतो.आपल्या परिवाराने आपले ऐकलेच पाहिजे असा काही हट्टी स्वभाव झालाय त्याचा.
आता भाऊ अमेरिकेत नोकरी करततोय.एक बहीण लग्नाच्या वयात आलीय. तर दुसरी कॉलेजला जातेय. या सर्वांची काही स्वप्ने आहेत पण मार्कच्या म्हणण्यानुसार वागावे लागतेय.
एके दिवशी फॅक्टरी व्हिजिट करून येत असताना त्याच्या गाडीचा अपघात होतो. जाग येते तेव्हा कळते तो एका अंधाऱ्या खोलीत आहे .पण अचानक एका प्रकाशात त्याच्यासमोर तो येतो.
तो स्वतःला वेळ टाईम किंवा समय असे संबोधतो. तो आहे दूत. तो मार्कला घेऊन आलाय.मार्क हे ऐकताच हादरतो. अजून आपल्याला परिवारासाठी खूप काही करायचे आहे असे सांगतो. ते आयुष्यात सेटल झाले नाहीत असे सांगतो.मार्क त्याला ब्रो म्हणतो.मला परत पाठव असे गयावया करत सांगतो.शेवटी तो मार्कला फक्त नव्वद दिवस देतो आणि मी तुझ्यासोबत राहीन अशी अट घालून परत पाठवतो .
आता मार्कच्या हातात फक्त नव्वद दिवस आहेत.या नव्वद दिवसात त्याला आपल्या परिवाराला सेटल करायचे आहे .त्याला हे शक्य होईल.
जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय ...भा. रा. तांबेच्या या कवितेला समर्पक असा हा चित्रपट आहे.
आपल्या मृत्यूने काही दिवसच परिवारावर फरक पडेल नंतर मात्र ते स्वतः खंभीरपणे स्वतःची स्वप्ने पूर्ण करतील असाच संदेश हा चित्रपट हलक्या फुलक्या विनोदी अंगाने देतो.
पवन कल्याण दूताच्या भूमिकेत बाजी मारून जातो.तर मार्कच्या भूमिकेत साई धरम तेजने छान साथ दिलीय. बाकी साऊथचे नेहमीचे कलाकार आहेत.
सहकुटुंबाने एकत्रितपणे पहावा असा हा चित्रपट नेटफिक्सवर हिंदी भाषेत आहे.

DEATH AT A FUNERAL

DEATH AT A FUNERAL
डेथ ऍट अ फुनेरल
 फॅमिली मित्र परिवाराला एकत्र येण्याचे कारण अंत्यसंस्कारही असू शकतात.अश्याच एका अंत्यसंस्काराला एडवर्डची फॅमिली एकत्र आलीय.अर्थात याला कारणीभूत एडवर्डच आहे कारण तोच मृत्यू पावलाय. आपले अंत्यविधी घरीच व्हावे अशी त्याची अंतिम इच्छा होती.त्याचे घर मोठे आहे आणि फॅमिली ही.
एरॉन त्याचा मोठा मुलगा आणि त्याची पत्नी मिचेल त्या घरात राहतात.तर दुसरा मुलगा रेयॉन यशस्वी लेखक असून तो न्यूयॉर्कला राहतो. हळूहळू एडवर्डची फॅमिली त्याच्या अंत्यसंस्कारासाठी एकत्र येते.प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात.ते इथे एकत्र आल्यावर सुटू शकतील या आशेवर आलेले आहेत. एडवर्डच्या मृत्यूचे फारसे कोणाला दुःख नाहीय .एडवर्डची पुतणी इलाईन आपला मित्र ऑस्करला घेऊन आलीय.आपल्या वडिलांना ती त्यांच्याविषयी सांगणार आहे. 
तिथे फ्रॅंकही आलाय.तो कोण आहे याविषयी कोणालाच माहीत नाही.फ्रॅंक बुटका आहे .साधारण चार फूट उंचीचा.तो एरॉनला एकांतात भेटून एडवर्डविषयी एक सत्य सांगतो आणि ते ऐकून एरॉन हादरतो . तीस हजार डॉलर दिले नाहीस तर हे सत्य पुराव्यानिशी सगळ्यांना सांगेन अशी धमकी फ्रॅंक देतो आणि मग एरॉन आणि रेयॉनची सत्य लपविण्यासाठी धडपड सुरू होते आणि त्या धडपडीतून काय विनोद होतात ते प्रत्यक्षात पाहायला हवे.
ही एक ब्लॅक कॉमेडी आहे.सर्वांनी मिळून पहावी आणि हसावे इतकीच अपेक्षा या चित्रपटात आहे.
मार्टिन लॉरेन्स ,ख्रिस रॉक ,डॅनी ग्रोव्हर यात प्रमुख भूमिकेत आहेत.चित्रपट हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे.एक खुसखुशीत विनोदी चित्रपट पाहायचा असेल तर नक्की पहा.

Monday, August 28, 2023

GUNS AND GULAABS

GUNS AND GULAABS
गन्स अँड गुलाब 
साधारण 1990 चा काळ .गुलबागंज आणि शेरपूर ही लगतची गावे.दोन्ही गावात अफूची शेती होते.शेतकऱ्यांनी किती अफू पिकवायची हे सरकार ठरवते. गांची गुलाबगंजचा अफूचा तस्कर तर नबीद शेरपूरचा . अनधिकृत अफू त्यांच्या ताब्यात असते.दोघात मोठे वैर आहे.
गांचीचा उजवा हात टायगर नबीदकडून मारला जातो .टायगरचा मुलगा टिपू सरळमार्गी मेकॅनिक .तो वडिलांच्या विरुद्ध स्वभावाचा .चित्रलेखावर तो मनापासून प्रेम करतो.चित्रलेखा शाळेत टीचर आहे.
नार्कोटिक्स विभागातून नवीन अधिकारी अर्जुन वर्मा गुलाबगंजला बदली होऊन आलाय .अतिशय प्रामाणिक अधिकारी म्हणून त्याची ओळख आहे.पण इथे त्याच्या जुन्या शत्रूने ब्लॅकमेलिंगमध्ये अडकविले आहे.
आत्माराम नबीदचा साथीदार.त्यानेच टायगरचा खून केलाय आता तो गांचीच्या मागे आहे.
एक अफूची मोठी ऑर्डर गांचीला कोलकत्यातील सुकांतोकडून मिळाली आहे. गांची ही ऑर्डर पूर्ण करेल पण त्या आधीच अपघात होऊन कोमात जातो. इथे आत्मारामचे साथीदार टिपूला त्याच्या बापाला कसे मारले ते सांगून भडकवितात आणि त्याच रागात टिपू हातातील स्पॅनरने दोघांना ठार मारतो आणि सगळा गुलाबगंज त्याला स्पॅनर टिपू नाव देतात.आपल्यावरील खुनाचा आरोप दूर होण्यासाठी टिपू गांचीच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारतो.
गांचीच्या अपघातामुळे अफूची ऑर्डर नबीद स्वीकारण्याचा प्रयत्न करतो .पण अर्जुन वर्मा गांची आणि नबीदकडील अफू जप्त करतो .आता गांचीचा मुलगा , नबीद ,टिपू ,आत्माराम ,अर्जुनचे जुने शत्रू तो जप्त केलेला अफू ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत .यात कोण यशस्वी होईल ?
यात शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची ही वेगळी कथा आहे. ते विद्यार्थी टायगरच्या खुनाशी ,चित्रलेखा आणि टिपूशी संबंधित आहे.
सतीश कौशिक गांची, राजकुमार राव टिपू ,दिलंक्यूर  सलमान अर्जुन वर्मा ,आणि  गुलशन देवाईः आत्माराम अशी एक तगडी स्टारकास्ट या सिरीजमध्ये आहे .सिरीजचा दुसरा सीजनही येईल अशी अपेक्षा आहे.
एक कॉमेडी थ्रिलर सिरीज नेटफ्लिक्सवर आहे.

Saturday, August 26, 2023

ESCAPE PLAN

ESCAPE PLAN
इस्केप प्लॅन 
असा कोणताही तुरुंग नाही जिथून कोणी पळून जाऊ शकत नाही .रे ब्रेसीनने आतापर्यंत चौदा तुरुंगातून स्वतःची सुटका करून घेतलेली असते. तो स्वतः अश्या सिक्युरिटीमध्ये तज्ञ आहे.त्याच्या कंपनीत त्याचा पार्टनर आणि दोन मदतनीस आहेत.जगातील प्रत्येक तुरुंगात त्याचे पुस्तक आहे.
जेसीका सीआयएमध्ये काम करते. तिने रेला स्वतःची ओळख लपवून एका अनोळखी जागी असलेल्या तुरुंगाची सिक्युरिटी चेक करायचे काम दिलंय. तो तुरुंग कोठे आहे हे अतिशय मोजक्याच लोकांना माहीत आहे.रे हे आव्हान स्वीकारतो आणि टेररिस्ट बनून तुरुंगात दाखल होतो .
पण त्याला जी माहिती दिलेली असते त्यापेक्षा हा तुरुंग वेगळाच असतो .इथला वॉर्डन ही दुसराच व्यक्ती होता. रेला आता कोणाचीच मदत मिळणार नव्हती.त्याच्या दोन्ही मदतनीसाना रे कुठे आहे याची कल्पना नव्हती.
वॉर्डन होंबेस अतिशय क्रूर माणूस होता. त्याच्याकडे अद्यावत सिक्युरिटी सिस्टीम होती आणि भरपूर सैनिक.
तुरुंगात रे ची ओळख एमिल रोटमायेरशी झाली. त्याने तुरुंगातून सुटका करण्यासाठी एमिलची मदत घेतली आणि प्लॅन बनविला.त्या प्लॅनमधून त्याला कळले तो नक्की कुठे आहे आणि सुटकेसाठी दुसरा प्लॅन करावा लागेल.
त्याने दुसरा प्लॅन बनविला.पण तो प्लॅन यशस्वी होईल का ?? 
रे आणि एमिलची तुरुंगातून सुटका होईल का ??
तो तुरुंग नक्की आहे तरी कुठे ?
सिल्वेस्टर स्टॉलोन आणि अरनॉल्ड श्वारचाझेंगर या सुपरस्टारना एकत्र पहायचे असेल तर नेटफ्लिक्सवर हा थरारकपट नक्की पहा 

Thursday, August 24, 2023

शूटर

SHOOTER
शूटर
बॉब स्वागर जगातील मोजक्याच सर्वोत्कृष्ट स्नायपरपैकी एक .इथोपियातील एका मोहिमेत त्याचा साथीदार फेन मारला गेला आणि तो सैन्यातून बाहेर पडला.आता एका जंगलात नदी किनारी आपल्या कुत्र्यासोबत आनंदात जगतोय.
तीन वर्षानंतर कर्नल इसाक त्याला भेटायला आलाय .अमेरिकन राष्ट्राध्यक्षाना जीवे मारायची धमकी आलीय आणि त्याचा सर्व अँगलने आम्ही विचार करतोय असे त्याला सांगण्यात आले.
एक स्नायपर त्याला कसा मारेल ह्या दृष्टीने विचार कर आणि आम्हाला मदत कर अशी विनंती त्याला केली .स्वागरने होकार दिला आणि राष्ट्राध्यक्ष कुठे कुठे जाणार त्या स्थळाची पाहणी केली आणि एक स्नायपर कुठे कसे मारु शकतो हे सांगितले.
फिलाडेल्फिया येथील समारंभात इथोपियाचे आर्चबिशप याना मेडल देण्यात येणार असते त्यात राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे असतात .स्नायपर तिथेच त्यांना मारेल हे स्वागर खात्रीने सांगतो आणि तसेच होते .त्याचवेळी एक पोलीस अधिकारी स्वागरला गोळी झाडतो .आपल्याला अडकविण्याचा प्लॅन आहे हे स्वागरला कळते आणि तो जखमी अवस्थेत तिथून पळतो.
निक मेम्सफिस एफबीआय स्पेशल एजंट तिथेच ड्युटीवर आहे .त्याला जॉईन होऊन फक्त तीन आठवडे झालेत.त्याला जखमी करून त्याची गाडी घेऊन स्वागर निसटतो.आता संपूर्ण अमेरिकन यंत्रणा राष्ट्राध्यक्षांचा मारेकरी समजून त्याच्या पाठी लागलीय.
आता त्याला गरज आहे एका मदतीची .तो आपला सैन्यातील साथीदार फेनच्या मैत्रिणीच्या घरी जातो .ती त्याच्यावर उपचार करते.
बरा झाल्यावर स्वागर त्याला अडकविणार्या कर्नल इसाकच्या मागे लागतो.यामागे नक्की कोण कोण गुंतले आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय.यासाठी तो एफबीआय एजंट निकची मदत घेतो. स्वागर निरपराध आहे हे निकला माहितीय..तो त्याला मदत करतो .
आपण निर्दोष आहोत हे स्वागर सिद्ध करेल का ? या प्रकरणात खूप मोठे लोक गुंतले आहेत त्यांच्यावर आरोप सिद्ध होतील का ? 
एक वेगवान ,थरारक चित्रपट पाहायचा असेल तर नेटफिक्सवर शूटर नक्की पहा .हा हिंदी भाषेत आहे.

Tuesday, August 22, 2023

DEATH RACE

DEATH RACE
डेड रेस
गाड्यांच्या शर्यती बघायला छान असतात .पण त्या जीवघेण्याही असतात.
अशीच एक रेस अमेरिकेतील एका बेटावर असणाऱ्या तुरुंगात सुरू असते.त्या तुरुंगाची मुख्य अधिकारी क्लाइर हेंन्ससें नावाची स्त्री आहे.तीच अश्या रेस आयोजित करते आणि त्याचे इंटरनेटवरून लाईव्ह प्रसारण करते .
तीन दिवस चालणाऱ्या या रेसवर फी आकारली जाते आणि साधारण सात ते आठ कोटी लोक ही रेस पाहतात. या रेसमध्ये जिंका किंवा मरा हेच सूत्र आहे.
 फ्रँकेस्टाईन सलग चार वर्षे रेस जिंकत आलाय आता तो जिंकला की त्याची तुरुंगातून सुटका होईल .त्याचा चेहरा  काही मोजक्याच लोकांना माहीत आहे .
गार्नर एम्स एक कार रेसर . सलग तीन वेळा तो चॅम्पियन राहिलाय .आता कष्ट करून आपल्या बायको आणि एक वर्षाच्या मुलीसोबत सुखी आहे .
पण काहीजण घरात घुसून त्याच्या बायकोला ठार मारतात आणि त्याचा आळ गार्नरवर येतो. त्याची रवानगी क्लाइरच्या तुरुंगात होते. क्लाइर गार्नरला फ्रांकेस्टाईन बनून रेस खेळायची ऑफर देते. गार्नर ती ऑफर स्वीकारतो आणि रेसमध्ये भाग घेतो .
एकूण नऊजणांनी भाग घेतलेली ही रेस जीवघेणी आणि खतरनाक आहे.यात क्लाइरने ठिकठिकाणी अडथळे ठेवले आहे .अधिकाधिक लोकांनी ही रेस पहावी म्हणून ती कोणत्याही थराला जाऊ शकते.
तुरुंगातच गार्नरला आपल्या बायकोचा खुनी सापडतो .आता तो बदला घेईल का ? मुळात तो रेस जिंकेल का ? त्याला जिंकायची संधी मिळाली तरी क्लाइर त्याला जिंकू देईल का ?? मुळात क्लाइर त्याला फ्रांकेस्टाईन का बनायला सांगते.
एक श्वास रोखून धरणारी मृत्यूची रेस .प्रचंड वेगवान आणि अंगावर काटा आणणारी रेस . जर तुम्हाला  गाड्यांची रेस आवडत असेल तर नेटफ्लिक्सवर डेड रेस नक्की पहा.
जेसन स्टेथमची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे अजून भाग आहेत .
चित्रपट हिंदी भाषेत नेटफिक्सवर आहे.

Monday, August 21, 2023

बर्ड ऑफ ब्लड

बर्ड ऑफ ब्लड
BARD OF BLOOD
कबीर आनंद बलुचिस्तानमधील एक रॉ एजंट. काही वर्षांपूर्वी एका ऑपरेशनमध्ये त्याच्या सोबत असलेला मित्र मारला गेला होता.तेव्हापासून तो रॉपासून दूर राहून एका कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी करत होता.
बलुचिस्तानमध्ये भारताचे चार रॉ एजंट पकडले गेले आणि आता ते तालिबानच्या ताब्यात होते. मुल्ला खालिद  तालिबानचा प्रमुख आहे.पण तालिबानी बलुचिस्तानात आहेत यावर आंतरराष्ट्रीय समूहाचा विश्वास नाही कारण त्यामुळे पाकिस्तान अडचणीत येऊ शकेल.आयएसआयचा मेजर तन्वीर शेहजादचा मुल्ला खालिदला पाठिंबा आहे.त्यानेच काही वर्षांपूर्वी कबीरला फसविले होते. शेहजादने पकडलेले रॉ एजंट पाकिस्तानच्या ताब्यात देण्याची विनंती तालिबानला केली.
सादिक शेख कबीर आनंदचा बॉस होता.आपल्या एजंटना फक्त कबीरच बलुचिस्तानमधून आणू शकतो याची खात्री त्यांना आहे म्हणून ते कबीरला बोलावून घेतात.पण त्यांचीही हत्या होते .
कबीर अनधिकृतपणे बलुचिस्तानात जाऊन आपल्या एजंट्सना परत आणण्याचे आव्हान स्वीकारतो आणि रॉ ऑफिसमधून इशा खन्नाला आपल्यासोबत घेतो.
हे मिशन संपूर्णपणे अनधिकृत असल्यामुळे त्याला रॉची कोणतीही मदत मिळणार नसते .तरीही ते दोघे बलुचिस्तानातील एक एजंट वीर सिंह ज्याला रॉ विसरून गेलीय त्याची मदत घेतात आणि त्याच्या मदतीने बलुचिस्तानात प्रवेश करतात.
ते तिघे मिळून पकडलेल्या एजंट्सला सोडवतील का ? या मोहिमेत प्रत्येक पावलावर संकटे आहेत .तालिबानसोबत त्यांना आयएसआयशीही सामना करायचा आहे .त्यांचे बाहेर पडायचे रस्ते ही बंद आहेत.
इम्रान हाश्मीने कबीर आनंदची भूमिका केली आहे .ही संपूर्ण सिरीज थरारक आणि उत्कंठा वाढविणारी आहे.संपूर्ण चित्रीकरण बलुचिस्तानमध्ये आहे. 
बिलाल सिद्धीकीच्या द बर्ड ऑफ ब्लड या कादंबरीवर सिरीज बेतली आहे .
नेटफिक्स वर नक्की पहा.

7 women and a murder

7 women and a murder
7 वुमन अँड अ मर्डर
रॅचेल...एक विधवा वृद्ध महिला
मार्गारेट ....रॅचेलची मुलगी ,मार्सेलोची पत्नी
अगोष्टीना ..रॅचेलची दुसरी मुलगी , मार्सेलोवर एकतर्फी प्रेम करणारी
मारिया ..तीन महिन्यांपूर्वी कामावर जॉईन झालेली मेड
वेरोनिया ..मार्सेलोची प्रेमिका
कॅटरिना ..रॅचेलची नात ,मार्गारिटाची मुलगी
सुसान ..रॅचेलची नात ,मार्गारिटाची मोठी मुलगी 
सुसान ख्रिसमससाठी आपल्या घरी येते तेव्हा नवीन रुजू झालेली मेड मारिया तिचे स्वागत करते. नंतर ती घरातील सर्वाना भेटते. ती वडील मार्सेलोची चौकशी करते तेव्हा ते गेस्टरूममध्ये झोपले असल्याचे सांगतात .थोड्या वेळाने मारिया त्यांना कॉफी घेऊन जाते तेव्हा ते मृत्यू पावलेले असतात. कोणीतरी त्यांच्या पाठीत सुरा भोसकलेला असतो .मार्गारेट पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न करते पण कोणीतरी फोनची वायर कापलेली असते .म्हणून ती गाडी घेऊन पोलीस स्टेशनला जाण्याचे ठरविते पण इंजिनच्या वायर्स कापलेल्या असतात . त्यातच वेरोनिया तिथे येते .वेरोनियाला कोणीतरी फोन करून तिथे बोलावलेले असते. तीही मार्सेलोचा मृतदेह पाहून हादरते .सगळ्याच स्त्रिया एकमेकांवर संशय घेऊ लागतात.म्हातारी रॅचेल व्हीलचेयरवर आहे .तिचे पैश्याचे बॉण्डही चोरीला जातात. खुनाचा संशय आपल्यावरही आहे म्हणून मारिया घर सोडून जायला निघते पण मेनगेटही बाहेरून कुलूप लावून बंद केलेले असते .
सर्व स्त्रिया एकत्र बसून एकमेकांवर संशय घेतात .यातीलच एक खुनी आहे हे नक्की पण खून कसा आणि का केला ?? चित्रपट पाहताना आपण त्यात गुंतून जातो आणि अनपेक्षित शेवट समोर येतो .
हा एक कॉमेडी रहस्यमय चित्रपट आहे.ज्यात सात स्त्रिया प्रमुख भूमिकेत आहेत.एका दिवसात एकाच बंगल्यात घडणारी ही खुसखुशीत कथा आपल्याला खिळवून ठेवते .यातील संवाद खूपच चटपटीत आणि हसू आणणारे आहेत 
चित्रपट नेटफिक्सवर आहे .

DUNGEONS &DRAGONS : HONOR AMONG THIEVES

DUNGEONS &DRAGONS : HONOR AMONG THIEVES
त्या भयानक तुरुंगात एडगिन आणि होल्गा नावाची बार्बेरियन स्त्री एकाच कोठडीत तुरुंगवास भोगत असतात. एडगिन एक हार्पर अर्थात हेर असतो.पण त्यांचे रूप उडघडकीस येते आणि परिणामी त्याची बायको रेड विझर्डकडून मारली जाते. होल्गाने एडगिनच्या मुलीचा किराचा सांभाळ केला. पुढे होल्गा आणि एडगिन एकत्रच चोऱ्या करू लागले.
आपल्या बायकोला पुन्हा जिवंत करण्यासाठी एडविनने टॅबलेटची चोरी करण्याचा प्लॅन केला .या प्लॅनमध्ये होल्गा ,चेंक आणि फोर्ग त्याच्यासोबत होते .त्यांनी ती टॅबलेट मिळवली पण सोफिना जादूगारणीने त्यांच्या प्लॅनची वाट लावली .यात एडविन आणि होल्गा पकडले गेले पण त्याआधी एडविनने टॅबलेट फोर्गच्या हवाली केले आणि किराची काळजी घेण्यास सांगितले.
दोन वर्षांनी सुनावणीच्या वेळी होल्गा आणि एडविन तुरुंगातून निसटले .बाहेर येताच त्यांना कळले फोर्ग राजा झाला असून त्याच्यामागे सोफिना आहे.तिने आपल्या जादूच्या प्रभावाखाली सगळ्यांना अंकित केलेय.
आता एडविन आणि होल्गाला ते टॅबलेट आणि किराला फोर्गच्या तावडीतून सोडवायचे आहे .त्यासाठी त्यांना अपार कष्ट आणि साहस करावे लागेल.काही ठिकाणी तर ड्रॅगनशी लढावे लागेल.याकामी त्यांना सायमन ,कोणत्याही प्राण्यांचे रूप घेऊ शकणारी डोरीक आणि चेंक मदतीला येतात .
एडविन ते टॅबलेट परत मिळवून आपल्या पत्नीला जिवंत करेल का ? तो किराला परत आणेल ? 
यात राजा आहे ,जादूगार आहेत ,क्षणात रूप बदलणारी माणसे आहेत.ड्रॅगन आहे .एका फॅन्टसीमध्ये जे काही असते ते सर्व यात आहे. आणि चित्रपट विनोदीसुद्धा आहे .
फास्ट अँड फुरियसमधील मिचेल रोड्रिंक्स यात होल्गाच्या फायटर योध्याच्या भूमिकेत आहे .
चित्रपट प्राईमवर हिंदी भाषेत आहे .संपूर्ण कुटुंबासोबत बघता येईल असा हा चित्रपट आहे.

Friday, August 18, 2023

JARHEAD 2

JARHEAD 2
जारहेड 2
अफगाणिस्तानातील त्या अमेरिकन तुकडीवर जीवनापयोगी वस्तूंची वाहतूक करण्याची जबाबदारी होती.त्यामुळे त्यांना लढाईचा फारसा अनुभव नव्हता.
नुकत्याच झालेल्या हल्ल्यात त्या तुकडीचा लीडर मारला गेला आणि जबाबदारी क्रिसवर आली.
 दुसऱ्या दिवशी त्यांना  सामानाचे दोन ट्रक दुसऱ्या ठिकाणी पोचवायचे होते आणि तो रस्ता तालिबानच्या ताब्यात असलेल्या उंच टेकड्या ,दरी खोऱ्यांमधून जात होता .
अपेक्षेनुसार त्यांच्यावर पहिला हल्ला झाला .तो परतवून पुढे जात असताना स्पेशल फोर्स नेव्ही सीलचा कमांडो त्यांच्याकडे मदत मागायला आला .त्याच्यासोबत अनुश नावाची अफगाणी स्त्री होती.तिला कोणत्याही परिस्थितीत अमेरिकन तळावर पोचवायची जबाबदारी त्याच्यावर होती.
नेव्ही सील कमांडो आणि अनुशला घेऊन क्रिसची टीम पुढे सरकते .पण त्यांच्यावर सतत हल्ले होतच असतात आणि हळूहळू क्रिसच्या तुकडीतील सैनिक कमीकमी होत असतात.शेवटी नेव्ही सील कमांडोही मारला जातो आणि तालिबानी पुन्हा अनुशला पकडतात.
अफगाणिस्तानासाठी आणि अमेरिकेसाठी अनुश खूपच महत्वाची स्त्री आहे आणि तिला काहीही करून सोडविले पाहिजे असे क्रिस ठरवतो आणि उरलेल्या सहकार्यांना घेऊन तो तिच्या सुटकेसाठी  निघतो.
ज्यांना लढाईचा अनुभव नाही असे सैनिक तालिबानच्या वेढ्यातून अनुशला सोडवतील का ? 
अंगावर काटा आणणारा युध्दपट नेटफिक्सवर हिंदी भाषेत उपलब्ध आहे .

Thursday, August 17, 2023

THE HUNT FOR VEERAPPAN

THE HUNT FOR VEERAPPAN
द हंट फॉर विरप्पन
साधारण 1987 पासून विरप्पनचा उदय होण्यास सुरुवात झाली .कर्नाटक आणि तामिळनाडूच्या वेशीवर असणाऱ्या एका गरीब गावात त्याचा जन्म झाला. असे म्हणतात की त्याने इतके हत्ती मारले की जंगलातील हत्तीच संपून गेले मग त्याने आपले लक्ष चंदनाच्या वृक्षांकडे वळविले आणि जवळजवळ सर्वच चंदनाची वृक्ष तोडून टाकली .तो क्रूर हस्तीदंत आणि चंदनचोर म्हणून प्रसिद्ध होता. तो नेहमी पोलिसांच्या दोन पावले पुढेच असायचा .
1989 ला कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांनी त्याला पकडण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स स्थापन केली .
ह्या चार भागाच्या डॉक्युमेंटरीमध्ये आपल्याला टास्क फोर्सचे प्रमुख विक्रम उर्फ टायगर आपल्याला भेटतात .तर विरप्पनची पत्नी मुथुलक्ष्मी आपल्याला त्याची कहाणी सांगते.
तामिळनाडू आणि कर्नाटकच्या वेशीवर पसरलेल्या घनदाट जंगलावर विरप्पनची सत्ता होती.हे जंगल इतके भयानक होते की काही भागात माणसेही पोचू शकत नव्हती.विरप्पन जंगलाच्या बाहेर कधीच पडत नव्हता तर टास्क फोर्स जंगलात यशस्वी होत नव्हती.
अनेक पोलिसांना त्याने क्रूरपणे मारले .कर्नाटकचे सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचे अपहरण ही सर्वात मोठी घटना होती. एकशे आठ दिवसाच्या प्रयत्नानंतर डॉ राजकुमार यांची सुटका झाली तो सर्व घटनाक्रम तिसऱ्या भागात दाखविला आहे .
विजयकुमार टास्क फोर्सचे प्रमुख झाले आणि त्यांनी विरप्पनला जंगलातून बाहेर काढण्यासाठी सापळा लावला आणि त्यात विरप्पन कसा फसला हे पाहण्यासाठी ही डॉक्युमेंटरी पहावीच लागेल.
चार भागाची ही डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे .

हार्ट ऑफ स्टोन

HEART OF STONE
हार्ट ऑफ स्टोन 
इटलीच्या बर्फाच्छादित टेकडीवर तो कॅसिनो होता.तिथे जायला फक्त केबल कार आणि हेलिकॉप्टरचाच पर्याय होता.उच्चभ्रू लोक तिथे जुगार खेळायला येत .मूलवेनी  हा शस्त्रांचा व्यापारी तिथे जुगार आणि व्यवसाय करण्यासाठी येणार होता. एमआय 6 चे एजंट त्याला पकडण्यासाठी हजर होते. रॅचेट स्टोन, बिली ,पार्कर प्रत्यक्षात त्याला अटक करणार होते.
पण त्याच्या चतुर सिक्युरिटीने हा डाव उधळून लावला .पार्करने मूलवेनीला पकडले आणि केबल कारमधून ते बाहेर पडले पण मध्येच मूलवेनीने सायनाईड खाऊन आत्महत्या केली.
चार्टर एक शांतीसाठी काम करणारी संस्था .तिनेच स्टोनला एमआय 6 मध्ये घुसविले आहे .हार्ट असे एक उपकरण आहे ज्याने जगातील कोणतीही सिस्टीम हॅक करू शकते .कंट्रोल करू शकते.ती कोणत्याही बँकेत घुसू शकते जगातील कुठलेही मिसाईल स्वतःच्या ताब्यात ठेवू शकते. चार्टरने हार्टला कडेकोट बंदोबस्तात मोठ्या बलूनच्या आकारातील विमानात अंतराळात ठेवले आहे.
किया धवनने चार्टरची संपूर्ण सिस्टीम हॅक केली आणि बलून जमिनीपासून 40 हजार फुटावर आणले .त्यातून तिने हार्टची चोरी केली.आता हार्टचे वापरकर्ते चार्टरच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या मागे लागलेत .
स्टोनने हार्ट परत आणण्याची जबाबदारी स्वीकारली तिच्या हातात फक्त पन्नास मिनिटेच आहेत आपल्या प्रमुख अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी .त्यात ती यशस्वी होईल का ??
चित्रपटाची लोकेशन फार सुंदर आहेत .इटली ,आफ्रिका ते आईसलँड अश्या लोकेशनवर चित्रपट शूट केला आहे .हा चित्रपट प्रचंड हायटेक संकल्पना वापरून केला आहे.चित्रपटात प्रचंड हाणामारी ,सुसाट वेगाने पाठलाग आहेत.पण तीही अतिशय सुंदररितीने चित्रित केली आहे.
किया धवनच्या भूमिकेत आलिया भट छाप पाडून गेलीय. ज्यांना स्पाय आणि हाय टेक टेक्नॉलॉजी वापरून तुफान हाणामारीचे चित्रपट पहायचे असतात त्यांना हा चित्रपट नक्कीच आवडेल .
चित्रपट हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे.

THE TAKING OF PELHAM 123द टेकिंग ऑफ पेल्हाम 123

THE TAKING OF PELHAM 123
द टेकिंग ऑफ पेल्हाम 123
आजचा दिवस आपल्या आयुष्यातील खतरनाक दिवस असेल हे वॉल्टर गारबरला माहीत असते तर तो कामावर गेलाच नसता . तो मेट्रो ट्रेनचा ट्रॅफिक कंट्रोलर होता .
पेल्हाम स्टेशनपासून मेट्रो 123 सुटली होती.त्या स्टेशनवर बरीच माणसे चढली होती त्यातच ती चार माणसे होती.एकाने बंदुकीच्या धाकावर ड्रायव्हरच्या केबिनचा ताबा घेतला .दुसर्याने शेवटच्या महिला गार्डला ताब्यात घेतले. ट्रेन सुरू झाली पण कोणालाच काही कळले नाही .
काही अंतर गेल्यावर सिग्नल नसताना ट्रेन थांबली म्हणून वॉल्टरला संशय आला पण तो पर्यंत उशीर झाला होता . ती ट्रेन रायडर नाव सांगणाऱ्या व्यक्तीच्या ताब्यात गेली होती.त्याने शिताफीने ड्रायव्हरच्या डब्यापासून इतर डबे वेगळे काढले आणि ते सोडून दिले.पण ड्रायव्हरचा डबा आपल्या ताब्यात ठेवून त्यात सतरा प्रवाश्यांना ओलीस ठेवले .
आता खेळ सुरू झाला वाटाघाटीचा .रायडरला वॉल्टरचे बोलणे आवडले आणि तूच वाटाघाटी करशील अशी ऑर्डर दिली.त्याने दहा करोड कॅश ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात मागितले आणि फक्त एक तास दिला .पुरावा म्हणून त्याने मोटारमनला गोळ्या घालून मारले .एका तासानंतर त्याने प्रत्येक मिनिटाला एक व्यक्ती मारेन अशी धमकी दिली .
वॉल्टर वाटाघाटीत नवखा होता .तो जमेल तसे रायडरला बोलते ठेवत होता . एक वेळ अशी आली की रायडरने वॉल्टरलाच पैसे घेऊन येण्यास सांगितले.
वॉल्टर पैसे घेऊन रायडर कसे जाईल का ?? वाटेत कोणत्या अडचणी येतील ? मुळात मेट्रो ट्रेन हायजॅक करण्यामागे  वॉल्टरचा मूळ हेतू काय आहे ??
जॉन ट्राव्होल्टाचा रायडर आणि डेंझेल वॉशिंग्टनचा वॉल्टर यांची जुगलबंदी पहायची असेल तर नेटफ्लिक्सवर हा चित्रपट नक्की पहा .
चित्रपट हिंदी भाषेत उपलब्ध आहे .

BORREGO

बोर्रेगो
BORREGO
इली एक सुंदर तरुणी .ती बॉटनिस्ट आहे. नवीन वनस्पतींची माहिती आणि अभ्यास करायला दूर दूर जाते. अलेक्स गोमेझ तिची मैत्रीण .अलेक्सचे वडील शेरीफ आहेत.
एके दिवशी इली वनस्पतीच्या शोधात दूर ओसाड प्रदेशात जाते.तिथे अचानक एक छोटे विमान क्रॅश होते.वैमानिकाला मदत करायला ती धावतच  जाते.पण वैमानिकच तिच्यावर बंदूक रोखतो आणि विमानातील वाचलेले ड्रग तिच्या गाडीत ठेवून तिला गाडीचा ताबा घेतो .
मध्येच त्यांच्या गाडीला अपघात होतो आणि ते दोघेही ड्रगच्या पिशव्या पाठीवर लादून पायी चालण्यास सुरवात करतात .एक दोनदा इली त्याच्या पासून सुटका करण्याचा प्रयत्न करते पण प्रत्येकवेळी तो वैमानिक तिला पकडतो. त्याच्या इस्पित स्थळी जायला खूप चालावे लागणार होते.तो मार्ग ही ओसाड खडकाळ आणि छोट्या छोट्या पायवाटांचा होता .
आपले ड्रग घेऊन येणाऱ्या विमानाचा अपघात झालाय हे कळताच  प्रमुख चिडतो आणि वैमानिकाच्या शोधात निघतो . 
अलेक्सचे वडील शेरीफ जोस गोमेझला या घटनेची माहिती मिळते आणि तो इलीच्या शोधात निघतो.अलेक्सही आपल्या मैत्रिणीच्या आणि वडिलांच्या शोधात निघते.
त्या वैमानिकापासून आणि ड्रगच्या प्रमुखापासून इली सुटका करून घेईल का ?? इथे प्रत्येक क्षण महत्वाचा आहे . त्या ओसाड जमिनीवर चालतानाही त्रास होतोय.
अलेक्स आणि जोस इलीला वाचविण्यासाठी वेळेवर पोचतील का ??
एक चार पात्रातील वेगवान थ्रिलर चित्रपट अमेझॉन प्राईमवर नक्की पहा.
चित्रपट हिंदी भाषेत उपलब्ध आहे.

Wednesday, August 16, 2023

बर्ड ऑफ ब्लड

बर्ड ऑफ ब्लड
BARD OF BLOOD
कबीर आनंद बलुचिस्तानमधील एक रॉ एजंट. काही वर्षांपूर्वी एका ऑपरेशनमध्ये त्याच्या सोबत असलेला मित्र मारला गेला होता.तेव्हापासून तो रॉपासून दूर राहून एका कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी करत होता.
बलुचिस्तानमध्ये भारताचे चार रॉ एजंट पकडले गेले आणि आता ते तालिबानच्या ताब्यात होते. मुल्ला खालिद  तालिबानचा प्रमुख आहे.पण तालिबानी बलुचिस्तानात आहेत यावर आंतरराष्ट्रीय समूहाचा विश्वास नाही कारण त्यामुळे पाकिस्तान अडचणीत येऊ शकेल.आयएसआयचा मेजर तन्वीर शेहजादचा मुल्ला खालिदला पाठिंबा आहे.त्यानेच काही वर्षांपूर्वी कबीरला फसविले होते. शेहजादने पकडलेले रॉ एजंट पाकिस्तानच्या ताब्यात देण्याची विनंती तालिबानला केली.
सादिक शेख कबीर आनंदचा बॉस होता.आपल्या एजंटना फक्त कबीरच बलुचिस्तानमधून आणू शकतो याची खात्री त्यांना आहे म्हणून ते कबीरला बोलावून घेतात.पण त्यांचीही हत्या होते .
कबीर अनधिकृतपणे बलुचिस्तानात जाऊन आपल्या एजंट्सना परत आणण्याचे आव्हान स्वीकारतो आणि रॉ ऑफिसमधून इशा खन्नाला आपल्यासोबत घेतो.
हे मिशन संपूर्णपणे अनधिकृत असल्यामुळे त्याला रॉची कोणतीही मदत मिळणार नसते .तरीही ते दोघे बलुचिस्तानातील एक एजंट वीर सिंह ज्याला रॉ विसरून गेलीय त्याची मदत घेतात आणि त्याच्या मदतीने बलुचिस्तानात प्रवेश करतात.
ते तिघे मिळून पकडलेल्या एजंट्सला सोडवतील का ? या मोहिमेत प्रत्येक पावलावर संकटे आहेत .तालिबानसोबत त्यांना आयएसआयशीही सामना करायचा आहे .त्यांचे बाहेर पडायचे रस्ते ही बंद आहेत.
इम्रान हाश्मीने कबीर आनंदची भूमिका केली आहे .ही संपूर्ण सिरीज थरारक आणि उत्कंठा वाढविणारी आहे.संपूर्ण चित्रीकरण बलुचिस्तानमध्ये आहे. 
बिलाल सिद्धीकीच्या द बर्ड ऑफ ब्लड या कादंबरीवर सिरीज बेतली आहे .
नेटफिक्स वर नक्की पहा.

Tuesday, August 8, 2023

बॉयझ 2

बॉयझ 2
Boyz 2
ज्यांनी बॉयझ पाहिला आहे त्यांना धुंग्या धैर्याची धमाल मस्ती आठवत असेल .कबीरसारख्या मितभाषी मित्रात त्यांनी बदल केला आणि आयुष्याची ओळख करून दिली.आपल्याच मस्तीत जगाची पर्वा न करता जगणे हे धुंग्या आणि धैर्यालाच जमते.
आता धुंग्या  धैर्या आणि कबीर दहावी पास होऊन कॉलेजमध्ये आलेत .आल्याआल्या त्यांची सिनियरकडून रॅगिंग होते पण हे तिघेही त्यांना योग्य उत्तर देतात. पण बारावीला कबीर होस्टेलसोडून घरूनच कॉलेजला जाणे पसंद करतो.
नरु कॉलेजमधील सिनियर .अर्थात तो अनेक वर्षे कॉलेजमध्ये येतोय.त्याला ज्युनियरवर रॅगिंग करायला आवडते.पण प्रत्येकवेळी धैर्या आणि धुंग्या आडवे येतात.
एके दिवशी ज्युनियर मुलीवर नरु रॅगिंग करताना कबीरमध्ये पडतो आणि मोठी हाणामारी होते.आता कबीरही पुन्हा हॉस्टेलमध्ये राहायला येतो .
हाणामारी कमी व्हावी म्हणून नरु धुंग्या आणि धैर्याला एक चॅलेंज देतो .ते चॅलेंज पूर्ण करायचे आणि त्याचा पुरावा आणून द्यायचा असे ठरते आणि त्या चॅलेंजसाठी कबीरची आणि सिनियरकडून नरुची निवड होते .
आता हे चॅलेंज काय आहे ? ते पूर्ण करण्यासाठी कबीर आणि नरुला काय काय करावे लागेल ? हे पाहण्यासाठी बॉयझ 2 पाहायला हवा.
चित्रपटात डबल अर्थाचे संवाद आहे त्यामुळे खूप हसायला येते . 
धुंग्याच्या भूमिकेत पार्थ भालेरावने धमाल केलीय तर धैर्याच्या भूमिकेत प्रतीक लाडने त्याला उत्तम साथ दिलीय.  ओंकार भोजनेने नरुच्या भूमिका गाजवली आहे. कबीरची शांत संयमी भूमिका सुशांत शिंदेने उत्तम साकारली आहे .
प्राईमवर हा चित्रपट पाहता येईल.

Friday, August 4, 2023

12 STRONGE

12 STRONGE
12 स्ट्रॉंग
9/11 ला अमेरिकेतील वर्ड ट्रेंड सेंटरवर हल्ला झाला .त्याची जबाबदारी अल कायदाने स्वीकारली आणि अमेरिकेने अफगाणिस्तानात आपले सैन्य अल कायदाच्या मागावर पाठविले.अल कायदाला तालिबानची मदत होती.
अफगाणिस्तानात घुसून तालिबानचे तळ नष्ट करायची जबाबदारी अमेरिकेन सैन्यावर होती.स्पेशल फोर्स ODA 595  तुकडीत बारा कमांडो होते. मिच नेल्सन त्या तुकडीचा कॅप्टन होता. त्याच्यावर नॉर्दन अलाईन्सचा प्रमुख अब्दुल डोस्तूमला मजार ए शरीफ ताब्यात घेण्यासाठी मदत करायची जबाबदारी होती.
प्रत्यक्षात मजार ए शरीफला जाण्याचा मार्ग अतिशय खडतर डोंगराळ आणि पूर्ण वैराण होता. अब्दुल डोस्तूम मिच नेल्सनवर फारसा विश्वास टाकत नव्हता.मजार ए शरीफ पर्यंत पोचण्यासाठी फक्त घोडा हेच प्रवासाचे साधन होते आणि वाटेत तालिबानचे दोन तीन छोटे मोठे तळ होते. त्या तळाना नेस्तनाबूत करून पुढे सरकायचे होते.ODA 595 च्या कमांडोना घोडयावर बसून प्रवास करण्याची सवय नव्हती तरीही त्यांनी ते आव्हान स्वीकारले.
केवळ बारा कमांडोच्या ODA595 तुकडीने मजार ए शरीफ ताब्यात घेतले का ?? त्यासाठी त्यांना काय काय करावे लागले ?
एक सत्य घटनेवर आधारित अप्रतिम युद्धपट अमेझॉन प्राईमवर पहायला विसरू नका .
चित्रपट हिंदी भाषेत आहे .

Thursday, August 3, 2023

सी यू सून

C U SOON
सी यू सून 
दुबईला बँकेत नोकरी करणारा जिम सोशल साईटवर मैत्रीण शोधत असतो.बरेच प्रयत्न केल्यावर अनु सबेस्टिन नावाच्या तरुणीशी त्याची मैत्री होते.
 अनु सुरवातीपासून स्वतःविषयी फार माहिती देत नसते पण जिमी मात्र आपल्या आईशी  आणि सहकार्यांशी ओळख करून देत असतो. अनु त्याच्याशी विडिओ कॉल वर बोलते.तिच्याकडे सिम कार्ड नाहीय तर वाय फायचा वापर करून बोलते.चॅटिंग करते.
केविन जिमीचा मित्र लांबचा भाऊ .तो साऊथ आफ्रिकेत सायबर क्राईममध्ये कामाला आहे.तो जिमीला तिच्याविषयी विचारतो पण जिमीला फारसे काही सांगता येत नाही.
एके दिवशी अनु जखमी अवस्थेत जिमीला फोन करते .वडिलांनी मारले असे ती सांगते .जिमी तिला आपल्या घरी घेऊन येतो .ती जिमीकडेच राहते पण काही दिवसांनी ती जिमीला मी निघून जाते पुन्हा भेटणार नाही असा विडिओ कॉल करून गायब होते.
तिच्या गायब होण्याची तक्रार होते आणि पोलीस जिमीला घेऊन जातात.जिमी केविनला सर्व प्रकार सांगतो आणि मदतीची विनंती करतो .
आता केविनवर जबाबदारी आहे अनुला शोधून काढायची .केविन साऊथ आफ्रिकेत आहे .जिमी दुबईत आहे .जिमीची आई केरळात आहेत.कोणीही कोणाला प्रत्यक्ष भेटू शकत नाही तरीही अनुला शोधून काढायचे आहे.
 सोशल मीडिया ,गूगल सर्च ,व्हिडीओ कॉल, मेसेंजर ,अश्या गोष्टींचा वापर करून केविनया प्रकरणाच्या मुळाशी कसा जातो हे बघण्यासारखे आहे.
संपूर्ण चित्रपटात आपल्याला विडिओ कॉल स्क्रिन ,कॉम्प्युटर स्क्रिन,मोबाईल स्क्रिनवर दिसतो. इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर कसा करतात हे हा चित्रपट पाहून कळते.
मिसिंग ,सरचींग या चित्रपटाच्या टाईपचा हाही साऊथ इंडियन मल्याळम भाषेतील चित्रपट आपल्याला नक्की आवडेल.सबटायटल्स इंग्रजीत असल्यामुळे भाषेची फारशी अडचण येत नाही.
यात फहाद फासील केविनच्या भूमिकेत आहे.तोच चित्रपटाचा निर्माता ही आहे.
चित्रपट अमेझॉन प्राईमवर आहे.

Tuesday, August 1, 2023

PARADISE

पॅराडाईज
PARADISE
आपल्या आयुष्यातील काही वर्षे आपण दुसऱ्याला डोनेट केली तर ?? अव्हॉन कंपनीत अशीच एक स्कीम आहे. काहीजण आपल्या डीएनएमधील काही सेल डोनेट करतात आणि त्याचा वापर इन्शुरन्स पॉलिसी म्हणून केला जातो.
मॅक्स हा अव्हॉनमधील डोनेटर एजंट .या वर्षीचा बेस्ट कर्मचाऱ्याचा अवॉर्ड त्याला मिळालाय. आपली पत्नी एलेनासोबत तो खुश आहे अजून मोठे बनायची स्वप्न पाहतोय.
अचानक एके दिवशी त्याच्या घराला आग लागते आणि ते जळून खाक होते. तुमच्याच हलगर्जीपणामुळे आग लागलीय असे सांगत इन्शुरन्स कंपनी नुकसानभरपाई नाकारते.प्रचंड कर्जामुळे दोघेही हतबल होतात .शेवटची इन्शुरन्स पॉलिसी म्हणून एलेना आपले सेल देण्याचे ठरविते जे तिने आधीच डोनेट केलेले असतात .सरासरी त्या सेलचे आयुष्य अडतीस वर्षाचे असते .
दुसऱ्या दिवशी तिच्या शरीरातून सेल काढले जातात.त्यानंतर ती अडतीस वर्षांनी एकदम म्हातारी होते.
मॅक्स तिचे सेल कोणाला दिलेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला ती तरुण मुलगी मारी थायसन सापडते.तिच्यातून सेल काढून तो पुन्हा एलेनामध्ये टाकायचे ठरवितो आणि मारीला पळवून नेतो .योगायोगाने मारी अव्हॉन कंपनीची सीइओ सोफी थाईसनची मुलगी असते .
सोफी आपल्या सशस्त्र रक्षकांसमवेत मॅक्स आणि एलेनाच्या मागे लागते.
मॅक्स एलेनाच्या आयुष्यातील अडतीस वर्षे पुन्हा परत आणून तिला तरुण बनवेल का ?
त्यासाठी त्याला कोणत्या परीक्षा द्याव्या लागतील ? 
तो मार्ग अतिशय खडतर आहे पण तो यशस्वी होईल का ??
नेटफिक्सवर हिंदी भाषेत हा चित्रपट उपलब्ध आहे .