Friday, December 29, 2023

Curry & Cyanide: The Jolly Joseph Case

Curry & Cyanide : The Jolly Joseph Case
केरळमधील  कुडाथायी गावातील एक सत्यघटना .जोसेफ फॅमिली गावातील प्रतिष्ठित फॅमिली. मोठी सून जॉली इंडियन इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीमध्ये प्रोफेसर आहे. 
2002 पासून त्या घरातील काही व्यक्ती अचानक मृत्युमुखी पडतात. फॅमिली जुन्या वळणाची असल्यामुळे पोस्टमार्टेम करू देत नाहीत.पण एक दिवशी तिचा नवरा ही मृत्यू पावतो.त्याच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये सायनाईडने मृत्यू झाला असे नमूद केले जाते.
2002 ते 2016पर्यंत  त्या घरात सहा मृत्यू होतात .त्यात एका दोन वर्षांच्या मुलीचा समावेश आहे .या मृत्यूमागे काहीतरी गडबड आहे असे जॉली जोसेफच्या नणंदेला संशय येतो.ती पोलिसात तक्रार करते आणि सगळ्यांच्या कबरी पुन्हा उघडायला लावते.
दहाजणांची एक टीम क्राईम ब्रांचकडून नियुक्त केली गेली. खरोखरच सगळ्यांचे खून झालेत की नैसर्गिक मृत्यू झालाय. ? या मागे कोण आहे ? पंधरा वर्षात झालेल्या मृत्यूचे गूढ केरळ पोलीस उलगडतील का ??
सत्यघटनेवर आधारित ही डॉक्युमेंटरी हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे .

Wednesday, December 27, 2023

क्यू आर कोड आणि लग्न

क्यूआर कोड आणि लग्न
आज बऱ्याच दिवसांनी केके उर्फ कमलाकर कदम याला भेटायचा योग आला .
योग कसला केकेनेच फोन करून बोलावले होते.तसाही तो दिवसभर लॅपटॉप घेऊन ऑफिसमध्ये बसूनच असतो.पण फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून गप्पा मारणे आम्हाला आवडते. 
गप्पा मारताना त्याच्यासमोर पडलेल्या पाकिटाकडे लक्ष गेले. सहज म्हणून मी ते उघडले तर ती लग्नपत्रिका वाटत होती.पण त्यावर कोणाचेच नाव छापले नव्हते फक्त मोठा क्यूआर कोड होता.
मी ते केके दाखविले.तसा  तो हसला.
"भाऊ डिजिटल लग्नपत्रिका आहे ही "
"अरे वा "असे म्हणून मी माझा फोन काढून तो कोड स्कॅन करायचा प्रयत्न केला पण ते ओपन होत नव्हते.
"भाऊ ज्यांना पत्रिका दिलीय त्यांच्याच नंबरवरून ओपन होईल ते" असे म्हणून त्याने स्वतःचा फोन घेऊन स्कॅन केला .ताबडतोब त्याच्या मोबाईलवर लग्न पत्रिका आणि एक गूगल फॉर्म आला .
" हा फॉर्म भरून द्यावा लागेल .तू येणार आहेस का ? " त्याने विचारले. 
मलाही उत्सुकता वाटली.
 मी होय म्हणालो.
"हे बघ, त्यानी कधी येणार विचारले आहे . म्हणजे सकाळी की संध्याकाळी ?"केकेने विचारले. 
मी गमतीने म्हटले" दोन्ही वेळेस".
त्याने माणसेच्या कॉलममध्ये दोन आकडा टाकला.
"भाऊ, त्याने मला फक्त संध्याकाळी स्वागत समारंभाला बोलावले आहे .म्हणजे संध्याकाळीच जाऊ.सकाळचे दोन स्लॉट आपल्यासाठी बंद आहेत."
"दोन स्लॉट ?" मी प्रश्नार्थक चेहरा केला. 
"सकाळी अक्षता टाकायला एक स्लॉट .जेवायला दुसरा आणि संध्याकाळी स्वागत समारंभाला तिसरा स्लॉट ."त्याने उत्तर दिले.
मग संध्याकाळी किती वाजता जायचे त्याचे टायमिंग लिहिले .
"भाऊ एक तास पुरे का ? आठ ते नऊ लिहितो "त्याने माझा होकार समजून लिहिले .
"जेवण काय हवेय ?" त्याने पुन्हा प्रश्न केला.
"अरे जे आहे ते खाऊ ? "मी चिडून म्हटले.
"तसे नाही भाऊ .हल्ली लग्नात काऊंटरवर दिसतील ते पदार्थ घेतात आणि नंतर टाकून देतात .त्यांनी लिस्ट दिलीय त्यातून पदार्थ निवड" माझ्या हाती फोन देत तो म्हणाला.
जेवणाचे बरेच पदार्थ  लिस्टमध्ये होते.अगदी लोणचे सॅलेड पासून पान सुपारी पर्यंत.वरती माझे नाव होते.
जवळजवळ वीस पदार्थ होते .मी त्यातून भात,पुरी वरण, बासुंदी ,पनीर भाजी, सॅलेड ,आईस्क्रीम सिलेक्ट केले .
"वा भाऊ, मोजकेच जेवतोस ? छान सवय आहे .लग्नाच्या दिवशी संध्याकाळी बरोबर आठ वाजता ये नऊ ला हॉलमधून बाहेर पडू ." केकेने त्याचा मेनू सिलेक्ट करीत फॉर्म सबमिट केला.
लग्नाच्या दिवशी बरोबर आठ वाजता हॉलमध्ये पोचलो .
अरे, हॉलचा दरवाजा बंद होता. लग्न कॅन्सल झाले की काय ?माझ्या मनात शंका .
पण केके बेफिकीर दिसला .त्याने दरवाजावरील क्यू आर कोड स्कॅन केला. ताबडतोब त्याला ओटीपी आला त्याने दरवाजावरील कीपॅडवर ओटीपी दाबला आणि दरवाजा उघडला .
आतमध्ये नेहमीसारखे लग्नाचे वातावरण होते.पण कुठेही गडबड गोंधळ दिसत नव्हता .आम्ही स्टेजवर पाहिले तर वधुवर उभे होते पण त्यांच्या आजूबाजूला फारशी गर्दी दिसत नव्हती.
पण स्टेजच्या दोन्ही बाजूला मोठे क्यूआर कोड दिसत होते .
"भाऊ आहेर किती देणार ?" केकेने विचारले. 
"पत्रिका तुला आहे मला नाही ?" माझ्यातील मराठी माणूस जागा झाला .
त्याने हसून मान डोलावली आणि नवऱ्याच्या बाजूच्या क्यूआर कोडवर हजार रु स्कॅन केले .पैसे पोचल्याची रिसीट मिळाली .मग त्याने ओळखीच्या लोकांना भेटायला सुरवात केली .
अचानक नवरा नवरीच्या डोक्यावर ठेवलेल्या डिस्प्ले मध्ये केकेचे नाव आले.तसा केके मला घेऊन स्टेजवर गेला .नवऱ्याची आणि माझी माझी ओळख करून दिली .नवरा अर्थात केके ला ओळखत होता . बहुतेक त्याचाच विद्यार्थी असावा.आमचा एक फोटो काढला .
"चल जेवू या ?"
 केके मला घेऊन खाली गेला .तिथेही मोजकीच माणसे जेवत होती . केकेने काऊंटरवर त्याचा नंबर सांगितला आणि आम्ही बाजूच्या टेबलवर बसलो .पाच मिनिटात आमची दोन ताटे घेऊन एक वेटर टेबलवर आला .
आयला ! मी जे पदार्थ सांगितले होते तेच पदार्थ ताटात होते .
"केके ,दुसरा एखादा पदार्थ पाहिजे असेल तर ? "मी केकेच्या ताटातील गुलाबजामकडे पाहून कुतूहलाने विचारले .
"मिळणार नाही ? त्या दिवशी चान्स होता सिलेक्ट करण्याचा तो सोडलास .याला चंचल मन म्हणतात."
केके शांतपणे जेवू लागला .अतिशय मोजकेच पदार्थ असल्यामुळे आमचे जेवण पटकन संपले अर्थात त्यातील पदार्थ पाहिजे तितके घेण्याची सोय होती पण आमचे पोट भरले होते.सवयीनुसार मी बासुंदी वाटी अजून एक मागून घेतली .
"भाऊ नऊ वाजत आले" त्याने मोबाईल दाखविला .
च्यायला ! मोबाईलमध्ये अलार्म वाजत होता .
"अरे कोण ओळखीचा भेटला तर वेळ होणारच ना ?"मी चिडून केकेला म्हटले. 
"त्यासाठी दहा मिनिटे वाढवून दिलीत.पण नंतर बाहेर नाही पडलो तर  दरवाजा आपल्यासाठी लॉक होईल आणि नवरा नवरी सोबतच बाहेर पडू .मंजूर आहे का ?" त्याने शांतपणे मला विचारले.
मी नाईलाजाने मान डोलावली .
तिथे पाच सहा ठिकाणी वेगवेगळे सेल्फी पॉईंट ठेवले होते . त्यावर एक व्हाट्स अप नंबर दिला होता. बहुतेकजण वेगवेगळ्या पोजमध्ये सेल्फी काढत होते .ग्रुपफोटो ही बरेचजण काढत होते .फोटो काढले की त्या व्हाट्स अप नंबरवर सेंड करत होते.
"केके हा काय प्रकार ?"माझा पुन्हा एक प्रश्न.
"भाऊ इथे फोटो काढून व्हाट्सअप वर पाठवले की त्यात नवरा नवरीचे फोटो एडिट करून टाकण्यात येतील .म्हणजे एकाच लोकेशनवर सारख्याच पोजमध्ये फोटो रिपीट होणार नाहीत आणि स्टेजवरची गर्दी टाळता येईल. " केके सहज स्वरात म्हणाला आणि माझा हात धरून दुसऱ्या दरवाजाने ओटीपी नंबर दाबून बाहेर पडला.
बाहेर येताच मी केके ला विचारले "यामागे डोके तुझेच ना ?"
केके हसला .
"भाऊ लग्न मनासारखे एन्जॉय केलेस ना ? थोडी शिस्त आणि कठोरपणा आहे .पण सर्वाना मनाप्रमाणे एन्जॉय करता आले ना .आता बघ ना तुझा वेळ वाचला .तुला पाहिजे ते मनासारखे खाता आले .अन्न फुकट गेले नाही.लोकांची धक्काबुक्की नाही .वधूवराना घाई नाही .स्टेजवर पाकीट द्यायला रांग नाही .तू जितका वेळ दिलास तितका वेळ तुला लग्न एन्जॉय करता आले . तू एक तास दिलास आम्ही तुला एका तासात मोकळे केले .तू जितका जास्त वेळ दिला असतास तितकाच वेळ आम्हीही घेतला असता ".केके हसून म्हणाला .
"पण ही आयडिया कशी आली तुझ्या डोक्यात ?" मी विचारले.
"त्या दिवशी तुकाराम कदमाच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो .लग्न दुपारचे जेवणाची आणि लग्नाची वेळ सारखीच त्यामुळे खूप गडबड उडाली होती.अरे ,लग्नाचे विधीही करू देत नव्हते.वधूवर उभे राहिले की लोक आहेर द्यायला धावायचे.पुन्हा फोटोही काढायचे. जेवायला ही गर्दी .त्यात हॉल छोटा .अन्नाची प्रचंड नासाडी .बिचाऱ्या कदमांनी खूप खर्च करून लग्नाचा घाट घातला होता.त्यांच्याकडून काहीच कसर बाकी ठेवली नाही तरीही लोक बडबड करीत होती .नावे ठेवत होती. पैसे खूपच खर्च केले होते पण नियोजन नव्हते .मग मीच ठरविले यावर काहीतरी मार्ग काढायचा . आपल्या पोरांना क्यू आर कोड तयार करायला लावले म्हटले हेच वापरून नियोजन करायचे.त्यात हे लग्न ठरले .मग मी वधू वर त्यांचे आईवडील आणि खास नातेवाईक याची मिटिंग घेतली आणि ही प्रोसिजर सेट केली. दोन्हीकडून किती माणसे येतील ? त्यात दिवसभर कोण असणार ? पटकन येऊन कोण जाणार ? याची वर्गवारी केली .जेवण फुकट घालवायचे नाही हा दोन्ही पार्ट्याचा प्रमुख आग्रह होता.विधी पूर्ण झाले पाहिजे यावर दोघांचे एकमत होते.थोडा वाईटपणा घ्यायला ते तयार होते .मग काय लावले आपल्या पोरांना कामाला .आपल्या पोरांनाही काम मिळाले माझे ही थोडे सुटले तुलाही मनासारखे जेवण मिळाले "केके माझ्या हातावर टाळी देत म्हणाला .
धन्य आहेस बाबा तू " मी ही त्याला हात जोडीत म्हणालो .
© श्री.किरण कृष्णा बोरकर

डोन्ट ब्रिथ

डोन्ट ब्रिथ 
Don't breath
रॉकी ,अलेक्स,मनी तिघे भुरटे चोर. रिकामी घरे फोडून त्यातील किमती ऐवज लुटायचा हे त्यांचे काम .अलेक्स ही तरुणी आहे आणि तिला लहान मुलगी आहे. रॉकीचे वडील सिक्युरिटीमध्ये आहेत त्यामुळे त्याला घराचे लॉक कोड सहज मिळतात.
एका घरात खूप रोख रक्कम आहे अशी माहिती त्यांना मिळते. त्या घराच्या आजूबाजूची घरे ही रिकामी असतात.एका नॉर्मन नावाच्या  माजी सैनिकाचे ते घर असते .नॉर्मनने इराक युद्धात आपले डोळे गमावलेले असतात .आता तो आपल्या कुत्र्यासोबत राहत असतो .
तिघेही त्याच्या घरात लॉक तोडून शिरतात .पण नॉर्मन सावध असतो .त्याला बाजूच्या व्यक्तीचा श्वासही जाणवतो.तो अतिशय क्रूर आहे.आपल्या घरात सहजपणे काठी न घेता हालचाली करतो.तो त्यांना चोरी यशस्वीपणे करून देईल का ??
एक अंध सैनिक त्या घरात तीन चोरांशी कसा सामना करतो हे नक्कीच पाहण्यासारखे आहे.
संपूर्ण चित्रपट एका घरात चित्रित झालाय .मोजून चार पात्रे आणि कुत्रा यात आहेत.अंगावर काटा आणणारा पुढे काय होईल ही उत्सुकता ताणून धरणारा हा चित्रपट हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे.

Monday, December 25, 2023

अलक

अलक 
बाजूच्या बर्गर पॉइंटकडे असूयेने पाहत त्याने वडापावच्या गाडीवरून एक वडापाव घेतला.घास घेताना शेजारचा तो वृद्ध आशाळभूतपणे त्याच्याकडे पाहत होता. कसनुस हसत त्याने आपला वडापाव त्याला देऊन दुसरा वडापाव घेतला."च्यायला, ह्याजगात आपल्यापेक्षाही गरीब माणसे राहतात की ?" चेहऱ्यावर रुंद हासू आणत तो पुटपुटला आणि त्या वृद्धाला हात दाखवीत चालू लागला.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

द लायन्स गेम

द लायन्स गेम
नेल्सन डेमिल
अनुवाद ..अशोक पाध्ये
मेहता पब्लिशिंग हाऊस
साल १९८६ लिबिया 
त्या रात्री लिबियातील अल अझीझिया गावात शांतता होती. लिबियाचा सर्वेसर्वा कर्नल गडाफी तेथे रात्रीच्या मुक्कामाला होता.त्याचवेळी अमेरिकन वायुदलातील चार विमाने त्या गावावर हल्ला करण्यास निघाली होती.चार विमानात एकूण आठजण होते. त्यांची नावे गुप्त राहणार होती.ठरल्याप्रमाणे हल्ला झाला .गावातील शंभरएक व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. त्यात गडाफीची मुलगी , दोन मुले मारली गेली.कर्नल गडाफी आश्चर्यकारकरित्या वाचला.असद खलील हा सोळा वर्षाचा मुलगा ही त्यातून  वाचला.पण तोही आपल्या कुटुंबियांना वाचवू शकला नाही.
वर्तमानकाळ
लिबियातील त्या घटनेला बरीच वर्षे उलटून गेलीत.पोलीस अधिकारी जॉन कोरी एफबीआयच्या दहशतवाद विरोधी पथकात नुकताच कॉन्ट्रॅक्टवर जॉईन झाला होता.तो मूळात एक हुशार पोलीस ऑफिसर आहे. तिरसट ,वरिष्ठाना न जुमानणारा प्रामाणिक अधिकारी म्हणून त्याची ख्याती होती. आज त्याला पॅरिसहून येणाऱ्या एका दहशतवाद्याला आणायला विमानतळावर जायचे होते.त्याची सोबती केट वरिष्ठ एफबीआय ऑफिसर होती.
पॅरिसहून येणाऱ्या विमानाचा संपर्क टॉवरशी होत नव्हता. पण विमान रडारवर दिसत होते. शेवटी विमान धावपट्टीवर उतरले.पण आत सर्व प्रवासी कर्मचारी मृत झाले होते आणि कैदी निसटला होता . त्या कैद्याचे नाव होते असद खलील.
अरबी भाषेत असदचा अर्थ सिंह असा होतो.जो शांतपणे विचारपूर्वक आपल्या सावजाची शिकार करतो.आता असद खलील ही आपल्या सावजांची शिकार करण्यास सज्ज झालाय.त्याने सुरवातच विमानातील तीनशे लोकांना मारून केलीय.त्यानंतर त्याने एफबीआयच्या ऑफिसमधील तीन अधिकाऱ्यांना ठार केलेय. आता तो पुढे निघालाय.तो नक्की काय करेल याविषयी कोणालाच माहीत नाही.
जॉन आपल्या पोलिसी बुद्धिमत्तेवर यामागे असदचा काय प्लॅन आहे ते शोधून काढतो. आता फक्त त्याला सापळ्यात अडकवायचे आहे .
लेखकाने अतिशय बारकाईने सगळा घटनाक्रम लिहिला आहे.त्यामुळे आपल्याला सर्व प्रसंग डोळ्यासमोर घडतायत असे वाटते.एफबीआय ची कार्यपद्धती, विमानतळावरील आपत्कालीन परिस्थिती आल्यास कसे वागतात .विमाने  भाड्याने घेण्याची पद्धत, त्यात असणाऱ्या त्रुटी लेखकाने विस्तृतपणे लिहिल्या आहेत.
असदची मारण्याची पद्धत पाहून आपल्या अंगावर शहारे येतात .
पहिल्या पानापासून शेवटपर्यंत उत्सुकता आणि थरार वाढवणारे पुस्तक .

सजीनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ

सजीनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ
Sajini Shinde Ka Viral Video
सजीनी सूर्यकांत शिंदे पुण्यातील एका प्रतिष्ठित शाळेत फिजिक्स टीचर आहे. सिंगापूरला ती शाळेच्या प्रोजेक्टसाठी जाते.तिच्या प्रिन्सिपलने तिची निवड केली नव्हती . पण तिची मैत्रीण श्रद्धा प्रिन्सिपलशी भांडून तिच्या खर्चाने घेऊन गेली.
सजीनीचे वडील मराठी थिएटरचे लोकप्रिय नट आहेत.त्यांचे नगरचे प्रतिष्ठित घराणे आहे.सजीनीचा होणारा नवरा  बंगळुरूमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतो .तो सजीनीला नेहमी मॉर्डन राहायचे सल्ले देत असतो.
त्या दिवशी सजीनीचा वाढदिवस सिंगापूरच्या हॉटेलमध्ये साजरा करतात.त्यावेळी अनेक फोटो आणि व्हिडिओ काढले जातात.सजीनीही मद्यधुंद अवस्थेत नाचते.
त्याचवेळी प्रिन्सिपल मॅडम श्रद्धाकडे प्रोजेक्टचे अपडेट्स मागते आणि चुकून श्रद्धा त्यांचे पार्टीतले विडिओ आणि फोटो पाठविते. त्याच दिवशी तिचा एक व्हिडिओ व्हायरल होतो. सगळेजण चवीने तिचा व्हिडिओ पाहतात.शाळेत पालकांचा मोर्चा निघतो. प्रिन्सिपल मॅडम सिंगापूरला गेलेल्या सर्व टीमला काढून टाकतात. सजीनीचा होणारा नवरा तिच्या विरुद्ध जातो.तिचा बाप ही तिला नाकारतो.
अचानक एक दिवस सजीनी गायब होते.तिची एक चिट्ठी सापडते .त्यात तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव आणि वडिलांचे नाव लिहिले असते.या दोघांमुळे आपल्याला जास्त त्रास होतोय असे लिहिलेले असते.
सजीनीला शोधायची जबाबदारी स्त्री विभागाच्या इन्स्पेक्टर बेलाकडे आलीय.बेलाला इन्स्पेक्टर राम पवार मदत करतोय.  दोघेही दिवसरात्र तिला शोधायचा प्रयत्न करतायत.ती त्यांना सापडेल का ? तिला कोणीतरी डांबून ठेवलंय की तिने आत्महत्या केलीय?? 
चित्रपटाची पार्श्वभूमी मराठी आहे.सुबोध भावे सजीनीच्या वडिलांच्या सूर्यकांत शिंदेच्या भूमिकेत आहेत .तर इन्स्पेक्टर राम चिन्मय मांडलेकर आहे. राधिका मदन सजीनीच्या भूमिकेत तर इन्स्पेक्टर बेला बरोटच्या भूमिकेत आहे.
एक रहस्यमय चित्रपट म्हणून आपण तो नेटफ्लिक्सवर पाहू शकतो.

Monday, December 18, 2023

कानविंदे हरवले

कानविंदे हरवले
हृषीकेश गुप्ते
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
खरे तर मिसेस कानविंदेचा तो फोन मिहीर इनामदारने घेतला नसता तर पुढच्या घटना कदाचित टळल्या असता.पण जे घडणार आहे ते टाळू शकत नाही.
वासुदेव कानविंदे हे सिनेमा जगतातील मोठे नाव.अर्थात मिहीर इनामदारही त्याच क्षेत्रात आर्ट डायरेक्टर होता म्हणून कानविंदेला नावाने ओळखून होताच.कानविंदे हे प्रसिद्ध ध्वनी संयोजक ,डायरेक्टर आहेत.
त्या दिवशी अचानक एका अनोळखी नंबर वरून मिहीरला फोन आला .कानविंदे हरवले आहेत असे त्यांची पत्नी म्हणत होती.
खरे तर मला का फोन केला ?? माझा काय संबंध ? असे अनेक प्रश्न मिहीरला पडले होते.
आठ दिवसांपूर्वी पहिल्यांदाच त्याला कानविंदेचा फोन आला होता.पण त्या फोनवर काय बोलणे झाले तेच मिहीरला आठवत नव्हते.
मिसेस कानविंदेच्या आग्रहावरून मिहीर त्यांना भेटायला गेला, तेव्हा तिने त्याच्या हातात एक लिफाफा ठेवला. त्यात जुन्या व्हिडिओ कॅसेट लायब्ररीची रिसीट होती. त्यात कानविंदेने एक व्हिडिओ कॅसेट भाड्याने घेतल्याची सही होती.पण अजून दोनजणांनी तीच कॅसेट भाड्याने घेतल्याची नोंद होती. कॅसेट लायब्ररीचा पत्ता मुंबईचा होता. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या कार्डवर तिसरे नाव मीर इनामदार उर्फ मिहीरचे होते.सहीही त्याचीच होती.पुण्यात राहणारा मिहीर मुंबईत जाऊन व्हिडीओ कॅसेट भाड्याने का घेईल ? 
आता मात्र मिहीर गोंधळात पडला .पण व्हिडिओ कॅसेट लायब्ररीचा मालक मुश्ताकभाई होता.जे मिहीरचा बालपणीचा मित्र इनायतचे वडील होते. पण कार्डवर तारीख चौऱ्याणव सालातील होती आणि तेव्हा मिहीर सोळा वर्षाचा होता.
आता मिहीरला मोरब्याला जाऊन मुश्ताकभाईला भेटावेच लागणार होते .कारण त्या कार्डवर लिहिलेली व्हिडीओ कॅसेट महत्वाची होती. त्याच कॅसेटच्या मागे कानविंदे होते.
काय आहे कानविंदेचे रहस्य ? ते कुठे हरविले आहेत ? त्यांचा मिहीर इनामदारशी काय संबंध ?? 
एक अतर्क्य ,गूढ आणि लेखकाच्या नेहमीच्या शैलीला साजेशी अशी गूढरम्य कादंबरी .

Thursday, December 14, 2023

ओरिजिन

ओरिजिन 
डॅन ब्राऊन 
अनुवाद ...मोहन गोखले 
मेहता पब्लिकेशन हाऊस
मानवाची उत्पत्ती कश्यापासून झाली ?? अर्थात  माकडापासून असा डार्विनचा शोध जगाला मान्य आहे.पण हे माकड कुठून आले ? ते देवाने निर्माण केले की विज्ञानाने.
 चर्च आणि विज्ञान यांचा वाद गेली अनेक शतके चालू आहे.गॅलिलिओ विज्ञानाचा आधार घेऊन चर्चशी भांडला .त्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी चर्चच्या देवाविषयीच्या अनेक समजुती मोडीत काढल्या .आजही सजीव कसे तयार झाले याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न अनेक शास्त्रज्ञ करतायत .
आज रात्री स्पेनमध्ये एक महान शोध प्रसिद्ध होणार आहे.जगभरातील प्रसारमाध्यमातून त्याचे लाईव्ह प्रसारण होईल .एडमंड कर्ष हा तरुण उद्योजक ,कॉम्प्युटर तज्ञ, विडिओ गेमचा निर्माता या शोधाच्या पाठीशी आहे .
स्पेनमधील बिलबाओ शहरातील गुगेनहाईम वस्तुसंग्रहालयात हा कार्यक्रम होणार आहे . त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी प्रसिद्ध सांकेतिकचिन्ह तज्ञ प्रोफेसर रॉबर्ट लॅग्डन याना खास आमंत्रित केलंय.
खरे तर एडवर्ड कर्ष हा लॅग्डनचा आवडता विद्यार्थी.अतिशय हुशार ,मॉर्डन आर्टचा चाहता.
हा शोध जनतेसमोर आणण्याआधी त्याने बिशप वॉल्डस्पिनो हे स्पेनच्या राजाचे मित्र, ज्यू धर्मगुरू  राब्बो येहुदा आणि इमाम सैय्यद अल फदल या प्रसिद्ध धर्मगुरूसोबत मिटिंग घेतली होती. एडमंडचा शोध पाहून तिघेही हादरून गेले.हा शोध जनतेसमोर आला तर मानवजातीचा विनाश नक्की आहे असे त्यांचे मत झाले.
गुगेनहाईम येथे जमलेल्या सर्व प्रसिद्ध व्यक्तींना एक हेडफोन देण्यात आला होता .रॉबर्टला ही एक हेडफोन होता .त्यातून एडमंडचा खास सहाय्यक विन्स्टन  रॉबर्टला सूचना करीत होता .खरे तर विन्स्टन कोणी पुरुष नसून तो अत्याधुनिक कुत्रीम बुद्धीमत्ता असणारा कॉम्प्युटर होता. कार्यक्रमाची आयोजक गुगेनहाईम म्युझियमची प्रमुख अधिकारी आणि एडमंडची मैत्रीण आणि स्पेनच्या राजपुत्राची नियोजित वधू अँब्रा व्हिडाल होती.
या कार्यक्रमात आयत्यावेळी एक व्यक्ती शिरली होती.राजवाड्यातून त्या व्यक्तीला कार्यक्रमाला येऊ द्यावे अशी विनंती अँब्राला केली होती.
अतिशय नाट्यमयरीतीने कार्यक्रम सुरू झाला आणि मुख्य कार्यक्रमाला काही मिनिटेच बाकी असताना कुठूनशी एक गोळी झाडण्यात आली आणि तिने एडमंड कर्षच्या कपाळाचा वेध घेतला . त्यापूर्वी रॉबर्टला ही धोक्याची जाणीव झाली आणि तो एडमंडच्या दिशेने धावत सुटला.जगभरातील करोडो प्रेक्षकांनी हे दृश्य लाईव्ह पाहिले.
कोण आहेत ज्यांना एडमंडचा हा शोध जगासमोर येऊ द्यायचा नाहीय ? हा शोध माहीत असणारे तीन धर्मगुरू आणि एडमंडच आहेत .त्यातील दोन धर्मगुरूंचा त्यांच्या देशात आणि एडमंडचा आता इथे खून झालाय.स्पेनच्या राजपुत्रालाही अँब्रा आणि एडमंडची जवळीक सहन होत नाहीय.
आपले काही बरेवाईट झाले तर रॉबर्ट आपला शोध जगासमोर आणेल याची खात्री एडमंडला आहे आणि तश्या सूचना त्याने विन्स्टनला दिल्या होत्या.
आपल्या मित्राचा डोळ्यासमोर झालेला खून पाहून अँब्रा हादरली. तिने रॉबर्टला साथ देण्याचे नक्की केले.पण शाही रक्षक ,स्पेनचे लोकल पोलीस यांच्यापासून ते कसे वाचणार ?? 
आपल्या शोधपर्यंत जाण्यासाठी एडमंडने काही खुणा चिन्हे मागे सोडली आहेत .त्या चिन्हांचा आधार घेत रॉबर्टला त्याच्या सुपर कॉम्प्युटरपर्यंत पोचायचे आहे आणि त्याचा शोध जनतेसमोर आणायचा आहे ? रॉबर्ट यात यशस्वी होईल का ?? असा कोणता शोध एडमंड कर्षने लावला आहे की त्यासाठी खून होतायत ?
क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी ,एका रात्रीच घडणारी डॅन ब्राऊनच्या नेहमीच्या शैलीतील थरारक कादंबरी.
AI अर्थात आर्टीफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावी वापर या कादंबरीमध्ये केला आहे.

Tuesday, December 12, 2023

जिगर थंडा डबल x

Jigar thanda Double X
जिगर थंडा डबल x
 तामिळनाडूतील कोंबईचे घनदाट जंगल हत्तींसाठी प्रसिद्ध आहे.तिथे अगणित हत्तींच्या शिकारी होतात.शेट्टानी हा तिथला प्रमुख शिकारी.तो सहजपणे हत्तीची शिकार करतो.त्याला अजूनही कोणी पाहिले नाही.त्याचे लागेबांधे वरपर्यंत आहेत. पोलिसांचे एक दल त्याच्या बंदोबस्तासाठी जंगलात तळ ठोकून आहे.पण डीएसपी रतनकुमार गावातील निरपराध लोकांना पकडून त्यांचा छळ करतोय.
ही घटना आहे साठ आणि सत्तर च्या दशकातील . मदुराईतील एक तरुण किरुबन पोलीस खात्यात सिलेक्ट झाल्याचे पत्र घेऊन आपल्या प्रेयसीला भेटायला कॉलेजमध्ये आलाय.तो पोलिसात सिलेक्ट तर झालाय पण रक्त पाहिले की त्याला अटॅक येतो.तो कोणाला साधा दम ही देऊ शकत नाही.त्याची प्रेयसी त्याला मजेत चार तरुणाचे भांडण सोडविण्यास सांगते .थोड्या वेळाने बाहेर गडबड उडते म्हणून ती धावत बाहेर येते तेव्हा ते चार तरुण मरून पडलेले असतात आणि किरुबनच्या हातात सुरा असतो.पोलीस त्याला पकडून घेऊन जातात.
तमिळनाडूत मुख्यमंत्रीपदासाठी चुरस चालू असते. त्यातील एका नेत्याला पाठिंबा देणाऱ्या गुंडाची हत्या करण्याची सुपारी डीएसपी रतनकुमार किरुबनला देतो.त्यांच्यामते तो पोलिसात सिलेक्ट झालेला होता आणि चारजणाची क्रूरपणे हत्या केली होती म्हणून तो हुशार असेल.त्याबदल्यात त्यांच्यावरील सर्व आरोप दूर करण्याचे आश्वासन देतो.
अलियन सिजर शहरातील खतरनाक गुंड .तो हत्तीच्या दातांची तस्करी करतो. त्याला मारायची सुपारी किरुबनला दिलीय. अलियन सिजरला चित्रपटाचे वेड आहे.क्लिंट इस्टवूड त्याचा आवडता हिरो.किरुबन रे दासन बनून त्याच्याकडे जातो आणि त्याच्या जीवनावर चित्रपट बनवायचा आहे असे सिजरला सांगतो.तो त्याच्या प्रत्येक गोष्टीची शूटिंग करतो .पण संधी मिळूनही मारू शकत नाही.शेवटी शेट्टानीला जिवंत पकडून दिल्यास तू राज्यात हिरो बनशील आणि चित्रपट हिट होईल असे सांगतो. शेट्टानी सिजरला नक्की ठार मारेल असा त्याला विश्वास असतो.
सिजर जंगलात जातो पण पुढे अश्या काही अनपेक्षित गोष्टी घडतात ज्या पडद्यावर पहाणेच योग्य ठरेल .
पावणेतीन तासाचा हा चित्रपट सुरवातीस विनोदी वाटतो पण मध्यभागी हिंसक बनतो आणि शेवटी अनपेक्षित वळण घेतो.
राघव लॉरेन्सने अलियन सिजरची भूमिका सहजपणे केलीय.त्याचा क्रूर चेहरा धडकी भरवितो. एस. के.सुर्या किरूबनच्या भूमिकते सहानुभूती मिळवतो .
पर्यावरण ,आदिवासी ,अवैध शिकार त्यावर चालणारे राजकारण यावर प्रकाश टाकणारा चित्रपट हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे.
यातील vfx पाहण्यासारखे आहे.विशेषतः हत्तीची शिकार पाहताना अंगावर काटा येतो.

Sunday, December 10, 2023

कडक सिंह

कडक सिंह
Kadak Singh 
ए. के.श्रीवास्तवने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला हे ऐकून कोणाचाच विश्वास बसला नाही. सरकारच्या आर्थिक गुन्हे विभागात त्याच्याइतका स्वच्छ प्रतिमेचा आणि कठोर अधिकारी दुसरा कोणीच नव्हता.
 त्यांचे काम इतके अचूक आहे की आत्महत्या करण्यात ही चूक होणार नाही असे त्यांचा सहकारी अर्जुन म्हणतो.
पण सध्या परिस्थितीच वाईट आलीय.अशोक अग्रवालने चिट फंड घोटाळा करून हजारो भागीदारकांचे पैसे बुडविले आहेत.त्या प्रकरणात ए के च्या एका सहकऱ्याने देखील आत्महत्या केलीय.
ए. के. ला शुद्धीवर काहीच आठवत नाही.साक्षी नावाची तरुणी त्याला भेटायला येते आणि त्याची मुलगी म्हणून ओळख सांगते. तेव्हा तो नकार देतो.आदित्य नावाचा पाच वर्षांचा मुलगा आपल्याला आहे असे तो सांगतो.पण आता आदित्य सतरा वर्षाचा आहे. तरीही तो साक्षीची संपूर्ण गोष्ट ऐकून घेतो. घरी आपल्याला कडकसिंह म्हणतात हे ऐकून त्याला हसू येते.
मग त्यागी येतो.त्यागी त्याचा बॉस. तोही ए .के. कोण आहे , तो इथे कसा आला ,चिट फंडची काय भानगड आहे ते सांगतो.ए .के. शांतपणे तेही ऐकून घेतो.
त्यानंतर अर्जुन त्याला त्याच्याकडे असलेली माहिती देतो .मग नैना येते.ती ए. के. ची मैत्रीण असल्याचे सांगते.या सर्व गोष्टी ए. के. आपली नर्स मिस कन्नन सोबत एन्जॉय करत ऐकत असतो.काही गोष्टींची पडताळणी मिस कन्नन करून तो करून घेतो.
एका झटापटीत अशोक अग्रवाल मारला जातो. काही कागदपत्रे तपासल्यावर साक्षीला वाटते आपले वडील आत्महत्या करू शकत नाहीत.
असे काय घडते की ए. के.सारखा कठोर अधिकारी आत्महत्येचे पाऊल उचलेलं ??चिट फंड घोटाळ्यात नक्की कोण कोण अडकले आहेत ? ए. के.ची स्मृती खरच गेलीय की तो नाटक करतोय. 
ह्या सर्वांची उत्तरे हवी असतील तर झी 5 वर कडक सिंह पहायलाच हवा.
कडक सिंहच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी सोडला तर कोणीही नावाजलेले कलाकार यात नाहीत.अर्धा चित्रपट हॉस्पिटलच्या रूममध्ये आणि पंकज त्रिपाठी बेडवर असताना आहे. पण एक एक धागा जोडत या प्रकरणाच्या शेवटी काय होते हे पाहणे मजेशीर आहे.

Friday, December 8, 2023

अलक

अलक 
"आताच्या काळात प्रेतालाही चार माणसे जमणे मुश्किल."त्याचा आजारी बाप हातात हात घेऊन पुटपुटला.
"काळजी नको बाबा, पन्नास माणसे नक्कीच जमतील तुमच्या अंत्ययात्रेला."त्याने ही हसत उत्तर दिले.
आज खरोखरच पन्नास माणसे बाबांच्या अंत्ययात्रेत उपस्थित होती.स्मशानभूमीतून बाहेर पडल्यावर त्याने प्रत्येकाच्या हाती दोनशेची नोट देत नमस्कार केला. "पैशाने हल्ली बरीच कामे होतात हे पटले आज."तो माझ्याकडे पाहून डोळे पुसत म्हणाला.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

The Italian Job

The Italian Job
द इटालियन जॉब 
जॉन ब्रिगर आणि त्याची टीम प्रोफेशनल चोर आहेत.त्यात चार्ली योजना आखण्यात पटाईत आहे.तर रॉब गाडी चालविण्यात. जॉन आयुष्यातील शेवटची चोरी करणार असतो.इटलीतील व्हेनिस शहरात ते एका माफियाकडील सोने लुटतात .सोने घेऊन पळताना त्यांचाच एक साथीदार स्टिव्ह गद्दारी करून ते सोने ताब्यात घेऊन सर्वाना ठार मारायचा प्रयत्न करतो त्यात जॉन मारला जातो.
जॉनची मुलगी स्टेलाही तिजोरी खोलण्यात तरबेज आहे.ती पोलिसांना मदत करते.एका वर्षांनी चार्ली तिला फिलाडेल्फियात भेटतो आणि स्टिव्हचा पत्ता लागल्याचे सांगतो.आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी स्टेला चार्लीला साथ देण्याचे ठरविते.
स्टिव्ह एका मोठ्या बंगल्यात राहतो .त्याच्या तिजोरीतून सोने पळविण्याची योजना चार्ली आखतो .पण स्टिव्हला त्यांची योजना कळते .तो ते सोने घेऊन दुसऱ्या देशात पळून जायचे ठरवितो. स्टिव्ह यात यशस्वी होईल का ? की चार्लीला आपली योजना आयत्यावेळी बदलावी लागेल ?? 
एक उत्कंठावर्धक थरारक चोरी पहायची असेल तर नेटफ्लिक्सवर हा चित्रपट हिंदी भाषेत जरूर पहा.
मार्क वॉलबर्ग, जेसोन स्टेथाम, चार्लीझ थेरोन प्रमुख भूमिकेत आहेत. यात बंदुकबाजी नाही ,हाणामारी नाही .फक्त चोरीचे प्लॅनिंग आणि तुफानी पाठलाग आहे.

Sunday, December 3, 2023

The Equalizer 3

The Equalizer 3
द इक्विलायझर 3
आधीच्या दोन भागापासून हा थोडा वेगळा आहे. यात हिंसा कमी, पण जी आहे ती फारच क्रूर आहे.
सिसलीतील एका वायनरी असलेल्या किल्लेवजा गढीत रॉबर्ट मकॅल हल्ला करून वायनारीच्या मालकाला आणि त्यांच्या मालकाला ठार मारतो.
पण निघताना तो जखमी होतो. एक पोलीस अधिकारी त्याला आपल्या अल्टामोंन्टे या छोट्या गावात घेऊन येतो. तेथील डॉक्टर त्याच्यावर उपचार करतो.रॉबर्ट त्याच गावात राहतो.पण अमेरिकेला त्या गढीतील अंमली पदार्थाची माहिती देतो.
अल्टामोंन्टे गावात माफियाचे राज्य आहे.व्हिसेन्ट आणि त्याचा भाऊ तेथील लोकांशी क्रूरपणे वागतात.अंमली पदार्थाच्या पैशातून इटलीत बॉम्बहल्ले होतात. पोलीस प्रमुख व्हिन्सेंटला हे प्रकार बंद करायला सांगतो पण त्यालाच मारहाण होते.आता रॉबर्टलाच काहीतरी करायला हवे.पण तो एकटा या माफियाशी लढेल का ? 
अतिशय टापटीप आणि स्वच्छतेची काळजी घेणारा .हातातील घड्याळात वेळ लावून समोरच्याला मारणारा रॉबर्ट डेंझल वॉशिंग्टनने नेहमीप्रमाणे सहज रंगविला आहे.पण यात तो आधीच्या दोन भागापेक्षा जास्त अग्रेसिव्ह वाटतो.तो लोकांच्यात मिसळतो .त्यांच्याशी मैत्री करतो.पण शत्रूला मारताना नेहमीसारखा थंड रक्ताने मारतो.
ज्यांनी आधीचे दोन भाग पाहिले आहेत त्यांनी हा भाग नक्कीच पहावा .
चित्रपट हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे .

Thursday, November 30, 2023

लिओ

Leo
लिओ
पार्थिबन हिमाचल प्रदेशातील ठियोग गावात आपल्या कुटुंबासोबत सुखाने राहतोय. त्याची पत्नी सत्या,सिद्धार्थ नावाचा मुलगा आणि चिंटू नावाची छोटी मुलगी आहे. त्याचे एक छोटे कॉफीशॉप आहे.
 पार्थिबन  प्राण्यांना पकडण्यात एक्सपर्ट आहे.नुकतेच त्याने  गावात फिरणाऱ्या हिंस्त्र तरसाला पकडण्यात मदत केलीय.
शहरात एका कलेक्टरची हत्या होते आणि खुनी पार्थिबनच्या कॅफेत शिरतात.आपल्या मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात तो त्यांना ठार मारतो. कोर्ट त्याला निरपराध ठरवते.पण त्याचे फोटो सगळीकडे प्रसिद्ध होतात.
अंटोनी दास आणि हॅरोल्ड दास दोघे भाऊ.त्यांची तेलंगणाला मोठी सिगारेट फॅक्टरी आहे. त्यांच्याकडेही पार्थिबनचा फोटो पोचतो आणि ते आपली माणसे घेऊन पार्थिबनला शोधायला निघतो.
इकडे त्या कलेक्टरच्या खुन्याचे नातेवाईक पार्थिबन आणि त्याच्या परिवाराला मारायला शहरात येतात.
अंटोनी दासच्या मते पार्थिबन हा त्याचा मुलगा लिओ दास आहे जो वीस वर्षांपूर्वी मारला गेला होता.आता तो त्याला परत घेऊन जायला आला आहे.पण पार्थिबन कोणत्याही अंटोनी किंवा लिओ दासला ओळखत नाहीय.
पण पार्थिबन नक्की लिओ आहे का ?? आपल्या कुटुंबाला वाचविण्यासाठी तो काय करेल ? 
थलपती विजय,संजय दत्त, त्रिशा, अर्जुन सारख्या मोठ्या स्टारनी भरलेला लिओ आपली चांगली करमणूक करतो.
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

दोबारा

दोबारा ( 2:12 )
Do baa raa
साल 1996 
स्थळ .हिंजेवाडी पुणे 
त्या रात्री खूप मोठे वादळ चालू होते.जवळजवळ तीन दिवस हे वादळ चालेल असा हवामानखात्याचा अंदाज होता.
अनय बारा वर्षाचा मुलगा त्या कॉलनीतील एका बंगल्यात आईसोबत राहतोय.त्याची आई आर्किटेक्टर आहे.पुण्यातील एका मोठ्या हॉस्पिटलचे डिझाइन ती करतेय.अनय व्हिडिओ कॅमेराद्वारे स्वतःच्या आणि वडिलांच्या मेमरी रेकॉर्ड करून टीव्हीवर पाहत असतो.तो स्वतःचे रेकॉर्डिंगही करतो.
त्या रात्री तो आपला व्हिडिओ रेकॉर्डर चालू करून टीव्हीवर बघत असताना शेजारच्या बंगल्यातून झटापटीचा आवाज येतो.
कुतूहलाने तो खिडकीतून पाहतो तेव्हा दोन व्यक्तींची झटापट चालू असते. इतक्यात लाईट जाते. तो बॅटरी घेऊन त्या बंगल्यात जातो तेव्हा तिथे खून झालेला असतो . खुनी अनयला पाहतो आणि मागे लागतो. अनय धावत बंगल्याबाहेर पडतो त्याचवेळी फायरबिग्रेडची गाडी त्याला उडवते आणि त्याचा मृत्यू होतो.त्यावेळी घड्याळात रात्रीचे दोन वाजून बारा मिनिटे झालेली असतात.
काही वर्षे उलटून गेलीत. ते हॉस्पिटल पूर्ण झालंय. त्या हॉस्पिटलमध्ये नर्स असणाऱ्या अंतरा अवस्थीने तो बंगला घेतलाय.ती नवरा विकास आणि सहा वर्षाची मुलगी अवंती सोबत राहायला आलीय.
 तिला अनय आणि खुनाची गोष्ट कळते.बंगला साफ करताना तेथे तिला तो टीव्ही आणि व्हिडिओ रेकॉर्डर सापडतो.त्या दिवशी ही वादळी रात्र आहे. रात्री झोप येत नाही म्हणून कुतूहलाने ती टीव्ही आणि व्हिडिओ रेकॉर्डर सुरू करते आणि टीव्हीत अनय दिसतो.
अनय तिला पाहतो आणि तिच्याशी बोलू लागतो .तीही त्याच्याशी बोलू लागते अचानक बाजूच्या बंगल्यात काही झटापट चालू आहे असे अनय तिला सांगतो .ती त्याला तिथे जाऊ नये असे  ओरडून सांगते पण तो तिथे जातो .तिथे एका स्त्रीचे प्रेत पडलेले असते.अनय ते पाहून पळतो त्याचवेळी लाईट जाते.बंगल्याच्या बाहेर येताच फायरबिग्रेडची गाडी अनयच्या समोरून जाते.तेव्हा दोन वाजून बारा मिनिटे झालेली असतात.
सकाळी अंतराला जाग येते तेव्हा ती दुसऱ्याच बंगल्यात असते. हॉस्पिटलमध्ये जाते तेव्हा सगळे तिला सर्जन समजत असतात.ती आपल्या मुलीला आणायला स्विमिंग क्लबला जाते.पण तिथे अवंती अवस्थी नावाची कोणीच मुलगी क्लबमध्ये नाहीय असे सांगितले जाते.
ती आपल्या नवऱ्याला विकासला भेटायला हॉटेलला जाते पण तो तिला ओळखायला नकार देतो. उलट तुम्ही डॉक्टर अंतरा वशिष्ट आहात आणि तुम्ही माझे ऑपरेशन केले होते असे सांगतो.तिचे वरिष्ठ डॉक्टरही ती डॉ.अंतरा वशिष्ठ आहे असे सांगतात. डिसीपी आनंद तिच्यावर विश्वास ठेवून अवंतीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो .
हा काय प्रकार आहे ? अंतरा नक्की कोण आहे  ? खरोखर तिला मुलगी आहे का ?? 1996 साली अपघातात मृत्यू पावलेला अनय अजून जिवंत आहे ?? डोके चक्रावून टाकणारा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहेत.
तापसी पनू  अंतरा अवस्थी आणि डॉ अंतरा वशिष्ठ च्या भूमिकेत आहे.अनुराग कश्यपचे दिग्दर्शन आहे.

Sunday, November 26, 2023

लिओ

Leo
लिओ
पार्थिबन हिमाचल प्रदेशातील ठियोग गावात आपल्या कुटुंबासोबत सुखाने राहतोय. त्याची पत्नी सत्या,सिद्धार्थ नावाचा मुलगा आणि चिंटू नावाची छोटी मुलगी आहे. त्याचे एक छोटे कॉफीशॉप आहे.
 पार्थिबन  प्राण्यांना पकडण्यात एक्सपर्ट आहे.नुकतेच त्याने  गावात फिरणाऱ्या हिंस्त्र तरसाला पकडण्यात मदत केलीय.
शहरात एका कलेक्टरची हत्या होते आणि खुनी पार्थिबनच्या कॅफेत शिरतात.आपल्या मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात तो त्यांना ठार मारतो. कोर्ट त्याला निरपराध ठरवते.पण त्याचे फोटो सगळीकडे प्रसिद्ध होतात.
अंटोनी दास आणि हॅरोल्ड दास दोघे भाऊ.त्यांची तेलंगणाला मोठी सिगारेट फॅक्टरी आहे. त्यांच्याकडेही पार्थिबनचा फोटो पोचतो आणि ते आपली माणसे घेऊन पार्थिबनला शोधायला निघतो.
इकडे त्या कलेक्टरच्या खुन्याचे नातेवाईक पार्थिबन आणि त्याच्या परिवाराला मारायला शहरात येतात.
अंटोनी दासच्या मते पार्थिबन हा त्याचा मुलगा लिओ दास आहे जो वीस वर्षांपूर्वी मारला गेला होता.आता तो त्याला परत घेऊन जायला आला आहे.पण पार्थिबन कोणत्याही अंटोनी किंवा लिओ दासला ओळखत नाहीय.
पण पार्थिबन नक्की लिओ आहे का ?? आपल्या कुटुंबाला वाचविण्यासाठी तो काय करेल ? 
थलपती विजय,संजय दत्त, त्रिशा, अर्जुन सारख्या मोठ्या स्टारनी भरलेला लिओ आपली चांगली करमणूक करतो.
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Friday, November 24, 2023

कन्नूर स्वाड

Kannur Squad
कन्नूर स्वाड
केरळ पोलिसांची कन्नूर स्वाड नावाचे स्वतंत्र युनिट आहे.ज्यात फक्त चार ऑफिसर आहेत.जॉर्ज मार्टिन त्याचा लीडर.
त्यांच्याकडे आलेली प्रत्येक केस त्यांनी कमीतकमी दिवसात यशस्वीपणे सोडवली आहे.पण एक दिवशी त्याच्या स्वाडमधील एका ऑफिसरवर लाच घेतल्याचा आरोप होतो आणि ते युनिट बरखास्त केले जाते.
कासारगोड शहरात एका अनिवासी भारतीय अब्दुल वहाबची हत्या होते. खुनी त्याच्या घरातून कॅश आणि दागिने लुटून नेतात. त्या आधी त्याच्या मुलीला ,मुलाला आणि पत्नीलाही बेदम मारहाण करतात.पोलिसांकडे काहीही पुरावा नसतो. त्यात राजकीय दबाव ही वाढत असतो.
कासारगोडचा एसपी मनू निधी पुन्हा कन्नूर स्वाडला बोलावतो. मला माझी पूर्ण टीम पाहिजे या अटीवरच जॉर्ज मार्टिन ही केस स्वीकारतो.मनू निधी त्याला फक्त दहा दिवसांत केस सोडविण्याची ऑर्डर देतो.जॉर्ज हे आव्हान स्वीकारतो आणि खुन्याच्या मागावर निघतो.
हा  केवळ  एक वेगवान पोलीस तपास नाहीय तर त्यामागे पोलिसांचे कष्ट, त्यांना तपासात येणाऱ्या अडचणी.लाल फितीचा कारभार ,प्रशासकीय अडचणी या सर्व गोष्टींचा प्रवास आहे.
कन्नूर स्वाड आपल्या वैयक्तिक अडचणी दूर सारून दहा दिवस आपल्या जीपसोबत 3000 किलोमीटर चा प्रवास करीत खुन्यांच्या मागावर आहे.त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत.ते रस्स्यावर आंघोळ करतात .मिळेल ते खातात. पण आपल्या कार्याशी प्रामाणिक आहेत.तरीही त्यांचे वरिष्ठ त्यांना भारत टूर करतायत असा आरोप करतात.
आपणही नकळत त्यांच्यासोबत प्रवासात गुंतून जातो.
यात ममूटीने जॉर्ज मार्टिनच्या भूमिकेत प्राण ओतले आहेत.त्याचा आत्मविश्वास आपल्या सहकार्यांना सांभाळून घेणे.त्यांच्यासाठी जीव धोक्यात घालणे हे बघण्यासारखे आहे.एका क्षणी तोही निराश आणि हतबल होतो.
आपल्याला हा थरार अनुभवायचा असेल तर हॉटस्टारवर कन्नूर स्वाड नक्की पहा.हिंदी भाषेत आहे.

Tuesday, November 21, 2023

पिपा

पिपा 
PIPPA
1971 साली रशियाने भारताला पाण्यावरून चालणारे रणगाडे दिले.कॅप्टन बलरामसिंह मेहता हा रणगाड्यांचे नेतृत्व करण्यात कुशल होता.चाचणी दरम्यान त्याने वरिष्ठांची ऑर्डर मोडून रणगाडा खोल पाण्यात नेला.परिणामतः त्याची चौकशी होऊन दिल्ली मुख्यालयात पेपरवर्क करण्यासाठी  बदली झाली.
बलरामसिहंचा मोठा भाऊ राम ही सैन्यात आहे तर बहीण राधा गुप्तलिपी तज्ञ आहे.
 पूर्व पाकिस्तानात मुक्तवाहिनी सेना आपला देश स्वतंत्र करण्यासाठी लढतेय. पाकिस्तान सतत पूर्व पाकिस्तानवर दबाव ठेवून आहे . राम मेहता  एका गुप्त मोहिमेसाठी पूर्व पाकिस्तानात गेलाय आणि मुक्तवाहिनी सेनेला प्रशिक्षण देतोय.
अचानक पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानवर हल्ला केला. रशियन रणगाडयात काही बदल करायचे होते आणि त्यासाठी बलरामसिंह मेहताचे नाव पुढे आले.
बलरामसिंहने दिवसरात्र मेहनत करून त्यात अपेक्षित बदल केले.त्यामुळे त्याला पुन्हा फिल्डवर जाण्याची परवानगी मिळाली.
तिथे राम मेहता अचानक गायब झालाय.तो पूर्व पाकिस्तानात पकडला गेलाय अशी बातमी राधाला मिळते.
बलरामसिंह नवीन पिपा रणगाडे वापरून पाकिस्तानी सैन्याला धूळ चारेल का ? तो आपल्या भावाला शोधून काढेल का ?
1971 साली बांगलादेशच्या निर्मितीतील एक सत्य युद्धकथा . भारतीय सैन्याने पाकिस्तानला पराजित करून बांगलादेश निर्माण केला .त्यातील ही एक कहाणी .
चित्रपट प्राईम व्हिडिओवर आहे .

Saturday, November 18, 2023

वॉन्टेड

WANTED
वॉन्टेड 
लोला एका मॉलमध्ये काम करते.तिला डेव्हिड नावाचा तरुण मुलगा आहे.ती मुळातच आक्रमक स्वभावाची आणि धाडसी आहे. 
चेल्सी एक तरुण अकाउंटंट .ती स्वभावाने  भित्री  पण टापटीप राहणारी. ऑडिटमध्ये तिने केलेल्या हिशोबात चुका सापडल्या त्यामुळे ती टेन्शनमध्ये आहे.
त्या दिवशी रात्री दोघीही एकाच स्टॉपवर बसची वाट पाहत उभ्या होत्या. दोघीही एकमेकांना अजिबात ओळखत नव्हत्या.नुकतीच नोकरी गेल्यामुळे लोला टेन्शनमध्ये होती.
 अचानक एक कार त्यांच्या अंगावर आली .त्यातील ड्रायव्हर जखमी होता .त्याला  मदत करायला दोघीही पुढे सरसावल्या. इतक्यात तिथे दुसऱ्या गाडीतून दोन बुरखेधारी उतरले त्यातील एकाने ड्रायव्हरला गोळ्या घातल्या.
लोलाने त्यांच्यावर आक्रमण केले. त्या झटापटीत एक मारला गेला तेव्हा दुसर्याने बंदुकीच्या धाकावर दोघींना कारच्या डिकीत बंद केले.
आता  दोन अनोळखी स्त्रियांचा कारच्या डिकीतून प्रवास चालू आहे . एका भंगार कार डेपोत गाडी थांबली आणि दोघींनी अपहरणकर्त्यावर हल्ला करून आपली सुटका करून घेतली आणि कार घेऊन पोबारा केला.कारची तपासणी केली तेव्हा त्यात बॅग भरून पैसे आणि ड्रग आढळून आले.
आता त्यांच्यामागे भ्रष्ट पोलीस, माफिया गुंड,आणि पोलीस लागले आहेत.
पोलिसांना त्या दोघी खुनाच्या आरोपाखाली हव्यात तर भ्रष्ट पोलीस आणि माफिया गुंडांना ड्रग आणि पैसे हवेत .
दरवेळी लोला आणि चेल्सी या सर्वांना चकमा देऊन पुढे जातायत .पण कुठपर्यंत पळतील ?? याचा शेवट व्हायलाच  हवा ?  त्यात दोघीही एकमेकांना पूर्णपणे अनोळखी स्वभाव भिन्न .त्या एकत्र राहतील ?
क्षणाक्षणाला पुढे काय होईल याची उत्कंठा वाढवणारी ही ऑस्ट्रेलियन सिरीज नेटफ्लिक्सवर इंग्रजी भाषेत आहे.
याचे एकूण तीन सिझन आलेत .पहिला सिजन पाहिल्यावर बाकी दोन्ही सीजन नक्की पाहणार याची खात्री आहे.

Wednesday, November 15, 2023

THE UNHOLY

THE UNHOLY ( 2021 )
द अनहोली
ते 1845 साल होते.बॅनफिल्ड येथे मेरी एलनॉरला काळ्या जादूटोण्याच्या आरोपाखाली पकडण्यात आले आणि एका झाडाला टांगून जिवंत जाळले गेले.तिची राख एका  बाहुलीत ठेवून ती साखळीत घट्ट बांधण्यात आली आणि त्याच झाडाखाली पुरली होती.
आता वर्तमानकाळात ते झाड अजूनही आहे. गेरी फेन हा पत्रकार .खोट्या बातम्या देण्याच्या अपकीर्तीमुळे त्याला कोणीही उभे करत नाही.तो छोटीमोठी कामे करतो.अश्याच एका छोट्या कामासाठी तो बोस्टनला जातो आणि त्या झाडाखाली ती बाहुली मिळते.तो त्या बाहुलीचा चुराडा करतो आणि मेरीचा आत्मा मोकळा होतो.
एलिस एक मूकबधिर तरुणी .तीच्या शरीरात तो आत्मा शिरतो आणि मेरी बोलायला लागते.ती एका अपंग मुलाला चालायला लावते तर एका फादरचा असाध्य आजार बरा करते. चर्च आणि सारेजण तिला संत म्हणू लागतात. पण खरेच ती संत आहे का ?
 चर्चमधील एक फादर या रहस्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो पण काही दिवसांनी तो लटकलेल्या अवस्थेत चर्चमध्ये सापडतो.  गेरीवरही एक अमानवी व्यक्ती हल्ला करते.
एका मोठ्या समारंभात बिशप एलिसचा सत्कार करणार आहेत आणि एलिस सर्वाना त्यांचे आत्मे मेरीला समर्पित करण्याचे आवाहन करणार आहे . या सर्वांचे जीव धोक्यात आहेत.गेरी हे टाळू शकेल का ? 
ज्यांना हॉरर चित्रपट आवडतात अश्यांसाठी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Sunday, November 12, 2023

चूना

चूना
Choona
शुक्ला एक बिल्डर आणि माफियाही.शहरात त्याची दहशत आहे.  पण त्याचा ज्योतिषी आणि ग्रहताऱ्यांवर खूप विश्वास .जे काही काम करेल ते ज्योतिष्याच्या सल्ल्यानुसार . आता त्याला राजकारणात शिरून सत्ता हाती घ्यायची आहे.त्यासाठी त्याने आमदार विकत घ्यायची तयारी ही ठेवली आहे.यासाठी त्याने शेनॉय नावाच्या बिझनेसमन ला हाताशी धरलेय.
अन्सारी आणि बांके दोघेही जिगरी दोस्त.अन्सारीच्या मामाला शुक्लाने ठार मारले होते.तेव्हापासून अन्सारी शुक्लाचा राग करतोय.त्यालाही राजकारणात जायचे आहे आणि म्हणून तो शुक्लाला प्रत्येक ठिकाणी विरोध करतोय.बांके पोलीस अधिकारी आहे. शुक्लामुळे तो निलंबित झालाय.
बिष्णू शुक्लाचा मेव्हणा .पण शुक्लाने त्याच्या बहिणीवर अन्याय केलाय . आता बिष्णू शुक्लाचा नोकर बनून राहिलाय.
जे पी एक मोठा कॉन्ट्रॅक्टर . एका मोठ्या कामाची वाट शुक्लाने लावल्यामुळे तो कर्जबाजारी आणि दारुडा झालाय.त्याचाही शुक्लावर राग आहे.
त्रिलोकी चोर आहे.वेगवेगळे रूप घेऊन खबरी काढणे चोऱ्या करणे हे त्याचे काम.शुक्लाकडे पैसे येणार आहेत आणि तो कुठे ठेवणार याची खबर त्यानेच दिलीय.पैशासाठी तो यात सामील झालाय.
झुंपा त्रिलोकीची मैत्रीण.कॉम्प्युटर एक्सपर्ट .आपल्या प्रियकरासाठी यात सामील झालीय.
पंडित उपाध्याय शुक्लाचा ज्योतिषी .मनासारखा सल्ला दिला नाही म्हणून शुक्लाने त्याला ठार मारायचे ठरविले पण तो वाचला.तोही बदला घेण्यासाठी यात आलाय.
या सर्वांना  शुक्लचा बदला घ्यायचा आहे .शुक्लाने आमदार खरेदी करण्यासाठी सहाशे कोटी गोळा केलेत .ते त्यांना लुटायचे आहेत.
हे सर्व मूर्ख ,अतिउत्साही आणि साधेभोळेही आहेत.पण तरीही ते जीवावर उदार होऊन हा धोका पत्करायला तयार झालेत.
ते सहाशे कोटी त्या अभेद्य बंगल्यातून आणि कडेकोट पाहऱ्यातून कसे लुटतील ??
ते सहाशे कोटी लुटून शुक्लाला चूना लावतील.
एक विनोदी ,थ्रिलर सिरीज नेटफ्लिक्सवर आहे.
जिमी शेरगिल शुक्लाच्या भूमिकेत आहे.

The good The bad and The ugly ( 1966 )

The good The bad  and The ugly  ( 1966 )
 द गुड द बॅड अँड द अग्लि
ही  1862 सालातील अमेरिकन सिव्हिल वॉरच्या काळात घडलेली घटना आहे. ब्लँडी हा निष्णात गन फायटर .खरे तर त्याला काहीच नाव नाहीय .
टुको नावाच्या गुंडाशी संगनमत करून पैसे कमवीत असतो.जिथे जिथे टुकोवर इनाम लागलेय तिथे त्याला हजर करून बक्षीस घ्यायचे आणि फाशी देताना त्याला पळवून न्यायचे. 
पण एक दिवस तो टुकोला धोका देतो आणि संधी मिळताच टुको त्याला वाळवंटात मैलोनमैल चालायला लावतो .मरणाच्या दारात असताना अमेरिकन सैनिकांची एक घोडागाडी दिसते.त्यातील एक सैनिक मरणापूर्वी ब्लँडीच्या कानात एका कबरीतल्या सोन्याचे रहस्य सांगतो. आता टुकोला त्या खजिन्यासाठी तरी ब्लँडीला जिवंत ठेवावे लागेल.
एंजल आय एक खाजगी मारेकरी.त्यालाही खजिन्याची कबर शोधायची आहे.टुको आणि ब्लँडीकडे त्या कबरीची माहिती आहे असे कळते.तो दोघांना घेऊन तो खजिना शोधायला निघतो . पण खजिना कोणाला मिळणार ?
सुप्रसिद्ध दिग्दर्शक सर्जीओ लिओनचा डॉलर ट्रायोलॉजी मधील हा चित्रपट. 
या चित्रपटाने अभिनेता क्लिंट ईस्टवूडला नाव मिळवून दिले. बराचसा चित्रपट क्लोजअप शॉटमध्ये चित्रित केलाय.चित्रपटातील पात्रे डोळ्याच्या भाषेतून बरेच काही बोलतात. यात लॉंग शॉटही खूप परिणामकारक आहेत.
पण चित्रपटात सर्वात जास्त परिणामकारक आहे ते पार्श्वसंगीत. याची थीम जगप्रसिद्ध आहे.अंगावर शहारे आणणारी ही थीम सतत आपल्याला भीतीची जाणीव करून देत राहते.आजही ही थीम अनेकजणांची मोबाईल ट्यून आहे .
क्लिंट ईस्टवूडची खुरटी दाढी ,भेदक डोळे , तोंडात छोटा सिगार ठेवून पुटपुटणे आणि डोळ्यांचे पाते लवते न लवते इतक्या वेगात बंदूक झाडणे बघण्यासारखे आहे . जोडीला ली वान क्लीफ आणि एली वालच आहे.
साधारण पावणेतीन तासांचा हा चित्रपट आपल्याला श्वास रोखून  वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो.
प्राईम व्हिडिओवर  चुकवू नये असा हा चित्रपट आहे.

Friday, November 10, 2023

बहिर्जी नाईक

बहिर्जी नाईक 
डॉ. राज जाधव 
नावीन्य प्रकाशन 
स्वराज्याचा पहिला गुप्तहेर आणि गुप्तहेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक आपल्या मुखाने आपली कहाणी सांगतोय. तो त्यांच्या अंगी असलेल्या नाना कला ,सोंग घेण्याची कला कशी शिकला हे सांगतो. ह्यात अनेक लोक बहिर्जी विषयी सांगतात .यात खुद्द महाराज आहेत.त्यांची सहाय्यक सावित्री आहे, जवळचा मित्र जिवाजी आहे तर शेवटी शंभू राजे आहेत.
स्वराज्याच्या स्थापनेत बहिर्जीचे किती मोठे योगदान आहे याची प्रचिती या पुस्तकातून आपल्याला कळते.रोहिडेश्वरावर स्वराज्याची शपथ तर तोरणा घेताना त्यात किती खजिना आहे आहे तो बहिर्जीने कसा शोधला हे वाचनीय आहे.तसेच सुरतेची लूट, पन्हाळ्यावरून  महाराजांची सुटका , आग्र्याहून सुटका ,अश्या मोठ्या मोहिमेत बहिर्जीचे योगदान किती महत्वाचे होते हे कळते.
आग्र्याहून महाराजांची सुटका हे शेवटचे प्रकरण आहे पण शंभू राजांच्या मनोगतात हा फक्त पूर्वार्ध आहे हे कळते.या पुस्तकाचा दुसरा भाग लवकरच येईल अशी खात्री आहे.

पी. आय.मीना

P. I. Meena
पी.आय.मीना
मीनाक्षी अय्यर ही एक प्रायव्हेट इन्वेस्टीगेटर. कंपनीने सांगितलेल्या व्यक्तींचा पाठलाग करणे  त्यांची पूर्ण माहिती काढणे आणि पुरावे आपल्या कस्टमरला देणे हे तिचे काम.
त्या दिवशी नेहमीप्रमाणे ती ऑफिसला निघाली होती.पण अचानक एका ट्रकने त्या स्क्यूटर चालविणाऱ्या तरुणाला उडवले आणि तो तिच्यासमोरच पडला.
माणुसकीच्या नात्याने तिने त्याला हॉस्पिटलमध्ये पोचवले.तिथे त्याची आई हजर झाली.पार्थो त्या तरुणाचे नाव.
पार्थोच्या आईने मीनाक्षीला हा अपघात नसून खून आहे असे सांगितले .मीनाक्षीने त्यात लक्ष दिले नाही .तिने आपले स्टेटमेंट पोलिसांना दिले आणि निघाली. 
दोन दिवसानंतर पार्थोचा मृत्यू झाला .ती तेव्हाही हॉस्पिटलमध्ये जाऊन आईला भेटून आली. नंतर घरी गेल्यावर पार्थोच्या आईने त्याची सगळी माहिती मीनाक्षीला दिली. सहज म्हणून मीनाक्षीने त्याच्या खोलीची झडती घेतली आणि तिला त्यात काही पेपर सापडले.त्याचा फोन सापडला. काही दिवसांनी पार्थोच्या आईने आत्महत्या केली.
मीनाक्षीने आपला वकील मित्र शुबो रॉयला मदतीला घेऊन या प्रकरणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यावरच प्राणघातक हल्ला झाला.वरवर साधे दिसणारे हे प्रकरण पुढे फारच गंभीर होत जाते. 
कोलकत्ता आणि ईशान्य भागात घडणारी ही रहस्यमय मालिका प्राईम विडिओवर आहे.

Thursday, November 9, 2023

द मॅग्निफिसंट सेवन 1960

The Magnificent Seven  1960
द मॅग्निफिसंट सेवन   1960
ते मेक्सिको तील एक छोटे गरीब खेडे होते. गावातील बहुतेक लोक शेतकरी होते.त्यांना साधी बंदूकही चालवता येत नव्हती.कॅल्व्हरा हा दरोडेखोर होता.तो आपल्या टोळीला घेऊन त्या गावात यायचा आणि जबरदस्तीने त्यांच्याकडून अन्नधान्य मांस घेऊन जायचा.
कॅल्व्हराच्या त्रासाला कंटाळून गावकऱ्यांनी रक्षणासाठी बाहेरुन काही धाडसी गनफायटर  बोलविण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी पैसे ही गोळा केले.
तीन गावकरी योग्य माणसे शोधायला शहरात आली .तिथे त्यांना क्रिस भेटला. पण क्रिसला हे एकट्याचे काम नाही याची जाणीव होती म्हणून त्याने अधिक  माणसांचा शोध चालू केला. योग्य ती पारख करून त्याने सहाजणाना आपल्यासोबत घेतले आणि सर्व त्या छोट्या खेड्याकडे निघाले.
त्या पन्नासजणांच्या  टोळीशी ही सात माणसे लढा देतील का ?
अकिरा कुरोसावाच्या सेवन सामुराई या सुप्रसिद्ध चित्रपटावर आधारीत हा चित्रपट आहे.
यात तुफान घोडेस्वारी आणि बंदुकीची गोळाबारी आहे.
अतिशय गाजलेला हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर आहे.
ज्यांना जुने वेस्टर्न चित्रपट आवडत असतील त्यांनी चुकवू नये.

Tuesday, November 7, 2023

आय फॉर एन आय

Eye For An Eye ( 1996 )
आय फॉर एन आय 
कॅरेन आणि मॅक एक सुखी जीवन जगतायत. कॅरेनला पहिल्या लग्नातून एक  सतरा वर्षाची ज्यूली नावाची मुलगी  आहे आणि मॅक पासून दुसरी मुलगी झालीय.  मेगन सात वर्षाची आहे.
आज मेगनचा सातवा वाढदिवस आहे .मॅक आणि कॅरेन दोघेही कामावर गेलेत.तर मेगन शेजारी खेळायला गेलीय.ज्यूली एकटीच घरात असताना कोणीतरी एक घरात घुसून तिच्यावर बलात्कार करतो आणि तिला ठार मारतो.
पोलिसांना खूप प्रयत्न करून काही पुरावे सापडतात आणि ते एका डिलिव्हरी बॉयला अटक करतात. मध्यंतरी कॅरेन या धक्क्यातून सावरण्यासाठी एक सपोर्ट ग्रुप जॉईन करते. ज्यांच्यावर अशी दुःखद परिस्थिती ओढवली आहे अशी माणसे त्या ग्रुपमध्ये येऊन आपले दुःख हलके करतात. अर्थात त्या ग्रुपमध्ये बदला घेणारीही माणसे आहेत आणि गुप्तहेर पोलीस अधिकारीही आहेत.
पोलीस रॉबर्ट डूबला कोर्टात आरोपी म्हणून हजर करतात. पण पुरेश्या पुराव्याअभावी आणि कायद्यातील पळवाटा वापरून  तो सुटतो.कॅरेनला हे पाहून धक्का बसतो.ती स्वतः त्याला शिक्षा देण्याचे ठरविते.
करेन कायदा हाती घेऊन त्याला शिक्षा देईल का ??
ती तर एक साधी गृहिणी आहे .
कायद्यातील पळवाटा वापरून खरा गुन्हेगार कसा सुटतो आणि पुन्हा गुन्हा करायला मोकळा होतो आणि ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांचे काय हाल होतात हे कॅरेनला पाहून समजते.
नेटफ्लिक्सवर हा चित्रपट हिंदी भाषेत आहे.

Friday, November 3, 2023

डेथ विश 2

Death Wish 2 1982
डेथ विश 2
डेथ विश सिरीजचा हा दुसरा चित्रपट 
पॉल केरसें हा आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर लॉस एजलीसला येतो.त्याच्या मुलीला कॅरोलला आईच्या मृत्यूचा धक्का बसलाय .ती उपचार घेतेय.
एके दिवशी आपल्या रिपोर्टर मैत्रिणीसोबत  कॅरोलला घेऊन पॉल फिरायला बाहेर पडतो. त्याच वेळी रस्त्यावरील काही गुंड त्याचे पाकीट मारतात.नंतर त्याला धक्काबुक्की करतात.पॉल त्यांना काही करत नाही .पण नंतर ते गुंड  त्याच्या घरी येऊन मोलकरणीला बेदम मारहाण करतात. तिच्यावर बलात्कार करतात.पॉल घरी येतो तेव्हा ते पुन्हा पॉलला जखमी करून कॅरोलला घेऊन जातात . 
पॉलला आपल्या मुलीला सोडवायचे आहे आणि त्या गुंडांना धडा ही शिकवायचा आहे .यात तो यशस्वी होईल का ?? 
चार्ल्स ब्रॉंसोनची  डेथ विश सिरीज चांगलीच गाजली होती.एकूण पाच भाग रिलीज झाले होते.  पहिल्या भागातील ही सूडकथा नंतर त्याला गुंडांचा कर्दनकाळ बनविते.
प्राईम विडिओवर याचे 2/3/4/5 भाग आहेत.जुने गाजलेले इंग्रजी चित्रपट ज्यांना आवडतात त्यांनी हे जरूर पाहावेत .

Wednesday, November 1, 2023

द सिक्स सेन्स

The Sixth Sense 1999
द सिक्स सेन्स
कोल सीयर नऊ वर्षाचा होता.सतत अस्वस्थ राहणारा, भीतीचा पगडा असलेला . त्याच्या आईलाही काळजी असायची. काही विचित्र घटना तिच्या घरात घडायच्या.
माल्कम क्रो मानसोपचार तज्ञ आहे. तो कोलची केस हँडल करतोय. काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर खुनी हल्ला झाला होता.आता तो पुन्हा काम करू लागलाय.
सुरवातीला कोल बरोबर बोलणे थोडे अडचणीचे आहे .कोल मध्येच विचित्र वागतोय. काही दिवस कोल सोबत घालवल्यावर  एके दिवशी कोलने त्याला सांगितले की त्याला मृत व्यक्ती दिसतात .पण त्यांना माहीत नाही ते मृत झालेत.ते ज्या अवस्थेत मृत झाले त्याच अवस्थेत त्याला दिसतात.ते सतत त्याच्या भोवती असतात .
माल्कम प्रथम विश्वास ठेवत नाही पण तो त्याच्यासोबत एका मृत मुलीच्या घरी जातो आणि कोल तिच्या मृत्यूचे रहस्य उघडे करतो .
आता कोलला यातून बाहेर काढायची जबाबदारी माल्कमवर आहे .त्याचे स्वतःचेही काही प्रॉब्लेम आहे.तो कोलला बरे करेल का ?  याचा शेवट काय होईल ??
एका अनपेक्षित धक्कादायक शेवटासाठी तयार राहा .
भारतीय वंशाचा दिग्दर्शक एम. नाईट श्यामलनचा अप्रतिम चित्रपट.
चित्रपट हॉटस्टारवर आहे.

Tuesday, October 31, 2023

पोलीस स्टोरी लॉकडाऊन

पोलीस स्टोरी लॉकडाऊन
Police story Lockdown
त्या दिवशी डिटेक्टिव्ह झोन्ग वेन आपल्या मुलीला भेटायला वू बारमध्ये गेला होता. मिओ डॉक्टर होती आणि वू जियांगची गर्लफ्रेंड होती. वू जियांग वू बारचा मालक होता.
आपले वडील पोलीस ऑफिसर आहेत हे मिओने वू जियांगला सांगितले नव्हते. आज बारमध्ये जास्तच गर्दी होती.झोन्ग वेनचे आपल्या मुलींबरोबरचे संबंध थोडे ताणलेले होते.पण तरीही त्याचे मुलीवर प्रेम होते.
झोन्ग वेन बारमध्ये आपल्या मुलीशी बोलत असताना वू जियांगने सर्व कस्टमरला बंदी बनवले.त्याने झोन्ग वेनला ही पकडले. सर्वांच्या सुटकेच्या बदल्यात त्याने तुरुंगातील एका कैद्याच्या सुटकेची मागणी केली .
झोन्ग वेनने त्याची मागणी पूर्ण करायची तयारी दाखवली .पण एका साध्या कैद्याची मागणी वू जियांग का करतोय हा प्रश्न त्याला पडला होता .
काय कसेल त्यामागचे कारण ? झोन्ग वेन  सर्वांची सुटका करेल का ? आपल्या मुलींबरोबरचे संबंध पूर्ववत होतील का ??
पोलीस स्टोरी सिरीजमधील हा चित्रपट 2013  ला रिलीज झाला.आता पोलीस ऑफिसर झोन्ग वेन म्हातारा झालाय.तो पूर्वीसारखा चपळ आणि गरम डोक्याचा राहिला नाही.त्याच्या हालचालींवर बंधन आलीत.पण आता तो शांतपणे विचार करतो.परिस्थितीला सामोरे जातो. सामोपचाराने वाद मिटवतो पण शक्य असेल तेव्हा प्राणपणाने लढतो .
प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट हिंदी भाषेत आहे.जॅकी चेन प्रेमींनी आवर्जून पाहावा.

Saturday, October 28, 2023

IRAIVAN

IRAIVAN
इराईवन
एसीपी अर्जुन कडक प्रामाणिक ऑफिसर आहे.त्याच्या सनकी स्वभावामुळे सगळेच घाबरून असतात.तो पोलीस असूनही कायदे पाळणारा नसतो.
शहरात तरुण मुलींचे क्रूरपणे खून होत असतात .खुनी स्वतःला स्मायली मॅन  म्हणवून घेतो.त्याला शोधण्याची जबाबदारी अर्जुन आणि आंद्रेववर आहे.अर्जुन आणि आंद्रेव खास मित्र.आंद्रेवची बहीण प्रिया अर्जुनवर प्रेम करतेय. खूप प्रयत्न करून अर्जुन स्मायली किलरला पकडतो पण त्यात आंद्रेव मारला जातो .या प्रकरणाचा धक्का बसून अर्जुन  नोकरी सोडून प्रियासोबत कॉफी शॉप उघडतो.
स्मायली मॅन तुरुंगातून पळून जातो.  तिथे अर्जुनची बहीण नाहीशी होते.अर्जुन पुन्हा स्मायली मॅनला पकडतो आणि पोलीस त्याला गोळ्या घालतात .
स्मायली मॅन एकटाच नाही तर अजून कोणीतरी त्याला मदत करतोय याची अर्जुनला खात्री पटते पण पोलीस त्याच्याकडे लक्ष देत नाहीत.
शेवटी दुसरा स्मायली मॅन पकडला जातो का ? तो कोण आहे ? त्याची कोणती किंमत अर्जुनला द्यावी लागते.
जा
जयम रवीने अर्जुनची भूमिका जोशात केली आहे.तर नयनताराला प्रियाच्या भूमिकेत फारसा वाव नाही.स्मायली मॅन राहुल बोस भाव खाऊन जातो.
पण चित्रपट खूपच लांबला आहे.रक्तरंजित दृश्ये खूप आहेत त्या मानाने रहस्य फारसे नाही .उगाच लांबविला असे वाटते .
नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे .

Friday, October 27, 2023

बॉडीस

Bodies
बॉडीस
साल 1890 इंग्लंडमधील लॉंग हॉरवेस्ट स्ट्रीटवर  इन्स्पेक्टर आल्फ्रेड हिलींगवूडला एका माणसाची बॉडी सापडते .तो माणूस नग्न असतो .त्याच्या डोळ्यात गोळी घुसून मृत्यू झालाय . मनगटावर एक विशिष्ट निशाणी आहे.पण पोस्टमार्टेममध्ये गोळी सापडत नाही.
साल 1941 इंग्लमधील  पोलीस मुख्यालयात इंस्पेक्टर चार्ल्स व्हाईटमनला एक फोन येतो .लॉंग हॉरवेस्ट स्ट्रीटवर एक बॉडी पडलेली आहे  तिची विल्हेवाट लाव. व्हाईटमन तिथे जातो.तिथे एक नग्न बॉडी पडलेली आहे.तिच्या डोळ्यात गोळी घुसून मृत्यू झाला आहे .मनगटावर एक विशिष्ठ निशाणी आहे.व्हाईटमन ती बॉडी घेऊन जाताना एक सहकारी त्याचा पाठलाग करतो पण महायुद्धात होणाऱ्या बॉम्बहल्ल्यात दोघेही जखमी होतात .त्याचा फायदा घेऊन व्हाईटमन आपल्या सहकाऱ्याला ठार करतो आणि बॉडी त्याच्याच डिकीत सापडली असे भासवितो.
साल 2023 लंडनमध्ये काही लोकांनी आंदोलन केलंय.  महिला इंस्पेक्टर शहारा हसन  बंदोबस्तासाठी तिथे आहे.एक तरुण मुलगा संशयास्पदरित्या फिरताना तिला दिसतो .त्याच्या हातात बंदूक आहे.ती त्याचा पाठलाग करत लॉंग हॉरवेस्ट स्ट्रीटकडे जाते.तिथे तिला एक नग्न पुरुषाची बॉडी आढळते .त्याच्या डोळ्यात गोळी लागून मृत्यू झालेला असतो तर मनगटावर एक विशिष्ट खूण असते.शेजारी तो तरुण मुलगा गन घेऊन असतो .पोस्टमार्टेममध्ये गोळी सापडत नाही.
साल 2052 महिला इंस्पेक्टर इरिस मापेलवूड काही संशयितांच्या मागावर लॉंग हॉरवेस्ट स्ट्रीटवर जाते .तिथे तिला एक नग्न माणूस पडलेला सापडतो .त्याच्या डोळ्यात गोळी घुसलीय आणि मनगटावर विशिष्ट खूण आहे.तिला तो मेलाय असे वाटते पण जवळ जाताच तो डोळे उघडतो . ती त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करते. तिथे तो जिवंत आहे पण कोमात आहे.ती त्याचा डीएनए घेऊन खरी ओळख काढते तेव्हा तो एका कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे असे कळते.ती कॉलेजमध्ये जाते तेव्हा तो तिथे लेक्चर देत असतो .ती हैराण होऊन त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन येते तेव्हा हॉस्पिटलमधील बॉडी मृत होते.
काय आहे हा प्रकार ?? हादरून गेलात ना ?? चार वेगवेगळ्या काळात एकच बॉडी एकाच ठिकाणी एकाच विशिष्ट प्रकारे सापडली जाते. चारही काळात आपल्यापरीने त्या गुन्ह्याचा शोध घेतला जातोय.यात तपासात भाग घेणाऱ्या इंस्पेक्टरची फारच महत्वाची भूमिका आहे.प्रत्येक एपिसोड डोळ्यांची पापणी न हलविता पाहिला पाहिजे.शेवटच्या दोन एपिसोडमध्ये हे रहस्य सुटत जाते.
नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत ही सिरीज आहे.नक्की पहावी अशी सिरीज आहे.

Wednesday, October 25, 2023

काला पानी

काला पानी
Kaala Paani
साल 2027 
अंदमानमध्ये स्वराज महोत्सव होणार आहे.खूप माणसे त्यासाठी अंदमानात आलीत. फक्त हेल्थ डिपार्टमेंट कडून परमिशन बाकी आहे.डॉ.सौदामिनी सिंह त्यासाठी सही करायला तयार नाहीत.तिला एका विचित्र रोगाची चिंता आहे.मानेवर काळे डाग असणारा हा रोग पहिल्यांदा बरा होतो पण काही दिवसांनी त्या व्यक्तीला उचक्या सुरू होतात आणि तोंडातून काळे रक्त बाहेर पडून ती व्यक्ती मृत्यू पावते.
गव्हर्नर  झिब्रांन काद्री डॉ. सौदामिनी सिंहवर दबाव टाकून ती परमिशन घेतात. एसीपी केतन कामतला अंदामानातून बाहेर पडायचे आहे.त्यासाठी तो आटोसच्या प्रमुखाला सर्वतोपरी मदत करत.आटोसचे मोठे प्रोजेक्ट अंदमानात चालू आहेत.स्वराज महोत्सव ही त्यांनीच भरविला आहे.
शेवटी डॉ.सौदामिनी सिहने त्या आजाराचे मूळ  कारण शोधून काढले.हा रोग पाण्यातून पसरतोय हे तिच्या लक्षात येते.ते पाणी एका तलावातून ऑटोसच्या पाईपलाईन मधून शहरात आणले जातेय. पण ते इतरांना कळण्याआधीच तिचा अपघाती मृत्यू झाला.
आता तो आजार सगळीकडे पसरला आहे. अंदमानातून कोणीही बाहेर जाऊ शकत नाही आणि कोणीही आत येऊ शकत नाही . अंदमान जगासाठी सील झाले आहे.त्या आजाराचे औषध शोधून काढायचे प्रयत्न सर्व स्तरातून चालू आहेत.
ओराको आदिवासी जमातीकडे या रोगावर औषध आहे पण ती जमात कुठेतरी गायब झाली आहे.असे म्हणतात त्यांना शेकडो वर्षांपासून या रोगाची कल्पना आहे. 
अंदमानात हाहाकार माजला आहे.शेवटी गव्हर्नर काद्रीने एक उपाय शोधून काढला .पण त्यात ते यशस्वी होतील का ??
आपल्याला पुन्हा करोना काळात घेऊन जाणारी ही सिरीज आहे.मानवी स्वभाव परिस्थितीनुसार कसा बदलत जातो याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही सिरीज आहे.
मोनासिंह , चिन्मय मांडलेकर, अमेय वाघ ,आशुतोष गोवारीकर ,अशी स्टार मंडळी यात आहे.प्रत्येक एपिसोड आपली उत्कंठा वाढवतो.अंदमानातील जंगल आपल्या अंगावर येते.याचा दुसरा सिजन येणार याची कल्पना शेवटच्या भागात मिळते.
ही सिरीज नेटफ्लिक्सवर आहे

Guns of the Magnificent Seven (1969 )

Guns of the Magnificent Seven (1969 )
 मॅग्नफीसंट सेवन सिरीजचा हा चित्रपट आहे . मेक्सिकोतील क्रांतिकारी नेता क्वांटेरॉ  प्रेसिडन्टच्या सैन्याकडून पकडला जातो .अटकेपूर्वी तो  सहाशे डॉलर आपल्या मॅक्स नावाच्या अधिकाऱ्याकडे देतो आणि आपल्या सुटकेसाठी ह्याचा वापर कर असे सांगतो .
मॅक्स मेक्सिको बॉर्डर पार करून क्रिस ऍडमला भेटतो.क्रिस व्यावसायिक आहे .तो या कामासाठी काही माणसे निवडतो .किनो घोडेचोर आणि हाणामारीत तरबेज आहे.कॅस्सी बॉम्ब बनविण्यात हुशार आहे. स्लॅटर एका हाताने अधू आहे पण निशाणेबाज आहे. मॉर्गन सुरफेकीत निष्णात आहे.
हे सर्व मॅक्स सोबत मेक्सिकोत येतात .आता तुरुंगात जाऊन क्वांटेराला कसे सोडवितात हे पाहणे उत्कंठावर्धक आहे.
हा एक क्लासिक वेस्टर्न चित्रपट आहे.मेक्सिकोतील ओसाड जमीन , रखरखीत ऊन ,तुफान घोडेस्वारी आणि पिस्तुलबाजीची रेलचेल असलेला हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर इंग्रजी भाषेत आहे.
ज्यांना जुने वेस्टर्न चित्रपट आवडतात त्यांनी हा चित्रपट चुकवू नये.

Saturday, October 21, 2023

king of kotha

KING OF KOTHA
किंग ऑफ कोथा
राजू ,कन्नन, टोनी आणि अजून काहीजण एकत्र फुटबॉल खेळायचे .त्यात राजू आणि कन्नन खास दोस्त.तामिळनाडू केरळच्या बॉर्डरवर समुद्रकिनारी कोथा नावाचे छोटे गाव होते .तिथे हे राहायचे.
राजूचे वडील रवी त्यावेळचे मोठे गँगस्टर होते .त्यामुळे राजूलाही गुंडगिरीची सवय लागली.आता गावात राजूचेच राज्य होते पण काही गोष्टीवरून त्याचा आणि कन्ननचा वाद झाला दोघात वैर आले आणि राजू कोथा सोडून गेला . 
या गोष्टीला दहा वर्षे  उलटून गेलीत .आता कोथामध्ये कन्ननचे राज्य आहे.गुंडगिरी ,अमली पदार्थ यात तो राजा आहे .त्याला थांबविणारा कोणीच नाही . टोनी पोलीस अधिकारी झालाय पण तो ही शांत आहे.
सिनियर इंस्पेक्टर शाहुल हसनची बदली कोथात झालीय.एक कडक ऑफिसर म्हणून त्याचे नाव आहे .आल्याआल्या तो कन्ननच्या कॅसिनोमध्ये जातो पण तिथे त्यालाच धमकी दिली जाते.कन्नन त्याच्या कपाळावर बंदूक ठेवतो .अपमानित होऊन शाहुल तेथून निघून जातो तेव्हा टोनी त्याला राजू आणि कन्ननची कथा सांगतो.कन्ननला संपविणारी एकच व्यक्ती आहे ती म्हणजे राजू.
शाहुल कन्ननला संपविण्यासाठी एक योजना बनवतो.तो राजूला शोधतो आणि कोथाला बोलवून घेतो .आता फक्त त्याला राजू आणि कन्ननच्या युद्धात प्रेक्षकांची भूमिका घ्यायची आहे .
राजू कन्ननला संपवेल का ?? 
पण इथेच सर्व संपत नाही .कदाचित दुसऱ्या भागात आपल्याला अजून काही भयानक पाहायला मिळेल.
दुलकर सलमानने राजू उभा केलाय तर शबीर कल्लारक्कलने कन्नन .
एक तुफान हाणामारीने भरलेला चित्रपट हॉटस्टारवर हिंदी भाषेत आहे.ज्यांना हाणामारी असलेले असलेले साऊथचे चित्रपट आवडतात त्यांनी नक्की पहावा.

Thursday, October 19, 2023

THIRUCHITRAMBALAM

THIRUCHITRAMBALAM
थिरुचित्रामबालम
थिरुचित्रामबालम उर्फ डरपोक डोनिकमध्ये फूड डिलिव्हरीचे काम करतोय. तो स्वभावाने शांत आणि भित्रा आहे, म्हणूनच त्याला डरपोक नाव पडलेय. घरी त्याचे वडील आणि आजोबा आहेत.घरात स्त्री कोणीच नाही. डरपोकचे वडील इन्स्पेक्टर आहेत .पण त्याचे आणि डरपोकचे पटत नाही .दोघेही एकमेकांशी बोलत नाहीत. दोघांच्यात आजोबाच एकमेव दुवा आहेत.
डरपोकची फक्त एकच मैत्रीण आहे .शोभना लहानपणापासूनच डरपोकसोबत आहेत.दोघेही एकाच बिल्डिंगमध्ये राहतात.शोभना खाली तर डरपोक वरच्या मजल्यावर.दोघांच्या कुटुंबाचेही खूप चांगले संबंध आहेत.
डरपोकला जी तरुणी आवडते ते तो शोभनाशी शेयर करीत असतो . एक दिवस लहान मुले पळविणार्या टोळीची माहिती डरपोक पोलिसांना देतो आणि डरपोकचा बाप त्या गुंडांना पकडतो. 
काही दिवसांनी डरपोकच्या बापाला पॅरॅलीसिसचा अटॅक येतो. त्यातून त्यांचे संबंध चांगले होतात. पण डरपोकचा घाबरट स्वभाव काही जात नाही .ते आजोळी एका लग्नाला जातात तिथेही डरपोक एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि ते शोभनाला सांगतो .पण तिथेही फेल होतो. 
आजोबा डरपोकला एक सल्ला देतो . पण त्या सल्लाचे परिणाम वाईट होतात आणि शोभनाशी असलेले संबंध दुरावतात .शोभना कॅनडाला जॉबसाठी निघून जाते. असे काय घडते की इतकी सुंदर निखळ मैत्री तुटायला येते. 
फक्त डरपोकच आहे जो पुढाकार घेऊन शोभनाबरोबर पूर्वीसारखी मैत्री जुळवू शकतो .पण डरपोक पुढाकार घेईल का ?
एक अतिशय सुंदर ,निखळ मैत्री कशी असते हे अनुभवण्यासाठी हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे पहावा.
धनुषने डरपोक उत्तम सादर केलाय.त्याचे बुजरेपण ,मुलीला प्रपोज करणे,शोभनाशी निखळ स्वच्छ मैत्री.,आजोबांसोबत मित्रांसारखे वागणे तर बापाशी फटकून बोलणे सुरेख सादर केलंय. प्रकाशराजने डरपोकचा बाप आणि इन्स्पेक्टर सादर केलाय.पॅरालिसिस अटॅक आल्यावर आलेली हतबलता .आपल्या बापावर अवलंबून रहाणे, डरपोकची माफी मागणे पाहून हलायला होते.
नित्या मेननने शोभना बनून धमाल उडवली आहे.डरपोकबरोबर भांडणारी , त्याची टेर खेचणारी पण त्यासाठी इतरांशी भांडणारी, काळजी करणारी शोभना. आपलीही मैत्रीण अशी असावी असे वाटते.
सगळ्यात धमाल केली आहे ते डरपोकचा आजोबा बनलेल्या भारतीराजाने. आपला मुलगा आणि नातू यांच्यामधील दुवा बनलेला. नातवासोबत दारू पिणारा तर मुलाची सेवा करणारा बाप सुरेख रंगविला आहे. तो जीवनाकडे खूपच सकारात्मक नजरेने पाहतो आणि आनंदाने दिवसाचे स्वागत करतो .
एक छान कौटुंबिक चित्रपट धनुषने आपल्याला दिला आहे.
चित्रपट प्राईमवर हिंदी भाषेत आहे.

Wednesday, October 18, 2023

आखरी सच

AAKHARI SACH
आखरी सच 
नवी दिल्लीमध्ये एकाच कुटुंबीयांनी समूहायिक आत्महत्या केल्या होत्या.त्याच घटनेचे कथानक घेऊन ही सिरीज बनविण्यात आली आहे.
राजावत परिवारात एकूण अकरा जण आहेत. भुवन अमन हे दोन भाऊ ,त्यांच्या पत्नी ,आई ,भाची,आणि मुलं असा परिवार आहे. अमनची डेअरी आणि मिठाईचे दुकान आहे. 
एके दिवशी पहाटे घरातून काही हालचाल दिसत नाही आणि कुत्रा सारखा भुंकतोय म्हणून शेजारी घरात जातात आणि त्यांना सर्व कुटुंब छताच्या पाईपला लटकलेले आढळते.भुवनची आई म्हातारी आहे म्हणून तिने बेडरूमध्येच  फाशी लावून घेतली. सारी दिल्ली या प्रकरणामुळे हादरली.
इन्स्पेक्टर अनया उर्फ अन्या तरुण हुशार अधिकारी . तिच्याकडे ही केस तपासासाठी दिली जाते.सर्वप्रथम ही आत्महत्या नसून खून आहेत असा तिचा समज होतो .पण जसजशी ती तपासात गुंतत जाते  तशी अधिकाधिक गोंधळात पडते.
तिला पुरावे सापडत जातात आणि ती शेवटी एका निष्कर्षावर पोचते.
अंतिम सत्य काय आहे ??
तमन्ना भाटिया इन्स्पेक्टर अन्याच्या तडफदार भूमिकेत आहे. तर अभिषेक बॅनर्जीने गूढ भुवन रंगविला आहे.
हॉटस्टारवर सहा भागात ही सिरीज आहे.

Tuesday, October 17, 2023

किल बोकसून

KILL BOKSOON
किल बोकसून 
कोरियात काही प्रोफेशनल कंपन्या होत्या.त्या आपल्या क्लायंटसाठी प्रशिक्षित मारेकरी पुरवायचे.त्याचे काही कडक नियम होते. एमके ही त्यातील मोठी कंपनी होती. गिल बोकसून ही त्यांची टॉपची मारेकरी .ती नेहमीच उच्च दर्जाची कामे करायची . चा मिन क्यू हा एमकेचा चेयरमन होता तर त्याची बहीण चा मिन ही डायरेक्टर होती.
बोकसून ही सिंगल मदर आहे. तिला पंधरा वर्षाची मुलगी आहे. नेहमीप्रमाणे बोकसूनला एक कामगिरी मिळाली.तिच्या मदतीला एक शिकाऊ मुलगी किम याँग दिली गेली.एका मंत्र्यांच्या मुलाला ठार मारून ती आत्महत्या आहे असे दाखवायचे होते.
पण काही कारणाने ती त्याला मारत नाही.एमकेच्या नियमात ही मोठी चूक आहे. डायरेक्टर चा मिन या संधीची वाट पाहत असते .ती ताबडतोब इतर कंपन्यांतील मारेकऱ्यांना बोकसूनला मारायची कामगिरी देते.
जे मारेकरी बोकसूनचे मित्र आहेत तेच तिच्या जीवावर उठतात .पण बोकसून सर्वाना ठार मारते. तिच्या या कृत्याचे पडसाद सर्वच कंपन्यात उमटतात .चेयरमन चा मिन क्यू ही घटना दाबायचा प्रयत्न करतो .त्यासाठी तो या घटनेची साक्षीदार किम याँगला ठार मारतो.
बोकसूनला ही घटना कळते तेव्हा ती चा मिनला ठार मारते आणि रक्ताने माखलेला सुरा चा मिन क्यू ला पाठविते.याचाच अर्थ आता ती चा मिन क्यूला लढण्याचे आव्हान दिलंय आणि दोघांतील एक जिवंत राहील.
या शेवटच्या युद्धात कोण जिंकेल ??
एक तुफान हाणामारी असलेला हा कोरियन थ्रिलर चित्रपट हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे .

Sunday, October 15, 2023

जेमिनी मॅन

GEMINI MAN (2019 )
जेमीनी मॅन
हेन्री ब्रोगन एक उत्कृष्ट स्नायपर होता.230 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनमधील एका पॅसेंजरला दोन किलोमीटर अंतरावरून उडवले होते. पण आता तो थकला होता.पन्नास वर्षाचा झाला होता तो.त्याला निवृत्त जीवन जगायचे होते.पण तो एजन्सीमध्ये सर्वोकृष्ट होता. तो निवृत्त झाला तर काम कोण करणार ? त्यात त्याला कळले की एजन्सी आपल्याला चुकीची माहिती देऊन माणसे मारत होती. तो हादरला.आपल्याकडून काही निरपराध व्यक्ती मारल्या गेल्या याची खंत त्याला लागून राहिली.
तो आता जॉर्जियामध्ये शांत जीवन जगतोय.त्याच्याकडे पुन्हा एजन्सी काम घेऊन आली पण त्याने नकार दिला. त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी डॅनी नावाची एक स्त्री एजंट नेमली होती.पण त्याने तिला ओळखले. 
आता एजन्सीने त्याला मारण्यासाठी एका हुशार मारेकऱ्याची नेमणूक केलीय. हेन्री आणि त्याचा सामना झाला तेव्हा त्याला कळले ही आपल्या तोडीस तोड आहे. पण आपल्याला त्यांच्याविषयी आपलेपणा का वाटतो हे हेन्रीला समजेना. डॅनीने दोघांचे सॅम्पल डीएनए साठी पाठविले. तपासात दोघांचे डीएनए सारखेच असल्याचे सिद्ध झाले.
हेन्रीच्या आयुष्यात कधीच कोणती स्त्री आली नव्हती मग हा मारेकरी कोण ? पुढे तपासात एक वेगळेच सत्य हेन्री आणि डॅनीसमोर आले.आणि त्यांनी ते प्रकरण संपवायचा निश्चय केला .
विल स्मिथ अभिनित हा चित्रपट प्रचंड हाणामारीने भरलेला आहे.एक अत्याधुनिक रहस्य असलेला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे .

OMG 2

OMG 2
ओएमजि 2
यासाठी पहिला पार्ट बघायची गरज नाही.याची कथा पहिल्या भागापेक्षा वेगळी आहे.पण संकल्पना तीच आहे.
कांती शरण एक सज्जन गृहस्थ .महाकाल मंदिराजवळ महादेवाची पूजा करणारा भक्त.तो देवळाजवळ पूजेचे सामान विकतो तसेच मंदिरात सेवेकरी म्हणून काम ही करतो.त्याला विवेक नावाचा मुलगा आहे आणि एक मुलगी आहे .
विवेक शहरातील चांगल्या शाळेत जातोय.एक दिवस विवेकचा शाळेच्या टॉयलेटमध्ये हस्तमैथुन करतानाचा विडिओ व्हायरल होतो. संपूर्ण शहरात विवेक आणि त्याच्या परिवाराची बदनामी होते.कांती शरणला काय करावे ते सुचत नाही.शाळा विवेकला काढून टाकते. तर मंदिराचा पुजारी त्याला शहर सोडून जायला सांगतो.
त्याचवेळी महादेव शहरात येतो.तो विवेकचा जीव वाचवतो आणि कांती शरणला कोर्टात जायला भाग पाडतो .
कांती शरण हस्तमैथुन पाप नाही तर मुलाला लैगिक शिक्षण देणे गरजेचे आहे असे कोर्टात सांगतो .तो रस्त्यावर बसणारा भोंदू, सेक्स पॉवरच्या गोळ्या देणारा दुकानदार, सेक्स पॉवर चेक करणारा खोटा डॉक्टर , आणि शाळेवर अब्रूनुकसानीची केस करतो .महादेव वेळोवेळी त्याला अप्रत्यक्षपणे सल्ला देत असतो.
कोर्टात कामिनी महेश्वरी शाळेच्या बाजूने उभी राहते.ती शाळा तिच्या सासऱ्याची असते.कांती शरण स्वतःच आपली केस लढण्याचे ठरवितो .जज पुरुषोत्तम पुढे केस उभी राहते आणि पुढे काय घडते हे पाहणे रंजनकारक आहे.
लैंगिक शिक्षण कसे गरजेचे आहे हे अतिशय हलक्या फुलक्या गमतीशीर पद्धतीने मांडले आहे .तरीही या विषयाची गंभीरता कमी होऊ देत नाही.
कांती शरणच्या हातखंडा भूमिकेत पंकज त्रिपाठी आहे. तो आहे तसाच या भूमिकेत आहे .तर यामी गौतमी विरुद्ध बाजूची वकील आहे.दोघांचे कोर्टरूममधील सिन बघण्यासारखे आहेत.महादेव बनलेला अक्षयकुमार आपल्या मोजक्याच सिनमध्ये भाव खाऊन जातो.तोच या चित्रपटाचा प्रमुख आधारस्तंभ आहे.
एका नाजूक विषयावरील हा चित्रपट सर्वांनी कुटुंबासह पहावा असा आहे .
चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे.

Saturday, October 14, 2023

अवेअरनेस

AWARENESS
अवेअरनेस
इवान आणि त्याचा बाप  व्हिसेन्ट छोट्या मोठ्या चोऱ्या करून जगत असतात.इवानकडे छोटी सुपरपॉवर आहे.तो समोरच्याच्या डोळ्यासमोर भ्रम निर्माण करू शकतो.एकदा दुकानातून दारूच्या बाटल्या चोरत असताना इवान दुकानाच्या मालकीणी समोर बंदूक धरल्याचा भ्रम करतो तर पाठलाग करणाऱ्या पोलिसांसमोर बर्फाच्या वादळाचा भ्रम निर्माण करतो.
योगायोगाने काही लोकांना या गोष्टीचा सुगावा लागतो आणि त्या एजन्सी इवानच्या मागे लागतात. दुसऱ्या वर्ल्डवॉरनंतर रशियन शास्त्रज्ञांनी एक फॉर्म्युला तयार करून तो काही जणांच्या शरीरात सोडलेला असतो.या फॉर्म्युलामुळे त्यांच्या शरीरात काही सुपरपॉवर तयार झालेल्या असतात. काही काळानंतर त्या सर्वांना ठार मारले जाते.पण ती सुपरपॉवर इवानच्या शरीरात कशी आली याचा प्रश्न त्या एजन्सीला पडतो आणि ते इवानला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात.इवानच्या रक्तातून तो फॉर्म्युला परत मिळवता येईल का हे चेक करायचे असते.
पण त्याला विरोध करणारे ही आहेत.एक व्यक्ती सतत इवानचे संरक्षण करीत असते .त्या व्यक्तीकडेही सुपरपॉवर असतात .तो इवानला त्याच्या शक्तीची जाणीव करून देतो .दुसऱ्या व्यक्तीच्या मनात शिरून आपल्या म्हणण्याप्रमाणे वागवायचे अशी एक सुपरपॉवर असते. 
आता इवानला एजन्सीपासून स्वतःला वाचवायचे आहे.
एक चमत्काराने भरलेला चित्रपट हिंदी भाषेत प्राईम व्हिडिओवर आहे.ज्यांना सायन्स फिक्शन चित्रपट आवडतात त्यांना नक्की आवडेल.

Friday, October 13, 2023

खुफिया

KHUFIYA
खुफिया
हिना रेहमान रॉच्या कृष्णा मेहरा उर्फ के एम साठी बांगलादेशात काम करते. ऑपरेशन ऑक्टोपसच्या मिशनवर ती बांगलादेशाचे संरक्षण मंत्री मिर्झाला मारायचा प्लॅन करते पण एका फोन मुळे ती फसते आणि मिर्झा च्याच हातून मारली जाते.
रॉमध्ये कोणतरी फितूर आहे हे केएमला कळते .रॉमध्ये काम करणाऱ्या रवीवर रॉचा संशय असतो.ते त्याच्या घरात केबिन मध्ये कॅमेरे बसवितात. रवी फितूर आहे हे सिद्ध होतेच पण तो ती माहिती कशी आणि कोणाला पोचवतो हे शोधून काढायचे आहे .रॉला तीही माहिती कळते आणि एक दिवस प्लॅन करून केएम त्याला पुराव्यानिशी पकडायचे ठरविते .पण त्याचवेळी अचानक रवी ला या गोष्टीची खबर लागते आणि तो ताबडतोब रॉचे दोन अधिकारी आणि विरोध करणाऱ्या आपल्या पत्नीला जखमी करून नाहीसा होतो .सोबत आपल्या आई ला आणि मुलाला घेऊन जातो .
सहा महिन्यानंतर रवीची पत्नी चारूला योगायोगाने केएमची माहिती मिळते.ती केएमला भेटते आणि आपल्या मुलाला परत आणायची विनंती करते.त्यासाठी ती सर्वप्रकारची मदत करायला तयार आहे .
एक योजना बनवून चारूला अमेरिकेत रवीकडे पाठविले जाते.चारू आपल्या मुलाला पुन्हा भारतात आणेल ? रॉची योजना यशस्वी होईल का ? 
केएमच्या भूमिकेचे तब्बू शोभून दिसते.तर अली फाजल रवीच्या भूमिकेत आहे.वामीक गाब्बीने चारूचे काम उत्तमपणे रंगविले आहे .
नेटफिक्सवर हिंदी भाषेत आहे .

Thursday, October 12, 2023

STRONG GIRL NAM-SOON

STRONG GIRL NAM-SOON
स्ट्रॉंग गर्ल नाम सून 
गॅंग नाम सून पाच वर्षांची असतानाच मंगोलियात हरवली होती.तिचे वडील फोटोग्राफर होते आणि आई एक प्रसिद्ध उद्योजिका . ती एका गरीब मंगोलियन कुटुंबात मोठी होतेय.विशेष म्हणजे तिच्याकडे जन्मापासूनच सुपरपॉवर आहे.  तिच्या आईच्या घराण्यात हजारो वर्षापासून स्त्रियांच्या अंगात सुपरपॉवर असतात.आता तिची आई आणि आजी कोरियात आहेत.
ती मंगोलियन नसून कोरियन आहे हे त्या कुटुंबाने लपविले नाही.उलट ती बावीस वर्षाची झाल्यावर त्यांनी आपल्या शेळ्या बकऱ्या विकून तिला कोरियात जाण्यासाठी पैसे दिले.
कोरियात नाम सूनची आई दरवर्षी आशिया स्ट्रॉंग गर्लची स्पर्धा भरविते.कधी ना कधी आपली मुलगी ही स्पर्धा जिंकेल अशी तिला आशा आहे.
नाम सून आपल्या आईवडिलांचा शोध घेण्यासाठी कोरियात आलीय.ती आपली शक्ती वापरून विमान अपघात टाळते. कोरियात तिला एक एजंट फसवितो आणि पासपोर्ट पैसे घेऊन जातो.एक तरुण पोलीस अधिकारी तिला मदत करतो.
नाम सून च्या आईला शेवटी त्या स्पर्धेत एक स्ट्रॉंग गर्ल सापडते .ती तिला नाम सूनच समजते.
कोरियात मोठ्या प्रमाणात एक नवीन ड्रग दाखल झालेय. तो तरुण पोलीस अधिकारी त्याच ड्रगच्या मागावर आहे.विमानतळावरील अपघात ही त्याच ड्रग साठी झालाय अशी त्याला शंका आहे.
ही मजेशीर कोरियन सिरीज नुकतीच नेटफ्लिक्सवर आलीय.आतापर्यंत तिचे दोन भाग आलेत.एकूण सोळा भागाची सिरीज हिंदी भाषेत आहे.
एक विनोदी थ्रिलर सर्व कुटुंबांनी मिळून पहावी अशी सिरीज आहे.

Monday, October 9, 2023

लुपिन 3

लुपिन 3
LUPIN 3
अस्सान डिओप अतिशय चातुर्याने म्युझियमच्या कडेकोट बंदोबस्तातून ब्लॅक पर्ल चोरतो.त्याने या चोरीची कल्पना आधीच सोशल मीडियाला दिलेली असते . ही शेवटची चोरी करून तो नाहीसा होणार असतो.त्यासाठी त्याच्याकडे प्लॅनही तयार असतो .
पण ब्लॅक पर्ल हातात येताच त्याला फोन येतो .तो फोन त्याच्या आईचाच असतो .तिचे  कोणीतरी अपहरण केलेले असते आणि तिला जिवंत ठेवायचे असेल तर अस्सानला त्यांच्यासाठी अधिक चोऱ्या कराव्या लागतील .
आईला जिवंत ठेवण्यासाठी अस्सान एक मौल्यवान पेंटिंग आणि पुरातन ब्रेसलेट चोरतो .पण त्यासोबत आपल्या आईचा कौशल्याने माग काढतो . 
कोण आहेत ही माणसे ज्यांनी अस्सान सारख्या चोराला वेठीस धरलेय ?अस्सान लुपिनच्या पावलावर पाऊल ठेवून चालतोय.तो अतिशय सभ्य चोर आहे. 
आपण एक शांत आयुष्य जगूया असे अस्सानचे कुटुंब सांगतेय.अस्सानपण यासाठी तयार झालाय .पण त्याचे शत्रू त्याला सुखाने जगू देतील का ?? 
सात भागाचा हा तिसरा सीजन आधीच्या दोन सीजनपेक्षा उत्कंठावर्धक आहे.यातील ब्लॅक पर्ल ,ब्रेसलेटची चोरी पाहण्यासारखी आहे .अस्सानची वेगवेगळी रूपे आणि त्याचे प्लॅनिंग पाहून आपण चक्रावून जातो .तोच प्रत्येक गोष्टी आपल्या मनाप्रमाणेच घडवून आणतो .
चौथ्या सीजन येणार हे तिसऱ्या सीजनमधून सूचित होते.
पाहायलाच हवी अशी ही अफलातून सिरीज नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत उपलब्ध आहे.

Sunday, October 8, 2023

इनफिनिट

INFINITE
इनफिनिट
ते इनफिनिट होते.हजारो वर्षे ते जगाचे रक्षण करत होते.मृत्यू पावले की पुनर्जन्म घ्यायचे. बाथर्स्ट हा इनफिनिट चा हजारो वर्षापासूनचा शत्रू .चांगले विरुद्ध वाईट हा सामना पुरातनकालापासून चालू आहे.
1985 साली बाथर्स्टच्या हल्ल्यात हेन्रीच ट्रेंडवे आणि त्याचे साथीदार मारले जातात .पण हेन्रीच त्याच्या हाती लागले धातूचे अंडे लपवून ठेवतो .बाथर्स्टला ते अंडे हवेय .त्या अंड्यामुळेच जगाचा नाश होईल .
इनफिनिट पुनर्जन्म घेणार हे बाथर्स्टला माहितीय .कारण त्याचाही पुनर्जन्म होणार आहे.
आता 2020 चालू आहे. इवान मॅकली मानसिक आजाराने त्रस्त आहे.त्याला मध्येमध्ये भयानक स्वप्न पडत असतात. तो अतिशय उत्कृष्ट सामुराई तलवार बनवितो.त्याला माहित नाही असे काही नाही.त्याच्याकडे माहितीचा खजिना आहे. विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे.तलवार विकताना त्याचे वाद होतात आणि तो सर्वाना चोप देतो .त्यात तो जखमी होतो.पोलीस स्टेशनमध्ये त्याची चौकशी करायला बाथर्स्ट  पोलीस अधिकारी बनून येतो .तो इवानला त्याची सगळी माहिती सांगतो .तो इनफिनिट आहे याची कल्पना देतो .ते धातूचे अंडे कुठे आहे हे ही विचारतो.पण इवान त्याला काहीच आठवत नाही असे सांगतो तेव्हा पोलीस स्टेशनवर भयानक हल्ला होतो . त्यात इवान निसटतो.
आता इवान इनफिनिटच्या ताब्यात आहे.ते त्याच्यावर पुनर्जन्म आठविण्यासाठी उपचार करतात .
शेवटी इवान आपले पुनर्जन्म आठवतात का ?? ते धातूचे अंडे कुठे लपविले आहे ते इवानला कळेल का ? पुन्हा तो बाथर्स्टला जगाचा नाश करण्यापासून वाचवेल का ?? 
मार्क वाहलबर्ग इवानच्या भूमिकेत आहे.
प्रचंड हाणामारी असलेला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Saturday, October 7, 2023

RDX

आरडीक्स
RDX
रॉबर्ट डॅनी झेवीयर तिघे पक्के दोस्त .कोचीनमधील छोट्या गावात ते राहतात . गावातील मुलांना ते मार्शल आर्ट शिकवतात. रॉबर्टचे एका मुलीवर प्रेम आहे एका कार्निवलमध्ये रॉबर्ट तिला भेटायला जातो आणि तिथे त्यांची काही गुंडासोबत झटपट होते.संपूर्ण कार्निवल उधळला जातो . रॉबर्टचे वडील त्याला गाव सोडून जायला सांगतात .
या गोष्टीला दोन तीन वर्षे होऊन गेलीत.आता डॅनीचे लग्न झालेय .त्याला छोटी मुलगीही आहे.एक छान आयुष्य ते जगतायत .गावात पुन्हा कार्निवल सुरू झालाय.काही गुंड दारू पिऊन मुद्दाम त्यात गोंधळ घालतात.डॅनीचे वडील शांतपणे त्याना समजवण्याचा प्रयत्न करतात पण ते गुंड त्यांच्यावरच हात उचलतात .ते पाहून डॅनी भडकतो आणि गुंडांना चोप देतो.
प्रकरण इथेच संपले असे समजून डॅनी कुटुंबासोबत घरी येतो आणि तेच गुंड त्यांच्या घरात येऊन हल्ला करतात.यात सर्वच जखमी होतात.
ही गोष्ट रॉबर्ट आणि झेवीयरच्या कानावर जाते आणि ते बदला घेण्यासाठी गावात परतात.
एक नेहमीची सुडकथा पहायची असेल तर आरडीएक्स पहा.
हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे .

मिशन रानीगंज

मिशन रानीगंज
पश्चिम बंगाल येथील रानीगंज येथे कोळशाची खाण आहे. त्या खाणीत अडकलेल्या 65 कामगारांच्या सुटकेची ही सत्यघटना.
ही गोष्ट 1989 ची आहे. खाणीत काम करताना एका सुरूंगाच्या स्फोटात भुयारातील भिंतींना तडे जातात आणि नदीचे पाणी प्रचंड वेगाने आत घुसते.बहुसंख्य कामगार बाहेर पडतात पण साधारण 65 कामगार आत अडकतात .
यशवंतसिंह गिल हा तरुण इंजिनियर जो रेस्क्यू स्पेशालिस्ट आहे.तो त्या कामगारांच्या मदतीसाठी पुढे सरसावतो. खाणीच्या सर्वात उंच पॉईंटला कामगार जमा होतील आणि तिथे ड्रिल करून त्यांना कॅप्सूलद्वारे बाहेर काढू अशी त्याची योजना असते.
त्यासाठी आवश्यक असतो एक सर्व्हे सुपरवायझर आणि ड्रीलिंग इंजिनियर . खाणीचा हेड  उज्ज्वल त्याला सर्व प्रकारची मदत करण्याची तयारी दर्शवितो. बिंदल हा हुशार तरुण ड्रीलिंग इंजिनियर ताबडतोब आपली वाहने घेऊन येतो तर तपन घोष हा सर्व्हे इंजिनियर संपूर्ण सिस्टीमवर चिडलेला असतो .त्याची नोकरी गेलेली असते .सर्व पैसे अडकलेले असतात.जसवंतसिंह त्याच्या हातापाया पडून घेऊन येतो.
या रिस्क्यू मिशनमध्येही राजकारण सुरू आहे. काही वरिष्ठ अधिकाऱ्याना त्या खाण कामगारांना बाहेर काढायचे नाही .त्यासाठी ते प्रयत्न करत असतात .
पण यशवंतसिंह गिल आपल्या मतावर ठाम असतो .एक माणूस उभा राहील अशी कॅप्सूल बनवायची . ती ड्रिल केलेल्या होलमधून खाली सोडायची आणि एकेकाला वर घ्यायचे अशी गिलची योजना आहे .यात तो यशस्वी कसा होतो हे बघण्यासारखे आहे.
संपूर्ण चित्रपटात गिल आणि त्याची टीम खूप सकारात्मक आहे .अक्षयकुमार ने तरुण तडफदार यशवंतसिंह गिल नेहमीप्रमाणेच उभा केला आहे .सतत सिगारेट ओढत टेन्शनमध्ये असलेला उज्ज्वल कुमुद मिश्राने रंगविला आहे .सतत टेन्शनमध्ये असणारा कामगारांना आपले मानणारा आणि गिलवर प्रचंड विश्वास ठेवणारा उज्जवल मनाला भिडतो .कमी बोलणारा पण कामात वाघ असणारा प्रचंड आत्मविश्वासाने भरलेला बिंदलच्या भूमिकेत पवन मल्होत्रा आहे .  शेवट माहीत असूनही आपल्याला श्वास रोखून पाहायला लावणारा मिशन रानीगंज आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे .