Thursday, February 29, 2024

अवतार

Avatar : The Last Airbender
अवतार : द लास्ट एअरबॅंडर
जल ,वायू,पाणी ,भूमी अश्या चार राष्ट्रांनी जग बनलेले आहे. चारही राष्ट्रात सुखशांती राहावी.एकमेकांनी परस्परांवर हल्ले करू नये. म्हणून त्यांच्यावर कंट्रोल करण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक झाली.त्यालाच अवतार म्हटले जाते.अवतार हा चारही राष्ट्रांवर नियंत्रण ठेवतो. एक अवतार संपला की दुसरा तयार होतो.तो अवतार कोणत्या राष्ट्रातून असेल हे कोणालाच माहीत नाही.
आता एक अवतार संपलाय दुसरा निर्माण होणार आहे.त्याचाच फायदा घेऊन अग्नी राष्ट्राने जल,वायू,भूमी राष्ट्रांवर हल्ले करून ते नेस्तनाबूत करण्यास सुरुवात केली. त्यांच्या तावडीतून कोणीच वाचले नाही .त्यांनी जगावर वर्चस्व मिळवले.पण नवीन अवतार जन्माला आलाय. त्याने यावेळी वायू राष्ट्रात जन्म घेतलाय.
हा अवतार बारा वर्षाचा  छोटा मुलगा आहे. त्याला स्वतःला आपल्या शक्तीची जाणीव नाहीय.पण त्याच्या गुरूंनी त्याला ओळखले आहे आणि अग्नी राष्ट्रांकडून त्याचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतायत.
अग्नी राष्ट्र अनेक वर्षे त्याच्या शोधात आहेत. त्यांना तो सापडेल का ?
एक बारा वर्षाचा मुलगा अवतार बनून जगाला वाचवेल का ?? 
फँटसी ,जादू ,युद्धाने भरलेली ,सहकुटुंब पहावी अशी एक  अदभूत रम्य परीकथा नेटफ्लिक्स वर हिंदी भाषेत आहे.

Wednesday, February 28, 2024

पोचर

POACHER
पोचर
केरळ सरकारला खात्री आहे की त्यांनी हस्तिदंत स्मगलिंग कधीच बंद केलीय.पण त्या रात्री एक पोचर फॉरेस्ट ऑफिसरला येऊन भेटतो आणि साधारण अठरा हत्तीची शिकार आतापर्यंत झाल्याचे सांगतो तेव्हा सगळे फॉरेस्ट डिपार्टमेंट हादरते.बऱ्याच अधिकाऱ्यांना निलंबित केले जाते. पोचर म्हणजे अनधिकृत शिकारी.जे मोठ्या प्राण्यांची शिकार करून त्यांचे दात शिंगे कातडी विकतात.
नील एक रॉ ऑफिसर .त्याच्याकडे हे प्रकरण आले आहे.पण त्याने आधीच स्पष्ट केलंय की तो आपल्या पद्धतीने आणि आपल्या टीमसोबत काम करेल.
माला एक रेंजर .सध्या ती केरळातील बर्ड सेंच्युरीमध्ये आहे.नील तिला आपल्या टीममध्ये घेतो. एलन सर्पतज्ञ आहे.शिवाय कॉम्प्युटर एक्सपर्ट .तोही नीलच्या टीममध्ये आहे.अतिशय गुप्तपणे तपासला सुरवात होते.
राज नावाचा पोचर प्रमुख संशयित आहे .त्यांच्यापर्यंत पोचताना नील आणि मालाला खूप अडचणी येतात.तपास हळूहळू अधिक त्रासदायक होतो आणि अनेक अनपेक्षित गोष्टी समोर येतात.
आपल्याला या केरळमधील जंगलातील तपासकार्यात सामील व्हायचे असेल तर अमेझॉन प्राईमवर पोचर पहावीच लागेल.
अनधिकृत शिकारी ,त्यांचे गैरव्यवहार आणि त्याच्या विरुद्ध लढणारे प्रामाणिक अधिकारी यांचा सामना पाहायचा असेल तर नक्की पहा .

Thursday, February 22, 2024

डेथ ऑन द नाईल

Death On The Nile
डेथ ऑन द नाईल 
खाजगी गुप्तहेर हर्क्युल पायरो सुट्टीसाठी इजिप्तला आलाय . योगायोगाने त्याची भेट जुना खास मित्र ब्यूकशी होते.ब्यूकही आईसोबत त्याच्या फॅमिली मैत्रिणीच्या लग्न समारंभासाठी आलाय.त्याची आई चित्रकार आहे आणि शाही परिवारातील आहे. 
इजिप्तमध्ये लिनेट आणि सायमनचे लग्न झालेय आणि आता ते आपल्या मोजक्याच मित्रमैत्रिणी, कुटुंबासह लग्न समारंभ साजरा करतायत.लिनेटही शाही कुटुंबातील आहे ,खूप श्रीमंत आहे .तर सायमन एक मध्यमवर्गीय बेकार तरुण .त्याचे दोन महिन्यांपूर्वी जॅकलीनशी लग्न ठरले होते .जॅकलीन आणि लिनेट खास मैत्रिणी.तिनेच सायमनला लिनेटकडे कामाला लावले होते.सायमनने  लिनेटशी लग्न केल्यामुळे जॅकलीन नाराज आहे.ती आमंत्रण नसतानाही त्या समारंभात दाखल झालीय.
जॅकलीनपासून सुटका करण्यासाठी लिनेट एक भलेमोठे जहाज भाड्याने घेते.आता त्या जहाजात सायमन ,लिनेट, लिनेटचा पूर्वीचा प्रियकर मित्र डॉ. लिनस ,ब्यूक,त्याची आई, लिनेटचा भाऊ अँद्रु ,तिची नोकराणी, एक नर्स ,तर एक गायिका आणि तिची सहकारी असे मोजकेच लोक आहेत.जहाज नाईल नदीतून फिरत राहणार होते त्यामुळे बाहेरून कोणीच येणार नव्हते. लिनेट आणि सायमनने आपल्या सुरक्षिततेसाठी हर्क्युल पायरोलाही बोलावले आहे.
पण एका ठिकाणी त्या जहाजात जॅकलीनचे आगमन झालेच. त्या दिवशी रात्री सायमन आणि जॅकलीनमध्ये वादावादी होते आणि रागाच्या भरात जॅकलीन पिस्तुल काढून सायमनवर झाडते .गोळी त्याच्या पायाला लागते. दुसऱ्या दिवशी सकाळी नोकराणीला लिनेट बिछान्यात मृतावस्थेत सापडते. तिच्या डोक्यात कोणीतरी गोळी घातलेली असते.
खुनी तर जहाजवरच आहे .चौकशी करताना पायरोला इथे जमलेल्या प्रत्येकाकडे लिनेटला मारण्याचे कारण सापडते. पण प्रत्येकजण आपण निरपराध आहोत हे सिद्ध करतोय.
आपला अनुभव ,निरीक्षणशक्ती आणि चौकस बुद्धीचा वापर करून पायरो खरा खुनी शोधून काढेल का ?
अगाथा ख्रिस्तीचा लाडका मानसपुत्र हर्क्युल पायरो मोठ्या पडदयावर पाहताना खूपच आनंद होतो .ज्यांनी अगाथा ख्रितीची पुस्तके वाचली आहेत त्यांना कदाचित चित्रपट आवडणार नाही .चित्रपट सुरवातीपासून संथ आहे. पण हळूहळू पकड घेत जातो.
चित्रपट हॉटस्टारवर हिंदी भाषेत आहे.

Tuesday, February 20, 2024

UGLY

UGLY
अग्लि
शालिनीचे डिसीपी शौनक बोसशी दुसरे लग्न आहे. तिला पहिला पती राहुलपासून कली नावाची दहा वर्षाची मुलगी आहे.राहुल फिल्म इंडस्ट्रीमध्ये हिरो बनण्यासाठी स्ट्रगल करतोय. कास्टिंग डायरेक्टर चैत्यन्य त्याचा खास मित्र आहे.शालिनी डिप्रेशनमध्ये असते.घरी सतत टीव्ही पाहणे, दारू पिणे हेच काम करतेय .राहुल कधीकधी कलीला घेऊन बाहेर फिरायला जातो.
त्या दिवशी ही तो कलीला घेऊन बाहेर गेला. चैत्यन्यच्या घरी त्याची एक ऑडिशन होती म्हणून तो कलीला गाडीत बसवून त्याच्या घरी गेला.चैत्यन्य बाहेर होता पण घरी येताच त्याने सांगितले कली गाडीत नाही आणि दरवाजाही उघडा आहे.दोघेही बाहेर तिला शोधायला धावतात .चैत्यन्यला एका फाटक्या माणसाकडे कलीचा फोन सापडतो .ते त्याच्या मागे लागतात पण पळता पळता तो अपघातात मरण पावतो.
आता सुरू होते राहुल आणि चैत्यन्यची चौकशी. इथे शौनक बोस प्रत्येकावर संशय घेतो .तो शालिनीचे फोन ही टॅप करतोय. कलीच्या सुटकेसाठी परदेशातून खंडणी मागितली जाते.
पण कली कुठेय ? खरोखरच तिचे पैश्यासाठी अपहरण झालेय की तिची परदेशात विक्री झालीय .
अनुराग कश्यपचा माणसाच्या स्वार्थी वृत्तीवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट हादरवून सोडतो .
तेजस्विनी कोल्हापूरे ,रोहित रॉय, राहुल भट असे उत्तम कलाकार यात आहेत.पण गिरीश कुलकर्णीचा विशेष उल्लेख करावा लागेल.यात बरेचसे मराठी कलाकार आहेत.
चित्रपट हॉटस्टार वर आहे .

ALLIED

Allied
अल्लीइड
 1942 च्या दुसऱ्या महायुद्धात विंग कमांडर मॅक्स वटत स्पेशल ऑपरेशनवर मोरोक्कोत उतरला. एका जर्मन राजदूतला मारण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे.तिथे त्याला मदत करण्यासाठी मरीने ह्या सुंदर तरुणीला नेमले होते.
दोघेही नवरा बायको म्हणून राहातायत.प्लॅन करून ते राजदूताच्या पार्टीचे आमंत्रण स्वीकारतात. तिथे ते राजदूताला ठार मारण्याची कामगिरी पूर्ण करतात.त्यादरम्यान त्यांचे प्रेम जुळते आणि  दोघेही लग्न करायचा निर्णय घेतात.
काही वर्षे उलटून जातात.आता त्यांना  एक वर्षाची  गोड मुलगी आहे. सुखी संसार चालू आहे .
एक दिवशी मॅक्सला कार्यालयात बोलावणे येते आणि त्याच्या पुढ्यात त्याची बायको जर्मन गुप्तहेर असल्याचा पुरावा ठेवला जातो.
मरीने खरोखरच गुप्तहेर आहे ?? मॅक्स या प्रकरणाचा छडा लावेल का ??
ब्रँड पिट अभिनित हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Thursday, February 15, 2024

UGLY

UGLY
अग्लि
शालिनीचे डिसीपी शौनक बोसशी दुसरे लग्न आहे. तिला पहिला पती राहुलपासून कली नावाची दहा वर्षाची मुलगी आहे.राहुल फिल्म इंडस्ट्रीमध्ये हिरो बनण्यासाठी स्ट्रगल करतोय. कास्टिंग डायरेक्टर चैत्यन्य त्याचा खास मित्र आहे.शालिनी डिप्रेशनमध्ये असते.घरी सतत टीव्ही पाहणे, दारू पिणे हेच काम करतेय .राहुल कधीकधी कलीला घेऊन बाहेर फिरायला जातो.
त्या दिवशी ही तो कलीला घेऊन बाहेर गेला. चैत्यन्यच्या घरी त्याची एक ऑडिशन होती म्हणून तो कलीला गाडीत बसवून त्याच्या घरी गेला.चैत्यन्य बाहेर होता पण घरी येताच त्याने सांगितले कली गाडीत नाही आणि दरवाजाही उघडा आहे.दोघेही बाहेर तिला शोधायला धावतात .चैत्यन्यला एका फाटक्या माणसाकडे कलीचा फोन सापडतो .ते त्याच्या मागे लागतात पण पळता पळता तो अपघातात मरण पावतो.
आता सुरू होते राहुल आणि चैत्यन्यची चौकशी. इथे शौनक बोस प्रत्येकावर संशय घेतो .तो शालिनीचे फोन ही टॅप करतोय. कलीच्या सुटकेसाठी परदेशातून खंडणी मागितली जाते.
पण कली कुठेय ? खरोखरच तिचे पैश्यासाठी अपहरण झालेय की तिची परदेशात विक्री झालीय .
अनुराग कश्यपचा माणसाच्या स्वार्थी वृत्तीवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट हादरवून सोडतो .
तेजस्विनी कोल्हापूरे ,रोहित रॉय, राहुल भट असे उत्तम कलाकार यात आहेत.पण गिरीश कुलकर्णीचा विशेष उल्लेख करावा लागेल.यात बरेचसे मराठी कलाकार आहेत.
चित्रपट हॉटस्टार वर आहे .

Tuesday, February 13, 2024

गुंटूर कारम

GUNTUR KAARAM
गुंटूर कारम
1988 साली गुंटूरला लेनिनबाबूने सत्यमच्या मिर्ची फॅक्टरी आणि गोडावूनला आग लावली.त्यात लेनिनबाबू मारला गेला आणि सत्यमला त्याच्या खुनाखाली अटक झाली.त्या वादातूनच सत्यमची बायको वसुंधरा आपल्या मुलाला रमण्णाला सोडून वडिलांकडे व्यंकट स्वामींकडे निघून गेली. 
या गोष्टीला पंचवीस वर्षे झाली.सत्यम बारा वर्षाची सजा भोगून परत आलाय.रमण्णा आता मिर्चीचा उद्योग संभाळतोय.तर व्यंकट स्वामी राजकारणात मोठा माणूस झालाय.त्याने वसुंधरला कायदा मंत्री केलंय. पण सारी सूत्र तोच हलवतोय. 
त्याने वसुंधराचे दुसरे लग्न लावून दिलय. तिला एक मुलगाही आहे.भविष्यात रमण्णाकडून आपल्या परिवाराला त्रास होऊ नये म्हणून त्याला कायदेशीररित्या फॅमिलीबाहेर काढायचा प्लॅन केलाय.त्याला रमण्णाकडून काही कागदपत्रांवर सही हवीय त्यासाठी त्याने पाणी या आपल्या वकिलाला नेमलेय.
पाणी रमण्णा भेटून त्याची सही घेण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येकवेळी अयशस्वी होतो .उलट त्याची मुलगी अम्मू रमण्णाच्या प्रेमात पडते आणि त्याचा सहाय्यक बालू रमण्णाच्या बाजूने उभा राहतो.
व्यंकट स्वामी आपल्या प्लॅनमध्ये यशस्वी होईल का ? वसुंधरा आपल्या मुलाला स्वीकारेल का ? एका सहीने नाती तुटू शकतात ?? 
तुम्ही जर साऊथचे चित्रपट पाहत असाल तर नेहमीचे कलाकार आपल्या नेहमीच्या भूमिकेत आणि नेहमीच्या अभिनयात दिसतील.यात फक्त नायक बदलतो .
सुपरस्टार महेश बाबू रमण्णाच्या मुख्य भूमिकेत आहे.तर टिपिकल नायिकेच्या भूमिकेत श्रीलीला आहे.प्रकाशराज व्यंकट स्वामीच्या भूमिकेत खलनायक बनला आहे.बाकी मुरली शर्मा, रमय्या ,वेंनेला किशोर आपापल्या भूमिकेत फिट बसतात.
नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत हा चित्रपट आहे.