Tuesday, May 30, 2023

द मदर

THE MOTHER
द मदर
NETFLIX
ती  अमेरिकेच्या सैन्यदलात सर्वोकृष्ठ स्नायपर होती.निवृत्त झाल्यावर आपल्याला कोण विचारणार नाही याची तिला खात्री होती म्हणूनच तिने आपल्या बॉससोबत अनधिकृत शस्त्रास्त्रे विकण्याचा धंदा सुरू केला पण आपले पार्टनर अजून काहीतरी करतायत याची तिला शंका आली .तिची शंका सत्यात आली आणि ती हादरली.तिने गुप्तचर अधिकाऱ्यांना सगळी माहिती दिली तेव्हा ती गरोदर होती.पण तिचे पार्टनर खूपच खतरनाक होते त्यांनी तिच्यावर तुरुंगात हल्ला केला त्यात ती जखमी झाली.तिने एका मुलीला जन्म दिला .
आपल्यापासून मुलीला धोका होऊ नये म्हणून ती तिच्यापासून दूर झाली. एफबीआय अधिकारी त्या मुलीच्या प्रत्येक वाढदिवसाचे फोटो तिला पाठवीत होता .आज बारा वर्षे झाली ती आपले आयुष्य एकाकी कंठत होती.तिच्याकडे फक्त आपल्या मुलीचे फोटो होते.अचानक एक दिवस तिला आपली मुलगी संकटात आहे याची बातमी मिळते .ती मुलीला वाचविण्यासाठी पुन्हा सक्रिय होते.पण त्याचबरोबर तिचे शत्रूही तिच्या मागावर येतात आणि सुरू होतो एक थरारक प्रवास .
ती आपल्या मुलीला संकटातून बाहेर काढेल का ?? आपली खरी ओळख तिला देईल का ? 
जेनिफर लोपेझचा एक वेगवान थ्रिलर चित्रपट नेटफ्लिक्सवर

सरचिंग

Searching
Netflix
डेव्हिडची सोळा वर्षाची मुलगी मार्गोट क्लासला जाते असे सांगून गायब होते.डेव्हिड तिला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो पण कोणत्याही माध्यमातून तिला कॉन्टॅक्ट होत नाही . ती लॅपटॉप घरीच विसरून गेलेली असते त्यावरून तो तिच्या मित्रांना कॉन्टॅक्ट करतो पण कोणालाही ती कुठे आहे माहिती नसते.शेवटी तो पोलिसांकडे तक्रार नोंदवतो.  एक महिला ऑफिसर  तिची केस घेते आणि पोलिसांच्या पद्धतीने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करते.
तिथे डेव्हिडही घरी बसून गुगल ,फेसबुक ,इन्स्टाग्राम ,जीपीएस आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला अनपेक्षित धक्कादायक गोष्टी कळतात .मार्गोट जिवंत आहे का ? असेल तर नक्की कुठे आहे ? तिच्या गायब होण्यामागे नक्की कोण आहे ? याची उत्तरे हवी असल्यास सर्चीग पहावाच लागेल.
हा संपूर्ण चित्रपट कॉम्प्युटरच्या स्क्रिनवर उलगडला गेलाय.युट्यूब विडिओ ,लाईव्ह विडिओ, गुगल सर्च इंजिनचे पेज ,तसेच फेसबुक ,इन्स्टाग्रामच्या पेज स्क्रिनवर दिसत राहतात.सोशल मीडियाचा वापर करून डेव्हिड आपल्या मुलीला कसे शोधतो हे पाहण्यासारखे आहे.
आताच्या सोशल मीडियाच्या जगात वावरणार्यांनी हा चित्रपट नक्कीच पहावा.

सिर्फ एक बंदा काफी है

सिर्फ एक बंदा काफी है
झी5
जेव्हा आरोपीचा वकील जो माजी केंद्रीय कायदा मंत्रीही होता.सरकारी वकील सोलंकीला सांगतो की आरोपीने खूप शाळा बांधल्या आहेत ,हॉस्पिटल बांधली आहेत.ते मोठे धर्म प्रसारक आहेत.तेव्हा सोलंकी वकील अतिशय शांतपणे आणि आदराने विचारतात शाळा हॉस्पिटल बांधली म्हणून बलात्कार करायचे लायसन्स मिळते का ?
चित्रपट सत्य घटनेवर आहे .कुठेही इतर गोष्टींकडे न जाता डायरेक्ट आपल्याला मूळ घटनेकडे घेऊन जातो .दिल्ली पोलीस स्टेशनमध्ये आई वडील आणि ती तरुण मुलगी शिरते आणि नंतर ती मुलगी आपले स्टेस्टमेंट स्त्री पोलीस ऑफिसरसमोर लिहून देते.स्टेस्टमेंट लिहीत असतानाच त्या स्त्री ऑफिसरचे चेहऱ्यावरील हावभाव बदलत जातात.
नंतर कायद्यानुसार कारवाई सुरू होते. त्या प्रसिद्ध बाबाला अटक करण्यात येते. नेहमीप्रमाणे सरकारी वकिलाला आरोपी आपल्याबाजूने ओढतो पण योगायोगाने ते उघडकीस येते.
पी.सी.सोलंकी हा देवभोळा सभ्य वकील.तो सरकारी वकील बनतो.त्यांच्यापुढे बाबाला कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये हे मोठे आव्हान आहे. त्यासाठी तो काय काय प्रयत्न करतो आणि कसे विरुद्ध पक्षाचे बेत हाणून पाडतो हे बघण्यासारखे आहे.
तब्बल पाच वर्षे चाललेला खटला .साक्षीदारांचे खून ,जामिनासाठी सुप्रीम कोर्टात चाललेली लढाई पाहून आपण सुन्न होतो.
यात फक्त आणि फक्त मनोज वाजपेयीचा पी.सी.सोलंकी आपल्यासमोर असतो.त्याचा आत्मविश्वास तर कधी डोळ्यातील भय आपल्याला गुंतवून टाकते.तो हिरो नाहीय तर सर्वसामान्य माणूस आहे. पण त्याच्याकडे कायद्याचा प्रचंड अभ्यास आहे.विरुद्ध पक्षाचे प्रत्येक पॉईंट तो कसे खोडून काढतो हे बघण्यासारखे आहे .यात अवास्तव आरडाओरड नाही .कायद्याचा सन्मान केला आहे.
चुकवू नये असा चित्रपट 

दसरा

दसरा
#DASARA
#NETFLIX
#ACTION
कोळशाच्या खाणीमध्ये असलेले ते छोटे गाव.गावात सर्वत्र कोळशाची काळी माती.धूळ ही काळीच.आणि त्या धुळीतच सर्व लोक राहतात.त्यांना एकच करमणूक आहे ती म्हणजे दारू पिणे. गावात एकमेव देशी दारू चा बार आहे.तो वेळेवर उघडला नाही तर लोक वेडीपीशी होतात.गावातील सर्व पुरुष बारजवळ दारू पिऊन पडलेली असतात.संध्याकाळी त्यांच्या बायका शिव्या देत त्यांना घरी घेऊन जातात
Mn
धारीनी सूरी आणि वेन्नाला बालपणापासूनचे



L
Men

 मित्र.धारीनीचे वेन्नालावर प्रेम आहे.पण आपला मित्र सूरीचे ही तिच्यावर प्रेम असलेले पाहून तो बाजूला 


होतो. ते मोठे होतात तेव्हा मालगाडीतून कोळसा mom
Mn
 
Mk

H


6 mn
.9

Bnb
9m



9 mk MNM ljmn

Mn mk n me m MNM m


e
M
Oo op 9llllllllllLlllllllllllLlllL
MM.... Uh na hbmbbvb

.
Mn
Mb mi. Is mk




L.
MNM mo



9
Mc
6l




Ni mom mn  चोरायची कामे करतात.
एका क्रिकेट मॅचमध्ये धारीनीची टीम सरपंचच्या टीम km
चा पराभव करते.त्यानंतर ते सरपंचाचा निवडणुकीत पराभव करतात.
सुरवातीला साधारण पाऊणतास चित्रपटाची कथा कोणत्या दिशेला जाते हे समजून येत नाही .गावकाऱ्यांवर आणि नायकावर दारूचा प्रचंड प्रभाव आहे लक्षात येते.
पण चित्रपट खऱ्या अर्थाने सुरू होतो जेव्हा सूरी आ


MNM
Mn




MB
MNM



णि वेन्नालाचे लग्न होते.त्या रात्रीच दारूच्या बारवर प्रचंड हल्ला होते. धारीनी, सूरी आणि त्यांच्या मित्रांच्या  मागे हल्लेखोर शस्त्रे घेऊन लागतात त्यात सूरी मारला जातो .
कोण आहेत ते हल्लेखोर ? त्यांनी सूरी आणि त्याच्या काही मित्रांना का मारले ? धारीनीला जेव्हा त्यामागचे सत्य कळते तेव्हा तो हादरून जातो आणि या गोष्टीचा बदला घ्यायचे ठरवितो .
हा संपूर्ण चित्रपट धुळीत निर्माण केलाय.यातील वेशभूषा ही कळकट धुळीने माखलेली आहे.अंगावर शहारे आणणारी हिंसा आणि प्रचंड रक्तपात यात आहे .
सुपरस्टार नानीची यात प्रमुख भूमिका आहे .तर दीक्षित शेट्टी आणि कीर्ती सुरेश त्याच्या साथीला आहेत.
चित्रपट नेटफिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Saturday, May 27, 2023

सरचिंग

Searching
Netflix
डेव्हिडची सोळा वर्षाची मुलगी मार्गोट क्लासला जाते असे सांगून गायब होते.डेव्हिड तिला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो पण कोणत्याही माध्यमातून तिला कॉन्टॅक्ट होत नाही . ती लॅपटॉप घरीच विसरून गेलेली असते त्यावरून तो तिच्या मित्रांना कॉन्टॅक्ट करतो पण कोणालाही ती कुठे आहे माहिती नसते.शेवटी तो पोलिसांकडे तक्रार नोंदवतो.  एक महिला ऑफिसर  तिची केस घेते आणि पोलिसांच्या पद्धतीने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करते.
तिथे डेव्हिडही घरी बसून गुगल ,फेसबुक ,इन्स्टाग्राम ,जीपीएस आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला अनपेक्षित धक्कादायक गोष्टी कळतात .मार्गोट जिवंत आहे का ? असेल तर नक्की कुठे आहे ? तिच्या गायब होण्यामागे नक्की कोण आहे ? याची उत्तरे हवी असल्यास सर्चीग पहावाच लागेल.
हा संपूर्ण चित्रपट कॉम्प्युटरच्या स्क्रिनवर उलगडला गेलाय.युट्यूब विडिओ ,लाईव्ह विडिओ, गुगल सर्च इंजिनचे पेज ,तसेच फेसबुक ,इन्स्टाग्रामच्या पेज स्क्रिनवर दिसत राहतात.सोशल मीडियाचा वापर करून डेव्हिड आपल्या मुलीला कसे शोधतो हे पाहण्यासारखे आहे.
आताच्या सोशल मीडियाच्या जगात वावरणार्यांनी हा चित्रपट नक्कीच पहावा.

Saturday, May 20, 2023

ब्लॅकलिस्ट

ब्लॅकलिस्ट 
BLACKLIST
NETFLIX
एक फरारी गुन्हेगार अचानक स्वतःला एफबीआयमध्ये आत्मसमर्पण करतो आणि त्यांना देशातील कुप्रसिद्ध वॉन्टेड लिस्ट मधील गुन्हेगारांना अटक करण्यासाठी मदत करण्याची तयारी दाखवतो .त्याची फक्त एकच अट असते .एफबीआयमध्ये नुकतीच सामील झालेल्या  एलिझाबेथ किन या महिला एजंटला माहिती देईन .
या सिरीजचे दहा सिजन आहेत आणि साधारण 200 भाग आहेत. प्रत्येक भाग वेगळा आणि सनसनाटी आहे .त्यामुळे आरामात वेळ मिळेल तसा एक एक भाग पाहिला तरी हरकत नाही .

Thursday, May 18, 2023

एनोला होम्स

एनोला होम्स
ENOLA HOLMES
Netfilx
है चित्रपटात शेरॉलॉक होम्स आहे.पण इथे तो नायक नाही तर दुय्यम स्थानी आहे.इथे त्याची सोळा वर्षाची बहीण एनोला प्रमुख भूमिकेत आहे . एलोनाची आई तिला सोडून गेली आहे .तिचे दोन्ही भाऊ तर लहानपणीच दूर गेले आहेत त्यातील एक शेरलॉक . आता एनोलाला आईला शोधायचे आहे. तिची आई विविध कोड्यामार्फत ती कुठे आहे याचे पुरावे तिला देतेय.ती क्रांतिकारक आहे हे एनोलाला समजते. ती आईला तर शोधतेच पण पण लंडन शहराला धोका निर्माण करणारे एक रहस्यही सोडवते.

Wednesday, May 17, 2023

द कुरियर

THE COURIER
द कुरियर
VROTT
त्या प्रसिद्ध बिझनेसमॅन आणि माफिया डॉनला खून करताना एकाने पाहिले आणि तो आयविटनेस बनला.एका अज्ञात स्थळात त्याला हलविण्यात आले आणि तिथूनच त्याची लाईव्ह व्हिडिओद्वारे साक्ष घेण्यात येणार होती.सर्वजण व्हिडिओ समुग्रीच्या पॅकेजची वाट पाहत होते.
ती कुरियर तरुणी ते पॅकेज घेऊन आली .अचानक काहीजणांनी त्यांच्यावर हल्ला केला .ती कुरियर तरुणी त्या आयविटनेसला घेऊन निघाली .पण बिल्डिंगच्या कार पार्किंगमध्ये अडकली .शत्रूने कार पार्किंग ताब्यात घेतली .सर्व दरवाजे लॉक केले.सी सी टीव्ही कॅमेरे ताब्यात घेतले. आता ती तरुणी आणि  तो आयविटनेस दोघेही अडकले आहेत .त्यांच्याकडे लढण्यासाठी शस्त्रेही नाहीत.कॅमेऱ्याद्वारे दोघांवर नजर ठेवून त्यांच्यावर हल्ला केला जातोय. 
ती कुरियर तरुणी कोण आहे ? ती या सर्वांशी सामना करून आयविटनेसला वाचवेल का ??
इमारतीच्या कार पार्किंगमध्ये  घडणारे चुकवू नये असे  एक वेगवान थरारक नाट्य .

Friday, May 12, 2023

यू टर्न

यू टर्न
झी5
रहदारीचे साधे नियम मोडले की नकळत किती भयानक परिणाम होतात याची कल्पना आपल्याला नसते..असाच एक साधा नियम चंदिगढ शहरातील फ्लाय ओव्हर वर रात्री मोडला जातो  .एक तरुण बाईकवरून रात्री एकटाच जात असतो .तो फ्लायओव्हरच्या मध्यावर येतो आणि त्याला मैत्रिणीचा फोन येतो.ती त्याला पार्टीसाठी बोलावते .तिचा आग्रह मोडवत नाही म्हणून तो ब्रिजवरच्या डिव्हाईडरचे दोन दगडी ठोकळे बाजूला काढून त्यामधून बाईकला यू टर्न मारून परत फिरतो पण ते दगडी ठोकळे पुन्हा जाग्यावर ठेवत नाही .काहीवेळाने भरधाव वेगाने आलेली कार त्या ठोकळ्याना धडकते आणि मोठा अपघात होतो.
राधिका एक तरुण  शिकाऊ पत्रकार .ती या फ्लाय ओव्हरवर होणाऱ्या अपघातांची माहिती गोळा करतेय. तिला आपल्या सोर्सकडून नियम तोडून यू टर्न घेणार्याच्या गाडीचा नंबर कळतो आणि ती त्याला भेटायला पण त्याने आत्महत्या केलेली असते .पोलीस चौकशीसाठी तिला अटक करतात आणि तिच्याकडे एकूण दहा नंबर सापडतात .पण त्या सर्व दहाजणांनी नियम तोडल्यावर चोवीस तासाच्या आत आत्महत्या केलेली असते.
हा काय प्रकार आहे ??  एका फ्लाय ओव्हरवर यू टर्नचा नियम मोडणारे चोवीस तासात आत्महत्या का करत असणार ? या घटनेशी राधिकेचा काय संबंध ?? सर्वजण समजतात की यामागे एक अमानवी शक्ती आहे ? पण खरेच तसे आहे का ? एक अनपेक्षित शेवट पाहण्यासाठी यू टर्न पाहायला हवा.

Monday, May 1, 2023

फोटोशूट

फोटोशूट
अवंती घरातून चिडचिड करीतच बाहेर पडली.अर्थात चुकी तिचीच होती.नेहमीप्रमाणे रात्री दोनपर्यंत जागायचे आणि सकाळी आरामात उठायचे हेच तिचे सूत्र.
पण आजची गोष्ट वेगळीच होती.आज तिच्या नोकरीचा पहिला दिवस होता.सकाळी उठायला थोडा उशीर झाला .उठली तेव्हा घरातील इतर मेम्बरची तयारी चालू होती त्यात तिला ऍडजस्ट करणे थोडे त्रासदायक ठरले.शेवटी तयार होऊन ऑफिसला पोचली तेव्हा दहा मिनिटे उशीरच झाला. सिक्युरिटी गार्ड पासून सर्वच तिच्याकडे रोखून पाहत होते.अवंती एमबीए होती.शिवाय घरात मोठी त्यामुळे असल्या नजरांची सवय नव्हती.
आज केदारलाही थोडा उशीरच झाला.नेहमीप्रमाणे ट्रॅफिक त्याच्या साथीला होताच .पण तरीही त्याला उशीर होत नव्हता. ऑफिसमध्ये शिरताना त्याने समोर धावत आत शिरत असलेली ती तरुणी पाहिली आणि इतरांच्या नजरासुद्धा. 
"नवीन आहे वाटतं," स्वतःशी पुटपुटत त्याने कार्ड पंच केले. केदारला जॉईन होऊन तीन वर्षे झाली होती.हसतमुख स्वभावामुळे तो लोकप्रिय होता .शिवाय अविवाहित असल्यामुळे बरेचजण त्याच्यावर लक्ष ठेवून होते.काहीजण स्वतःची मुलगी, भाची, पुतणी, त्याच्या नकळत सुचवीत असायचे.
कॉफीब्रेक झाला आणि अवंतीला घेऊन एचआर मॅनेजर केदारच्या डेस्कजवळ येऊन उभे राहिले.
"केदार, ह्या मिस अवंती आजच जॉईन झाल्यात फायनान्सला "हसून केदारने हात मिळवला आणि स्वतःची ओळख करून दिली. 
"नशीब तुम्ही रोखून नाही पाहिले."अवंती हसत म्हणाली.तसा सकाळची आठवण होऊन केदार हसला.
"नाही हो ,पहिला दिवस आणि उशिरा आलात म्हणून सगळे रोखून पाहत होते." तशी अवंती हसली.
खरे तर केदारला अवंती पाहताच क्षणी आवडली होती. ऑफिसमध्ये तिचे वागणे आदबशीर होते.सगळ्यां ऍक्टिव्हिटीत पुढे असायची .केदारशीही ती संधी मिळेल तेव्हा बोलायची .एक दोनदा बाहेर कॉफीशॉपमध्येही ते भेटले होते. 
शेवटी केदारने तिला प्रपोज केले. नाकारण्यासारखे काहीच नव्हते त्याच्यात ,त्यामुळे तिने पटकन होकार दिला.
लवकरच दोघांच्या घरातून लग्नाची परवानगी मिळाली आणि लग्नाची तारीखही पक्की झाली. लग्न एकदाच होते त्यामुळे ते यादगार व्हायला हवे असे अवंतीचे म्हणणे.पैश्याचा प्रश्न नव्हता आणि अवंतीच्या प्रेमाखातर केदार तिच्या प्रत्येक गोष्टीला मान देत होता..
प्री वेडिंग फोटोशूट करायची अवंतीची इच्छाही त्याने मान्य केली . एक चांगला फोटोग्राफर  ठरविला गेला . पहिल्यावेळी घराच्या टेरेसवर गार्डनजवळ फोटो काढले .पण तरीही अवंती खुश नव्हती .तिला बाहेर जायचे होते.कुठल्यातरी रिसॉर्टवर ,नैसर्गिक वातावरणात ,ओढ्याजवळ वेगवेगळे ड्रेस घालून फोटोशूट करायचे होते.केदारला मान्य नव्हते पण हे एकदाच होणार म्हणून त्याने होकार दिला.दोघेही लोणावळ्याला एका रिसॉर्टवर पोचले. फोटोग्राफर आधीच पोचला होता .वेळ न दवडता त्यांनी फोटोशूटला सुरवात केली.
सकाळीसकाळी कानाजवळचा फोन वाजला आणि बंड्याची झोप उडाली.शिव्या देतच त्याने फोन उचलला तर पलीकडून केदार बोलत होता.
"च्यायला ,बायकोसोबत फोटो काढायचे सोडून मला का फोन करतोस तू "? चिडून बंड्या म्हणाला.
केदार काही काळ बंड्याच्याच ऑफिसमध्ये होता.त्यामुळे बंड्याची आणि त्याची खास मैत्री होती.
"अरे बंड्या, फोटोग्राफर पाहिजे. जो होता तो निघून गेला आणि बाईसाहेबांना अजून फोटो काढायचे आहेत.कोण असेल तर पाठव ताबडतोब .अड्रेस वॉट्स अप करतो."असे म्हणून फोन कट केला .
"अरे देवा, सुट्टीतही हे लोक झोपू देत नाही .आता ताबडतोब फोटोग्राफर कुठून आणू "?  मनात चरफडत तो उठला .
अश्यावेळी एकच व्यक्ती त्याच्या डोळ्यासमोर होती आणि ती म्हणजे केके उर्फ कमलाकर कदम .केकेकडे सगळ्याच अडचणींवर सोल्युशन होते. बंड्याने फोन करून केकेला प्रॉब्लेम सांगितला आणि हसून केकेने नो प्रॉब्लेम फोटोग्राफर दिलेल्या अड्रेसवर पोचेल अशी खात्री दिली .
"केके काम होईल ना" ? बंड्याने साशंक स्वरात विचारले .
"केकेकडे आलेले काम पूर्ण केले नाही असे आतापर्यंत घडलंय का ? भाऊचा माणूस आहे म्हणून चिडत नाही तुझ्यावर."केकेने एका शब्दात बंड्याची लायकी काढली .
दुसऱ्या दिवशी सकाळी केकेचा माणूस बंड्याच्या घरात येऊन पेनड्राईव्ह देऊन गेला.
सर्वप्रथम फोटो बघायचा मान त्या दोघांचाच असे मनात म्हणत बंड्याने तो पेनड्राईव्ह पॉकेटमध्ये ठेवला आणि विसरून गेला .दोन दिवसांनी त्याला केदारचा फोन आला ."बंड्या कामानिमित्त बाहेर आहे .भेटायला जमणार नाही तू तो पेनड्राईव्ह घरी नेऊन दे "
"अरे किती काम कराल ? लग्नाला तरी घरी राहा "असे हसतहसत बोलून बंड्याने फोन ठेवला.
दुपारी तो केदारच्या घराजवळ येताच एक विचित्र शांतता जाणवली .बिल्डिंगमध्ये कोण गेला वाटते .स्वतःशी पुटपुटत त्याने बेल दाबली तेव्हा केदारच्या बाबांनीच दरवाजा उघडला .त्यांच्या चेहऱ्यावर एक ताण स्पष्ट दिसत होता.
"बंड्या, केदार अजून आला नाही रे "त्यांनी काळजीने सांगितले.
"हो काही अर्जंट काम निघाले म्हणून बाहेर गेलाय ,हा पेनड्राईव्ह त्यानेच तुम्हाला द्यायला सांगितला आहे."असे म्हणून त्याने तो बाबांच्या हातात दिला.
"अरे नाही ,तो प्री वेडिंग शूट करायला गेलाय तो आलाच नाही अजून.अवंतीही घरी नाही आलीय अजून.."त्यांनी बंड्याला मोठा धक्काच दिला.
"नाही हो, आजच सकाळी फोन आला त्याचा .म्हणून तर हा पेनड्राईव्ह घेऊन आलो "असे म्हणत त्याने पेनड्राईव्ह लॅपटॉपला जोडला आणि स्क्रिनवरील फोटो पाहून हादरून गेला .
लॅपटॉपच्या स्क्रिनवर केदार आणि अवंतीच्या निष्प्राण देहाचे वेगवेगळ्या अवस्थेतील छिन्नविच्छिन्न अवस्थेतील फोटो होते..
"हे कसे शक्य आहे "? बंड्या ओरडला .त्याने ताबडतोब केकेला फोन केला. 
"केके तो फोटोग्राफर कुठेय" ? 
"अरे तो ऑर्डरला गेलाय .काय झाले ? थांब मी त्याला कॉन्फरन्स कॉलवर घेतो "असे म्हणून त्याने कॉल केला.थोड्या वेळाने त्या फोटोग्राफरचा आवाज ऐकू आला .
"साहेब बोला" ?
"अरे काय हे ? कसे फोटो काढलेस तू ? असे फोटो काढतो का कोण" ? बंड्या चिडून म्हणाला.
"साहेब त्यांनी सांगितले तसेच फोटो काढले मी .काहीतरी वेगळेपणा हवा म्हणून अश्या पोज दिल्या त्यांनी "तो फोटोग्राफर सहज स्वरात म्हणाला. 
"म्हणून अश्या पोज "? बंड्याने पुन्हा आवाज चढविला .
"काय करू साहेब ? असे फोटो काढायची माझी खासीयतच आहे.मी अपघातात ,दगवलेल्या आणि खून झालेल्या व्यक्तींचे फोटो काढतो .मी त्यातच एक्सपर्ट आहे.पोलिसांसोबतच काम करतो मी" 
बंड्या ताबडतोब केदारच्या बाबांना घेऊन लोणावळा पोलिसस्टेशनमध्ये गेला .पोलसानी फोटोवरून जागा निश्चित केली आणि तिथे पोचले. त्या दरीत अवंती आणि केदारचे छिन्नविच्छिन्न मृतदेह पडले होते.
© श्री .किरण कृष्णा बोरकर