Friday, June 30, 2017

अस्वस्थ

"भाऊ गेले बरेच दिवस मी अस्वस्थ आहे" . विक्रम चहाचा घोट घेऊन बोलला आणि माझ्या पोटात भीतीने गोळा आला.  सौ.ही किचनमधून शेवटचा बिस्किटंचा पुडा घेऊन बाहेर आली .
" आता काय झाले विकी "? मी काळजीने विचारले .अर्थात ती माझी काळजी होती.
"अरे काय चालले आहे या देशात ?? कुठे चाललाय आपला देश ?? आपल्याला आता याविषयावर चर्चा करायला हवी "विकीने घोषणा केली.
"अजिबात नाही"!!!! मी जोरात बोललो . त्याच्या चर्चेमुळे माझे महिन्याचे बजेट कोसळणार होते याची खात्री झाली . सौ.ने देखील पटकन सर्व डिशेस आत नेऊन ठेवल्या . अशी स्त्री माझी बायको असण्याचा अभिमान परत एकदा मला झाला .
"तुला कधीपासून देशाची काळजी ?? मुलगी दहावी कशी पास झाली हे तुला माहीत नव्हते . तिचा रिझल्ट मी तुला सांगितला . आधी स्वतःचे बघ मग देशाची काळजी कर", मी वैतागून बोललो.
"हेच ते भाऊ!! हेच तुझे मला पटत नाही.अरे किती घाणेरडे राजकारण चालू आहे हल्ली.आपण त्यात लक्ष द्यायला नको ?? पुन्हा एकदा चहाच्या अपेक्षेने सौ कडे पाहत म्हणाला .
"राजकारणाच्या गोष्टी तू मला शिकवू नकोस" मी हसत म्हणालो . कॉलेज सेक्रेटरीच्या निवडणुकीत तुझ्या विरोधात उभी राहिलेली वसुधा नुसती माघार घेऊन थांबली नाही तर भरलेला फॉर्म फाडून टाकला आणि मतदानाच्या वेळी दोन दिवस गायब होती .अजूनपर्यंत मला देखील कळले नाही काय केलेस तू ?? मी मात्र दोन दिवस बापाच्या शिव्या खात होतो", .सौ च्या फिदीफिदी हसण्याकडे लक्ष न देता मी म्हणालो .
"उगाच जुन्या आठवणी नको.गेले दोन दिवस मी व्हाट्स अँप वर सतत जाती,धर्माच्या पोस्ट वाचतोय फार अस्वस्थ व्हायला होते."विक्रम संतापून म्हणाला.
"म्हणजे तू व्हाट्स अँप पाहतोस तर . मेसेजला उत्तर तीन दिवसांनी देतोस मग जगात काय चालू आहे हे तुला उशिराच कळणार ना ?? मी उपहासाने म्हणालो .
"पण खरेच सध्या फार वेगळ्या पद्धतीने राजकारण चालू आहे असे वाटते .मी गंभीर होत म्हणालो "आजपर्यंत राष्ट्रपतींच्या निवडीत सामान्य जनतेला इंटरेस्ट नव्हता. पण आता तो कोणत्या जातीचा आहे .निवडणूक कशी होणार ? .हे सर्वसामान्य जनतेला माहीत झालेत . कोणता नेता कोणत्या जातीचा आहे आणि तो काय करतो हेही कळू लागले . कोणीही उठतो आणि अभ्यास न करता स्वतःचा इतिहास मांडतो .त्याला पुरावा काहीच नसतो .सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींना जातीधर्माचा सहारा घेतला जातोय .आज आपण शेजाऱ्यांकडेही संशयाने पाहू लागलो आहे ".
"खरे आहे भाऊ ",विक्रम उत्तराला", हल्ली ऑफिसमध्ये ही आरक्षणावर खूप वादविवाद होतात .मी त्या भानगडीत पडत नाही . पण त्यामुळे गटबाजी खूप वाढली आहे . पूर्वी एकत्र जेवायचो ,पिकनिकला जायचो . ट्रेनमध्ये जागा पकडायचो एकमेकांसाठी. पण हल्ली ते कमी झाले आहे . प्रत्येकाने आपापल्या जाती धर्माचे ग्रुप बनविले आहेत .चर्चा होते ती फक्त याच विषयावर आणि अगदी हमरीतुमरीवर येतात .मला वाटते आपण पुढे जाण्याऐवजी मागे चाललो आहोत.
" खरे आहे विकी "मी उत्तरलो.
",मग या गोष्टीवर उपाय काय ??
" उपाय एक आहे. आपण या गोष्टीवर आपली मते मांडू नये . सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करू नये . असले मेसेज पुढे फॉरवर्ड करू नये किंवा शेअर ही करू नये .उलट डिलीट करून टाकावे म्हणजे आपल्याकडून बाद होतील अश्या गोष्टी . मी तर म्हणतो ज्या ज्या ग्रुपवर अश्या गोष्टींची चर्चा होत असेल तर त्या ग्रुपमधून बाहेर पडावे .
"बरोबर !! विक्रम टाळी वाजवून म्हणाला.
"पण विकी तू ह्या गोष्टीत कधीच नसतोच मग आज का अस्वस्थ ??? मी जरा कुतुहलानेच विचारले .
"अरे भाऊ,तोआमच्या ऑफिसचा अभिराम माहीत आहे ना "?? मी मान डोलावली "तो दर महिन्यातून दोनवेळा तरी माझ्याबरोबर बसतो.पण गेले काही दिवस मला टाळतोय.परवा तर दुसऱ्या लोकांबरोबर तो बसलेला दिसला . नंतर चौकशी केली तर कळले हल्ली अचानक त्याला जातीचा धर्माचा अभिमान वाटू लागला आहे आणि त्याच लोकांबरोबर त्याची उठबस आहे . मध्येच एका मोर्चातही सहभागी झाला होता म्हणे .अरे अश्या गोष्टींमुळे माझा पार्टनर दूर गेला यार आता दुसरा शोधावा लागेल !!! . ते ऐकून मी विक्रमला हात जोडले .
(C) श्री.किरण बोरकर

Sunday, June 25, 2017

इसाक बागवान

इसाक बागवान ....शब्दांकन .. अजय ताम्हणे
निवृत्त पोलीस उपायुक्त इसाक बागवान यांच्या पोलीस कथा  आहेत . हे आत्मचरित्र म्हणता येणार नाही .कारण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर ते केवळ दीड पान बोलले आहेत .पोलीस इन्स्पेक्टर झाल्यापासून त्यांनी सोडविल्या केसेस यात त्यांनी अतिशय सोप्या भाषेत सांगितल्या आहेत . मन्या सुर्वे एन्काऊंटर पासून प्रसिद्ध झालेले बागवान यात आपल्याला पोलिसांच्या कार्याची बारकाईने माहिती देतात . १९७७ पासून सुरू झालेल्या मुंबईतील गॅंगवॉरचे प्रमुख साक्षीदार आहेत . मोबाईल नसलेल्या काळात आपले खबऱ्यांचे जाळे तयार करून अनेक केसेस यशस्वीपणे सोडविल्या . त्याच बरोबर त्यांनी आपल्या वरिष्ठांचाही योग्य मान ठेवला .मुंबई पोलिसांना एक अभिमानास्पद उंचीवर नेऊन ठेवणारे हे पुस्तक .

Friday, June 23, 2017

क्रिकेट

"काय बंड्या "??" कालची मॅच एन्जॉय केलीस वाटते ?? बंड्याच्या अवतारकडे बघत मी हसून विचारले .
"काय भाऊ तुम्हीपण" ?? आयुष्यात क्रिकेटशिवाय दुसरे काहीच नाही असे वाटते का तुम्हाला . हल्ली जो तो एकाच गोष्टीची चर्चा करतो क्रिकेट!! क्रिकेट!!" . बंड्या वैतागून बोलला .
"अरे, हो! हो! इतके नको रागावायला. काय झाले ?दमलायस पुष्कळ", .मी चुकचुकारले .
"आहो भाऊ ,गेले दोन दिवस ऑफिसमध्ये दिवसभर काम करतोय . ह्या क्रिकेटमुळे कामावर कोण येत नाही . घरी बसून काम करतो असे सांगतात आणि काम होत नाही . मग सगळी जबाबदारी टीम लीडर म्हणून माझ्यावर येते .कोणाकोणाला बोलणार ?? बोललो की मी देशद्रोही असल्यासारखे बघतात .आहो ज्या दिवशी भारताची क्रिकेटची मॅच असते तेव्हा ऑफिस मध्ये पंचवीस टक्के अनुपस्थिती आणि जे आहेत ते मोबाईल लॅपटॉप वर मॅच बघतात.भारत पाकिस्तान असेल तर बघायला नको . भारत बंद असल्यासारखी परिस्थिती .आता मी कंपनीला सुचवणार आहे या दिवशी कोण ड्युटीवर येईल त्याला स्पेशल भत्ता द्या" .बंड्या हसून म्हणाला .
" हो रे ,मलाही तसेच वाटते . हल्ली लोक नको तेवढे गुंतले आहेत या खेळात . खूपच पर्सनल घेतात हा खेळ.पूर्वी खूप कमी क्रिकेट होते .त्यामुळे कधी मॅच असली की लोक खुश असायचे .संथ आणि शांतपणे खेळ चालायचा .जो तो आपली कामे सांभाळून सामने पाहायचा . पण आता घरचे कार्य असल्यासारखे वागतात .ह्यांना कोण मॅच बघायचे पैसे देतात का ?? मी थोड्या नाराजीने बंड्याला विचारले .
" काय माहित !!..पण आपले नुकसान होते . त्यादिवशी मॅच हरलो म्हणून कोणीतरी ऑफिसची खुर्ची मोडली संतापून .तर काहीजण दुःख झाले म्हणून दारू पियाला अर्धा दिवसांनी  गेले .मला एक कळत नाही हे क्रिकेटर फक्त दिवसाला आठ  ते नऊ तास काम करतात. रोज तर नाहीच करत. पण करोडो रुपये घेतात वर्षाला .पूर्वी सगळे म्हणायचे देशासाठी खेळतात पण हल्ली तेच म्हणतात आम्ही प्रोफेशनल झालो आहोत .आमची किंमत मोठी आहे . काहीतर न खेळता ही तितकेच पैसा घेतात आणि आपण दिवसाला कमीत कमी आठ तास राबतो .मग प्रवास.महिन्याला चार सुट्ट्या . वर्षाच्या सुट्ट्या फिक्स .त्याही बॉस च्या मर्जीवर . आणि पगार काय ?? तर 5/6 लाख.काहींना तर त्याहीपेक्षा कमीच .खेळाडूंचा  परफॉर्मन्स वाईट झाला तरी काही फरक पडत नाही . ह्यांना काही नियम नसतात का ?? बंड्या चिडून म्हणाला
अरे  हे राष्ट्रीय संपत्ती मध्ये मोडतात .याना सर्व माफ मी हसून म्हणालो.
"याना आपल्यासारखे अँप्राझल  का लावत नाही ??? बंड्याचे ऐकून मलाही गंमत वाटली .
" तुझ्या मनात काय आहे बंड्या .
"आहो हे खेळाडू मुळात करोडपती .त्यात त्यांना सर्व फुकट .फाईव्ह स्टार ट्रीटमेंट .फक्त खेळायचे इतकेच काम .मग ह्यांना यांच्या परफॉर्मन्सनुसार पैसे का मिळू नये . उदा. फलंदाजांनी कमीत कमी किती धावा कराव्या ,किती धावा नंतर त्यांना बोनस ,गोलंदाजांनी कमीतकमी किती बळी विकेट घ्यावा ,कमीत कमी धाव दयाव्या त्यावर त्यांना बोनस . जिंकले की बोनस तर हरले की दंड . आपण नाही का चुकला की मेमो देतो . दांडी मारली की पगार कापतो.तसे ह्यांच्या बाबतीत करायचे .मग त्यासाठी तरी त्यांना चांगले खेळावे लागेल".बंड्या हसत हसत म्हणाला .
" खरेच बंड्या आयडिया काही वाईट नाही . हल्ली कोणताही खेळाडू देशासाठी खेळतोय असे दिसून येत नाही . मॅच हरलो की हा पराभव विसरून विसरून पुढील मॅचवर लक्ष केंद्रित करू .असे परवलीचे वाक्य बोलून मोकळे होतात .पण डोळ्यात प्राण आणून बघणाऱ्या लोकांचे काय ?? सर्वजण आपापली कामे सोडून ह्यांना बघायला आलेले असतात .मॅच संपल्यावर त्यांना बॉस च्या ,बायकोच्या,प्रेयसीच्या ,बापाच्या शिव्या खायला जायचे असते .मी हसून बोललो .
" या बाबतीत मी सुखी आहे भाऊ .मॅच असली की सोनियाला बाहेर फिरायला घेऊन जातो . थिएटर मोकळे,गार्डन मोकळे,रस्ते मोकळे ,कुठेही गोंधळ गर्दी नाही .ती तर म्हणते आठवड्यातून एकदा मॅच असुदे म्हणजे असा छान दिवस मिळेल तिला .पण माझी अशी हालत होते त्याचे काय, "? असे म्हणून माझ्या हातावर टाळी देऊन मोठ्याने हसला .

(C) श्री. किरण बोरकर

Tuesday, June 20, 2017

कोकणातील शेतकरी

रविवारी सकाळीच दरवाजाची बेल वाजली. तसा मी वैतागलो. पण दारात रामभाऊना पाहून आश्चर्यचकित झालो .रामभाऊ आमच्या गावातले शेजारी .मुंबईत आले की एक चक्कर आमच्याकडे ठरलेली .
" रामभाऊ असे अचानक "?? मी काळजीने विचारले .
ते आत येऊन बसले . सौ. त्यांना पाणी घेऊन आली "काय वो भाऊ ,गावात सगळा बरा हा ना ?? आपले माणूस आल्यावर तिची भाषा ही बदलली .
"हो सगळे बरे आहेत ", असे बोलून पिशवी तिच्या हातात दिली . नेहमीप्रमाणे त्यात गावाची भेट असणार हे निश्चित .
"तुम्ही तयार व्हा मग आपण बोलू" असे बोलून मी बाहेर पडलो .
काही वेळाने घरी आलो तर रामभाऊ सगळे आवरून बसले होते .सौ.ने त्यांच्यासाठी मोठ्या पेल्यातून चहा खारी, फरसाण आणून ठेवले आणि बाजूला बसली .मीही चहा पित त्यांना विचारले "अचानक का येणे केले ".
"अरे विजयची परीक्षा आहे मुंबईत कसली तरी महिनाभर राहायचे आहे .अभ्यास करावा लागेल . म्हटला तुझ्याशिवाय कोण आहे त्याची काळजी घेणारा ,?? ठेवशील काय पोराक महिनाभर तुझ्याकडे ?? शेवटचा प्रश्न विचारतात त्यांचा स्वर लाजिरवाणे झाला .
"म्हणजे काय रामभाऊ?? हे विचारणे झाले काय ?? हक्काचे घर आहे तुमचे ".मी सरळ म्हणालो .
" ह्या बोलणा तुमका शोभत नाय हो भाऊ . परके करून टाकलाव आमाक एकदम ",सौ ला कंठ फुटला .
"तसा नाय गो बाय पण विचारूक  हवा ना ?? .तुमची पण काम असत .अडचणी असतं .
",असू दे पाठवून द्या त्याला  . तुमचो झिल आमास्नी जड नाय  . सौ.चा मायेचा ओलावा ऐकून रामभाऊ हसले .
"मग काय चालले आहे सध्या रामभाऊ ?. कर्ज माफ होणार तुमची आता" .मी गमतीने विचारले
" छे !!आमची कसली कर्जा. दीड एकरात काय पिकता कोकणात ?. पण हाय कर्ज थोडे ,पैसे मिळाले की हफ्ते भरतय .आमाक नको हो कोणाचा  फुकट .रामभाऊ थोडे रागात बोलले .
"  अरे कर्ज आहे ,शेती आहे मग चालते कसे ? .कर्ज माफीसाठी सगळे भांडतायत .मी विचारले .
" ते मोठे रे बाबा . मी छोटा माणूस .एवढे  पैसे कोणाक लागतंय . दीड एकरात दोन विहिरी ,धा कलम ,दोन काजू ,पाच  माड,धा  केळी ,दोन फणस लावले आहेत . त्यातून थोडेफार मिळतात ,उरलेल्या जागेत भात . सगळं पुरता वर्षभर . कलमाच्या शंभर  पेट्या आंबा निघतो . काजू पण येतात. त्यातले थोडे विकतो ,दिवसभर शेतात राबतो  मग खर्च कसला येतोय .येणाऱ्या पैशात तेल मीठ येते . बायको पोरांक वर्षातून दोन वेळा कापड घेतो .विज्या रिक्षा चालवतो त्याचा तोच खर्च करतो . मग पैसे कशाला लागतात . अगदी काहीच मिळालं नाही तर समुद्रवर जाऊन चिबोर्या पकडायचा. नाहीतर जाळ टाकून मिळतील ते मासे घरी घेऊन यायचे . आता पर्वाचाच बघ ना, रात्री सहज म्हणून समुद्रवर गेलो आणि पन्नास  चिबोर्या पकडल्या .कोण खाईल एव्हड्या मग सकाळी दत्ताअण्णाना देऊन टाकल्या दोनशे  रु ला ".रामभाऊ हसत म्हणाले .
"तसा नाय हो भाऊ, पण बायही आता मोठी झाली .तिचा पण लगीन करूचा असा "आमच्या सौ.ला भारी काळजी .
" हा रत्नाचा होय!! अरे बाजूच्या शिरगावाच्या तोडणकराबरोबर बोलणी चालू हायत. पोरगा बारावी झालाय ,आणि एक कंपनीत कॉन्ट्रॅक्टवर काम करतोय . घरी शेती, कलम आहेत . निर्व्यसनी आहे . जमेल तिचे . पोरगीही जवळच राहील .आणि त्याला शेतात मदत करेल .
"हो पण खर्चाचा काय ?? सौ चा मुख्य प्रश्न .
" कशाला पैसे . लग्न तर आपल्या घरी अंगणात . आणि अर्धा अर्धा खर्च वाटून घेऊ आम्ही . आपल्यात तसाच असता विसरलीस . तुझ्या बापासन काय सगळा खर्च केलान की काय लग्नात ?? असे म्हणून जोरात हसले . ते ऐकून सौ ने नाक मुरडले .
"असो म्हणजे तुम्हाला आता कसली चिंता नाही तर ??मी सहज म्हटले
"तसे नाही भाऊ ,चिंता सगळ्यांना असते . सहा महिन्यांपूर्वी माझ्या पंधरा कोंबड्या रोगाने मेल्या . एका रेडकूला वाघाने उचलला . मागच्या वर्षी पाऊस नाही तर भात ही नाही . आंबे पण लागले नाहीत . पण आपल्याकडे जे आहे त्याचा वापर करीत जगायचे असते . निसर्ग एखादी गोष्ट कमी देतो पण दुसरी भरभरून  देतो . तिचा वापर केला पाहिजे .तेव्हा पोटाला थोडा चिमटा काढून जगले पाहिजे .मेहनत करायला हवी . मी मागच्या वर्षी समुद्राचा वापर केला .मासेमारी केली . स्वतः जाऊन बाजारात विकले .जंगलात जाऊन जांभळं ,करवंद काढली .त्याचा रस बनवला . देवाने पाऊस नाही पण रखरखीत ऊन दिले ना ?? मग त्याचा वापर करून मासे ,करवंदे,वाळवली. कोकम केली ,बाजारात जाऊन विकली . तुला सांगतो घरगुती भेसळमुक्त म्हणून जास्त भाव मिळाला मला . मी कोणालाच दोष देत नाही पण आम्ही शेतकरी आहोत .आमचे पिकवणे हेच काम . मग गप्प बसून कसे चालेल . जगण्यासाठी काहीतरी मार्ग शोधावा लागतो भाऊ" .असे बोलत रामभाऊने हळूच डोळे पुसले .
मीही रामभाऊच्या झुंझार वृत्तीला सलाम केला .

(C) श्री. किरण बोरकर

Sunday, June 18, 2017

इगो

अमृता धुसफुतच घरात शिरली आणि शांतपणे चहा पीत बसलेल्या अमृतच्या समोर उभी राहिलीं.
"आणखी किती दिवस लोकांचे टोमणे खात जगू मी" तिने कमरेवर हात ठेवून विचारले .तसा अमृत चमकला .
"आता काय झाले " . हल्ली रोज तिचा मूड ऑफ असतो आणि चिडचिड चालू असते हे त्याच्या लक्षात आले होते .पण तो अश्या गोष्टीकडे लक्ष देणार माणूस नव्हता . स्वतःच्या मस्तीत राहणारा .
"अरे खाली हळदीकुंकूला गेले होते . बिल्डिंग मधल्या सगळ्या बायका विचारत होत्या कधी देणार पेढे ,बर्फी ?? काय उत्तर देऊ ?? परवा वन्स ही बोलल्या ,आते कधी बनवणार मला ?? सासू बाई तर हल्ली रोजच आडून आडून बोलतात .अरे किती जणांचेे तोंड बंद करू "?? असे म्हणत रडायला लागली .
" अरे रडतेस कशाला ?? सांगायचं आम्ही थांबलोय . तो सहज म्हणाला .
"किती वर्षे "?? ती चिडून म्हणाली", सात वर्षे झाली . वय वाढत चालली आपलीं ".
"हो का !! बघू यावर्षी ",तो सहज बोलला आणि टीव्ही बघत बसला .
ती शांत झाली त्याच्या बाजूला बसत म्हणाली", हे बघ अमृत आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊ . काही प्रॉब्लेम असेल तर सोडवू . हल्ली खूप उपाय आलेत यावर . काही दोष असले तर उपाय करू" .
तसा अमृत उखडला "तुला काय म्हणायचे आहे .?? आपल्यात दोष आहे ?? म्हणजे माझ्यात दोष आहे असे म्हणायचे आहे का ?? तसे असते तर आपले संबंध घडले असते का ?? तूच तपासणी कर .तुलाच काही होत नाही . मी नाही काही करणार . असे बोलून बाहेर निघून गेला . त्याची मुक्ताफळे ऐकून अमृता हादरून गेली .
मी आणि विक्रम नेहमीप्रमाणे इराण्याकडे बसलो होतो . भाववाढ आणि शेतकऱ्यांच्या संपावर विक्रम आपली बहुमूल्य मते मांडीत होता आणि मी मुकाटपणे ब्रेड बटर खात ऐकत होतो .इतक्यात अमृत आत शिरला . त्याचा संतापलेला चेहरा बघून आम्ही समजलो याचे काहीतरी बिनसलेय . मी त्याला सवयीप्रमाणे हाक मारली आणि सवयीप्रमाणे विक्रमने दोन शिव्या मला दिल्या . नाईलाज झाल्यासारखा अमृत आमच्यात येऊन बसला .
"काय छत्रपती आज कोणावर चिडलात" ? विक्रमने छद्मीपणे विचारले.
मी त्याला नजरेने गप्प केले . चहाची ऑर्डर देऊन अमृत ला विचारले", काय झाले "?. तसा तो उसळला "अरे आमची ही,!!  मुलं पाहिजे मूल पाहिजे म्हणून मागे लागलीय . ते काय आपल्या हातात आहे . पाहिजे तेव्हा झाले . प्रयत्न तर करतोय ना ??
" मग काय चुकते तिचे ?? मी सहजपणे म्हणालो . "किती वर्षे प्रयत्न करतोयस ?? आणि किती वर्षे प्रयत्न करणार राजे ?? विक्रमने पट्टा चालवला .
"अरे आता नाही होत तर काय करू" ? अमृत चिडून म्हणाला .
"चेक करून घ्या ",मी शांतपणे म्हणालो.
"हो तिला पाहिजे तर घेईल ती. मला गरज वाटत नाही", अमृत रागात उद्गारला .
"काय हरकत आहे तुझे चेकिंग करायला .तू पुरुष आहेस म्हणून तुला काही प्रॉब्लेम नसणार का ?? की अहंकार आड येतोय."विक्रम चा तोल सुटला .
मी विक्रमला शांत केले आणि अमृतला विचारले ",खरेच तुला बाबा व्हाचंय का" ?? खरोखर तुला वाटत असेल तर तर इगो सोड . जर का खरोखर काही प्रॉब्लेम असेल तर त्यावर इलाज करता येईल . आता खूप उपचार पद्धती आल्या आहेत . दोष कोणाचाही असू शकतो .जसे इतर आजार तसाच हा आजार समजून इलाज करा . शेवटी आई होणे हा अमृताचा हक्क आहे तसाच बाप होणे तुझा . तू तिच्या एकटीवर ही जबाबदारी टाकू शकत नाहीस" .
हे ऐकून अमृत विचारात पडला शेवटी मोकळेपणाने म्हणाला," ठीक आहे जाऊ दोघेही डॉक्टरकडे ".
(C) श्री. किरण बोरकर

Wednesday, June 14, 2017

सत्या

सत्या गेले दोन तीन दिवस अस्वस्थ होता . बायको गावी गेली होती . महिनाभर घरी एकटाच होता . त्यात मित्रांनी रात्री दारू पिताना काही क्लिप दाखविल्या होत्या . त्यामुळे झोपेतही त्या समोर दिसायच्या.
तो एक ऑफिसमध्ये ड्राइवर म्हणून कामाला होता .रात्रीबेरात्री स्टाफला घरी सोडायचे काम असायचे .त्यात आज सकाळी उठला तेव्हा बाजूच्या खोलीत काही हालचाल ऐकू आली . एकटाच होता म्हणून सहज मधल्या पत्र्याचे निरीक्षण केले तेव्हा एक बारीक होल दिसून आले . उत्सुकतेने डोळा लावून बघताच तेथील दृश्य पाहून त्याची कानशिले तप्त झाली . हातापायाला कंप सुटला. आपल्या दोन्ही मांड्या कधी आवळून घेतल्या हे त्यालाच कळले नाही.
आज त्याला रात्रीची ड्युटी होती त्यामुळे दिवसभर काहीच काम नव्हते . दुपारी तो बाहेर पडला. नेहमीच्या वाईन शॉप मधून नेहमीची खरेदी केली. बाजूच्या अण्णाकडे सिगारेट घ्यायला पुढे आला . अण्णांच्या दुकानावर आधीच दोघीजणी सिगारेट घेत होत्या . त्यांचे ड्रेस पाहून परत तो अस्वस्थ झाला .सकाळचे शेजारच्या खोलीतला दृश्य नजरेसमोर आले .त्यात एक सिगारेट पेटवायला खाली वाकली आणि तिथे लक्ष जाताच सत्याचे डोळे फिस्करले .अर्थात तो कुठे पाहतोय हे तिच्या लक्षात आले होते . तिनेही हसून त्याच्याकडे पाहिले आणि चटकन डोळा मारून ती निघाली .  दोघीना पाठमोरे चालताना पाहून पुन्हा शरीरात आग पेटली .
घरी येऊन त्याने सर्व तयारी केली आणि दोन पेग मध्येच बाटली संपवली . टीव्हीवर कोणतातरी दक्षिणेचा चित्रपट चालू होता . त्यातील अभिनेत्रींच्या उन्नत हालचाली पाहत बायकोचे स्वप्न पाहत झोपी गेला .झोपेतही त्याला शेजारची स्त्री ,त्या मादक हालचाली करणाऱ्या मुली . मित्राने दाखविलेल्या विडिओ क्लिप दिसत होत्या .
रात्री तो नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेला .त्यामोठ्या कॉर्पोरेट पार्कच्या बाहेर गाडीला टेकून सिगारेट पित आजूबाजूची गर्दी न्याहाळू लागला . तिथेतर त्याला रंगबिरंगी पऱ्यांची जत्राच भरली आहे असे त्याला वाटू लागले .  एक कोपऱ्यात सिगारेट पिट गप्प मारणाऱ्या तरुण मुली . त्यांचे टाइट ड्रेस ,एकमेकांना मिठया मारून बोलणे ,मोठमोठ्याने हसत टाळ्या देने ,पाठीवर थाप मारणे . सगळे कसे एक मोहमयी दुनियेत आलोय असे  वाटत होती . त्याची नजर एक जागेवर थांबत नव्हती .रात्री दोन फेऱ्या मारून तो परत ऑफिसपाशी आला .
रात्रीचा एक वाजत आले होते .अजून एक ट्रिप बाकी होती त्याची . वेळ होता म्हणून परत त्याने मोबाइल उघडून विडिओ पाहणे सुरू केले . थोड्याच वेळाने दोन तरुणी आणि दोन  मुले ऑफिसमधून बाहेर पडली . बाहेर येताच चारही जणांनी सिगारेट पेटविल्या आणि झुरके मारत गप्पा मारीत बसले .गप्पा मारतानाही ते एकमेकांना कुठेही हात लावायची संधी सोडत नव्हते . दोन्ही तरुणींनी अतिशय नवीन आकर्षक ड्रेस घातले होते . त्यांच्या शरीराचे उठावदार भाग अजून उठून दिसत होते . सिगारेट संपल्यावर ते सर्व गाडीत बसले . त्यातील एक तर फारच उत्साही दिसत होती . सतत तिच्या हातापायाची हालचाल चालू होती . त्या तरुणांच्या नको तिथे स्पर्श करीत होती . आराश्यातून सत्याला त्यांचे सगळे चाळे दिसत होते . त्याचे मन पेटून उठत होते .कानशिले गरम होत होती.इच्छा नसून त्याची नजर तिथेच वळत होती . पहिल्या स्टॉपला ते तरुण उतरून गेले . गाडीत फक्त दोन तरुणी राहिल्या .अचानक त्या उत्साही तरुणीने गाडी कोपऱ्यावर थांबवली . ते दुकान उघडेच असते रात्रभर याची तिला माहिती होती .त्या दुकानातून ती काळ्या पिशवीतून तिला पाहिजे ती वस्तू घेऊन आली .
"हे डिअर!! आता या वेळी घेणार तू "?? दुसरी कौतुकाने चित्कारली .
"मग काय करू यार ?? रात्र खायला उठते ?? आज किती दिवस झाले एकटी झोपतोय मी .तुला काय ?? तुझा आहे घरी तयारीत वाट बघत"ती रागाने बोलली
" हो ग,  आता रात्रभर झोपू देणार नाही मला. पण तू अशी किती दिवस राहणार ?? याची सोबत करत", हातातील काळ्या पिशवीकडे बोट दाखवत तीने विचारले
"बघू दुसरा मिळत नाही तो पर्यंत". दोघीही हसल्या .
दुसऱ्या स्टॉपवर दुसरी उतरून गेली आणि ही एकटीच राहिली .सिगारेट शिलगावत तिने पाय वर केले . परत सत्याला सकाळची शेजारीण आठवली . त्या तरुणीचे नको नको ते भाग सत्याला दिसत होते . नाइलाजाने त्याने तिला म्हटले "मॅडम,  आरामात बसा",. तशी ती त्याच्यावर खेकसली ",तुझे काम तू नीट कर मला शिकवू नकोस ?? ते ऐकून सत्याचे टाळले सरकले त्याने सरळ तिला विचारले ",इतकी खाज असेल तर मी येऊ का भागवायला ?? तशी ती उसळली", xxxxx !! तू कोण समाजतोस स्वतःला ?? हात लावायची तरी लायकी आहे का तुझी "?? ते ऐकून सत्याचा उरलासुरला कंट्रोलही गळून पडला . शिव्या देत त्यांनी गाडी बाजूच्या अंधाऱ्या बोळात घातली . आणि मागचा दरवाजा उघडून तिच्यावर तुटून पडला.

(C) श्री. किरण बोरकर