Thursday, February 22, 2024

डेथ ऑन द नाईल

Death On The Nile
डेथ ऑन द नाईल 
खाजगी गुप्तहेर हर्क्युल पायरो सुट्टीसाठी इजिप्तला आलाय . योगायोगाने त्याची भेट जुना खास मित्र ब्यूकशी होते.ब्यूकही आईसोबत त्याच्या फॅमिली मैत्रिणीच्या लग्न समारंभासाठी आलाय.त्याची आई चित्रकार आहे आणि शाही परिवारातील आहे. 
इजिप्तमध्ये लिनेट आणि सायमनचे लग्न झालेय आणि आता ते आपल्या मोजक्याच मित्रमैत्रिणी, कुटुंबासह लग्न समारंभ साजरा करतायत.लिनेटही शाही कुटुंबातील आहे ,खूप श्रीमंत आहे .तर सायमन एक मध्यमवर्गीय बेकार तरुण .त्याचे दोन महिन्यांपूर्वी जॅकलीनशी लग्न ठरले होते .जॅकलीन आणि लिनेट खास मैत्रिणी.तिनेच सायमनला लिनेटकडे कामाला लावले होते.सायमनने  लिनेटशी लग्न केल्यामुळे जॅकलीन नाराज आहे.ती आमंत्रण नसतानाही त्या समारंभात दाखल झालीय.
जॅकलीनपासून सुटका करण्यासाठी लिनेट एक भलेमोठे जहाज भाड्याने घेते.आता त्या जहाजात सायमन ,लिनेट, लिनेटचा पूर्वीचा प्रियकर मित्र डॉ. लिनस ,ब्यूक,त्याची आई, लिनेटचा भाऊ अँद्रु ,तिची नोकराणी, एक नर्स ,तर एक गायिका आणि तिची सहकारी असे मोजकेच लोक आहेत.जहाज नाईल नदीतून फिरत राहणार होते त्यामुळे बाहेरून कोणीच येणार नव्हते. लिनेट आणि सायमनने आपल्या सुरक्षिततेसाठी हर्क्युल पायरोलाही बोलावले आहे.
पण एका ठिकाणी त्या जहाजात जॅकलीनचे आगमन झालेच. त्या दिवशी रात्री सायमन आणि जॅकलीनमध्ये वादावादी होते आणि रागाच्या भरात जॅकलीन पिस्तुल काढून सायमनवर झाडते .गोळी त्याच्या पायाला लागते. दुसऱ्या दिवशी सकाळी नोकराणीला लिनेट बिछान्यात मृतावस्थेत सापडते. तिच्या डोक्यात कोणीतरी गोळी घातलेली असते.
खुनी तर जहाजवरच आहे .चौकशी करताना पायरोला इथे जमलेल्या प्रत्येकाकडे लिनेटला मारण्याचे कारण सापडते. पण प्रत्येकजण आपण निरपराध आहोत हे सिद्ध करतोय.
आपला अनुभव ,निरीक्षणशक्ती आणि चौकस बुद्धीचा वापर करून पायरो खरा खुनी शोधून काढेल का ?
अगाथा ख्रिस्तीचा लाडका मानसपुत्र हर्क्युल पायरो मोठ्या पडदयावर पाहताना खूपच आनंद होतो .ज्यांनी अगाथा ख्रितीची पुस्तके वाचली आहेत त्यांना कदाचित चित्रपट आवडणार नाही .चित्रपट सुरवातीपासून संथ आहे. पण हळूहळू पकड घेत जातो.
चित्रपट हॉटस्टारवर हिंदी भाषेत आहे.

No comments:

Post a Comment