Wednesday, August 8, 2018

फ्रेंडशिप डे

खरे तर सगळा वर्गच आमचा मित्र परिवार ....पण त्यातही छोटे छोटे ग्रुप बरेच....
सव्वीस वर्ष झाली कॉलेज सोडून...त्यातील आम्ही बरेच एकमेकांशी कनेक्ट आहोत.फारसे असे सर्वांचे एकत्र भेटणे होत नाही . मग कधी कोणाला हुक्की येते भेटायची.त्याला दुसरा साथ देतो .न येणारे गप्प बसतात कारण त्यांना काहीही झाले तरी यायचे नसतेच. तर काही परदेशी असलेले त्यांचा हुरूप वाढवितात आणि अश्या तऱ्हेने एकएकाचा होकार येतो.
मग त्या गेटटूगेदरला स्टार्ट गिविंग फौंडेशनची अन्युअल जनरल मीटिंग असे भारदस्त नाव दिले जाते . पण तरीही बरेचजण येत नाहीत.काहीजण कामात बिझी... तर काही वैयक्तिक आयुष्यात ....तर काही इतर न सांगता येणाऱ्या प्रॉब्लेममध्ये अडकलेले असतात.
असो.... पण प्रत्येकाची येण्याची इच्छा असतेच.एक जवळचा स्पॉट ठरविला जातो . जिथे फक्त बेसिक गरजा असल्या तरी चालतात . म्हणजेच हवा तितका वेळ गप्पा मारता येतील.एकमेकांना जोरात शिव्या देता येतील. ठरलेले मेम्बर आपल्याला सोपे पडेल त्या मार्गाने स्पॉटवर दाखल होतात.पण ते जेव्हा भेटतात आणि एकमेकांना पाहून जोरात ओरडत मिठ्या मारतात तेव्हा मधला काळ गायब झालेला असतो ..अजूनही ते 1992 चेच मित्र असतात . तोच निरागसपणा ...तीच चमक ...त्यांच्या डोळ्यात असते . आता तो  समाजात वावरणारा एक प्रतिष्टित माणूस नसतो तर 1992 चा खोड्या काढणार ,मारामारी करणारा ,मुलींच्या मागे धावणारा आमचा मित्र असतो . आता त्या दिवशी तरी त्याचे आजार, काळजी ...चिंता त्याच्यापासून दूर गेलेले असतात . त्याच्या सुटलेल्या पोटावरचे आणि टक्कल पडलेल्या डोक्यावरचे विनोद तो सहन करतो .सध्या बंद केली आहे रे ....असे सांगणारा आज तुमच्याबरोबर घेईन दोन पेग असे हळूच सांगतो .आज तो आपला मोठेपणा सांगत नाही कारण दुसरे त्यांच्या क्षेत्रात कैकपटीने मोठे झालेत हे त्याला माहित आहे आणि त्याचा त्याला अभिमान आहे . तो मित्रांबरोबर क्रिकेट खेळतो ..एक सिगारेट चारजणात पितो .जास्त झाली की सांगतो आता कमी करा रे ...मी केलीय . रात्री तो नेहमीचा कार्यक्रम चालू होतो . मग सुरू होते आता काय करायचे पुढे .स्टार्ट गिविंग फौंडेशन समाजाला काहीतरी देण्याच्या हेतून चालू केली आहे .आताच अजेंडा चालू आहेच पण दोन वर्षानंतर काय बदल असावेत यावर चर्चा . मग त्याचे विचार बाहेर येतात . जगात आपल्याला येणारे अनुभव शेयर केले जातात . प्रत्येक मुद्याचा किस काढला जातो . इथे वाद किंवा विरोध नसतो तर चर्चा असते . आपले म्हणणे लादले जात नाही तर व्यक्त केले जाते .चारही बाजूने विचार करून निर्णय घेतले जातात . शेवटी इथे येणारा पैसा हा स्वतःच्या खिश्यातून येणार आहे याची जाणीव प्रत्येकाला असते .त्यामुळे सर्वानाच विचार करणे भाग असते .यात रात्र कधी सरते ते कळत  नाही .
चला आम्ही तरी समाजाला काहीतरी देण्याचे ठरविले आहे तुम्ही कधी देणार ........???
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment