Friday, May 12, 2023

यू टर्न

यू टर्न
झी5
रहदारीचे साधे नियम मोडले की नकळत किती भयानक परिणाम होतात याची कल्पना आपल्याला नसते..असाच एक साधा नियम चंदिगढ शहरातील फ्लाय ओव्हर वर रात्री मोडला जातो  .एक तरुण बाईकवरून रात्री एकटाच जात असतो .तो फ्लायओव्हरच्या मध्यावर येतो आणि त्याला मैत्रिणीचा फोन येतो.ती त्याला पार्टीसाठी बोलावते .तिचा आग्रह मोडवत नाही म्हणून तो ब्रिजवरच्या डिव्हाईडरचे दोन दगडी ठोकळे बाजूला काढून त्यामधून बाईकला यू टर्न मारून परत फिरतो पण ते दगडी ठोकळे पुन्हा जाग्यावर ठेवत नाही .काहीवेळाने भरधाव वेगाने आलेली कार त्या ठोकळ्याना धडकते आणि मोठा अपघात होतो.
राधिका एक तरुण  शिकाऊ पत्रकार .ती या फ्लाय ओव्हरवर होणाऱ्या अपघातांची माहिती गोळा करतेय. तिला आपल्या सोर्सकडून नियम तोडून यू टर्न घेणार्याच्या गाडीचा नंबर कळतो आणि ती त्याला भेटायला पण त्याने आत्महत्या केलेली असते .पोलीस चौकशीसाठी तिला अटक करतात आणि तिच्याकडे एकूण दहा नंबर सापडतात .पण त्या सर्व दहाजणांनी नियम तोडल्यावर चोवीस तासाच्या आत आत्महत्या केलेली असते.
हा काय प्रकार आहे ??  एका फ्लाय ओव्हरवर यू टर्नचा नियम मोडणारे चोवीस तासात आत्महत्या का करत असणार ? या घटनेशी राधिकेचा काय संबंध ?? सर्वजण समजतात की यामागे एक अमानवी शक्ती आहे ? पण खरेच तसे आहे का ? एक अनपेक्षित शेवट पाहण्यासाठी यू टर्न पाहायला हवा.

No comments:

Post a Comment