एन्ड गेम ......मॅथ्यू ग्लास
अनुवाद ...... उदय कुलकर्णी
मेहता पब्लिकेशन
युगांडातील एक हॉस्पिटलवर लॉर्ड रेझिस्टन्स आर्मी हा दहशतवादी ग्रुप हल्ला करतो. त्यात अमेरिकेचे 32 नागरिक मारले जातात . यावर कारवाई करण्यासाठी अमेरिका योजना आखते पण त्यासाठी चीनच्या प्रभावक्षेत्रातील भागात लष्कराचा तळ ठोकायला चीन विरोध करतो . अमेरिकेच्या शेयरबाजारात खूप उलाढाली घडतात . अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत चीनची लाखो करोडोंची गुंतवणूक आहे . त्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत चीन उलथापालथ घडवू शकतो . आता या दोन महासत्तांमध्ये संघर्ष उभा राहिला आहे . दोन्ही देशांच्या युद्धनौका समोरासमोर उभ्या राहिल्या आहेत.एकमेकांशी संबंध नसलेल्या या घटना पण दोन महासत्तांमध्ये होणारे राजकारण घडवते आहे . जग महायुद्धाच्या कड्यावर उभे आहे फक्त पहिली गोळी झाडली की महाभयंकर घटनांची मालिकाच सुरू होईल .
मॅथ्यू ग्लास हे टोपणनाव असून लेखक अज्ञात आहे . तो कोणीतरी आतल्या गोटातील माणूस असावा असे बोलले जाते .त्यामुळे तो खरे नाव जाहीर करू शकत नाही . आणि ते इंग्लंडमध्ये अज्ञात स्थळी राहतात .
Sunday, April 22, 2018
एन्ड गेम ......मॅथ्यू ग्लास
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment