Friday, April 6, 2018

द फेस ऑफ डेथ..... कोडी मॅकफॅदियेन

द फेस ऑफ डेथ..... कोडी मॅकफॅदियेन
अनुवाद ........ अमोल कपोले
मेहता पब्लिकेशन
स्मोकी बॅरेट एक FBI एजंट. ती विकृत आणि सिरीयल खुनी पकडण्यात एक्सपर्ट आहे . ती स्वतः एक विकृत खुन्याच्या छळातून गेली आहे . त्यात तिने आपला पती ,आणि  मुलगी गमावली आहे . त्या खुन्याने तिचा चेहराही विद्रुप केला आहे .सोळा वर्षाच्या सारासमोर तीन खून झाले आहेत आणि ती आता स्वतःच्या कानशीलावर बंदूक ठेवून फक्त स्मोकीची वाट पाहतेय.आपल्याला अनेक वर्षे त्रास देणाऱ्या एक विकृत माणसाने हे खून केलेत असे तिचे म्हणणे आहे . स्मोकी आणि तिच्या सहकाऱ्यांवर या खुन्याला पकडायची जबाबदारी टाकण्यात आली आहे .या विकृत खुन्याला पकडण्यात स्मोकी यशस्वी होईल का ?? एक थ्रिलर कादंबरी

No comments:

Post a Comment