Wednesday, April 4, 2018

द मिरॅकल ......आयर्विग वॅलेस

द मिरॅकल ......आयर्विग वॅलेस
अनुवाद .......जयवंत चुनेकर
मेहता पब्लिकेशन
1857 साली लुर्द या फ्रान्समधील छोट्या गावी  बेर्नादेत्त या गरीब 15 वर्षीय मुलीला एका पांढऱ्या वस्त्रधारी स्त्रीने गुहेत दर्शन दिले आणि तीन रहस्ये सांगितली . त्यानंतर त्यातील दोन रहस्ये खरी ठरली .काही वर्षांनी मी पुन्हा याचठिकाणी प्रकट होईन आणि ती तारीख वेळ ही तिने सांगितली.आता तो दिवस जवळ आलाय . ती ज्या गुहेत प्रकट होते त्यातील पाण्याने कोणतेही रोग नष्ट होतात . माणूस व्याधीमुक्त बनतो अशी श्रद्धा आहे . जगभरातून अनेक लोक याप्रसंगी कुर्दला येणार आहेत .
रशियन पंतप्रधानपदाचा प्रमुख दावेदार गुप्तपणे इथे आलाय . त्यालाही स्वतःचा आजार बरा करायचा आहे . तरुणपणीच अचानक आंधळी झालेली सुंदर अभिनेत्री ही आंधळेपणा दूर होईल या अपेक्षेने आलीय . एक उद्योगपती आपल्या देखण्या प्रेयसीला घेऊन आलाय जी एक मानसोपचारतज्ञ आहे आणि तिचा या गोष्टीवर विश्वास नाही . तर एक स्वतःला क्रांतिकारी म्हणवून घेणार युवक स्फोटके घेऊन ही गुंफाच नष्ट करायला आलाय .खर्याखोट्याची शहानिशा करण्यासाठी एक पत्रकार तरुणी या सगळ्यांवर बारीक नजर ठेवून आहे .तिला फक्त सनसनाटी बातमी हवीय . हे सगळे आता कुर्दला एकत्र झालेत . आणि आता सुरू झालय उत्कंठावर्धक नाट्य .श्रध्दा अंधश्रद्धा यांचे द्वंद्व .लोकांच्या भावनांचा व्यापार . यात घडणारे रहस्य . खरोखरच ती स्त्री परत त्या गुहेत अवतीर्ण होईल ..?? लोक व्याधीमुक्त होतील.??? की ती गुंफाच स्फोटाकाने उडवून देण्यात क्रांतिकारी यशस्वी होईल ??? कोणता चमत्कार घडेल..????

No comments:

Post a Comment