Monday, February 21, 2022

रावण ..राजा राक्षसांचा ...शरद तांदळे

रावण ..राजा राक्षसांचा ...शरद तांदळे
न्यू इरा पब्लिशिंग हाऊस
दशग्रीवाला कुंभकर्ण,बिभीषण हे सख्खे भाऊ तर महापार्श्व ,खर, दूषण,शूर्पणखा,महोदर, कुम्मीनसी सावत्र भाऊ बहिणी.
दशग्रीवची आई आणि त्याच्या दोन मावश्या विश्रव ऋषीच्या पत्नी .विश्रव ऋषींच्या पहिल्या पत्नीचा मुलगा कुबेर हा देवांचा लेखापाल आणि लंकेचा राजा होता .त्याच्या बेढब आणि कुरूप दिसण्यामुळे सर्व त्याला कुबेर म्हणत.
सुमाली हा असुर राजा .लंकेवर त्याचेच राज्य होते पण देवांविरुद्धच्या युद्धात  लंका  त्याच्या ताब्यातून गेली आणि कुबेराने सुमाली राजाच्या तीन मुली आपल्या वडिलांना भेट दिल्या.  
काही वर्षांनी सुमालीने  विश्रवाच्या आश्रमावर हल्ला करून आपल्या मुलींना आणि नातवंडांना मुक्त केले आणि पुन्हा लंका काबीज करण्यास निघाले .
दशग्रीव हळूहळू मोठा होत होता . त्याने आपले शिक्षण ब्रम्हदेवाकडे पूर्ण केले .तो उत्कृष्ट वादक होता ,वेद आणि धर्मशास्त्रात पारंगत होता .त्याचा आयुर्वेदात आणि विविध औषधी वनस्पतीचा प्रचंड अभ्यास होता. त्याने सर्व असुर जमातींना एकत्र केले आणि फक्त राक्षस ही जमात निर्माण केली . या जमातीत स्त्री पुरुषांना समानता होती. त्याने स्वतंत्र स्त्री सेना उभारली.त्याने बलशाली राक्षस सेना उभारून कुबेरावर चढाई केली . त्यात कुबेराचा पराभव झाला  आणि दशग्रीव लंकेचा राजा झाला . कुबेराचे पुष्पक विमान त्याच्या ताब्यात आले . त्यातून तो कैलासावर महादेवाचे आशीर्वाद घ्यायला गेला तेव्हा त्यांनी  त्याचे रावण ठेवले. रावणाने आपला सासरा मयच्या मदतीने संपूर्ण लंका सोन्याची बनवली.
सुमालीने विविध असुर जमातींना एकत्र आणण्यासाठी काही जमातींचा नरभक्षकपणा नष्ट करण्यासाठी  दशग्रीव नावाचा एक सर्व शक्तिमान असा ईश्वर आहे . त्याला दहा डोकी आणि वीस हात आहेत.तो त्याच्या इच्छेनुसार पाऊस  पाडतो.सूर्य चंद्र ही त्याच्या आज्ञेत राहतात. तो माणसे खातात त्यांवर कोपतो आणि शिक्षा करतो अशी अफवा पसरवली .त्यामुळेच रावणाला दहा डोकी आहेत असे समजले जाते.
या संपूर्ण पुस्तकात रावण अतिआत्मविश्वासाने भरलेला आहे. रामाचे नाव  70% पुस्तक वाचल्यानंतर येते. राम लक्ष्मण सीता  अयोध्या याविषयी रावणाला काडीचीही माहिती नाही असेच या पुस्तकात दिसून येते .
शूर्पणखा आणि तिचे भाऊ दंडकारण्यात फिरायला गेले असताना ती राम लक्ष्मणाकडे आकर्षित झाली आणि त्यातून वाद निर्माण होऊन तिचे नाक आणि कान कापले . त्याचाच सूड म्हणून रावणाने सीतेला पळवले . त्या आधी त्याने राम लक्ष्मण सीतेला पाहिले ही नव्हते .
समोरच्या शत्रूला त्याने नेहमीच कमी लेखले .त्याचाच परिणाम पराभवात झाला.
पुन्हा एक वेगळा अहंकारी कपटी अतिआत्मविश्वास असलेला समोरच्याला हलके लेखणारा रावण आपल्याला या पुस्तकातून दिसतो .

No comments:

Post a Comment