Sunday, February 27, 2022

मृत्यू अखेरचा सोबती....अगाथा ख्रिस्ती

मृत्यू अखेरचा सोबती....अगाथा ख्रिस्ती
अनुवाद... श्रीनिवास गुळवणी
( द डेथ कम्स एज द एन्ड )
कादंबरीतील काळ  हा सुमारे चार हजार वर्षांपूर्वीचा आहे.इजिप्तमधील नाईल नदीकाठच्या गावात ही घटना घडते.
ईमहोटेप हा कुटुंबप्रमुख आणि धर्मगुरू .तो मोठा व्यापारी आणि जमीनदारही आहे . त्याच्या कुटुंबात तीन मोठी मुले,दोन सुना ,एक विधवा मुलगी म्हातारी आई आणि नातवंडे आहेत. तसेच एक जुनी विश्वासू मोलकरीणही आहे .
यावेळी बऱ्याच महिन्यांनी घरी येताना ईमहोटेप आपल्यासोबत एक सुंदर तरुणी घेऊन आला .ती त्याची रखेली आहे आणि घरात सर्वांनी  तिचा मान ठेवलाच पाहिजे अशी ऑर्डर सर्वाना दिली.
नोफ्रेट ही ईमहोटेपची रखेली हुशार आणि कपटी होती.तिने आल्याआल्या सगळ्या घराचा ताबा घेतला.मालकाच्या दोन्ही सुनांमध्ये भांडणे लावून दिली.घरातील म्हाताऱ्या मोलकरणीला आपल्या बाजूला वळवून घेतले.
पण एक दिवस स्मशानजवळील टेकडीच्या पायथ्याशी नेफ्रेडचा मृतदेह आढळला .तो अपघात आहे का खून ...?? विधिवत तिच्यावर अंत्यसंस्कार झाले . पण त्यानंतर सुरू झाली एक  खुनांची मालिका....
काही दिवसांनी याहमोज आणि सोबेकवर दारुतून विषप्रयोग झाला आणि त्यात सोबक मृत्यू पावला तर याहमोज कसाबसा बचावला.
त्यानंतर याहमोजची पत्नी सॅटीपीचा  अपघाती मृत्यू झाला.पण मरताना  तिच्या डोळ्यात विचित्र भाव  होते.
ईमहोटेपची वृद्ध आई ईसा ही हुशार स्त्री. भूत प्रेत ,जादूटोणा यावर तिचा विश्वास नाही.यामागे नक्कीच कोणाचा तरी हात आहे याची तिला खात्री होती.तिने आपल्या पद्धतीने या गोष्टीचा छडा लावायचा प्रयत्न केला पण तिचाही विषप्रयोगाने मृत्यू झाला .
कोण आहे या मागे...?? वृद्ध मोलकरीण हेनेटच्या मते यामागे नेफ्रेटचा अतृप्त आत्मा आहे .पण तिचाही काटा काढला गेला.
असे घडत राहिले तर कुटुंबातील कोणीही जिवंत राहणार नाही .किंवा खुनीच सर्व इस्टेटीचा मालक बनेल.
मानवी मनांशी खेळणारी.अनेक पात्र असणारी अगाथा ख्रिस्तिची खिळवून ठेवणारी रहस्यकथा

No comments:

Post a Comment