Tuesday, April 16, 2024

द वॉक

The Walk
द वॉक
स्वप्न प्रत्येकजण पाहतो .काहींची स्वप्ने अशक्य असतात त्यामुळे ती स्वप्नच राहतात पण काहीजण अशक्य स्वप्नच पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. 
फिलिप पेटीट्स त्यातीलच एक स्वप्नवेडा तरुण. फिलिप मुळात फ्रान्सचा .त्याला तारेवरून चालायचे वेड आहे.जिथे दोन झाडे की तो दोरी बांधून त्यावरून चालायचा .पापा रुडी हे सर्कशीतील प्रसिद्ध नाव. फिलिप पापा रुडीच्या हातापाया पडून त्यांचा शिष्य झाला .
असेच तारेवरून चालताना त्याला अँनी भेटली. एक दिवस दातांच्या डॉक्टरकडे गेला असताना त्याला न्यूयॉर्क शहरात बांधण्यात येणाऱ्या ट्वीन टॉवरची बातमी दिसली आणि त्या दोन टॉवरच्या टोकावर तार बांधून त्यावरून चालायचे. पण हे इतके सोपे नव्हते . 1974 साली दोन्ही टॉवरचे काम पूर्ण होत आले होते.
फिलिपने एक टीम तयार केली . दोन्ही टॉवरची अनेक वेळा वेगवेगळ्या वेशात पाहणी केली.तार कशी बांधायची हे पापा रुडीकडून शिकून घेतले .
फिलिप एक अशक्य अशी गोष्ट करतोय. त्याला फक्त  त्याचे मित्र साथ देतायत. हे साहस तो पूर्ण करेल का ??
एका अलवियाचे अचंबित करणारे अशक्य असे साहस तुम्हाला श्वास रोखून ठेवायला लावेल. तुम्ही फिलिपच्या निडर आणि आत्मविश्वासाने भरलेल्या स्वभावाच्या प्रेमात पडाल.
चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे.नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

No comments:

Post a Comment