Friday, April 5, 2024

The Wages Of Fear

The Wages Of Fear
द वेजेस ऑफ फियर
फ्रेड आणि अलेक्स सख्खे भाऊ.अलेक्स स्फोटक तज्ञ आहे तर फ्रेड खाजगी सिक्युरिटी .एका चोरीच्या प्रकरणात अलेक्स तुरुंगात जातो.तो फ्रेडमुळेच त्यात अडकलेला असतो. 
आता फ्रेड सहारा वाळवंटात छोट्या टोळ्यांसोबत राहतोय.तिथेच तेलाच्या विहिरी आहेत.पण तिथे  बंडखोरांच्या टोळ्या ही आहेत आणि सैन्य ही .एका झटापटीत तिथल्या तेलाच्या विहिरीला आग लागते.पुढील चोवीस तासात ती आग दुसऱ्या विहिरीजवळ पोचणार असून दोन्ही तेल विहिरी उध्वस्त होणार आहेत इतकेच नाही तर आजूबाजूच्या टोळ्या ही त्यात जळून खाक होतील.
त्या आगीला विझविण्यासाठी साधारण शंभर किलो विशिष्ठ प्रकारची स्फोटके लागणार आहेत .अलेक्स त्या स्फोटकांचा तज्ञ आहे.  कंपनी फ्रेड आणि अलेक्सला ती स्फोटके घेऊन तेल विहिरीजवळ आणायचे काम सोपवते बदल्यात त्यांना भरपूर पैसे आणि परदेशी स्थायिक होण्यासाठी मदत करण्याचे वचन देते.
अलेक्स आणि फ्रेड दोन ट्रकमध्ये स्फोटके भरून पाचशे किलोमीटर दूर असलेल्या जळत्या तेल विहिरीकडे निघतात.
त्यांना वीस तासात तिथे पोचायचे आहे.प्रवास ओसाड वाळवंटातून आहे .रस्तोरस्ती सैन्याचे चेकपोस्ट आणि लपून हल्ला करणाऱ्या बंडखोर टोळ्या आहेत .ते स्फोटकानी भरलेले ट्रक घेऊन ह्या खडतर प्रवासातून फ्रेड आणि अलेक्स वेळेवर तेल विहिरीजवळ पोचतील का ?
हा अतिशय खतरनाक प्रवास आपला श्वास रोखून ठेवतो. नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत हा चित्रपट आहे.

No comments:

Post a Comment