Wednesday, April 3, 2024

हार्ट ऑफ द हंटर

Heart Of The Hunter
हार्ट ऑफ द हंटर 
झुको दक्षिण आफ्रिकेतील एक क्रांतिकारक तरुण.दुष्ट कारस्थानी राजकारण्यांना जनतेसमोर आणायचे त्यांचे काम.पण दोन वर्षांपूर्वी तो हे काम सोडून आपली ओळख बदलून राहतोय. त्याला बायको आणि लहान मुलगा आहे.
डाझा मटीमा हा क्रूर आणि गुन्हेगार माणूस दक्षिण आफ्रिकेचा प्रेसिडन्ट व्हायला पाहतोय.त्यासाठी तो वाटेल ते मार्ग अवलंबतो. झुकोच्या बॉसकडे त्याच्या काळ्या व्यवहाराची माहिती आहे. डाझाला हे कळते आणि तो त्याच्या मागे लागतो.आपण ती माहिती वृत्तपत्रांपर्यंत पोचवू शकत नाही हे त्याला समजून चुकते म्हणून ती माहिती तो झुकोला देतो आणि वृत्तपत्रांपर्यंत पोचविण्याची विनंती करतो.
आता दक्षिण आफ्रिकेतील सगळे पोलीस ,गुप्तचर विभाग डाझाच्या हुकूमनुसार झुकोच्या मागे लागले आहेत.झुकोची पत्नी आणि मुलगा पोलिसांच्या ताब्यात आहेत .झुकोच्या प्रत्येक हालचालींवर त्यांचे लक्ष आहे.त्याला रस्त्यातच ठार मारण्याचे हुकूम दिले गेलेत.
झुको या परिस्थितीवर मात करून आपल्याकडील माहिती त्या वृत्तपत्रांपर्यंत पोचवेल का ?यासाठी त्याला कोणती आहुती द्यावी लागेल.
दक्षिण आफ्रिकेचा हा थरारक वेगवान प्रवास असलेला चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

No comments:

Post a Comment