Friday, April 5, 2024

अल्फा

Alpha
अल्फा
साधारण वीस हजार वर्षांपूर्वी मानवाने टोळ्या बनवून राहायला सुरवात केली होती.अन्नासाठी ते फक्त शिकारीवर अवलंबून होते.चकमक पेटवून आग निर्माण करत होते.दगडांची हत्यारे शिकारीसाठी वापरत होते.
ताऊचीही एक टोळी होती. ताऊचा मुलगा केडा  मोठा झाला होता.नियमाप्रमाणे प्रशिक्षण घेऊन तो पहिल्यांदाच टोळीसोबत शिकारीला निघाला. मोकळ्या कुरणात त्यांनी रानडुक्करांच्या कळपावर हल्ला केला पण त्यातील एक भले मोठे रानडुक्कर मागे फिरून केडावरच धावून गेले .केडा जखमी होऊन उंच कड्यावरून खाली कोसळला . त्या कड्यावरून खाली उतरणे शक्य नव्हते. केडा मृत्यू पावला असे समजून त्याच्या स्मरणार्थ दगड ठेवले गेले आणि सर्वजण आपल्या वस्तीकडे निघाले.
इकडे उंचावरून पडूनही केडा जिवंत होता.त्याचा पाय मुरगळला होता .त्याने स्वतःला सावरले .पण क्रूर लांडगे त्याला शांत बसू देत नव्हती. त्याला वस्तीकडे जाण्याचा मार्ग शोधायचा होता.त्यातच पाच लाडग्यांनी त्याच्यावर हल्ला केला .त्यांच्याशी लढताना एका लाडग्याला त्याने जखमी केले आणि बाकीचे पळून गेले.
केडाने त्याची मलमपट्टी करून जीवदान दिले .मग तो लांडगा त्याच्या सोबत राहू लागला .केडाने त्याला अल्फा नाव दिले.
केडाला हिवाळा सुरू व्हायच्या आत आपल्या वस्तीत परतायचे आहे.कारण एकदा का बर्फवृष्टी सुरू झाली की प्रवास कठीण होणार आहे.सगळीकडे थंड वातावरण आणि बर्फाची जमीन तयार होणार .
अश्या वातावरणात निसर्गाशी आणि जंगली प्राण्यापासून स्वतःला वाचवीत केडा आपल्या वस्तीत जाईल का ? त्याला अल्फा कितपर्यंत साथ देईल ??
संकटात मनुष्य आणि जंगली प्राण्यांची मैत्री कशी जुळते आणि दोघेही येणाऱ्या संकटांना कसे सामोरे जातात हे पहायचे असेल तर नेटफ्लिक्सवर  हिंदी भाषेत अल्फा पाहायला विसरू नका.

No comments:

Post a Comment