Tuesday, May 21, 2024

बिस्ट

Beast
बिस्ट
डॉ. नेट सॅम्युअल आपल्या दोन मुलींसह बऱ्याच वर्षांनी दक्षिण आफ्रिकेत आला होता. तिथे त्याचा मित्र मार्टिन वनरक्षक होता. 
त्या दिवशी सकाळीच ते सर्वजण जंगल सफारीसाठी निघाले . रस्त्यात त्यांनी सिंहाचा कळप पाहिला . त्यातील एक सिंहीण जखमी होती. या जंगलात अवैध पद्धतीने शिकारी होतात आणि शिकारी आता सिंहाना मारू लागलेत असा मार्टिनचा तर्क होता.
पुढे ते एका  गावात शिरले तेव्हा तिकडे सर्वच लोक मृत्युमुखी पडले होते.एका सिंहाने किंवा कळपाने त्यांच्यावर हल्ला केलाय असे मार्टिनचे अनुमान होते .त्याने ताबडतोब परत फिरायचा निर्णय घेतला.
ते परत जात असताना एका महाकाय सिंहाने त्यांच्यावर हल्ला केला .ते सर्व गाडीत असल्याने थोडे जखमी झाले पण गाडी खराब झाली.
गाडीतील रेडिओ बंद होता. मदतीची आशा नव्हती .बाहेर सिंह त्यांची वाट पाहतोय .सॅम्युअल आपल्या मुलींना सुखरूपणे यातून बाहेर काढेल का ? एक अतिशय अंगावर काटे आणणारा थरारक चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

No comments:

Post a Comment