Sunday, March 31, 2024

मॅन ऑन फायर

Man On Fire
मॅन ऑन फायर
मेक्सिकोत रोज कमीतकमी चार अपहरण होत असतात. देशातील करोडपती उद्योजकांच्या फॅमिलीला टार्गेट केले जाते.
जॉन क्रेसी एक माजी अमेरिकन सैनिक आणि सीआयए एजंट.मेक्सिकोत आपल्या मित्राला भेटायला आलाय आणि तो मित्र त्याला सॅम्युअल रामोसची छोटी मुलगी  पिटाचा बॉडीगार्ड बनण्याची गळ घालतो.
पिटाच्या पालकांनाही अपहरणाची भीती आहे त्यामुळे क्रेसी नेहमीच सावध असतो पण शेवटी पिटाचे अपहरण होतेच .तिला वाचविण्याच्या प्रयत्नात क्रेसी जखमी होतो पण तरीही त्याने चारजणाना ठार केलेले असते.
सॅम्युअल वकिलामार्फत मोठी रक्कम पिटाच्या सुटकेसाठी कबूल करतो .रक्कम देताना पोलिसांचा हल्ला होतो त्यात अपहरणकर्त्याचा भाचा मारला जातो .परिणामी पिटाला ही ठार करण्यात येईल असे अपहरणकर्ता सॅम्युअलला सांगतो .
क्रेसी बरा होऊन पिटाच्या अपहरणकर्त्याच्या शोधात निघतो.तो त्यांना संपविण्याची शपथ घेतो .पण या तपासात त्याला धक्कादायक गोष्टी कळतात आणि तो हादरतो .
काय आहे सत्य ? क्रेसी आपला तपास पूर्ण करेल. ?
नेटफ्लिक्सवर हा चित्रपट इंग्रजी भाषेत आहे .ज्यांना डेंझल वॉशिंग्टन आवडतो त्यांना हा चित्रपट आवडेल.इक्विलायझर चित्रपटाचा एक भाग आपण पाहतोय असेच वाटत राहते .

No comments:

Post a Comment