Thursday, July 11, 2019

एक होता कार्व्हर.... वीणा गवाणकर

एक होता कार्व्हर.... वीणा गवाणकर
राजहंस प्रकाशन
खरे तर तो मोझेसबाबांच्या गुलामाचे पोर. लहान असतानाच त्याच्या आईला टोळीवाल्यानी पळवून नेली  ते तिच्या दोन महिन्याच्या मुलासकट. शेवटी घोड्याच्या बदल्यात त्या मुलाची सुटका झाली . जन्मतः ते अशक्त होते .पण सुझानबाईने त्याला जगवले. लहानपणापासूनच त्याला बागकामाची आवड होती . मातीशी जणू त्याचे जन्माचे नाते होते . जगण्यासाठी वाटेल ते कष्ट करायचे . समोर येईल ते शिकायचे हे त्याच्या अंगवळणी पडून गेले. फुकट कोणतेही काम करायचे नाही. त्यावेळी निग्रोना गुलामाचे जीणे जगावे लागे. मोझेस आणि सुझानने त्याचे गुण ओळखले आणि दूर शिकायला पाठविले . तो बागकाम शिकला. शेतीची कामे शिकला .संगीत शिकला ,चित्रकला शिकला . लोकांच्या घरची कामे करून शिक्षण पूर्ण केले . तो जगातील सर्वोत्तम कृषीशात्रज्ञ बनला. शेंगदाणा.. रताळ्यावर.. त्याने खूप अभ्यास केला ,वेगवेगळे शोध लावले . नैसर्गिक रंग शोधून काढले . तर निग्रोना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आयुष्यभर झटला .कार्व्हर कसा घडला हे इथे सांगण्यापेक्षा ते प्रत्यक्ष वाचलेच पाहिजे .एक अप्रतिम पुस्तक

No comments:

Post a Comment