Friday, July 19, 2019

इस्तंबूल इस्तंबूल ..... बुऱ्हान सोनमेझ

इस्तंबूल इस्तंबूल ..... बुऱ्हान सोनमेझ
अनुवाद......सविता दामले
प्रसिद्ध तुर्की लेखक बुऱ्हान सोनमेझ याची तुर्की भाषेतील ही लोकप्रिय कादंबरी.इस्तंबूल येथील तुरुंगातील चार कैद्यांची ही कथा.नरक म्हणजे काय..?? तुरुंगातील छळ म्हणजे काय ...??  एका आशेवर सगळेच आपल्याला होणारा त्रास सहन करीत जगत असतात .शरीरावर बंधने असली तरी मनावर कोणीच बंधने घालू शकत नाही . त्याच्यावर फक्त स्वतःचीच मालकी असते .हे या कादंबरीत दाखविले आहे . सतत मृत्यूच्या छायेत राहून ते कैदी एकमेकांना नवलपूर्ण गोष्टी सांगतात .पण मध्येमध्ये ही कादंबरी वाचताना कंटाळा येतो . एक सलग अशी कथा या कादंबरीत नाही त्यामुळे लय पकडत नाही . एक वेगळी कादंबरी म्हणून एकदा वाचायला हरकत नाही .

No comments:

Post a Comment