Thursday, August 24, 2023

शूटर

SHOOTER
शूटर
बॉब स्वागर जगातील मोजक्याच सर्वोत्कृष्ट स्नायपरपैकी एक .इथोपियातील एका मोहिमेत त्याचा साथीदार फेन मारला गेला आणि तो सैन्यातून बाहेर पडला.आता एका जंगलात नदी किनारी आपल्या कुत्र्यासोबत आनंदात जगतोय.
तीन वर्षानंतर कर्नल इसाक त्याला भेटायला आलाय .अमेरिकन राष्ट्राध्यक्षाना जीवे मारायची धमकी आलीय आणि त्याचा सर्व अँगलने आम्ही विचार करतोय असे त्याला सांगण्यात आले.
एक स्नायपर त्याला कसा मारेल ह्या दृष्टीने विचार कर आणि आम्हाला मदत कर अशी विनंती त्याला केली .स्वागरने होकार दिला आणि राष्ट्राध्यक्ष कुठे कुठे जाणार त्या स्थळाची पाहणी केली आणि एक स्नायपर कुठे कसे मारु शकतो हे सांगितले.
फिलाडेल्फिया येथील समारंभात इथोपियाचे आर्चबिशप याना मेडल देण्यात येणार असते त्यात राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे असतात .स्नायपर तिथेच त्यांना मारेल हे स्वागर खात्रीने सांगतो आणि तसेच होते .त्याचवेळी एक पोलीस अधिकारी स्वागरला गोळी झाडतो .आपल्याला अडकविण्याचा प्लॅन आहे हे स्वागरला कळते आणि तो जखमी अवस्थेत तिथून पळतो.
निक मेम्सफिस एफबीआय स्पेशल एजंट तिथेच ड्युटीवर आहे .त्याला जॉईन होऊन फक्त तीन आठवडे झालेत.त्याला जखमी करून त्याची गाडी घेऊन स्वागर निसटतो.आता संपूर्ण अमेरिकन यंत्रणा राष्ट्राध्यक्षांचा मारेकरी समजून त्याच्या पाठी लागलीय.
आता त्याला गरज आहे एका मदतीची .तो आपला सैन्यातील साथीदार फेनच्या मैत्रिणीच्या घरी जातो .ती त्याच्यावर उपचार करते.
बरा झाल्यावर स्वागर त्याला अडकविणार्या कर्नल इसाकच्या मागे लागतो.यामागे नक्की कोण कोण गुंतले आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय.यासाठी तो एफबीआय एजंट निकची मदत घेतो. स्वागर निरपराध आहे हे निकला माहितीय..तो त्याला मदत करतो .
आपण निर्दोष आहोत हे स्वागर सिद्ध करेल का ? या प्रकरणात खूप मोठे लोक गुंतले आहेत त्यांच्यावर आरोप सिद्ध होतील का ? 
एक वेगवान ,थरारक चित्रपट पाहायचा असेल तर नेटफिक्सवर शूटर नक्की पहा .हा हिंदी भाषेत आहे.

No comments:

Post a Comment