Thursday, August 17, 2023

THE HUNT FOR VEERAPPAN

THE HUNT FOR VEERAPPAN
द हंट फॉर विरप्पन
साधारण 1987 पासून विरप्पनचा उदय होण्यास सुरुवात झाली .कर्नाटक आणि तामिळनाडूच्या वेशीवर असणाऱ्या एका गरीब गावात त्याचा जन्म झाला. असे म्हणतात की त्याने इतके हत्ती मारले की जंगलातील हत्तीच संपून गेले मग त्याने आपले लक्ष चंदनाच्या वृक्षांकडे वळविले आणि जवळजवळ सर्वच चंदनाची वृक्ष तोडून टाकली .तो क्रूर हस्तीदंत आणि चंदनचोर म्हणून प्रसिद्ध होता. तो नेहमी पोलिसांच्या दोन पावले पुढेच असायचा .
1989 ला कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांनी त्याला पकडण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स स्थापन केली .
ह्या चार भागाच्या डॉक्युमेंटरीमध्ये आपल्याला टास्क फोर्सचे प्रमुख विक्रम उर्फ टायगर आपल्याला भेटतात .तर विरप्पनची पत्नी मुथुलक्ष्मी आपल्याला त्याची कहाणी सांगते.
तामिळनाडू आणि कर्नाटकच्या वेशीवर पसरलेल्या घनदाट जंगलावर विरप्पनची सत्ता होती.हे जंगल इतके भयानक होते की काही भागात माणसेही पोचू शकत नव्हती.विरप्पन जंगलाच्या बाहेर कधीच पडत नव्हता तर टास्क फोर्स जंगलात यशस्वी होत नव्हती.
अनेक पोलिसांना त्याने क्रूरपणे मारले .कर्नाटकचे सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचे अपहरण ही सर्वात मोठी घटना होती. एकशे आठ दिवसाच्या प्रयत्नानंतर डॉ राजकुमार यांची सुटका झाली तो सर्व घटनाक्रम तिसऱ्या भागात दाखविला आहे .
विजयकुमार टास्क फोर्सचे प्रमुख झाले आणि त्यांनी विरप्पनला जंगलातून बाहेर काढण्यासाठी सापळा लावला आणि त्यात विरप्पन कसा फसला हे पाहण्यासाठी ही डॉक्युमेंटरी पहावीच लागेल.
चार भागाची ही डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे .

No comments:

Post a Comment