Thursday, August 31, 2023

DEATH AT A FUNERAL

DEATH AT A FUNERAL
डेथ ऍट अ फुनेरल
 फॅमिली मित्र परिवाराला एकत्र येण्याचे कारण अंत्यसंस्कारही असू शकतात.अश्याच एका अंत्यसंस्काराला एडवर्डची फॅमिली एकत्र आलीय.अर्थात याला कारणीभूत एडवर्डच आहे कारण तोच मृत्यू पावलाय. आपले अंत्यविधी घरीच व्हावे अशी त्याची अंतिम इच्छा होती.त्याचे घर मोठे आहे आणि फॅमिली ही.
एरॉन त्याचा मोठा मुलगा आणि त्याची पत्नी मिचेल त्या घरात राहतात.तर दुसरा मुलगा रेयॉन यशस्वी लेखक असून तो न्यूयॉर्कला राहतो. हळूहळू एडवर्डची फॅमिली त्याच्या अंत्यसंस्कारासाठी एकत्र येते.प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात.ते इथे एकत्र आल्यावर सुटू शकतील या आशेवर आलेले आहेत. एडवर्डच्या मृत्यूचे फारसे कोणाला दुःख नाहीय .एडवर्डची पुतणी इलाईन आपला मित्र ऑस्करला घेऊन आलीय.आपल्या वडिलांना ती त्यांच्याविषयी सांगणार आहे. 
तिथे फ्रॅंकही आलाय.तो कोण आहे याविषयी कोणालाच माहीत नाही.फ्रॅंक बुटका आहे .साधारण चार फूट उंचीचा.तो एरॉनला एकांतात भेटून एडवर्डविषयी एक सत्य सांगतो आणि ते ऐकून एरॉन हादरतो . तीस हजार डॉलर दिले नाहीस तर हे सत्य पुराव्यानिशी सगळ्यांना सांगेन अशी धमकी फ्रॅंक देतो आणि मग एरॉन आणि रेयॉनची सत्य लपविण्यासाठी धडपड सुरू होते आणि त्या धडपडीतून काय विनोद होतात ते प्रत्यक्षात पाहायला हवे.
ही एक ब्लॅक कॉमेडी आहे.सर्वांनी मिळून पहावी आणि हसावे इतकीच अपेक्षा या चित्रपटात आहे.
मार्टिन लॉरेन्स ,ख्रिस रॉक ,डॅनी ग्रोव्हर यात प्रमुख भूमिकेत आहेत.चित्रपट हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे.एक खुसखुशीत विनोदी चित्रपट पाहायचा असेल तर नक्की पहा.

No comments:

Post a Comment