Thursday, August 17, 2023

THE TAKING OF PELHAM 123द टेकिंग ऑफ पेल्हाम 123

THE TAKING OF PELHAM 123
द टेकिंग ऑफ पेल्हाम 123
आजचा दिवस आपल्या आयुष्यातील खतरनाक दिवस असेल हे वॉल्टर गारबरला माहीत असते तर तो कामावर गेलाच नसता . तो मेट्रो ट्रेनचा ट्रॅफिक कंट्रोलर होता .
पेल्हाम स्टेशनपासून मेट्रो 123 सुटली होती.त्या स्टेशनवर बरीच माणसे चढली होती त्यातच ती चार माणसे होती.एकाने बंदुकीच्या धाकावर ड्रायव्हरच्या केबिनचा ताबा घेतला .दुसर्याने शेवटच्या महिला गार्डला ताब्यात घेतले. ट्रेन सुरू झाली पण कोणालाच काही कळले नाही .
काही अंतर गेल्यावर सिग्नल नसताना ट्रेन थांबली म्हणून वॉल्टरला संशय आला पण तो पर्यंत उशीर झाला होता . ती ट्रेन रायडर नाव सांगणाऱ्या व्यक्तीच्या ताब्यात गेली होती.त्याने शिताफीने ड्रायव्हरच्या डब्यापासून इतर डबे वेगळे काढले आणि ते सोडून दिले.पण ड्रायव्हरचा डबा आपल्या ताब्यात ठेवून त्यात सतरा प्रवाश्यांना ओलीस ठेवले .
आता खेळ सुरू झाला वाटाघाटीचा .रायडरला वॉल्टरचे बोलणे आवडले आणि तूच वाटाघाटी करशील अशी ऑर्डर दिली.त्याने दहा करोड कॅश ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात मागितले आणि फक्त एक तास दिला .पुरावा म्हणून त्याने मोटारमनला गोळ्या घालून मारले .एका तासानंतर त्याने प्रत्येक मिनिटाला एक व्यक्ती मारेन अशी धमकी दिली .
वॉल्टर वाटाघाटीत नवखा होता .तो जमेल तसे रायडरला बोलते ठेवत होता . एक वेळ अशी आली की रायडरने वॉल्टरलाच पैसे घेऊन येण्यास सांगितले.
वॉल्टर पैसे घेऊन रायडर कसे जाईल का ?? वाटेत कोणत्या अडचणी येतील ? मुळात मेट्रो ट्रेन हायजॅक करण्यामागे  वॉल्टरचा मूळ हेतू काय आहे ??
जॉन ट्राव्होल्टाचा रायडर आणि डेंझेल वॉशिंग्टनचा वॉल्टर यांची जुगलबंदी पहायची असेल तर नेटफ्लिक्सवर हा चित्रपट नक्की पहा .
चित्रपट हिंदी भाषेत उपलब्ध आहे .

No comments:

Post a Comment