Thursday, August 17, 2023

हार्ट ऑफ स्टोन

HEART OF STONE
हार्ट ऑफ स्टोन 
इटलीच्या बर्फाच्छादित टेकडीवर तो कॅसिनो होता.तिथे जायला फक्त केबल कार आणि हेलिकॉप्टरचाच पर्याय होता.उच्चभ्रू लोक तिथे जुगार खेळायला येत .मूलवेनी  हा शस्त्रांचा व्यापारी तिथे जुगार आणि व्यवसाय करण्यासाठी येणार होता. एमआय 6 चे एजंट त्याला पकडण्यासाठी हजर होते. रॅचेट स्टोन, बिली ,पार्कर प्रत्यक्षात त्याला अटक करणार होते.
पण त्याच्या चतुर सिक्युरिटीने हा डाव उधळून लावला .पार्करने मूलवेनीला पकडले आणि केबल कारमधून ते बाहेर पडले पण मध्येच मूलवेनीने सायनाईड खाऊन आत्महत्या केली.
चार्टर एक शांतीसाठी काम करणारी संस्था .तिनेच स्टोनला एमआय 6 मध्ये घुसविले आहे .हार्ट असे एक उपकरण आहे ज्याने जगातील कोणतीही सिस्टीम हॅक करू शकते .कंट्रोल करू शकते.ती कोणत्याही बँकेत घुसू शकते जगातील कुठलेही मिसाईल स्वतःच्या ताब्यात ठेवू शकते. चार्टरने हार्टला कडेकोट बंदोबस्तात मोठ्या बलूनच्या आकारातील विमानात अंतराळात ठेवले आहे.
किया धवनने चार्टरची संपूर्ण सिस्टीम हॅक केली आणि बलून जमिनीपासून 40 हजार फुटावर आणले .त्यातून तिने हार्टची चोरी केली.आता हार्टचे वापरकर्ते चार्टरच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या मागे लागलेत .
स्टोनने हार्ट परत आणण्याची जबाबदारी स्वीकारली तिच्या हातात फक्त पन्नास मिनिटेच आहेत आपल्या प्रमुख अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी .त्यात ती यशस्वी होईल का ??
चित्रपटाची लोकेशन फार सुंदर आहेत .इटली ,आफ्रिका ते आईसलँड अश्या लोकेशनवर चित्रपट शूट केला आहे .हा चित्रपट प्रचंड हायटेक संकल्पना वापरून केला आहे.चित्रपटात प्रचंड हाणामारी ,सुसाट वेगाने पाठलाग आहेत.पण तीही अतिशय सुंदररितीने चित्रित केली आहे.
किया धवनच्या भूमिकेत आलिया भट छाप पाडून गेलीय. ज्यांना स्पाय आणि हाय टेक टेक्नॉलॉजी वापरून तुफान हाणामारीचे चित्रपट पहायचे असतात त्यांना हा चित्रपट नक्कीच आवडेल .
चित्रपट हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे.

No comments:

Post a Comment