Thursday, August 31, 2023

ब्रो

BRO
ब्रो
मृत्यूनंतर आपल्या परिवाराचे काय होईल ही भीती प्रत्येकालाच असते.
मार्कंडेय उर्फ मार्क आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करतो.लहानपणीच त्याचे वडील गेले आणि आई भाऊ दोन बहिणींची जबाबदारी त्याच्यावर आली.तो आता मोठ्या कंपनीत कामाला आहे. लवकरच जनरल मॅनेजरही बनणार आहे.त्याची एक प्रेयसीसुद्धा आहे..पण आपल्या कुटुंब स्थिर झाल्याशिवाय लग्न करायचे नाही असे तो म्हणतो.आपल्या परिवाराने आपले ऐकलेच पाहिजे असा काही हट्टी स्वभाव झालाय त्याचा.
आता भाऊ अमेरिकेत नोकरी करततोय.एक बहीण लग्नाच्या वयात आलीय. तर दुसरी कॉलेजला जातेय. या सर्वांची काही स्वप्ने आहेत पण मार्कच्या म्हणण्यानुसार वागावे लागतेय.
एके दिवशी फॅक्टरी व्हिजिट करून येत असताना त्याच्या गाडीचा अपघात होतो. जाग येते तेव्हा कळते तो एका अंधाऱ्या खोलीत आहे .पण अचानक एका प्रकाशात त्याच्यासमोर तो येतो.
तो स्वतःला वेळ टाईम किंवा समय असे संबोधतो. तो आहे दूत. तो मार्कला घेऊन आलाय.मार्क हे ऐकताच हादरतो. अजून आपल्याला परिवारासाठी खूप काही करायचे आहे असे सांगतो. ते आयुष्यात सेटल झाले नाहीत असे सांगतो.मार्क त्याला ब्रो म्हणतो.मला परत पाठव असे गयावया करत सांगतो.शेवटी तो मार्कला फक्त नव्वद दिवस देतो आणि मी तुझ्यासोबत राहीन अशी अट घालून परत पाठवतो .
आता मार्कच्या हातात फक्त नव्वद दिवस आहेत.या नव्वद दिवसात त्याला आपल्या परिवाराला सेटल करायचे आहे .त्याला हे शक्य होईल.
जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय ...भा. रा. तांबेच्या या कवितेला समर्पक असा हा चित्रपट आहे.
आपल्या मृत्यूने काही दिवसच परिवारावर फरक पडेल नंतर मात्र ते स्वतः खंभीरपणे स्वतःची स्वप्ने पूर्ण करतील असाच संदेश हा चित्रपट हलक्या फुलक्या विनोदी अंगाने देतो.
पवन कल्याण दूताच्या भूमिकेत बाजी मारून जातो.तर मार्कच्या भूमिकेत साई धरम तेजने छान साथ दिलीय. बाकी साऊथचे नेहमीचे कलाकार आहेत.
सहकुटुंबाने एकत्रितपणे पहावा असा हा चित्रपट नेटफिक्सवर हिंदी भाषेत आहे.

No comments:

Post a Comment