Kondal
कोंडल
मॅन्युअलचे गाव समुद्रकिनारीच होते.त्यामुळे मासेमारी हा प्रमुख व्यवसाय.पण राजकारणी लोक गावाचा विकास होऊ देत नव्हते.तसेच मासेमारीत ही भ्रष्टाचार होत होता.मॅन्युअलचा या गोष्टीला विरोध होता.तो नेहमीच गवकऱ्यांच्या बाजूने उभा राहत होता.
एके दिवशी मोठा वाद होऊन त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले.मॅन्युअलला काही दिवस गाव सोडून जावे लागले.तो बंदरावर जाऊन एका मासेमारी करणाऱ्या बोटीवर कामाला लागला.आता बोट किनारा सोडून समुद्रात शिरली. साधारण दहा लोक बोटीवर आहेत.ती बोटच त्यांचे जग आहे.
पण त्या बोटीवर काहीतरी रहस्यमय गोष्ट आहे.मॅन्युअलही काही खास कामासाठीच या बोटीवर आलाय असा काहींचा संशय आहे.
असे काय आहे त्याचा शोध मॅन्युअल घेतोय. या बोटीवर त्याच्या जीवाला धोका आहे तरीही तो तिथे टिकून आहे.
सुरवातीला संथ वाटणारा हा चित्रपट बोट सुरू झाल्यावर पकड घेत जातो. यातील ऍक्शन सीन अतिशय चांगले आहेत.समुद्रावर बोटीतील चित्रीकरण बघण्यासारखे. तर मॅन्युअलची शार्कविरुद्धची लढत श्वास रोखते.
यातील कलाकार नेहमीच आजूबाजूला दिसणारी नॉर्मल माणसे आहेत.सर्वजण दाढी मिश्या वाढवून लुंगी नेसून समुद्रावर वावरतात.
अँथनी वर्गीसने मॅन्युअल ची प्रमुख भूमिका केली आहे.ज्यांना ऍक्शन ,थ्रिलर चित्रपट पाहायला आवडतात त्यांनी नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत हा चित्रपट जरूर पहावा.
No comments:
Post a Comment