Saturday, July 7, 2018

द डेव्हील्स अल्टरनेटीव्ह .... फ्रेडरिक फोरसिथ

द डेव्हील्स अल्टरनेटीव्ह .... फ्रेडरिक फोरसिथ
अनुवाद.....रमेश जोशी
रशियात एक शुल्लक चुकीमुळे भीषण दुष्काळ पडला आहे . जास्त गहू  बाहेरून आयात करावा लागेल आणि मास्कोला अमेरिकेशिवाय पर्याय नाही .
युक्रेनच्या क्रांतीकारकांना रशियापासून स्वातंत्र्य हवेय . त्यांना एक मोठा धक्का द्यावा म्हणून केजीबीच्या प्रमुखांच्या हत्येचा कट रचला जातो आणि तो यशस्वीही होतो .
दहा लाख टन क्रूड ऑइल वाहून नेणारे जहाज फ्रेडा आपल्या पहिल्या वाहिल्या सफरीसाठी तयार झालीय . तिने जपानवरून प्रस्थान केलय .
युक्रेन क्रांतिकारकांनी आपले काम चोख बजावले पण त्यानंतर विमान अपहरण करून ते इस्त्रायलला नेताना त्यांना पकडण्यात आले आणि पश्चिम जर्मनीच्या तुरुंगात डांबण्यात आले . मास्कोने केजीबी प्रमुखाची हत्या लपवून ठेवली.
आपल्या साथीदारांना  सोडविण्यासाठी युक्रेन क्रांतिकारकांनी एक वेगळीच योजना आखली. त्यांनी आयर्लंड येथे नांगर टाकून बसलेल्या फ्रेडाचे अपहरण केले . साथीदारांना सोडा नाहीतर कॅप्टनसकट तीस खलाशी आणि जहाज उडवून देऊ शिवाय दहा लाख टन क्रूड ऑइल समुद्रात सोडून देऊ अशी धमकी दिली.
ते ऑइल समुद्रात सोडले तर पर्यावरणाची आणि पाच देशांच्या समुद्रकिनार्यांची अपरिमित हानी झाली असती .
साऱ्या जगाचे लक्ष या अपहरण नाट्यकडे लागले आहे . मारेकऱ्यांना सोडू नये म्हणून रशियाचा दबाव येतोय. राष्ट्राध्यशांच्या खुर्चीला धक्का बसू शकतो .
कोण आणि कसा काढेल यातून मार्ग.
संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे
शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवणारी कादंबरी .

No comments:

Post a Comment