Sunday, July 1, 2018

मृत्यूवर मात ( चिटिंग डेथ )

मृत्यूवर मात ( चिटिंग डेथ )
मूळ लेखक ..... डॉ.  संजय गुप्ता
संशोधक ...... कॅलिब हेलरमन
अनुवाद .....गौरी गाडेकर
मेहता पब्लिकेशन
ऍना बागनहॉम नार्वेतील बर्फाळ शिखरावर स्कीईग करायला गेली आणि अपघातात सापडली .ती बर्फात एक तासांपेक्षा जास्त वेळ अडकली होती . क्लीनिकली ती मृत होती .
माईक मर्ट्झ एका शाळेत बस ड्रायव्हर होता .एका अपघातात सापडला आणि त्याचे हृद बंद झाले .
अफगाणिस्तानातील खिंडीत डोंगरात जखमी झालेल्याना भर युद्धात वैद्यकीय मदत कशी मिळेल. भरपूर रक्तस्त्राव होऊनही तो सैनिक कसा वाचेल??? त्याचे हृदयातचे ठोके थांबवून परत  चालू करता येतील का ????
अजून त्या बाळाचा जन्मही झाला नाही पण त्याच्या हृदयात प्राणघातक दोष आहे .
डॉक्टरांनी आशा सोडलेला कोमातील रुग्ण
केवळ हृदयाचे ठोके बंद पडले आणि श्वास थांबला म्हणजे माणूस मृत झाला नाही . काही वर्षांपूर्वी अश्या रुग्णाची आशा डॉक्टरांनी सोडून दिली असती .पण नवीन वैद्यकीय संशोधनामुळे आज हे जिवंत आहेत तर धडधाकट ही आहेत . लेखक प्रसिद्ध न्यूरो सर्जन आणि लेखक डॉ. संजय गुप्ता विज्ञानाचा आधार घेऊन हे चमत्कार नोंदवतात . जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा मानवी शरीराची आत काय हालचाल सुरू असते ते सर्व आपल्याला हे डॉक्टर सांगतात.

No comments:

Post a Comment