Friday, September 6, 2019

दि ग्रेट डिक्टेटर्स ....डॉ. संजय कप्तान

दि ग्रेट डिक्टेटर्स ....डॉ. संजय कप्तान
श्रीराम बुक एजन्सी
आपण सर्वात मोठा हुकूमशहा हिटलरला समजतो. दुसरे महायुद्ध घडविणारा जर्मनीचा सर्वेसर्वा.
पण रशियाचा जोसेफ स्टॅलिन हा त्याच्यापेक्षा ही क्रूर होता . त्याच्याबद्दल फारशी कोणाला माहिती नाही . लेखकाने या पुस्तकात हिटलरला स्थान दिले नाही . पण त्याने स्टॅलिनला पहिला क्रमांक दिला आहे . त्यानंतर आपल्याला फारसे माहीत नसलेल्या हुकूमशहांची माहिती या पुस्तकात दिली आहे . लेखकाने त्यांच्या क्रूर छळाची माहिती देण्यापेक्षा त्यांची जीवनकथा सांगण्यावर भर दिला आहे .सोव्हिएत युनियनचा निकिता क्रुशचेव्ह .,इटलीचा बेनीटो मुसोलिनी,डोमिनीकन रिपब्लिकचा अतिशय क्रूर समजला जाणारा ट्रूजिलो ,इंडोनेशियाचा वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून शत्रूला ठार मारणारा अहमद सुकारणो ,कौर्याची परिसीमा गाठणारा हैतीचा पापा डूव्हॅलीयर असे अनेक पडद्याआड असलेले हुकूमशहा समोर आणले आहेत . यांचा जीवनपट ,प्रगती आणि ऱ्हास  आपल्यासमोर मांडला आहे . आंतरराष्ट्रीय इतिहासाची आवड असणाऱ्यांना हे पुस्तक वाचायला हवेच

No comments:

Post a Comment