Monday, March 4, 2024

हाऊस ऑफ निन्जा

House Of Ninjas
हाऊस ऑफ निन्जा
सूची आणि योको तावरा हे जपानमधील सुखी कुटुंब . हरू हा तरुण मुलगा ,आजू मुलगी,नोबुको म्हातारी आई आणि दहा वर्षाचा छोटा मुलगा असे सर्व जपानमधील जुन्या वडिलोपार्जित मोठ्या घरात राहतात. हरू डिलिव्हरी बॉयचे काम करतो .तर त्याच्या वडिलांची सूचीची छोटी फॅक्टरी आहे.ती ते कशीबशी चालवितात. हरूची बहीण कॉलेजमध्ये शिकते.
पण हे त्यांचे फक्त वरवर दाखविण्यासाठी आहे.खरे तर ते पाचशे वर्ष जुन्या शिनोबी परिवारातील निन्जा आहेत. ते समाजात लपून राहातायत.
सहा वर्षांपूर्वी एका मोहिमेत त्यांनी आपल्या मोठ्या मुलाला गाकूला गमावले आहे आणि तेव्हापासून ते सर्वसामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करतायत.
पण जपानमध्ये शिनोबी परिवाराचे परंपरागत शत्रूही आहेत जे त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांना जपानवर आपल्या परिवाराचे वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे.
करेन नावाची पत्रकार तरुणी या प्रकरणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करते त्यातून तिला पाचशे वर्ष जुन्या शिनोबी निन्जा परिवाराची माहिती कळते.
 जपानवर असे कोणते मोठे संकट येणार आहे त्यामुळे पुन्हा या तावरा कुटुंबाला निन्जा बनावे लागणार आहे ??
जपानचे परंपरागत निन्जा योद्धांची ही अफलातून कहाणी नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहेत आहे.
चपळ हालचाली ,तुफान तलवारबाजी ,निन्जाचे हस्तकौशल्य पहायचे असेल तर ही मालिका नक्की पहा.

No comments:

Post a Comment