Sunday, March 10, 2024

कॅप्टन मिलर

Captain Miller
कॅप्टन मिलर
अनालिसन उर्फ ईसा खालच्या जातीतील तरुण . वरच्या जातीचे राजे महाराजे आपल्याला हीन वागणूक देतात ,देवळात जाऊ देत नाहीत म्हणून चिडलाय. त्याचा मोठा भाऊ सेनगोलन  क्रांतिकारक आहे.ब्रिटिशांविरुद्ध अहिंसेने लढतोय.आपले लोक नाही निदान ब्रिटिश लोक तरी आपल्याला समान वागणूक देतील म्हणून सैन्यात जातो आणि गावाचा रोष पत्करतो.
ईसाला ब्रिटिश आर्मीत मिलर नाव दिले. त्याच्या पहिल्याच कामगिरीत आपल्याच देशातील शांततेने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर गोळ्या घालण्याची आज्ञा दिली .तीनशे आंदोलक त्यात मारले गेले .त्यात सेनगोलंही होता .सहन न होऊन ईसाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यालाच ठार मारले आणि बंडखोर झाला.
आता तो लूटेरा बनून ब्रिटिश आर्मीची हत्यारे लुटू लागलाय. पण त्याच्या गावात त्याला स्थान नाही .तो धड लूटेराही नाही आणि क्रांतिकारकही नाही.
गावातील जमीनदाराने आपला सहाशे वर्ष जुना देव ब्रिटिशांच्या हवाली केला.गव्हर्नरला गाव खाली करून त्याजागी शिकारीचे पार्क करायचे आहे.त्याने गावातील सर्व लोकांना ठार मारण्याची किंवा मिलरला आत्मसमर्पण करायची आज्ञा दिली.
मिलर ब्रिटिशांकडून आपला देव परत मिळवेल का ?
तो स्वतःला स्वाधीन करून गाव वाचवेल का ?
गावातील लोकांना मंदिरात जायची परवानगी मिळेल ?
1930 सालातील कॅप्टन मिलरचा ब्रिटिशांविरुद्धचा लढा पाहायचा असेल तर प्राईम व्हिडिओवर कॅप्टन मिलर हिंदी भाषेत पहा.
धनुषने कॅप्टन मिलरची प्रमुख भूमिका केली आहे तर त्याला साथ द्यायला शिव राजकुमार ,सुदीप किशन, प्रियांका मोहन आहेत.

No comments:

Post a Comment