Friday, March 8, 2024

मामला लीगल है

Maamla Legal Hai
मामला लीगल है 
शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात.कोर्टात कायदेशीर भाषा आणि कलमे वापरून खोट्याचे खरे आणि खऱ्याचे खोटे करता येते.
ही कथा आहे दिल्लीतील पटपडगंज डिस्ट्रीट कोर्टातील.हे कोर्ट नेहमीचे साधे कोर्ट आहे.वकील भरपूर पण बर्याचजणाना अजून चेंबर नाही.वकील रस्त्यावरच टेबल टाकून बसले आहे. अडव्होकेट वी. डी. त्यागी तिथल्या बार असोसिएशनचा अध्यक्ष आहे.  त्याला दिल्ली बार असोसिएशनचा अध्यक्ष बनायचे आहे आणि त्यासाठी तो विविध योजना आखतो. सुजाता पण वकील आहे पण चेंबर नसल्यामुळे तिच्याकडे केसेस येत नाही असे तिला वाटते.ती मध्यस्थ बनून त्यावर कमिशन घेत असते .अनन्या श्रॉफ हावर्डमधून डिग्री घेऊन आलीय.ती प्रामाणिक आणि कायद्याने वागणारी आहे.तिला कोर्टात येताच सत्य परिस्थितीची जाणीव होते तरीही आपली तत्वे सोडत नाही. विश्वास पांडे हा कोर्ट मॅनेजर परिस्थितीनुसार वागणारा .तो अनन्याला जमेल तितकी मदत करतो.
या आठ भागाच्या सिरीजमध्ये आपल्याला वकिलांचे विविध किस्से विनोदी पद्धतीने पाहायला मिळतात.यातील पात्रे वाईट नाहीत तर परिस्थितीमुळे वाकलेली आहेत.
रविकिशन वी.डी. त्यागीच्या प्रमुख भूमिकेत आहे.आपण चांगल्या विनोदी भूमिका ही करू शकतो हे त्याने दाखवून दिलंय.
ही सिरीज नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

No comments:

Post a Comment