Friday, March 29, 2024

कस्टडी

Cusrody
कस्टडी
शिवा उडाणटप्पू तरुण. घरी आईवडील, मोठा भाऊ, छोटी बहीण आहे. वडील शवागृहात कामाला आहेत तर मोठा भाऊ पोलीस ऑफिसर होणार आहे.एकदा  मोठा भाऊ वडिलांसाठी औषध आणायला बाजारात जातो तेव्हा गटारात  गॅसचा मोठा स्फोट होतो आणि इतरांचे प्राण वाचवताना तो मारला जातो.त्याची नोकरी शिवाला मिळते. 
आता त्या घटनेला पाच वर्षे झाली. आज शिवा पोलिस कॉन्स्टेबल आहे.तो आपले काम प्रामाणिकपणे करतोय.
रेवती त्याची प्रेयसी .तिचे लग्न दुसऱ्याशी ठरतेय म्हणून तिला पळवून नेण्यासाठी शिवा रात्री पोलीस स्टेशनमधून बाहेर पडला.पण रस्त्यात त्याच्या गाडीला दुसऱ्या गाडीने ठोकले. त्या गाडीत दोन व्यक्ती होत्या.दोघेही एकमेकांवर हल्ला करीत होते .त्यातील एक स्वतःला सीबीआय ऑफिसर सांगत होता तर दुसरा राजू नावाचा मोठा गुंड होता. शिवाने दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये बंद केले.पण चौकशी करताना खरे सत्य बाहेर आले.
सीबीआय ऑफिसरला दोन दिवसात राजुला कोर्टात उभे करायचे आहे .पण आता त्याच्याच जीवाला धोका आहे.बोलताना तो राजुची सर्व माहिती शिवाला देतो .बाजारातील स्फोटात राजूचाच हात होता हे शिवाला कळते .
अचानक काही पोलीस राजू आणि सीबीआय ऑफिसरला भेटायला येतात . त्यांना अतिशय उच्च पातळीवरून पाठवण्यात आले असते.ते हल्ला करून सीबीआय ऑफिसरला ठार मारायचा प्रयत्न करतात पण त्यात राजू जखमी होतो . आता शिवा ,सीबीआय ऑफिसर राजुला घेऊन पळतात वाटेत राजूची प्रेयसी त्यांना भेटते .मग ते तिघेही जखमी राजूला घेऊन बंगलोरच्या दिशेने प्रवासाला सुरवात करतात .
पण ते दोन दिवसात बंगलोर कोर्टात पोचतील का ?? रस्त्यात त्यांना अनेक अडथळे आहेत .पोलीस आणि राजूचे गुंडही त्यांच्या मागे आहेत .
हा जीवघेणा प्रवास रस्त्यावरून खोल पाण्यात ,मग पुन्हा पायी, पुन्हा जंगलात मग ट्रेन मधून होतो.
शिवा राजूला घेऊन कोर्टात वेळेवर पोचेल का ??
नागा चैत्यन्य, अरविंद स्वामी , प्रियामणी प्रमुख भूमिकेत आहेत.
एक थरारक प्रवास अनुभवायचा असेल तर प्राईम व्हिडीओवर हिंदी भाषेत कस्टडी जरूर पहा.

No comments:

Post a Comment