Thursday, March 14, 2024

MERCY

MERCY
मर्सि
मिचेल मिलर सैन्यात डॉक्टर असते.तिचा नवरा ही सैन्यात बॉम्ब स्कॉडमध्ये आहे.ते अफगाणिस्तानमध्ये असताना बॉम्बस्फोटात तिच्या नवऱ्याचा मृत्यू होतो.
या गोष्टीला दोन वर्षे उलटून गेली आहेत.आता डॉ. मिचेल एका हॉस्पिटलमध्ये काम करतेय. ती मुलगा  बॉबसोबत सुखी आहे.
एफबीआयने रायन क्वीनला अटक केलीय.रायन क्वीन हा कुप्रसिद्ध माफिया पॅट्रीक क्वीनचा मुलगा.पॅट्रिक आपला सर्व व्यवसाय रायनला देणार हे त्याच्या  मोठ्या मुलाला सिनला पसंद नाही.तो रस्त्यातच रायन आणि एफबीआयच्या टीमवर हल्ला करतो. त्यात बरेचजण मारले जातात.रायनला एक एफबीआय एजंट जखमी अवस्थेत मर्सि हॉस्पिटलमध्ये घेऊन येथे जिथे मिचेल त्याचा जीव वाचवते. मिचेलचा मुलगा बॉबही आईला भेटायला आलाय.
रायनवर हल्ला झालाय हे कळताच पॅट्रीक हॉस्पिटलमध्ये धाव घेतो तर रायन जिवंत असल्यास आपले बिंग फुटेल याची भीती वाटून सिनही  तेथे साथीदारांसह पोचतो. ते हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांना ओलीस धरतात. पॅट्रीकला रायन जिवंत हवाय तर सिन रायनला ठार मारण्याची संधी शोधतोय.पण त्यांच्यामध्ये मिचेल उभी आहे. ती रायनला जिवंत ठेवून सर्वांचे प्राण वाचवेल का ?
एक उत्कंठा वाढविणारा थरारक चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

No comments:

Post a Comment