Tuesday, March 12, 2024

RED QUEEN

Red Queen
रेड क्वीन
अंटॉनिया स्कॉट जगातील सर्वात बुद्धिवान स्त्री.तिचा आयक्यू 242 आहे.एका गुप्त पोलीस विभागात ती काम करते.तिला रेड क्वीन म्हटले जाते.हा गुप्त विभाग हाय प्रोफाइल ज्याची प्रसिद्धी होणार नाही अश्या प्रकरणाचा तपास करतोय.
एका प्रसिद्ध उद्योगपतीच्या मुलाची हत्या होते. अंटॉनिया बुद्धिमान असल्यामुळे थोडी सनकी आहे.तिला कंट्रोल करण्यासाठी गोळ्या घ्याव्या लागतात.तिचा नवरा कोमात आहे ती त्याला  रोज हॉस्पिटलमध्ये भेटायला जाते.
इंस्पेक्टर जॉन गुटीझवर पुरावे लपविण्याच्या आरोपाखाली चौकशी चालू होती.तो एक जाडजूड  गे इसम आहे.अंटॉनियाचा मदतनीस म्हणून त्याची नेमणूक होते. सुरवातीला त्यांचे खटके उडतात.अंटॉनियाची कामाची पद्धत त्याला पटत नाही .पण अंटॉनिया अतिशय बुद्धिमान असल्यामुळे तिचे अंदाज बरोबर ठरत जातात.
लारा ही एक श्रीमंत उद्योगपतीची मुलगी.मॅगी नावाच्या घोड्यावर तिचे अतिशय प्रेम आहे.एक दिवस तिचे अपहरण होते.तिचा ड्रायव्हर आणि प्रिय घोडा मारला जातो.तिचा शोध घेण्याची जबाबदारी रेड क्वीनवर आहे. 
या प्रकरणाचा शोध घेताना अनेक अनपेक्षित धक्के आपल्याला बसतात. तर रेड क्वीनची अनेक रहस्ये आपल्यासमोर ओपन होतात. शेवटी ते लाराचा शोधून काढतात का ??
एक अप्रतिम सिरीज प्राईम व्हिडिओवर हिंदी भाषेत आहेत.नक्की पहा.

No comments:

Post a Comment